हृदयसंवाद (१) : प्रास्ताविक व स्वागत
सन 2018 मध्ये मी आपल्या आणि अन्य एका संस्थळावर “ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’वर शिक्कामोर्तब“ हा लेख लिहिला होता आणि त्यावर चर्चाही झाली होती. त्यानंतर ऑगस्ट 2023मध्ये ध्यानीमनी नसताना त्या लेखाच्या एका वाचकांनी अन्यत्र स्वतःच्या हार्ट अटॅकसंबंधी अनुभवकथन केले. त्यात त्यांनी ट्रोपोनिनच्या त्या लेखाचा जीवरक्षक म्हणून उपयोग झाल्याचे नमूद केले. ते वाचून आनंदयुक्त समाधान वाटले. त्या निमित्ताने हृदयविकारावर अनेकांशी व्यक्तिगत संपर्कातून ओझरती चर्चा झाली.