भल्याभल्यांसाठी आव्हान ठरणारं रोलँ गॅरोस

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
4 Jun 2024 - 10:46 pm

पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex) यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी पाहत आलेली आहेत. त्यामुळे रोलँ गॅरोस संकुलातील मध्यवर्ती कोर्ट असलेल्या फिलीप चॅर्टिएर कोर्टावर (Philippe Chartier) आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेले आहेत. 14 वेळा ही स्पर्धा जिंकणारा स्पॅनिश टेनिसपटू राफाएल नादाल 2024 च्या स्पर्धेत पहिल्या फेरीतच बाहेर पडला आहे.

इतिहाससमीक्षालेखबातमीमाहितीविरंगुळा

बाजारगप्पा-भाग-३

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
4 Jun 2024 - 9:08 am

मागील दोन्ही भाग वाचला नसेल तर विनंती आहे की पहील्या भागापासुन वाचुन घ्या नाहीतर काहीच कळणार नाही. तर मागील भागात आपण एक मनी मॅनेजमेंट कशी करावी ते बघितले त्यालाच आता पुढे नेऊन जाऊ. तर मागे म्हणालो तसे मनी मॅनेजमेंट आणि माइंडसेट हे क्लोजली इन्टरकनेक्टेड आहेत. जसे शरीर आणि मन. पण शरीर समजा मनी मॅनेजमेंट आहे आणि माइंडसेट मन च आहे की. तर तुम्ही बघा सुरुवात शरीराकडुन करणे सोपे आहे तुम्ही आंघोळ केली तुमच्या मनाला फ्रेश वाटेल तुम्ही संभोग केला तुमच्या मनाला आनंद होइल. तर शरीराकडुन सुरुवात करत मनाला नियंत्रित करणे तुलनेने सोपे आहे. आणि दोन्ही एकच आहेत.

मांडणीप्रकटन

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ४

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
4 Jun 2024 - 1:07 am

२२ मे २०२४
आज ध्यानाचा तिसरा दिवस.
आज इथं येऊन चार दिवस पुर्ण झाले. आता असं वाटतं की जणु आपण कित्तीतरी काळापासुन इथेच होतो. आयुष्याला एक रीतसर दिनचर्या प्राप्त झाली आहे, नित्यनेम प्राप्त झाला आहे. एखाद्या जागी तुम्ही फोटो घ्यायचे बंद केलेत की समजुन जावं की आता तुम्ही तिथं रुळला आहात!
आता संपुर्ण वेळ ध्यान , योग आणि चिंतन बस इतकेच !

धर्मअनुभव

तो

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
3 Jun 2024 - 4:17 pm

दूरवरून दिसणारा अथांग तो! नेहमी ओढ लावणारा! राजापूरकडून देवगडला संध्याकाळी येत असताना पश्चिमेकडे दूरवर चमकताना दिसणारा तो! नीट बघितल्यावर दूरवर दिसणारी त्याची लांब पसरलेली निळी पट्टी! त्याची भव्यता आणि त्याचा विस्तार! कधी कधी अगदी जवळ येईपर्यंत न दिसणारा आणि ऐकूही न येणारा तो! इतका अजस्र असूनही त्याचं त्याच्या मर्यादेतलं असणं! सध्या कोकणात देवगडला एका निवांत जागी राहण्याचा व परिसरामध्ये फिरण्याचा योग आहे. इतका शांत आणि अप्रतिम निसर्ग. निसर्गाच्या जवळ येणं एक प्रकारे ध्यानाचा अनुभव देऊन जातं. आज देवगड- कुणकेश्वर किनारी रस्त्याने सायकल चालवण्याचा आनंद लुटला. अक्षरश: लुटला. स्वर्गसुख.

आरोग्यप्रवासअनुभवआरोग्य

जल्लोष (निवडणूक निकाल स्पेशल)

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
3 Jun 2024 - 2:00 pm

निवडणूक मग ती विधानसभेची असो की लोकसभेची, मी खूप उत्सुक, उत्साही आणि अधीर होते. मतदानाचा दिनांक जाहीर होतो आणि तो माझ्या पक्का लक्षात राहतो.

ती तारीख जवळ येत चालली की माझा उतावीळपणा वाढत जातो.

"आपली नावं आहेत ना मतदारयादीत? चेक करा. तुम्ही खात्री करून घेतली आहे ना? मतदान केंद्र नेहमीचंच ना? सकाळी लवकर जावून मतदान करुन येऊया हं! उशीर नको. आपला पहिला नंबर हवा. पहिला चहा, ब्रेकफास्ट मतदानानंतर करायचा." .. अशी कटकट मी घरच्यांच्या कानाशी सुरु करते आणि तेही होकार देऊन देऊन बेजार होतात.

मुक्तकप्रकटनविचार

टूलकिट्स : २०२४ ते २०२९

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in राजकारण
2 Jun 2024 - 11:04 am

प्रस्तावना : तुर्तास आम्ही आमच्या हिमालयातील भटकंतीवर सविस्तर, प्रांजळ आणि कोणत्याही प्रकारे राजकारण विरहीत अशी लेखमालिका लिहिण्यात व्यग्र होतो मात्र तिथेही काही लोकांनी येऊन प्रतिसादात स्कोअर सेटलिंग करायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने डोक्यात चमकुन गेली.
मी ज्या आश्रमात रहात होतो तेथुन जवळच्याच एका पुरातन मंदिरात खुद्द स्वामी विवेकानंद ह्यांनी त्यांच्या साधना काळात येऊन तपश्चर्या साधना केलेली होती . त्यांचे एक वाक्य आठवले :

" ह्या जगाची समस्या ही "दुर्जनांची सक्रियता " नसुन "सज्जनांची निष्क्रियता" ही आहे."

बाजारगप्पा-भाग-२

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
1 Jun 2024 - 10:17 pm

तर मागील भागात आपण बघितलं की काही सार्वकालिक सत्ये आह्ते बाजाराविषयीची त्याच चर्चेला थोडं पुढे नेत पुढील महत्वाचे सत्य बघु या.

मांडणीविचार

पूणे ससून

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
31 May 2024 - 10:11 am

इथं तीन लाख,
मिळतात बसून।
हो हे आहे,
पुण्याचे ससून।।

कसे बदलणार,
डाॅक्टरचे रक्त?
कुठे मिळणार,
'भ' विटामीन-रहीत
शुद्ध रक्त?!

कुणाकुणाचे
बदलणार रक्त?
पोलीस,RTO,
वकील,कस्टम,Excise,
जज,आमदार,बिल्डर?
त्यापेक्षा सोपी,
मजूरी सक्त ।।

भ्रष्टाचारकविता