फुल्ल टू दबंग

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
29 Oct 2010 - 12:24 pm

काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो. अशी छानशी पूर्वतयारी झाल्यानंतर मी दबंग बघायला सज्ज झालो हे तुम्ही ओळखले असेलच.

नुकताच येऊन गेलेला सलमान 'वाँटेड' पाहिल्यापासून सलमान आणि दबंग दोघांनी माझ्या अपेक्षा फारच उंचावून ठेवल्या होत्या. तसा मी काही फार जाणकार परीक्षक किंवा एखाद्या कलाकाराला पारखू शकेन असा कसबी वगैरे नाही, पण सलमानचा वाँटेड पाहिल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे सलमानने आता स्वतःला आणि स्वतःच्या वकुबाला पूर्ण ओळखले आहे. मुख्य म्हणजे सलमान काय करू शकतो आणि तो काय करताना हिट होऊ शकतो हे कळणारे कसबी दिग्दर्शक त्याच्या हाताला लागू लागले आहेत. अरे वाटत आहे की सलमानने आता आपण कितपत अभिनय करू शकतो हे व्यवस्थित लक्षात घेऊन त्या टाईपच्या भूमिका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सलमानला बघणे आणि सहन करणे आता सुसह्य व्हायला लागले आहे. अभिनय, मेलोड्रामा, डोळ्यांची भाषा वगैरे आपल्याकडून पब्लिकला अपेक्षीत नाही आणि ते आपल्याला जमणार नाही हे त्याच्या पक्के लक्षात आले आहे, त्यामुळे ओन्ली रफ अँड टफ अका रावडी सलमान दबंग पूर्ण खाऊन जातो आणि मुख्य म्हणजे डोक्यात न जाता डोक्यावर जातो.

दबंग म्हणजे निर्भय. हि गोष्ट आहे उत्तरप्रदेश मधल्या लालगंज भागातील एका निर्भय पण चालू पोलिस ऑफिसर रॉबिनहूड उर्फ चुलबुल पांडेची. कंजूष सावत्र वडील विनोदखन्ना आणि आई डिंपल कपाडिया ह्यांच्या सोबतच त्याला साथ आहे ती सावत्र भाऊ मख्खी उर्फ मंदबुद्धी आरबाज खानची. लहानपणापासूनच वडील आणि सावत्र भावाशी चुलबुल उर्फ सलमानचे सख्य असे नसतेच. त्यांना जाता येता त्रास देणे, ताठपणे बोलणे हेच काय ते त्याचे काम. हा लहान चुलबुल आता एक धाडसी पोलिस ऑफिसर बनलेला आहे जो लुटारूंना वगैरे पकडून वर त्यांचा माल लुटून त्यांना पळून जायला देखील मदत करत असतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच सलमानच्या एंट्रीचा जो शॉट आहे तिथेच माझ्या मनात थोडीशी शंकेची पाल चुकचुकायला लागली होती. हि सलमानची एंट्री अगदी थेट 'वाँटेड' चित्रपटाप्रमाणेच आहे. अगदी तो त्या सिनेमात ज्या गोडाउन मध्ये मारामारी करतो तसेच हुबेहूब गोडाउन इथे दबंग मध्ये उभे केल्यासारखे स्पष्ट जाणवते. एंट्रीचा शॉट संपल्या संपल्या लगेच 'दबंग दबंग' हे गाणे सुरू होते. गाणे आणि संगीत थेट 'ओंकारा' च्या वळणावर जाणारे. आता भवतेक चित्रपट बघून डोक्याला शॉट लागणार असे वाटायला लागते... मात्र नंतर जी काही धमाल सुरू होते की क्या कहने...

दबंग सलमानची झडप आता लालगंजचा युवा नेता छेदी सिंग बरोबर होते. छेदी सिंगचा रोल सोनू सूद ने केला आहे. अप्रतिम शरीरयष्टी आणि सहज अभिनय ह्यामुळे ह्या भूमिकेत तो भाव खाऊन गेला आहे हे नक्की. ह्या छेदी सिंगच्या डोक्यावर हात आहे तो मंत्री अनुपम खेरचा आणि त्याला सोबत आहे ती होणाऱ्या इन्स्पेक्टर सासऱ्याची ओम पुरीची. लूटमार, देशी दारूच्या भट्ट्या हे सगळे सांभाळून राजकारण करणे आणि आगामी निवडणुकीसाठी तिकिटाच्या मागे लागणे हे ह्या छेदी सिंगचे काम. त्याच्या माणसाने लुटलेला माल त्याच्या माणसांकडून सलमान पळवतो आणि इथे त्यांच्या संघर्षाला सुरुवात होते. पुढे अनुपम खेर देखील सलमानच्या मदतीने छेदी सिंगला शह देऊ पाहतो आणि हे युद्ध अजूनच भडकते.

मधल्या वेळात सलमानची हिरवणी म्हणून सोनाक्षी सिंगची नेमणूक केलेली आहे. तसेही आजकाल हिरवणींकडून फारशी अभिनयाची अपेक्षा नसतेच. सोनाक्षी दिसली आहे सुंदरच आणि 'थप्पडसे नही प्यारसे डर लगता है साब' वगैरे डायलॉग मारत काही संवादात भाव देखील खाऊन गेली आहे. एकूणच सोनाक्षीचे पदार्पण झक्कास म्हणायला हरकत नाही. तिच्या जोडीलाच उल्लेख करायला हवा तो आरबाज खानचा. ह्या माणूस देखील फारसा अभिनय कुशल वगैरे नाही, पण मर्यादेत राहिला तर छान काम करून जातो. (उदा. गर्व) ह्या चित्रपटात देखील त्याच्या वाटेचे काम त्याने चोख केले आहे. स्वतः दिग्दर्शक असूनही तो कुठे भरकटलेला नाही आणि मुख्य म्हणजे त्याने सलमानला देखील भरकटू दिलेले नाही.

सलमान आणि आरबाजच ह्या चित्रपटातील मिशीवाला लुक एकदम शॉल्लेट आणि त्यांना शोभतोही. हा लुक म्हणे सलमानला सोनाक्षीनी सुचवला. खरेतर ह्या चित्रपटात खान कँप कडून गोविंदाच्या कन्येला लाँच केले जाणार असल्याची बातमी होती, पण ऐनवेळी बाजी मारली ती शत्रुघ्न सिन्हांची कन्या सोनाक्षीने. जाडजूड सोनाक्षील ६ महिने जीम मध्ये राबवून सलमानने अगदी फिट केल्याचे दिसते.

हान.. तर आता इकडे चुलबुल आणि सलमान मधला संघर्ष चांगलाच पेट घेतो तर तिकडे दुसऱ्या आघाडीवर आईच्या मृत्यूनंतर सलमान आणि त्याच्या वडील आणि भावातला संघर्ष देखील पेटून उठतो. सलमानच्या वडील आणि भावाची मदत घेऊन छेदी सिंह सलमानला शह देऊ पाहतो मात्र त्यात अयशस्वी ठरल्याने तो त्यांच्या फॅक्टरीला आग लावून देतो. त्या धक्क्याने सलमानचे वडील हॉस्पिटलामध्ये ऍडमिट होतात. वडिलांच्या इलाजासाठी पैशाची गरज असलेला आरबाज पुन्हा छेदी सिंहच्या जाळ्यात सापडतो आणि नको ती कामे करायला लागतो. शेवटी भावाचाच खून करायची गळ त्याला छेदी सिंह घालतो तेव्हा मात्र तो जाऊन सलमानला मिळतो आणि मग दुष्टांचा नाश ठरलेलाच.

अशा साध्या सरळ आणि टिपीकल रावडी कथेला उत्तम साथ लाभली आहे ति संगीताची आणि ऍक्शन दृश्यांची. संगीताच्या आघाडीवर साजिद-वाजिद ह्यांनी खरोखर श्रवणीय आणि अप्रतिम कामगिरी केलेली आहे. चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत. उडत्या चालीच्या (आणि ढापलेल्या) 'मुन्नी बदनाम हुई' बरोबरच 'तेरे मस्त मस्त दो नैन' हे राहत फतेह अली खानच्या आवाजातील हळुवार गाणे म्हणजे मेजवानी आहे.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

एस. विजयन ह्यांची ऍक्शन दृश्ये भन्नाटच आणि टिपीकल सलमान खान फॅन्सची मागणी पूर्ण करणारी. त्याच्या जोडीला खटकेबाज संवादाची चटपटीत भेळ आहेच. मात्र हे सगळे असताना देखील विनोद खन्ना, अनुपम खेर आणि ओम पुरी सारख्या कलाकारांना इतक्या किरकोळ भूमिका देऊन वाया का घालवले अशी रुखरुख राहून जाते. कदाचित 'खान कँप'ला नाही म्हणणे जड गेले असल्याने त्यांनी ह्या भूमिका स्वीकारल्या असाव्यात. तुलनेने तेवढ्याच छोट्या भूमिका असून देखील महेश मांजरेकर आणि डिंपल मात्र आपल्या अभिनयाची छाप सोडून जातात.

जाताजाता अरबाजच्या दिग्दर्शनाला सलाम ठोकावेसे वाटतात असे २ प्रसंग :-

१) मंत्री असलेल्या अनुपम खेरच्या बंगल्यात येवढ्या सिक्युरिटी मधून अरबाज आरामात आंब्याच्य पेटीतून बाँब घेउन जातो.

२) अंतिम मारामारीत सलमानच्या अंगावरुन टराटरा फाटून चिंध्या होउन वार्‍यावर उडालेला शर्ट सलमान खलनायकाला मारुन ट्रॅक्टरमधून परत येताना तोच शर्ट त्याच्या अंगावर असतो.

एकूण काय तर दबंग सलमानसाठी, झटकेबाज सोनाक्षीसाठी आणि 'तेरे मस्त मस्त दो नैन' साठी हा १००% टैमपास करणार दबंग बघणे मस्टच आहे.

कलासंगीतनाट्यसमाजजीवनमानतंत्रमौजमजाचित्रपटलेखमतबातमीशिफारसमाध्यमवेधसल्लाअनुभवमाहितीप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्त परिचय!

आपल्याला तर आवडला ब्वा पिच्चर ! झक्कास !!

Dhananjay Borgaonkar's picture

29 Oct 2010 - 12:35 pm | Dhananjay Borgaonkar

+१

मराठमोळा's picture

29 Oct 2010 - 12:29 pm | मराठमोळा

डोकं बाजुला ठेवुन बघावे अशा सिनेमांचीच आजकाल चलती आहे, हेच सिनेमे एकमेकांचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड मोडीत काढत असतात. दबंग पण याच कॅटेगरीमधला, पैसा कमाने का है तो फिर जो बिकता है वोईच बनाओ. अपनी अकल मत लगाओ. :)

बाकी आजकाल साऊथ ईंडीयन स्टाइल सिनेमे लोकांना आवडायला लागले आहेत.

मृत्युन्जय's picture

29 Oct 2010 - 12:42 pm | मृत्युन्जय

खरं सांगु का? तद्दन गल्लाभरु, बकवास, तर्कहीन, मसाला चित्रपट असलेला दबंग मलासुद्धा आवडला होता. काही चित्रपट असतात की ते १० वर्षांनी सुद्धा "आवडतात" असे म्हणायचे असते. दबंग आवडला होता या कॅटेगरीमधला आहे. अजुनही जर कधी लागला तर बघेन. याउलत "आवडतो" कॅटेगरी मधला असलेला रंग दे बसंती प्रत्येक वेळेस लागेल त्यावेळेस बघेन असेच नाही.

स्वानन्द's picture

29 Oct 2010 - 2:55 pm | स्वानन्द

अगदी अगदी !

दिपक's picture

29 Oct 2010 - 12:47 pm | दिपक

वॉण्टेड सारखा दबंग आवडला होता. सलमानला असेल रोल शोभतात.

चित्रपट-परिक्षण लिहावे ते दोघांनेच एक तर फारएन्ड आणी दुसरं म्हणंजे पर्‍यानी.

आजपासुन पर्‍याला " चित्रपट-परिक्षण केसरी " का खिताब देत आहोत (सोबत त्याची आवडत्या द्रव्याची बाटली ही देण्यात येईल ही नोंद घ्यावी, आता कसा पुरस्कार स्विकारत नाही ते बघुयात)

चित्रपट पाहिला . आवडला .
परिक्षण वाचले. आवडले.

मला सोनाक्षी चित्रपटात,खामोsssssssssश !! असा डायलॉग मारते की काय अशी भिती वाटत होती,पण त्यो डायल्वाक एकुन मीच खामोश झालो.

दुसरे म्हणजे अगदी शेवटचा फाईट सिक्वेन्स , हॉलीवुडच्या गाय रिची ने दिगदर्शीत केलेल्या, शेरलॉक होम्स चित्रपटातुन अगदी जसाच्या तसा ऊचललेला आहे. तस ही बॉलीवुड मध्ये ऊचलेगिरी चालतेच.

एकुण डोक बाजुला ठेवुन पाहिले तर दोन-अडीच तासाची निख्खळ करमणुक !!

विकाल's picture

29 Oct 2010 - 12:52 pm | विकाल

एक सुधारणा...

"जाताजाता अरबाजच्या दिग्दर्शनाला सलाम ठोकावेसे वाटतात असे..."

अभिनव कश्यप हा दिग्दर्शक आहे...!

झुणका भाकर's picture

29 Oct 2010 - 12:54 pm | झुणका भाकर

२) अंतिम मारामारीत सलमानच्या अंगावरुन टराटरा फाटून चिंध्या होउन वार्‍यावर उडालेला शर्ट सलमान खलनायकाला मारुन ट्रॅक्टरमधून परत येताना तोच शर्ट त्याच्या अंगावर असतो.
हे पाहुन तर आम्हाला अर्नाल्ड चीच आठवण झाली.

विसोबा खेचर's picture

29 Oct 2010 - 12:57 pm | विसोबा खेचर

मस्त परिक्षण रे..

सल्लू बाबा पण छान..

बाकी, कुणाचाही जीव जडावा अशीच आहे मलायका अरोरा..! :)

तात्या.

utkarsh shah's picture

29 Oct 2010 - 2:52 pm | utkarsh shah

हान.. तर आता इकडे चुलबुल आणि सलमान मधला संघर्ष चांगलाच पेट घेतो तर

मी पहिलेल्या दबंग मध्ये चुलबुलचा रोल सलमान करत होता. बहुतेक तुमचा दबांग वेगळा असेल बुवा कदाचित.. (ह. घ्या.)

चिगो's picture

29 Oct 2010 - 4:28 pm | चिगो

मस्त पराक्षण... आपलं, परीक्षण !! दबंग आवडला. फुल्लटू टाईमपास..

चिंतामणी's picture

29 Oct 2010 - 5:10 pm | चिंतामणी

प रा. तुझे परीक्षंण एक दम "फुल्ल टू" कडक.

त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.

हे वाचल्यावर मी तु कसा दिसत असशील त्यावेळी हे डोळ्यासमोर आणण्याचे फुल्ल टु प्रयत्न करीत आहे.

:-/

विचारात पडलेला चिंतामणी

प्रियाली's picture

29 Oct 2010 - 5:19 pm | प्रियाली

वाँटेडनंतर मीही दबंग बघायला उत्सुक आहे. असे चित्रपट बघून डोकेदुखी डोक्यासोबत पळून जाते असा अनुभव आहे. ;)

असो.

तसा मी काही फार जाणकार परीक्षक किंवा एखाद्या कलाकाराला पारखू शकेन असा कसबी वगैरे नाही,

कसबी? कसाब आहेस बाबा तू!

बायदवे, मला वॉंटेडमधला

"पास्ता पास्ता रोज डब्बामें पास्ता लेके जाती है|" हा डायलॉक भारी आवडतो. =)) असे भारी डॉयलॉक लिहिणार्‍या प्राण्याला मी हात जोडून नमस्कार करते. दबंगमध्येही असेच संवाद आहेत का?

परिकथेतील राजकुमार's picture

29 Oct 2010 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

दबंगमध्येही असेच संवाद आहेत का?

दबंगमध्ये तर क ह र आहे !

उद :- कमिनीसे याद आया, पांडेजी आपकी बिवी कैसी है ? =))

इथे अजुनही काही रोचक संवाद वाचता येतील.

धमाल मुलगा's picture

29 Oct 2010 - 6:37 pm | धमाल मुलगा

"मैने एकबार कमिटमेंट कर दी तो मै खुदकी भी नहीं सुनता" हे विसरलीस? :D

प्रियाली's picture

29 Oct 2010 - 7:06 pm | प्रियाली

ती तर पंचलाईन आहे पण ते

पास्ता पास्ता आणि ती पास्ता खाणारी आणि डब्ब्यात घेऊन जाणारी आयेशा टकिया भारीच. (ती त्या अबू आझमीच्या लेकालाही रोज पास्ता खायला घालत असेल का असा विचारही डोक्यात आला होता. ;) )

छोटा डॉन's picture

29 Oct 2010 - 7:09 pm | छोटा डॉन

पास्ता पास्ता आणि ती पास्ता खाणारी आणि डब्ब्यात घेऊन जाणारी आयेशा टकिया भारीच.

+१, आयेशा टाकिया भारीच ह्याच्याशी संपुर्ण सहमती.
आमच्या टारु नावाच्या मित्रालाही ती फार्फार आवडायची.

(ती त्या अबू आझमीच्या लेकालाही रोज पास्ता खायला घालत असेल का असा विचारही डोक्यात आला होता. )

"(जर रोज स्वत: आयेशा त्याला पाश्ता खाऊ घालत असेल तर ) नशिबवान आहे लेकाचा" एवढेच म्हणतो. ;)

- छोटा डॉन

मृत्युन्जय's picture

29 Oct 2010 - 7:26 pm | मृत्युन्जय

तुम्ही त्याच्या नशिबाचे मोजमाप पास्त्यावरुन केलंय हे बघुन डोळे अंबळ पाणावले.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Oct 2010 - 7:10 pm | परिकथेतील राजकुमार

पास्ता ?
ती त्याला खस्ता खायला लावत असेल.

मुन्नी बदनाम हुई गाण्याचा व्हिडो परिक्षणात न टाकल्याबद्दल पर्‍याचा निषेध.

-मुन्ना

मेघवेडा's picture

29 Oct 2010 - 7:42 pm | मेघवेडा

पर्‍या तुझ्यामुळे नाईल्याशी सहमती दर्शवण्याची वेळ आली आहे आज माझ्यावर. :D

लई भारी रे पर्‍या!! दे मार धाड पिच्चर लई आवडतात आपल्याला!!

धमाल मुलगा's picture

29 Oct 2010 - 6:41 pm | धमाल मुलगा

श्री.प.रा.,
हा काय फालतुपणा आहे? कोणत्यातरी क्षुल्लक देमार चित्रपटांबद्दल भरभरुन लिहायला पब्लिक फोरम कशाला वापरता? ह्या असल्या लोकांमुळे आणि गोष्टींमुळेच समाजात हिंसेची अंधश्रध्दा वाढते.

असो.
ह्या विषयावर अजुन आपले रॉबिनहुड देशपांडे उर्फे चुलबुल देशपांडे काही कसे बोलले नाहीत? ;)

छोटा डॉन's picture

29 Oct 2010 - 7:04 pm | छोटा डॉन

हा काय फालतुपणा आहे? कोणत्यातरी क्षुल्लक देमार चित्रपटांबद्दल भरभरुन लिहायला पब्लिक फोरम कशाला वापरता? ह्या असल्या लोकांमुळे आणि गोष्टींमुळेच समाजात हिंसेची अंधश्रध्दा वाढते.

+१, हेच म्हणतो.
असल्या भिकार चित्रपटांची परिक्षणे ?
आयला असले टुकार आणि गल्लाभरु चित्रपट पहावतात कसे हाच प्रश्न आहे.

त्यापेक्षा पराने "डायरी" लिहायला सुरवात करावी असे सुचवतो. ;)

- छोटा डॉन

धमाल मुलगा's picture

29 Oct 2010 - 7:10 pm | धमाल मुलगा

आपण रजनी आणि चिरंजीवी, नागार्जुना ह्यांचे डायहार्ड फ्यान आहात हे आम्ही तुर्त विसर्लो आहोत, कारण एकच..आपण आमच्य भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे. (तत्वः तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो.)

श्री.प.रा. ह्यांना नम्र विनंती, की त्यांनी आपल्या प्रतिभेची प्रतिमा अधिकाधिक उजळवावी आणि आम्हास वाचनमेजवानी द्यावी. ;)

छोटा डॉन's picture

29 Oct 2010 - 7:22 pm | छोटा डॉन

श्री. मुलगा,
आपली अंमळ गल्लत होते आहे, आम्ही केवळ सत्य तेच बोलत असतो व वर तेच लिहले आहे.
"दबंग" सारखे पिक्चर अत्यंत टाकाऊ, हलक्या प्रतीचे आहेत हे आमचे स्पष्ट मत आहे आणि आम्ही ते आग्रहाने मांडले आहे, आता ह्याला आपलीही सहमती निघाली हा योगायोग समजावा. ह्या निमित्ताने उगाच स्वतःचीच पाठ थोपटुन घेण्याचे हास्यास्पद प्रकार करु नयेत.

असो, चांगले पिक्चर म्हणजे नक्की काय हे पहायचे असेल तर आपण "रजनी, चिरंजीवी, बालकॄष्णा, विक्रम, महेशबाबु' ह्यांचे चित्रपट पहावेत असे सुचवतो.
मला वेळ मिळाला की थोड्याच दिवसात "मदिगरा / इन्द्रा - दी टायगर / स्टालिन / शंकरादादा सेरीज " ह्यापैकी एखाद्या अजरामर महान कलाकृतीचे परिक्षण टाकेन.
बाकी असो.

- ( उच्च अभिरुचीवाला ) छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

29 Oct 2010 - 7:26 pm | परिकथेतील राजकुमार

वरच्या यादीत NTR Jr. ह्यांचे नाव कसे नाही बरे ?

छोटा डॉन's picture

29 Oct 2010 - 7:29 pm | छोटा डॉन

>>वरच्या यादीत NTR Jr. ह्यांचे नाव कसे नाही बरे ?
गल्ली चुकली मालक.
हा प्रश्न आम्हाला विचारण्याऐवजी खुद्द NTR Jr. ला विचारावा की "बाबारे, डॉन्याच्या यादीत तुझे नाव का नाही?"
बाकी असो.

- छोटा डॉन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2010 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परा, मस्त परिक्षण रे..! लवकरच पाहतो. :)

बाकी, ' तेरे मस्त मस्त दो नैन' गाणं ऐकायला एकदम मस्त आहे.
[लेखात टाकलेला दुवा चालत नाही तो भाग वेगळा. :) ]

-दिलीप बिरुटे

मस्त कलंदर's picture

29 Oct 2010 - 7:37 pm | मस्त कलंदर

परा नेहमीप्रमाणे मस्तच परिचय रे.. मी वाँटेड पाह्यला नाही.. पण तुझा लेख वाचून परत एकदा दबंगमधले सगळे सीन्स आठवले.. शेवटचा डायलॉग तर अगदी कहरच आहे.. सोनाक्षी म्हणते, "पांडेजी, हमने उलटी कर दी है, आप सुलटे हो सकतें हैं।"
बाकी, पिक्चर मेंदू बाजूला ठेवून पाहायचा हे अगदी बरोब्बर!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Oct 2010 - 8:26 pm | बिपिन कार्यकर्ते

लै भारी!!!! शिन्मा अर लैच भारीये... फुल्टू टीपी!!! पैसा वस्सूल स्साला!!!

बाय द वे... पर्‍या, तुझा आवडता देशद्रोही पिच्चर उद्या का परवा टीव्हीवर येतो आहे म्हणे... :)

चित्रा's picture

29 Oct 2010 - 9:18 pm | चित्रा

पैसा वसूल म्हणजे पाहायलाच पाहिजे.

परिक्षण चांगले लिहिले आहे.
ती सोनाक्षी किती छान दिसतीये!
सिनेमा पाहीन असे वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Oct 2010 - 9:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

परिक्षण आवडलं, पिच्चर आवडेल याची खात्री आहे, पण सोनाक्षी मलातरी अंमळ रिटार्ड वाटली. ईशा देओल जास्त मंद आहे का सोनाक्षी सिन्हा याची स्पर्धा लावायला हरकत नाही.

प्रियाली's picture

29 Oct 2010 - 9:42 pm | प्रियाली

ईशा देओल मला परग्रहावरची पाहुणी वाटते. डोकं मोठं, चेहर्‍यावर विक्षिप्त भाव वगैरे त्यामानाने सोनाक्षी पृथ्वीवरली तरी दिसते.

मला आवडला नाही. फारच फालतू !

पण पराभौ परीक्षण जबरा लिवत्यात यात वादच नै ! असले भिकार शिणेमे चालण्यासाठी अशी परीक्षणे पोस्टरसोबतच लावली पाहिजेत. :)

chipatakhdumdum's picture

30 Oct 2010 - 2:08 am | chipatakhdumdum

२०१० मध्ये फक्त २ पिक्चर चाल्ले. येक रोबो ,दुसरा दबंग.
असले भिकार शिणेमे चालण्यासाठी अशी परीक्षणे पोस्टरसोबतच लावली पाहिजेत.


पिक्चर चालून लागून निघून सुध्दा गेला, आता कुठल परीक्षण लावतो भाउ हा चालण्यासाठी ?

अविनाशकुलकर्णी's picture

29 Oct 2010 - 10:04 pm | अविनाशकुलकर्णी

समीक्षण वाचून अंमळ शुद्ध निषाद ची आठवण आली....
शुद्ध निषाद...म्हणजे श्रीकांत ठाकरे...
मस्त लिहिले आहे

sneharani's picture

30 Oct 2010 - 10:06 am | sneharani

पिक्चर नाही आवडला!.
तेव्हा एखाद्या चांगल्या पिक्चरचे परिक्षण येऊ दे.

सहज's picture

30 Oct 2010 - 11:23 am | सहज

काळवीटांची शिकार, फुटपाथवरच्या माणसांचा जीव घेणे, आता करबुडवेगिरी इतके आरोप तसेच गुन्हे दाखल झालेल्या तसेच सुमार अभिनय करणार्‍या एका 'खाना'चे मिपावर ब्राम्हणी (का बामनी??) तत्वांकडून झालेले असे कोडकौतुक पाहून अत्यंत शरम वाटली.

परा आता पापाचे परिमार्जन - चिंतातूरजंतूंनी सुचवलेले १ अफ्रिकन, १ स्कॅन्डेनेव्हीयन, १ पूर्व आशीयायी, १ पूर्व युरोपीयन, १ अफगणिस्तानी असे ५ सिनेमे पाठोपाठ दाखवा. किंवा इंद्राज व क्रेमर यांनी सुचवलेली भाषानियमविषयक ५ पुस्तके!

-------------------------------------------------------------
एक चित्रपटभक्त नात्याने मनुष्यवध, जनावरांची हत्या, करबुडवेगिरी, बेक्कार अभिनय करणार्‍यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका असे आवाहन करतो.

कानडाऊ योगेशु's picture

30 Oct 2010 - 11:58 am | कानडाऊ योगेशु

पराचे परीक्षण आवडले.

पण चित्रपट अजिबात आवडला नाही.

चित्रपट प्रदर्शनानंतर सुरवातीचे काही दिवस ३ इडिय्ट्सबरोबर ह्या चित्रपटाची मुद्दामुन तुलना केली जात होती.

पण डबंगच्या मानाने ३ इडियट्स कितीतरी पटीने चांगला चित्रपट आहे.

ह्या चित्रपटाला फार हाईप करुन सुपरडुपर हिट बनवल्यासारखे वाटते.

बाकी सलमान मिशीमध्ये छान दिसतो.

जिंतेद्रनेही हिंमतवालानंतरच्या काही चित्रपटात मिशी ठेवली होती. आणि ते चित्रपट बर्यापैकी गाजले सुध्दा.!

अमिताभने बहुदा महानमध्ये मिशीचा प्रयोग केला होता पण तो साफ फसला.

(मिशीवाला) योगेश