मै हर इक पल का शायर हूँ ----- साहिर लुधयानवी (भाग २)

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
19 Sep 2023 - 5:03 pm

पहिल्या भागाची लिंक मै हर इक पल का शायर हूँ ----- साहिर लुधयानवी (भाग १)

आवडता गीतकार याबद्दल चर्चा चालू होती .. आणि साहिर चे नाव आले नाही तर कसे चालले ? म्हणून साहिर विषयी थोडेसे ...
____________________________________________________________________________________________________________________

साहिरचा गीतलेखनाचा प्रवास सुरु झाला तो १९४९ सालच्या "आझादी कि राह पर" या चित्रपटापासून ... पण त्यांची खरी जोडी जमली ती सचिन देव बर्मन यांच्यासोबत. १९५१ साली आलेल्या नौजवान आणि बाजी या चित्रपटापासून.

असा एक किस्सा सांगितला जातो कि :
साहिर हे शायर म्हणून खूप लोकप्रिय होते .. पण त्यामुळे त्यानां चित्रपटात गीतकार म्हणून संधी द्यायला अनेक निर्माते घाबरत असत ... जवळ जवळ वर्षभर साहिर अनेक निर्मात्यांना भेटत होते पण काम मिळत नव्हतं ... अशातच सचिनदा मुंबईला संगीतकार म्हणून आले होते. त्यावेळी सचिनदांना साहिर कोण हे माहितहि नव्हते . असेच एक दिवस साहिर सचिनदांना भेटायला त्यांचं हॉटेलच्या रूमवर गेले ... आपला परिचय दिल्यावर सचिनदांनी एक चाल ऐकवली व गाणे लिहायला सांगितले ... साहिरने लगेचच शब्द ऐकवालर ... ठंडी हवाएँ। .. लेहेराके आए। .. अणि इथून या दोघांची जोडी जमली ती "प्यासा" पर्यन्त

प्यासा .. संगीताच्या दृष्टीने उत्तम चित्रपट .. पण शायरीच्या दृष्टीने सर्वोच्च शिखर (हायलाइट)
ह्या चित्रपतील "ये दुनिया अगर मिल भी जाएँ है" आणि "ये महलों ये तख्तों ये ताजोंकी दुनिया" ही गाणी तर अंगावर काटा आणतातच. पण या चित्रपटात साहिरच्याच काही कविता / शेर नायकाच्या तोंडी वापरले आहेत ते मात्र लाजवाब आहेत.

चित्रपटाचा नायक एक कवी असतो आणि संपूर्ण चित्रपटावर एक दुःखाची छाया आहे ... कवीची उपेक्षा, अवहेलना आणि त्यातून येणारा संताप हाच या चित्रपटाचा गाभा आहे ... साहिरचे शब्द हे वातावरण गहिरे करून जातात.

ये हँसते हुए फूल, ये महका हुआ गुलशन
ये रंग में और नूर में डूबी हुई राहें
ये फूलों का रस पी के मचलते हुए भँवरे
मैं दूँ भी तोह क्या दूँ तुम्हें ए-शोख नज़ारो
ले देके मेरे पास कुछ आंसू हैं कुछ आहें यारों

आणि हे आपल्या अंगावर येत ते रफीच्या जीवघेण्या आवाजात ... कुठल्याही वाद्यांशिवाय. तालवाद्य तर सोडाच पण सुरवाद्यही नाहीत... निरव शांतता आणि रफीचा आवाज ... बस एव्हढच .. बाकीचं काम शब्दच करून जातात

असाच एक शेर ...
ग़म इस क़दर बढ़े, के मैं घबरा के पी गया
इस दिल की बेबसी पे, तरस खा के पी गया |

ठुकरा रहा था मुझको, बड़ी देर से जहां
मैं आज सब जहां को, ठुकरा के पी गया |

कवीच दुःख आणि मग दुनियेला लाथ मारायची कलंदरी... साऱ्या चित्रपटाचं सारच जणू

थोडं विषयांतर ....
यातील मैं घबरा के पी गया वरून दुसरी एक गझल आठवली. सागर सिद्दीकी यांची

मैं तल्ख़ी-ए-हयात से घबरा के पी गया
ग़म की सियाह रात से घबरा के पी गया

तल्ख़ी-ए-हयात म्हणजे जगण्यातलं दुःख, कडवटपणा
ग़म की सियाह रात से म्हणजे दुःखद अंधारी रात्र

मैं आदमी हूँ कोई फ़रिश्ता नहीं हुज़ूर
मैं आज अपनी ज़ात से घबरा के पी गया

ज़ात म्हणजे कुळ / वंश किंवा आपण स्वत: आपले अंतरंग ... कुठलाही अर्थ घेतला तरी सामान्य माणूस घाबरणारच

काँटे तो ख़ैर काँटे हैं इस का गिला ही क्या
फूलों की वारदात से घबरा के पी गया

काटा रुते कुणाला ... मज फुलही रुतावे .... काटा टोचणारच त्याच दुःख नाही ... पण फुलंही असच वागू लागली तर ....

'साग़र' वो कह रहे थे कि पी लीजिए हुज़ूर
उन की गुज़ारिशात से घबरा के पी गया

गुजारिश : आग्रह ...

थोडं विषयांतर झालं .. पण प्यासातल्या अजून एका गझलेविषयी पुढच्या भागात… आणि साहिर - सचिनदा यांच्याबद्दलही

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

सचिनदेव बर्मन यांचे संगीत आणि त्यांनी स्वतः गायलेली गाणी एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. साहिर-सचिनदेव बर्मन या जोडीने निर्माण केलेल्या गीतांविषयी वाचायला उत्सुक.

मुक्त विहारि's picture

26 Sep 2023 - 8:54 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

सुरेख..सुरिला लेख.. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.

साहिरची मूळ गजलः
तंग आ चुके हैं कशमकश-ए-ज़िंदगी से हम
ठुकरा न दें जहाँ को कहीं बेदिली से हम
मायूसी-ए-मआल-ए-मोहब्बत न पूछिए
अपनों से पेश आए हैं बेगानगी से हम
लो आज हम ने तोड़ दिया रिश्ता-ए-उमीद
लो अब कभी गिला न करेंगे किसी से हम
उभरेंगे एक बार अभी दिल के वलवले
गो दब गए हैं बार-ए-ग़म-ए-ज़िंदगी से हम
गर ज़िंदगी में मिल गए फिर इत्तिफ़ाक़ से
पूछेंगे अपना हाल तिरी बेबसी से हम
अल्लाह-रे फ़रेब-ए-मशिय्यत कि आज तक
दुनिया के ज़ुल्म सहते रहे ख़ामुशी से हम ...

१९५७ सालच्या गुरुदत्तच्या 'प्यासा' मधे रफीने गायलेली ( संगीतः सचिनदेव बर्मन) ही गजल आज विस्मरणात गेलेली असली तरी नंतरच्या १९५८ मधील 'लाईट हाऊस' मधले हेच गीत अजरामर झालेले आहे. (सिनेमातील गाण्यांमधे मूळ गजलेपेक्षा थोडी वेगळी रचना आहे)

आशा भोसले/दत्ता नाईक (लाईट हाऊस)

तंग आ चुके हैं कशमकश-ए-ज़िंदगी से हम
ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम
तंग आ चुके..

लो आज हम ने तोड़ दिया रिश्ता-ए-उम्मीद
लो अब कभी गिला ना करेंगे किसी से हम
ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम
तंग आ चुके..

गर ज़िंदगी में मिल गए फिर इत्तफ़ाक़ से
पूछेंगे अपना हाल तेरी बेबसी से हम
ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम
तंग आ चुके..

ओ आसमान वाले कभी तो निगाह कर
अब तक ये ज़ुल्म सहते रहे ख़ामोशी से हम
ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम
तंग आ चुके..
-- 'प्यासा' मधील गझलेची (पारंपारिक ?) चाल वापरून ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेले 'एक मुसाफिर एक हसीना' (१९६२) मधले रफीचे "हमको तुम्हारे इष्क ने क्या क्या बना दिया" हे गीत अतिशय लोकप्रिय झाले.
वरील तिन्ही गीतांचे दुवे:

प्यासा मधील 'तंग आ चुके'
https://www.youtube.com/watch?v=SqqpIR39Y_I

एक मुसाफिर एक हसीना' मधील "हमको तुम्हारे इष्क ने"
https://www.youtube.com/watch?v=AZZ2cDL8Q5I

लाईट हाऊस मधील 'तंग आ चुके'
https://www.youtube.com/watch?v=SLtEvjg-mDo

अमर विश्वास's picture

27 Sep 2023 - 11:25 am | अमर विश्वास

व्वा चित्रगुप्त साहेब

क्या बात कही है !

प्यासा चित्रपटात विजय (नायक) ही गझल एक मुशायऱ्यात सादर करतो ... त्यामुळे म्युझिक / वाद्ये वगैरे नाहीत .. पण रफी साहेबांचा आवाजात हे शब्द थेट काळजाला भिडतात

साहिरने १२२ हिंदी सिनेमांसाठी ७३३ गाणी लिहीलेली आहेत असे दिसते. पैकी प्रत्येक गायकाने किती गाणी गायलेली आहेत त्याचा तक्ता:

आशा भोसले: 223
रफी: 188
लता: 160
किशोरः. 69
महेन्द्र कपूरः. 61
गीता दत्तः 54
मन्ना डे: 38
मुकेशः. 22
तलतः 20
सुधा मल्होत्रः 19
सुमन कल्याणपूरः. 18
हेमंत कुमारः. 12
याच प्रकारे कोणकोणत्या संगीत दिग्दर्शकांची किती गाणी, हेही कुणाला मिळाल्यास इथे अवश्य द्यावे.

राघव's picture

27 Sep 2023 - 2:36 pm | राघव

खरं बोललात.. शायरीचा कळस!

सगळ्याच रचना चांगल्या आहेत यातल्या. उणं काढणारे आपण कोण! :-)
मला आवडते एका रचनेतील हे जीवघेणं कडवं -

इसको ही जीना कहते है तो यूँही जी लेंगे
उफ़ न करेगे.. लब सी लेंगे.. आँसूं पी लेंगे
ग़म से अब घबराना कैसा.. ग़म सौ बार मिला

हमने तो जब कलियाँ मांगी काँटों का हार मिला
जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला

खतरनाक!

हे गीत एवढे उत्कट होण्यात साहिर इतकाच हेमंतकुमार आणि सचिनदेव बर्मन यांचाही महत्वाचा वाटा आहे. माझेपण अत्यंत आवडते गीत.
https://www.youtube.com/watch?v=t6nHfdKgshg

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Sep 2023 - 7:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकेका महारथीने काय काम करुन ठेवले आहे चित्रपट संगीतामधे. हे काम म्हणजे नुसतेच पोटाची खळगी भरण्यासाठी नक्कीच नव्हते. त्यामागे त्यांची प्रतिभा पणाला लागली असेल, आणि तरीही मायानगरी मुंबईत राहताना त्यांना आपल्या राहण्याचा, पोटापाण्याचा प्रश्न सतावत असेलच. शिवाय तिथले लॉबिंग्,राजकारण, गळेकापू स्पर्धा याचाही सामना करावा लागलाच असेल. अनेक कलाकार पडद्यामागच्या अंधारातच संपले, काही थोडा प्रकाश दिसू लागताच व्यसने आणि उधळपट्टीमुळे डुबले, थोडेसे टिकले आणि त्यातही थोडेजण पैसे वगैरे साठवुन निवांतपणे निवृत्त झाले.

पडद्यामागची बदनाम(??) अंधारी दुनिया आहे ही. उगवत्या सूर्याला नमस्कार याची सतत जाणीव करुन देणारी.

प्रचंड सहमत आहे ....

मी तरी, हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे ....

जुइ's picture

3 Oct 2023 - 7:35 pm | जुइ

प्यासा मधील अजून एक आवडते गीत म्हणजे "हम आपकी आंखो". साहिरवर अजूनही लिहा.