आज कल पाव जमीं पर .......

सावि's picture
सावि in जनातलं, मनातलं
13 Apr 2024 - 10:46 pm

आज कल पाव जमीं पर .......

हो हो अगदी असंच वाटतंय मागचे ३ आठवडे झाले. पण ही भावना सुद्धा थोडी अर्धवट च आहे, कारण माझा एकच पाय जमिनीवर आहे.

गुडघा दुखत होता म्हणून डाव्या गुडघ्याची एक छोटीशी मिनिस्कस रिपेअर सर्जरी झाली ३ आठवड्यापूर्वी. हा पाय आणि जमिनीचा स्पर्श ३ आठवडे साठी वर्ज आणि अगदी तेंव्हा पासून मी सगळ्या गोष्टींसाठी एका पायावर तयार असतो !

एक पाय हवेत - "आज मैं उपर आसमा नीचे" गुणगुणत होता तर दुसरा पाय जमिनीवर संपूर्ण भार घेऊन दुःखी शायर बनला होता "बहोत छालो का दुख है नसीब में, शायद उसुलो पे चलने कि सजा मिली है".

बरं सगळं काम जमिनीवरचा पाय करत असला तरी कौतुक हवेतल्या पायचेच .. अर्धवट मीनाकुमारी झाल्यासारखं, राजकुमार समोर बसून म्हणतोय - आपके पाव देखे, बहोत हसीन है, जमीन पर मत रखिये मैले हो जायेंगे. आजकल पाव जमी पर नही पडते मेरे म्हणत रेखा सारखं मोहरून जावंसं वाटतं तर लगेच दुसरा पाय स्वतःलाच जमिनीवर आणून सत्यात उतरवतो. बहुधा त्याला सुद्धा वाटते मीना कुमारी किंवा रेखा नाही .. पण किमान बीना तरी बनावं आणि कितीही ठोकळा असला तरी प्रदीप ने रफी च्या आवाजात म्हणावं - पाव छू लेने दो फुलों को इनायत होगी... !! पण कसचं काय, पायाखाली फुलं सोडा, तो तर बिचारा बाथरूम मधल्या खाली सांडलेल्या पाण्यापासून कसं वाचावं, याचा विचार करत एका पायावरची कसरत करत असतो !!

कधी कधी वाटते सुधा चंद्रन सारखं एका पायावर गिरक्या घेऊन नाचे मयुरी करावे. डॉन मधला प्राण व्हावं ... एका पायावर जरी असलो तरी इकडून तिकडे टणाटण उड्या माराव्या आणि अनेक करामती कराव्या ... इतकं सुंदर जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र माझा उपकार मधला प्राण चा मलंग चाचा झाला आहे.

माझ्या आई ने आणि आजी ने अनुभवलं तेच आता बायको आणि मुलगी अनुभव करेल... तीच उत्सुकता तोच वाट बघण्याचा काळ उद्या संपणार आहे... उद्या मी माझ्या पायावर उभा राहणार...

आणि मी कितीही नाही म्हणत असलो तरी त्या बहुतेक म्हणतील च ...

डिगी डिगी बाला कशा उभा लहिला !!

कथालेख

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2024 - 12:37 pm | चौथा कोनाडा

छान, खुसखुशीत लेखन !
आ व ड ले !

आज तुम्ही तुम्च्या स्वत:च्या पायावर उभा राहणार तर ...
हार्दिक शुभेच्छा !

कर्नलतपस्वी's picture

14 Apr 2024 - 3:31 pm | कर्नलतपस्वी

तेव्हा खालील गाणे जरूर गुणगूणा...

बुजुर्गोने .....बुजुर्गोने
कहाँ की अपने पैरोंपे खडे हो के दिखलाओं ......

सावि's picture

14 Apr 2024 - 5:38 pm | सावि
सावि's picture

14 Apr 2024 - 5:38 pm | सावि
अहिरावण's picture

14 Apr 2024 - 7:40 pm | अहिरावण

चला आत्म निर्भर होण्यासाठी तुम्ही उभे राहिलात.
आता पायांनी चालत जाऊन मतदान करा. योग्य उमेदवार निवडा.
देशसेवा करा. कुटुंबाने या काळात जी तुम्हाला आस्था दाखवली, काळजी घेतली ते ऋण आजन्म विसरु नका.

भागो's picture

14 Apr 2024 - 9:28 pm | भागो

माझ्या शुभेच्छा!

खूप छान लिहीले आहे. लेखात जुनी गाणी गुंफणे हा माझाही आवडता उद्योग आहे. मिपावर असे बरेच लेखन केले आहे. हे वाचून मला मुकेशचे हे गाणे आठवले:

दो कदम तुम न चले... दो कदम हम न चले
आरज़ूओं के दीये बुझ गए जलते जलते

हम तो आंखों मे बसा लेंगे तुम्हारे गम को
तुम कभी भूल के भी याद न करना हमको
अपनी मंजिल तुम्हे मिल जायेगी चलते चलते

वक़्त ने जहर भरा प्यार के पैमानों में
हो गए ख्वाब सुलगते हुए वीरानों में
जान से जायेंगे हम दर्द के ढलते ढलते ...

दो कदम तुम न चले दो कदम हम न चले
आरज़ूओं के दिए बुझ गए जलते जलते ..

(एक हसीना दो दीवाने १९७२. मुकेश-कल्याणजी आनंदजी)

नगरी's picture

17 Apr 2024 - 4:23 pm | नगरी

मस्तच,लिहायचे खूप आहे,नंतर. लाईट गेले आहेत.