२१ डिसेंबरचे प्लॅन्स

औदुंबर's picture
औदुंबर in जनातलं, मनातलं
1 Nov 2012 - 3:17 am

तर मित्रहो,

२०१२ हे वर्ष पृथ्वीच्या इतिहासातले शेवटचे वर्ष असणार आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. २०१२ साली जग नष्ट होणार, हे भाकित माया की अ‍ॅझ्टेक लोकांनी फार वर्षांपूर्वी करून ठेवले आहे, त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे. 'सॅंडी'ने चुणूक दाखवलीच आहे. त्याप्रमाणे 'बिगिनिंग ऑफ द एंड' सुरू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
या वर्षाच्या सुरूवातीला या विषयाचा फार गहजब झाला, पण प्रत्यक्षात हा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा त्या मानाने फारसा गवगवा होताना दिसत नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे! वर्ल्ड कप, ऑलिंपिक्स, गेला बाजार एखादी फालतू कॉमनवेल्थ किंवा आशियाई स्पर्धा जवळ आली तरी केवढा गाजावाजा होतो! टीव्हीवर सततच्या जाहिराती, वर्तमानपत्रातून लेख वगैरेंचा नुसता धडाका उडतो. त्यामानाने या जागतिक महत्वाच्या घटनेबाबत मात्र फारच अनुत्साह दिसून येत आहे. बरेचसे लोक तर जगाचा अंत जवळ आला आहे, हे विसरून गेल्याप्रमाणेच आपापल्या रोजच्या व्यवहारात मग्न होऊन गेले आहेत. मला स्वतःला याचं फार आश्चर्य वाटतं. एखादं सुपरबाउल असो, किंवा क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल मॅच असो, लोक किती प्लॅन आखतात! ऑफिसला दांडी मारण्यासाठी कोणत्या सबबी तयार ठेवाव्या, एखाद्या मित्राच्या घरीच मॅच-व्ह्युईंग पार्टी ठेवावी की मस्तपैकी एखाद्या थिएटरमध्ये जाऊन मॅच पहावी, वगैरेंच्या प्लॅनिंगमध्ये सर्व लोक बुडून जातात. जगबुडी ही तर मदर ऑफ ऑल इव्हेंट्स! कल्पना करा, जगाच्या इतिहासात आत्तापर्यंत कुणीही कधीही पाहिला नाही असा शो आपल्या सर्वांना याची देही, याची डोळां बघायला मिळणार आहे! कुठलीही हॉलिवुड मूव्ही झक मारेल असा स्पेक्टाक्युलर सोहळा आपल्याला पहायला मिळणार! नक्की काय होणार? एखादा महाप्रचंड पूर येणार, की भूकंप होऊन पृथ्वीचे दोन तुकडे पडणार, की एखादा महाकाय धूमकेतू येऊन आपल्यावर आदळणार, याची सर्वांना उत्सुकता असायला हवी, नाही का? तर हा अतिभव्य इव्हेंट कशाप्रकारे साजरा करायचा, असा मला प्रश्न पडला आहे. आपल्या सर्वांचं काय मत?
मला सुचलेले ऑप्शन्स-
एक छानपैकी साठसत्तर इंची प्लाझ्मा टी.व्ही. स्पेशली विकत घ्यायचा. (टी.व्ही क्रेडिटवर घेता येईल, कारण नंतर कर्ज फेडण्याची काही गरजच उरणार नाही) सगळ्या मित्रांना घरी बोलवून मस्तपैकी पार्टी करत जगभरचा हल्लागुल्ला आपल्या दिवाणखान्यात बसून बघायचा. आयफेल टॉवर, इजिप्तचे पिरॅमिड्स पाण्याखाली जाताना आपल्या डोळ्यांनी पहायचे! किंवा एखादा धूमकेतू येऊन पृथ्वीवर आदळताना पहायचा! कित्ती मज्जा ना? झालंच तर कुठला देश आधी नष्ट होईल, कुठला नंतर, यावर बेट्स लावायच्या. जगभरच्या तांडवाचा आंखो देखा हाल वृत्तनिवेदकांकडून ऐकायचा. उदाहरणार्थ- 'अभी अभी खबर आयी है की उझ्बेगिस्तानपर भारी उल्कापात हो रहा हैं. चलिये वहांकी खबर सुनते हैं हमारे वहांके संवाददाता श्री. प्रकाश वर्मासे.'
'प्रकाशजी, क्या आप हमें बता सकते हैं, वहां उझ्बेगिस्तानमें क्या हाल है?'
'प्रकाशजी?...'
'प्रकाशजी?.................'
अशा सर्व गमतीजमती पहात, पिझ्झा आणि बिअरच्या संगतीने अगदी आपल्या घरापर्यंत प्रलय येईपर्यंत हंगामा करायचा!

किंवा, एखाद्या उंचावरच्या हिलस्टेशनमध्ये महागात महाग अशा रिसॉर्टमध्ये सर्वात चांगली रूम बुक करून (हे सर्व क्रेडिटवर) उंची वाईनचे घुटके घेत घेत दर्‍याखोर्‍या पाण्यात बुडून जाताना पहायच्या.

किंवा एखाद्या बलूनमधून उंचावर जाऊन तिथून खालची सगळी गंमत बघायची.

तर मंडळी, अशा सर्व ऐडिया सध्या सुचत आहेत. तुम्ही कायकाय प्लॅन करणार आहात? जरा आम्हालाही कळवा बर्का पटापट!

धोरणनृत्यसंगीतइतिहाससमाजजीवनमानभूगोलविज्ञानज्योतिषप्रकटनविचारशुभेच्छाअनुभवमतशिफारससल्लामाहितीचौकशीमदतविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

1 Nov 2012 - 4:08 am | स्पंदना

काय प्लॅनींग आहे? ज्याला त्याला मरताना बुडवायच. सार क्रेडीटवर घ्यायच. व्वा! मरायचच आहे तर पैसा वाचवुन का मरताय? अन मरताना पुण्य इक्कठा करनेके बजाय, पाप करके ( तुमना पता है पैसा भरना नही पडेगा करके तो वो पापच हुव्या ना?) कायकु मरनेका?
काय होइल ते होवो. तसाही सॅडीन काय फार वेगळा प्रकार नाही केला. जरा अमेरिकन म्हंटल की फार गाजावाजा असतो एव्हढच. त्यांच्यावरचा अतिरेकीहल्ला, त्याची वादळ, त्यांच्या इथली बेरोजगारी हे सारे विषय फार महान असतात बाबा! आपण त्यांची बरोबरी करु नये. तुम्ही निवांत रोज जसे जगताय तसे जगत रहा, उगा क्रेडीटबेडीट वापरुन सार्‍या जगाची नाही झाली तरी निदान तुमची जगबुडी निश्चीत होइल, तेंव्हा तो विचार सोडा.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Nov 2012 - 7:01 am | अत्रुप्त आत्मा

जगबुडिचे भय आंम्हाला नसते. ;-)
अमर अत्रुप्त आत्मा :-b

श्रीरंग_जोशी's picture

1 Nov 2012 - 8:58 am | श्रीरंग_जोशी

एक तर तुमच्या जगातली लोकसंख्या न भूतो न भ॑विष्यती अशी वाढणार.
अन 'इ'हलौकिक जगात पिडायला कुणीच मिळणार नाही. तसेच तुंम्हाला च्यालेंज देणारे अनेक लोक तुमच्या जगात पोचणार?

बघा बुवा, सांभाळूनच रहा ;-).

अरुण मनोहर's picture

1 Nov 2012 - 7:13 am | अरुण मनोहर

एक छानपैकी साठसत्तर इंची प्लाझ्मा टी.व्ही. स्पेशली विकत घ्यायचा."

जागो प्यारे, जुन्यापुराण्या वस्तू कशाला विकत घ्यायच्या?

सोनीएल जी या कंपन्यांनी ८४ इंची अल्ट्रा एच डी टिव्ही बाजारात आणले आहेत. किमती आहेत अनुक्रमे २५ व २० हजार अमेरिकन डॉलर्स.

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Nov 2012 - 8:54 am | श्री गावसेना प्रमुख

अंत

५० फक्त's picture

1 Nov 2012 - 12:14 pm | ५० फक्त

लई भारी फोटो, आजची रात्र कानाला हेडसेट लावुन घोस्ट रिटर्न्स खेळण्यात जाणार, तिच्यायला लई बेक्कार वाटतं आपल्या टिममधला एखादा गेला की, ते शॉपिंग मॉल मधुन बाहेर पडायची आयडिया हाय का कुणाकडं?

चौकटराजा's picture

1 Nov 2012 - 8:59 am | चौकटराजा

इथला एक आयडी श्री वल्ली यानी विचारले आहे 'घोरवडेश्वराच्या डोंगरावर फुले फुलली आहेत येता काय फोटोग्राफीला ?'
मी २१ डिसेम्बरला तिथे जाउ म्हणतो. वल्लीच्या नव्या कॅमेर्‍याने मी बुडलेल्या कोकणचे फोटो काढणार व मानवी इतिहासातील शेवटचा दिवस यावर ऐतिहासिक बखर वल्ली लिहिणार ! कसे ?

इरसाल's picture

1 Nov 2012 - 9:08 am | इरसाल

तुम्ही गुजरात मधे आहात काय ?

नितिन थत्ते's picture

1 Nov 2012 - 10:44 am | नितिन थत्ते

लै भारी. :)

असो आम्ही हा सोहळा आधीच साजरा केला असल्याने या २१ डिसेंबरच्या सोहळ्याचं काय कौतुक नाही. (जुने धागे दिसत नाहीत त्यामुळे दुवा दिला असला तरी सोहळ्याचे रेकॉर्डिंग पाहता येणार नाही).

घटं भिद्यात् पटं छिंद्यात् !!

तिमा's picture

1 Nov 2012 - 10:55 am | तिमा

ठाण्याला 'उथळसर' नांवाचा एक भाग आहे. त्याची सहज आठवण झाली.

कवितानागेश's picture

1 Nov 2012 - 11:47 am | कवितानागेश

तुम्हाला पोहता येत नाही का? उंचावर कशाला जायचे?

क्लिंटन's picture

1 Nov 2012 - 12:08 pm | क्लिंटन

त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे.

बरं आहे गुजरात निवडणुकांची मतमोजणी २० डिसेंबरलाच होऊन जाईल. :)

मला दरवर्शी बुडवता... एखाद्या वेळी तुम्ही पण बुडुन बघा...

एक चेपुवर स्टेटस वाचलं होतं:

"If the world doesn't end on 21 Dec, 2012, I have a feeling that a lot of babies would be borne on 12 Sept, 2013".

;) :D :P

अन्या दातार's picture

1 Nov 2012 - 6:59 pm | अन्या दातार

एवढ्या$$$$$$ मोठ्या इव्हेंटचे टाईम टेबल जाहीर झालेय काय?

ह्म्म... मी विचार करतोय की २१ डिसेंबर नंतर अश्या आणि अनेक वेबसाईट्स चे काय होईल ?;)
नविन तारीख देतील काय ? ;)
ALL ABOUT 2012