वार्तालाप: भिक्षा ही कामधेनू
समर्थ म्हणतात भिक्षाही सर्व सांसारिक आणि अध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारी कामधेनू रुपी गाय आहे. समर्थांनी भिक्षा मागून संपूर्ण भारताचे भ्रमण केले. त्याकाळी भारत परचक्राच्या तावडीत सापडलेला होता जाळ-पोट, हिंसा, लूट, बलात्कार इत्यादी सामान्य बाबी होत्या. हीन भावनेनेग्रस्त सामान्य जनता दुःख आणि दारिद्र्यात खितपत पडलेली होती. महाराष्ट्राची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. समर्थांनी हे सर्व बदलण्याचे ठरविले. भिक्षेच्या बळावर ज्या काळी मंदिरे आणि मठ उध्वस्त होत होती त्या काळात त्यांनी समर्थ मठांची स्थापना केली. भिक्षेच्या मदतीने त्यांनी त्यांच्यासारखे शेकडो समर्थ ब्रह्मचारी तयार केले.