पुस्तक परिचय: ययाति

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
26 Jun 2024 - 7:35 am

----
ययाति
----
वि. स. खांडेकर -- ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, मराठीतील पहिले साहित्यिक. ययाति -- वि. स. खांडेकरांनी १९५९ मधे लिहिलेली, पौराणिक संदर्भ आणि सामाजिक आशय असलेली कथा. या कादंबरीसाठी १९७४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

----

अगदी ओघवतं, प्रवाही लिखाण. साधे शब्द, पण तरीही कथेतून सामाजिक आशय अगदी प्रखरपणे मांडलेला. कथेच्या शेवटी मन विषण्ण, व्यथित होतं. कथा संपते, पण वाचकाला स्वतःशी संवाद करायला भाग पाडूनच.

साहित्यिकसमीक्षा

तुमची निष्ठा कुठे ?

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in राजकारण
25 Jun 2024 - 11:17 pm

आज संसदेत काही नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यात निदर्शनास आलेली काही वाक्ये :

ओवेसी - जय भिम. जय मीम. जय तेलंगाना . जय फलस्तीन . अल्लाहु अकबर.

राहुल गांधी - जय हिंद. जय संविधान

छत्रपालसिंग गंगवार - जय हिंदुराष्ट्र. जय भारत.

(हे म्हणल्यावर लगेच विरोधी पक्षाच्या बाजुने - "ये संविधान विरोधी है" अशा अर्थाच्या घोषणा ऐकु आल्या. मात्र पॅलेस्टाईनच्या जयजयकारानंतर विरोधी पक्ष पैकी "ये संविधान विरोधी है" असे कोणी म्हणल्याचा व्हिडीओ दिसला नाही. )

भिंत तुझी माझी...

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
25 Jun 2024 - 12:55 am

मी खऱ्याखुऱ्या भिंतिविषयी बोलतो आहे. आभासी नव्हे. भिंत हा एक भारी प्रकार आहे. भिंतीविषयी उगाच एक नकारात्मक भावना जोडलेली आहे. भिंतीवर कितीतरी सुंदर गोष्टी सुद्धा असतात. म्हणजे छानशा पेंटिंग्ज, देवाचा फोटो, एकत्र कुटुंबाचा फोटो, वगैरे. ह्या भिंतीविषयी सुचण्याचे कारण म्हणजे, आज बाजारात फिरत असताना रस्त्यावर पोस्टर विकणारी एक बाई दिसली. कधी काळी मला हे पोस्टर्स फार आवडायचे. माझ्या रूम मध्ये वाकुल्या दाखवणाऱ्या tom च एक पोस्टर होतं. त्यानंतर एका रूम मध्ये आधी राहणाऱ्या एका मुलाने काही अप्रतिम म्हणावेत असे ऐश्वर्या रॉयचे फोटो लावले होते. काही महाभाग फारच शौकीन असायचे.

भाषा

कवितेचा शब्द शब्द

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
24 Jun 2024 - 12:38 pm

प्रपाताने थेंबुट्यास
कमी कधी लेखू नये
पिंडी वसते ब्रह्मांड
कदापि विसरू नये

महापुरात लव्हाळी
वाचतील? खात्री नाही
लवचिकतेचा ताठा
लव्हाळ्याने धरू नये

आरशाने आरशात
प्रतिबिंब पाहू नये
अनंताने कोंदटसे
सान्तपण लेवू नये

कवितेचा शब्द शब्द
ओळ बनण्याच्या आधी
दोन ओळींच्या मधल्या
अनाघ्राता स्पर्शू नये

मुक्तक

पलंग..नव्हे मृत्यूचा सापळा

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
22 Jun 2024 - 4:21 pm

माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच संपलं होतं आणि माझ्या एका इंग्लिश मित्रासोबत मी पॅरिस मध्ये रहायला आलो होतो.आम्ही दोघेही तरुण होतो आणि आमच्या सध्याच्या वास्तव्याच्या या रंगतदार शहरात मनमुराद जगत होतो.‌ लुव्र म्युझियम च्या अगदी समोर असलेल्या  "पॅले रोयाल" मध्ये आम्ही रहात होतो. एका रात्री आम्ही  आसपास फिरता फिरता ,आज ' टाइमपास'  कसा करावा  याचा विचार करत होतो.माझा दोस्त म्हणाला,  ‌चल "फ्रॅस्कॅटी" त जाऊ.( फ्रॅस्कॅटी हा १९व्या शतकातील, पॅरिस मधील एक प्रख्यात कॅफे व सोशल क्लब होता. तिथे उच्चभ्रू वर्गातील पुरूष व स्त्रिया येत.

कथाभाषांतर

गोष्टी कृष्णाच्या १

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
22 Jun 2024 - 12:05 pm

मला आवडतात गोष्टी वाचायला.आणि त्याजर मुळापर्यंत नेणाऱ्या असतील तर मनोरंजक वाटतात.
संदर्भ -शोध कृष्णाचा,पूर्णत्वाचा प्रवासी लेखक प्रा. डॉ.राम बिवलकर यांच्या पुस्तकातील जेवढा उमगेल तो गोषवारा देते.
फोटो -कृष्णा @मथुरा
अ

कथासंदर्भ