अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले.
तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ... ची १५०१५+ वाचने म्हणजे जवळपास ५०,००३+ वाचने, सर्व मिळून गेल्या काही दिवसातच झाली आहेत. ही एक मोठी कमालच म्हणावी लागेल कारण एवढी ढिगाने वाचने मिपाच्या इतिहासात इतक्या वेगाने कधीच झाली नव्हती. आणि यापेक्षाही मोठी कमाल म्हणजे हे सारेही एकाच असंबद्ध शैलीत लिहिणारे लेखक आहेत.
आता यांच्या यशाचे गमक काय? मराठी वाचकांच्या अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'आक्रमक' आणि 'भडकाऊ' धाग्यांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्ग? (वेग पाहता 'अचानक' आणि 'झपाट्याने' हेच शब्द समर्पक आहेत.)
... हे लेखक मिपावर नवीन नवीन लिहीत असताना त्यांना वाचकांनी ठेंगा दाखवला, कोणी विषयाला अनुसरून प्रतिसाद देईनात, नुसतेच अवांतर चालवलेले, मग हे लोक भयंकर कमेंटी आणि डेंजर धागे टाकायला लागले. यांनी मिपाकरांविषयी जेथे तेथे अद्वा-तद्वा लिहीणे सुरु केले. हे त्यावेळी जिलब्या लिहायचे. त्या जिलब्यांत त्यांनी लिहिलेले असेच क्लिष्ट काही वाचून यांच्या एका मित्राने म्हणे यांना लेखमाला लिहायचे सुचवले, हे भलतेच मनावर घेऊन त्यांनी एक धागा लिहिला, तो बघता बघता ट्यारपी-गेनर झाला. मग यांनी काय करावे ? तर नवीन काही लिहायचे सोडून त्याच धाग्यातील तेच विषय आणि तेच संदर्भ उचलून त्यांचे अतार्किक तत्वज्ञान पुढे लांबवले आणि 'That's the way i write!' नावाने आणखी एक बाळबोध लेखमाला लिहून काढली..
तर त्यांच्या फक्त काहीच वाक्यातील जरी तोडक्या मोडक्या लेखनशैलीकडे दुर्लक्ष केले तरी ... अशा महाशयांना लेखक म्हणावे कि नाही हा प्रश्न उद्भवतो. फक्त एक दोन अतर्क्य आणि अगम्य विषय उचलायचे, आणि त्यांच्यातले बळे जुळवून आणलेले बालिश आणि मूर्ख संदर्भ दाखवायचे आणि बेसावध, अबोध आणि निष्पाप वाचक टार्गेट करून हि शब्दांची बंडलं 'लेखमाला' या नावाने खपवायची हेच यांचे उद्योग.
यांना आपण मिपाचे मारेकरी म्हणतो ते दोन कारणांसाठी, एक तर यांच्या जबर एकामागून एक पळणार्या धाग्यांचे साहित्यिक मूल्य शून्य आहे, उलट दर दोन वाक्यानंतर मांडलेले काहीतरी विसंगत मुद्दे आणि संदर्भरहित बडबड. आणि दुसरे म्हणजे, यांचे हे निरुपयोगी आणि नॉनसेन्सिकल रायटिंग सिंंड्रोमचा इफ्फेक्ट असणारे धागे वाचून आपण साहित्य वाचतो आहोत असा होणारा कोवळ्या अजाण वाचकांचा गैरसमज. यामुळे एक संपूर्ण पिढी साहित्या विषयीची मतेच चुकीची करून घेत आहे. याचाच परिणाम म्हणजे 'तत्वज्ञान आणि अमिबाचा आकार' वाचणार्या वाचकांना 'अंतरिक्षः मेंदूतील रिकामी जागा' अथवा 'ससे रात्री झोपतात किंवा कसे: एक विचार' वाचण्यात कसलाच रस नसतो. आणि साहित्य म्हणजे काय हे बर्याच वाचकांना ह्या ना..क लेखकांमुळे कळतच नाही. हे त्यांना दर आठवड्याला एक नवा दुर्बोध धागा वाचायला लावतात.
एवढ्यावरही हि मंडळी थांबली असती तरी काही आपत्ती नव्हती, पण एक धागा चालला म्हणून "बास, आता हापिसात दुसरे काही करायचेच नाही तर नुसते रिकामे धागे पाडायचे" असला टीपीयुक्त प्रोपागांडा घेऊन लेखन करायला आलेले हे लोक सध्या येता जाता लेख टाकतात (नव्हे खपवतात). आणि जोडधंदा म्हणून 'मिड्टाईम्स ऑफ नॉर्थ ईस्ट महाराष्ट्रा' मध्ये "What marathi reader wants?" या मथळ्याखाली मराठी वाचकांचे विचार मांडण्यासाठी स्वतः होऊन प्रतिनिधित्व करतात. आणि त्यात मुलुखभराचा मूर्खपणा वर्तमानपत्री भाषेत छापून आणतात.
आजकाल ... महाशय स्वतःला "Motivational writer" असेही म्हणवून घ्यायला लागले आहेत. लाखमोलाची बँड्विड्थ वाया घालवून हे "अक्सीडेंटल लेखक" अश्राप नव-वाचकांना stereotypical advice देऊन आयमाय एक करतात. खरे म्हणजे जो माणूस स्वतः अचानक यशस्वी झाला आणि तो हि काहीच न करता तोच माणूस 'यशस्वी कसे व्हावे' या विषयी मराठीतील सर्वोत्तम संस्थळावर लिहीण्यास देण्यास पात्र आहे का? तरी बरे इथे त्याच्या बौद्धिक पातळीविषयी बोलत नाहीये.
एक मजेशीर गोष्ट सांगून हे पाल्हाळ संपवूया, काही दिवसांपूर्वी, या ...चा म्हणे कीबोर्ड बडवतांना बोटं मुडपली, किरकोळ फ्रॅक्चर झाले तर हे महाशय पोहचले थेट संस्थळाच्या मालकाकडे, आणि म्हणाले 'आता मला एक महिना लिखाण रेस्ट घ्यावी लागेल आणि यामुळे माझे मेगाबायटी नुकसान होईल आणि मला अगोदरच कितीतरी धागे पेंडिंग आहेत, हे सर्व धागे मला कुणीतरी आयते लिहून द्यावे' पण अॅडमिनने *** वर लाथ मारून त्यांची बोळवण केली.मग यांनी स्वतःचा रीकवर होत असतानाचा एक व्हीडीओ बनवला आणि युट्युब वर टाकून दिला. आणि म्हणाले "दिल मे सच्ची चाह हो तो लेखकू कुछ भी कर सकता है, मुश्किल कितनी भी बडी क्यू न हो हमारे लिखाण को नही रोक सकती" आणि काही महिन्यानंतर पुन्हा ढीगभर धागे बाजारात आणले.
आता अशा महान माणसांविषयी आणि यांना 'मिसळपावचे शिलेदार' म्हणणाऱ्या वायझेड माझा विषयी काय लिहू तेच सुचेनासे झालेय.
**
आपली मते जाणून घ्यायला आवडतील, ... आणि ... विषयी खूप लिहिणार आहे पुढच्या भागात...
(लेखन पूर्णपणे ऑन डिमांड लिहीले गेले आहे, त्यामुळे लिखाणाविषयी काहीही आक्षेप असल्यास तो परस्पर डिमांड करणार्याकडे लागू होतो याची नोंद घ्यावी ;)
आपण काय पेर्र्णा लिहायाला घाबरत नाही ब्वा!
प्रतिक्रिया
25 Feb 2016 - 3:41 pm | रातराणी
खतरनाक! टोपी काढली आहे!
25 Feb 2016 - 3:44 pm | गॅरी ट्रुमन
जबरदस्त. प्रचंड आवडले आहे.
25 Feb 2016 - 3:44 pm | अजया
ढिशुम ढिशुम =)))
लिखाणाच्या सुपा-या घेऊन लेख पाडणार्याला काय म्हणता येईल? मारेकरी का शूर शिलेदार ?
25 Feb 2016 - 3:50 pm | नाना स्कॉच
वंटास!!!! जब्बरजस्त!! लॉळ
25 Feb 2016 - 3:51 pm | तर्राट जोकर
__/\__ येथे कर माझे जुळती!
25 Feb 2016 - 3:52 pm | गवि
निखालस विनोदी..
25 Feb 2016 - 3:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारीच जमलंय. मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती. उदा. ब्याटमन, धन्या, विठा, प्रचेतस, पीलियन रायडर, बोका इ आझम, गवि, असं काहीतरी नावं टाकायला पाहिजे होती.
डिस्क्लेमर : प्रतिसादात लिहिलेली नावं काल्पनिक आहेत, ती जर कोनाला आपली वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
25 Feb 2016 - 4:01 pm | उगा काहितरीच
काय सर आज काय मारामारीचा विचार आहे का ? ;-) हघ्या हेवेसांनलगे !
25 Feb 2016 - 4:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, मी गम्मत पण नै करायची का ? आणि खरं पण नै बोलायचं का ? कालपासून एवढ्या खाड-खाड फळया पडू राहिल्या डोक्यावर मी शांतच राहिलो ना ? (पळा आता)
-दिलीप बिरुटे
25 Feb 2016 - 5:22 pm | नीलमोहर
तुम्ही म्हणून त्या फळ्या अंगावर घेतल्या, इतर कोणी असते तर त्याच फळ्या उलट्या करून त्यांच्या डोक्यात घातल्या असत्या ;)
'मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती.'
- म्हणजे थोडक्यात हाराकिरी करायची होती असेच ना, अहो आत्ता कुठे मिपाकर, 'ही आहे नीमो, हिला आपले म्हणा' पर्यंत येतायत, थोडं या आनंदात डुंबून तरी घेऊ द्या ;)
25 Feb 2016 - 5:24 pm | अभ्या..
माझे घ्या नाव मारेकर्यात.
चालतेय मला. नावाला जागुन दाखव म्हणले तर एखादा गेम पण वाजवून दाखवतो. ;)
26 Feb 2016 - 2:09 am | टवाळ कार्टा
<माई>
गेम वाजवणे आणि गेम करणे यात फरक असतोना रे श्याम
26 Feb 2016 - 2:10 am | टवाळ कार्टा
कोणीतरी माईंचे मोड लावा हो जरा वरच्या प्रतिसादाला
26 Feb 2016 - 2:18 pm | नीलमोहर
कुठे माऊस सोडून दंबूक उचलायला जाताय,
तुमचं नाव मारेकर्यांत येणार नाही बहुधा, डायरेक्ट एखादी नवीन कॅटॅगरी काढावी लागेल :)
25 Feb 2016 - 4:08 pm | खेडूत
''राग येऊ द्या हवे तर, पान आपण लिहायाला घाबरत नाही ब्वा!''
हे राहिलंच की!
25 Feb 2016 - 4:37 pm | बोका-ए-आझम
आजकाल मारेकरी म्हणतात काय औरंगाबादमध्ये?
25 Feb 2016 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळ कितीही खा पण चिडू नका असं आमचं म्हणनं असतं.
अंगावर एक थेंब नाय पडला पाहिजे. रागावू नका ब्वा फक्त.
-दिलीप बिरुटे
25 Feb 2016 - 4:38 pm | बोका-ए-आझम
नाही हो सर. मी आझमचा बोका नाही.
25 Feb 2016 - 4:55 pm | पिलीयन रायडर
ओ डिबी...
आम्ही मेगाबायटी प्रतिसाद मंडळाचे सदस्य आहोत. (तुम्ही आमचे नेते संन्यस्थ डांगे अण्णा ह्यांना विसरलात बरं..)
धागे काढतो का आम्ही कधी तरी?!! ;)
25 Feb 2016 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्राडॉ, कुस्तिचा फड टाकायचा विचार आहे की काय ?! =)) =))
25 Feb 2016 - 4:00 pm | उगा काहितरीच
खतरनाक! काय तर पंच आहेत एक से बढकर एक !
25 Feb 2016 - 4:16 pm | श्री गावसेना प्रमुख
25 Feb 2016 - 4:16 pm | राही
सॉल्लिड.
25 Feb 2016 - 4:19 pm | जेपी
चांगलय..
आता,
मिपाकरांची व्यवच्छेदक लक्षणे-
येऊद्या..
26 Feb 2016 - 3:52 pm | नीलमोहर
१. व्यवच्छेदक म्हणजे काय?
२. हे असे फुलटॉस टाकून परत दरवेळी त्यावर षटकाराची अपेक्षा करणे चूक की बरोबर?
आता तुम्ही लिहा, आम्हाला निखळ वाचनानंद घेऊ द्या ;)
25 Feb 2016 - 4:20 pm | मितभाषी
=))
25 Feb 2016 - 4:21 pm | होबासराव
.
25 Feb 2016 - 4:23 pm | श्री गावसेना प्रमुख
बर असत थोड़ मनोरंजक, आता ह्यांनी नाही जिलेब्या पाडायच्या तर काय जेष्ठ सदस्य पाड़तील
25 Feb 2016 - 4:24 pm | एस
_/\_
25 Feb 2016 - 4:26 pm | श्री गावसेना प्रमुख
माझ्या वरच्या अर्धवट प्रकाशित झालेल्या प्रतिक्रिया डिलिट करता येतील काय
25 Feb 2016 - 4:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;)
-दिलीप बिरुटे
25 Feb 2016 - 4:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;)
-दिलीप बिरुटे
25 Feb 2016 - 5:45 pm | नीलमोहर
हेच ते.. हेच.. अगदी !!
नवलेखकूंच्या मनातले जाणून घेऊन त्यांना नाउमेद न करता प्रो त्सा ह न देणे असावे तर असे.
(प्रतिसादातले सारण :p)
25 Feb 2016 - 4:34 pm | नाखु
"गोफणगुंडा"
आवडला...
पुढचे किमान किती भाग (आणि कधी हा प्र्शन गिळला आहे) आहेत.
25 Feb 2016 - 4:35 pm | स्वाती दिनेश
मस्त!
स्वाती
25 Feb 2016 - 4:35 pm | बोका-ए-आझम
रापचिक एकदम!
25 Feb 2016 - 4:51 pm | पैसा
आम्ही वाचायला घाबरत नाय!
25 Feb 2016 - 5:56 pm | सस्नेह
अलिकडं कोण मिपाकर कोण मारेकरी काईच कळंना झालय ;)
(दहशतग्रस्त) स्नेहा
25 Feb 2016 - 6:24 pm | प्रचेतस
जबराट.
धूमशाम एकदम. =))
25 Feb 2016 - 9:40 pm | जव्हेरगंज
खतरा!
25 Feb 2016 - 9:51 pm | मितान
Lol ! Bhari !!!!
25 Feb 2016 - 10:05 pm | स्वामी संकेतानंद
=))
25 Feb 2016 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
धम्माल, दे दणादण, धागा !!!
25 Feb 2016 - 10:15 pm | टिवटिव
लोल !!!
25 Feb 2016 - 10:25 pm | भाते
मिपावरच्या एका ज्वलंत विषयाला वाचा फोडल्यापध्दल अभिनंदन. लेखनातले पंचेस आवडले.
पुभाप्र.
25 Feb 2016 - 11:06 pm | भीडस्त
असं कुठं नाव असतं का पुस्तकाचं
ते
That's the way i bite असं आहे म्हणे..
Biter आपलं ते Writer. :) :)
25 Feb 2016 - 11:09 pm | सतिश गावडे
वृत्तपत्रीय लिखाण !!
राग येऊ द्या हवा तर, आपण बोलायला खरच घाबरत नाही! :-)
26 Feb 2016 - 12:54 am | बिपिन कार्यकर्ते
ही माझी तीन नावं.... परा, प्राडॉ, विजुभाऊ .... ;) (ह. घ्या हो लेकाहो, नाही तर जीव घ्याल!)
चला आपापली लिष्टं टाका पटापट!
28 Feb 2016 - 11:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिका काय हे ? ;/
संदीप डांगे अन्ना, श्री गुरुजी, परा, प्यारे काका, विक्षिप्त, राजेश, सर्किट, ही नावं आठवली तरी मी त्यांना मिपा मारेकरी म्हणनार नाही. व्यवस्थित चाललेलं मिपा तुम्हाला बघवत नै का बिका ?
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
28 Feb 2016 - 2:13 pm | श्रीगुरुजी
हा धागा वाचल्यावर उगाचच महान नाटककार श्री. रा. रा. टेक्सास गायकवाड यांचे "आम्ही देशाचे मारेकरी" हे अजरामर नाटक आठवले.
26 Feb 2016 - 1:44 am | निशांत_खाडे
_/\_ मुजरा स्वीकारा..
26 Feb 2016 - 1:56 am | बहुगुणी
कळलं का, निशांत_खाडे, मिसळपाव म्हणजे कसं मौजमस्तीचं धमाल तळं आहे ते? असंच उडी घेऊन पोहा, किंवा काठाकाठाने मजा घ्या, पण त्रागा वगैरे सोडून द्या म्हणजे एंजॉय कराल.
_/\_ मुजरा स्वीकारा..
प्रा डॉंच्या खरडवहीतली तुमची खरडही वाचली. Must say I liked your sporting spirit!
:-) देर आये, दुरुस्त आये!
26 Feb 2016 - 2:05 am | निशांत_खाडे
हे अगोदरच कळले असते तर बरे असते :-D
लिहिताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे आता :-). धन्यवाद!
26 Feb 2016 - 2:11 am | निशांत_खाडे
आणि हे इतके कनस्ट्रकटीव क्रीटीसीजम म्हटल्या नंतर तर तळ्यातून बाहेर यावेसेच वाटणार नाही.
26 Feb 2016 - 2:29 pm | नीलमोहर
जगभराचे ताणतणाव व्याप-ताप इथे येऊन विसरून जायचे आणि या ज्ञान सागरात डुंबत रहायचं, लेखन-वाचन आनंद घ्यायचा द्यायचा - बास ! मज्जानु लाईफ !!
बाकी खेळाडू वृत्ती दाखवल्याबद्दल अभिनंदन :)
26 Feb 2016 - 2:07 am | टवाळ कार्टा
26 Feb 2016 - 3:43 am | भरत्_पलुसकर
तै उगा नाय तुमचं नाव आमच्या लिश्टीत हाय ते! तोडफोड केलीया निस्ती!
26 Feb 2016 - 8:40 am | सतिश गावडे
26 Feb 2016 - 4:00 pm | नीलमोहर
कौतुक,
हवा जाईल अशाने...
डोक्यात ;)
26 Feb 2016 - 2:55 am | श्रीरंग_जोशी
विडंबनकार नीमो यांचा विजय असो.
26 Feb 2016 - 3:12 am | गामा पैलवान
26 Feb 2016 - 3:42 pm | नीलमोहर
प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनासाठी सर्वांचेच मनःपूर्वक आभार.
माझ्या लेखांच्या बाबतीत एक गोष्ट मला खूप म्हणजे खूप आवडते, किंबहुना इथे सातत्याने लिहीत राहण्यामागे
तीही एक प्रेरणा आहे म्हणता येईल :)
विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच, मूळ लेख तोवर वाचलेला नव्हता, वाचल्यावर
जबर कच्चा माल असल्याची कल्पना आली, मग काय मज्जाच !
एकवेळ साधं सहज लेखन करणं सोपं पण हे असं लिहीतांना फार दमछाक होते, फॅ फॅ उडणे म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव येतो.
26 Feb 2016 - 4:13 pm | सस्नेह
पण 'प्रेर्णा' लिंकवायला विसरलीस ना !
आम्हाला शोधावी लागली.
26 Feb 2016 - 4:29 pm | नीलमोहर
अतिउत्साह दुसरं काय ;)
नंतर प्रतिक्रिया वाचून खुश होतांना आठवलं प्रेरणा राहून गेली.
पण तुम्ही आहात ना आठवण करून द्यायला, घ्या मग काम, लेखाच्या शेवटी ही लिंक__/\__ चिकटवून टाका.
आपण काय पेरणा लिहायाला घाबरत नाही ब्वा!
28 Feb 2016 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच...
मी नै कै हं...! उगं माझं नाव नै घ्यायचं (असं जाहीर) ;)
मी फक्त भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे मारेकरी असं लिहा म्हटलं होतं.
-दिलीप बिरुटे
26 Feb 2016 - 3:47 pm | होबासराव
;))
26 Feb 2016 - 3:56 pm | नीलमोहर
वरती तुमचीही डिमांड वाचली,
'आहे चा महिमा' वर लिहा - म्हणजे काय ते मात्र समजले नाही.
26 Feb 2016 - 4:34 pm | होबासराव
मतबल तै ये आपने पढ्याच नै.
http://www.misalpav.com/node/34952
26 Feb 2016 - 5:08 pm | नीलमोहर
'आ ता मा झ्या त ता क द ना ही'
(मंगेश देसाई स्टाईलमध्ये इमॅजिन करावे ;)