नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्या, नव्हे तसल्या गोष्टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे. आम्ही रडारवर बसलो होतो, आता तुमचा वरचा कॉन्टॅक्ट सुरु झालाय (दीक्षा देऊन झाल्यानंतर), सीमकार्ड, तुम्ही रिचार्ज करा, बॅलन्स संपलंय, पेट्रोल भरु, कुठंही गेलात तरी कॉन्टॅक्टमध्ये रहा, असल्या वरवर सोप्या पण अत्यंत गूढ, गहन प्रक्रिया सूचित करणार्या भाषेत बोलायचे. त्यांना लिहिता वाचता येत होतं, कारण नाथ संप्रदायाच्या नित्योपासनेच्या पुस्तकातले अभंग ढोलकीच्या अतिशय मनोहर तालावर नाथ महेश्वरच्या त्यांच्या छोट्याशा मठीत म्हणत उभे असतानाच मी आणि विलासराव त्यांची वाट पहात बाहेर घाटावर बसून होतो. सांगायचा मुद्दा हा की भरभक्कम संकल्पना, लंबंचौडं भाषण वगैरे नाथांचे विषय नव्हते - होता फक्त थेट अनुभव, मी जिकडे तिकडे प्रॅक्टीकल प्रॅक्टीकल म्हणून ओरडत होतो ते समोरासमोरचं प्रॅक्टीकल. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे थेट दाखवायचे - म्हणजे नुसती नजर टाकून थेट आजूबाजूची झाडं गदागदा हालवून दाखवायचे - तुफान आणून दाखवायचे आणि विचारायचे - चल बता ये क्या है? सांग मला हे समजून हे काय आहे ते. अर्थातच हे योगसाधनेच्या बळावर. मातृरुपी चामुंडा शक्तीच्या उपासनेच्या बळावर. महेश्वरचा त्यांचा रहाण्याचा एकूण गेटअप, ते करीत असलेले अचाट प्रकार पाहून मला मनात कुठेतरी हा माणूस वामाचारी आहे असं वाटत होतं. हो ना, आता एखादा माणूस अशा गोष्टी करत असतानाच पूर्ण करड्या रंगात रंगवलेलं शक्तीचं मंदीर, धड डॉबरमॅनही नाही आणि धड गावठीही नाही अशा कुत्र्यांना पाणथळ जागी डुंबताना दाखवून ते भैरव आहेत दर्शन घे, क्षणात तेच कुत्रे पुन्हा त्या शक्तीच्या मंदीराशेजारी आराम पडलेले दाखवून, गांजा वगैरे वरवरच्या गोष्टी पाहून आणखी वेगळं काय वाटणार? नाथांचे पाय पकडेपर्यंत आम्ही होतो युजीपंथीय - विचारांची साखळी, ती तोडा म्हणजे शरीराचा स्फोट होतो वगैरे गोष्टी युजींकडून ऐकलेल्या - म्हणजे 'मी' नावाचं 'Living Organism'कसं ऑपरेट होतं हे अनुभवता येईल वगैरे युजींचा अनुभव मी ताडून पहात होतो. डावं-उजवं होतंय ते तुटलं पाहिजे, म्हणजे स्फोट होतों, खरंय का असं मी विचारलं. तर डावं-उजवं ही नाथ पंथामधली ब्रह्मांडाचं संतुलन साधणारी विश्वव्यापक संकल्पना आहे - म्हणजे जगात सम आणि विषम आहे म्हणूनच विश्वाला गती आहे हे मज पामराला कसं ठावं असणार. नाथ पंथाची शिकवण अगदी साधी आणि थेट आहे - एका हाताने द्या आणि दुसर्या हाताने घ्या. वासना आहेत? तर आहेत! प्रेम आहे? तर आहे! द्वेष आहे? तर आहे! वाद आहे? तर आहे! या सगळ्या गोष्टींमध्ये संतुलन पाहिजे. म्हणजे द्वेष मिळाला - तर तो शून्य करण्यासाठी प्रेम वापरावं लागेल. मी स्वत:कडे एक विभक्त एंटीटी म्हणून पाहात होतो आणि जे काही होईल ते फक्त माझ्यात होईल असं मी समजत होतो. आणि नाथ तर कालभैरवाचंच रुप असल्याने मी शेवटी जागृत होऊनही कुठे पोहोचणार होतो? काळाच्या मुखातच ना? म्हणून महेश्वरच्या घाटावर कालभैरव बनून उभ्या असलेल्या नाथांना आधी सगळे चमत्कार दाखवावे लागले, मग मी नमस्कार केला. मग नाथांनी दीक्षा दिली. खरबूज कापून त्याचं अर्धं भक्कल न तोडता खायला लाऊन त्याद्वारे योगसाधनेच्या बळावर नाथांनी स्वत:चा डावा मेंदू माझ्या मेंदूत आरोपित केला, त्यांचा स्वत:चा देह महेश्वरहून अमरकंटकला जाऊन विसर्जीत केला. नाथांचा सगळं बोलणं कोड्यात. दीक्षा मिळाल्यानंतर दोन-चार दिवसांत एका सकाळी नाथांचा फोन आला - काय म्हणता यशवंत पाटील? हे असं वाट्टेल त्या नावाने कुणालाही हाक मारायचे. कधी म्हणायचे मी दगडधोंडे, लोखंडाचा डॉक्टर आहे, तु जीवाचा डॉक्टर आहेस - असं काहीही. तर मला त्या सकाळी ते फोनवर म्हणे, इंदूर स्टेशनवर या, अमरकंटकला निघालोय आणि मी काही खाल्लेलं नाही. येताना काहीतरी खायला घेऊन या. स्टेशनच्या उजव्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली मी थांबलोय वगैरे. तो स्टेशनवरचा दृष्टांत मी लिहिला पण आहे. स्टेशनवर नाथांचं दर्शन होऊ शकलं नाही. जवळपास होते तेवढ्या पिंपळांखाली मी जाऊन आलो. पण अमरकंटकला निघालेत म्हणजे देह विसर्जीत करायला निघालेत हे मला त्यावेळी कळलं नव्हतं. नाथांनीच नंतर खाणाखूणांद्वारे त्यांनी देह विसर्जीत केल्याचं कळवलं. घराच्या बाहेर पडलो तेव्हापासूनच आजूबाजूची झाडे गदागदा हालायला सुरुवात झालीच होती. ही नाथ खरोखर त्यांच्या देहाने इंदूरमध्ये आल्याची खूण होती. मग पुढे बर्याच खाणाखूणा. काल सूर्यावरुन झालेल्या शुक्राच्या अधिक्रमणादरम्यान माझ्या डाव्या मेंदूत असलेल्या नाथांच्या चेतनेने ही कव्वाली निवडली - आणि मला अखेरीस कळलं मी एक गोरखधंदा बनलोय. ग्रह गती आणि मानवी जीवन यांचा संबंध असतोच असतो, जे पिंडी ते ब्रह्मांडी! या कव्वालीच्या अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत. पण नुस़रत फतह अली खानांनी जेवढी म्हटलीय तेवढीच इथे घेतलीय. आता पाकिस्तानात लिहिल्या गेलेल्या कव्वालीत 'गोरखधंदा', 'दर्शन', 'वादात काही नाही' (शंकराचार्यांचा संदर्भ, बृहदारण्यकोपनिषदात 'ये बुराई, ये भलाई, ये जहन्नुम, ये बहिश्त' हेच संस्कृतमध्ये आलंय, कारण सगळं एक आहे) हे असं सांगणारे शब्द कसे आले? नाथपंथ त्या काळच्या भारतात कुठेपर्यंत पोहोचला असेल देव जाणे. मग एक मुसलमान कव्वाल 'तुम इक गोरख धंदा हो' गाणारच. हे मूळचं सूफी गीत आहे. यात सगळं अगदी थेट सांगितलंय, समोर मांडलंय, तुम्ही नेमके कसे आहात हे विचारलंय, ज्यांनी 'अनल हक़', 'मीच ईश्वर आहे' म्हटलं त्या मन्सूरचं काय झालं हेही सांगितलंय, ईश्वर का दिसू शकत नाही हे विचारलंय, सांगितलंय - एकूण अगदी प्रचंड अर्थ, दिसतील तेवढे अर्थ. आनंद घ्या.
कभी यहां तूने ढूंढा कभी वहां पहूंचा
तुम्हारी दीद की खातीर कहां कहां पहुंचा
गरीब मिट गये पामाल हो गये लेकीन
किसी तलक न तेरा आजतक निशां पहुंचा
हो भी नहीं और हर जा हो
हो भी नहीं और हर जा हो
तुम इक गोरख धंदा हो
हर जर्रे में किस शान से तु जलवा नुमां है.. तु जलवा नुमां है
हैरान है मगर अक्ल के कैसे है तु क्या है?
तुम इक गोरख धंदा हो
तुझे दैर-ओ-हरम मैं ने ढूंढा तु नहीं मिलता
मगर तशरीफ फरमा तुझको अपने दिल में देखा है
तुम इक गोरख धंदा हो
जब बजूझ तीर कोई दुसरा मौजूद नहीं
फिर समझ में नहीं आता तेरा परदा करना
तुम इक गोरख धंदा हो
कोई फत में तुम्हारी खो गया है
उसी खोए हुए को कुछ मिला है
न बुतखाने ना काबे में मिला है
मगर टूटे हुए दिल में मिला है
अदम बनकर कहीं तु छूप गया है
कहीं तू हस्त बनकर आ गया है
नहीं है तू तो फिर इनकार कैसा
नफिली तेरे होने का पता है
मै जिसको कह रहां हू अपनी हस्ती
अगर वो तू नहीं है तो क्या है?
नहीं आया खयालों में अगर तू
तो फिर मैं कैसे समझा तू खुदा है
तुम इक गोरख धंदा हो
हैरान हूंऽऽऽ मै हैरान हूंऽऽऽ इस बात पे तुम कौन हो क्या हो?
हाथ आओ तो बुत, हाथ ना आओ तो खुदा हो
अक्ल में जो गिर गया लाइंतहा तु कर हूआ
जो समझ में आ गया फिर वो खुदा क्यूं कर हुआ
फलसफी को बहस के अंदर खुदा मिलता नहीं
छोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नहीं
छुपते नहीं हो सामने आते नहीं हो तुम
जलवा दिखाके जलवा दिखाते नहीं हो तुम
बैरो हरम के झगडे मिटाते नहीं हो तुम
जो अस्ल बात है वो बताते नहीं हो तुम
हैरां हूं मेरे दिल में समाए हो किस तरहा
हालां की दो जहां में समाते नहीं हो तुम
ये मा बद ओ हरम हे कलीसा-ओ-दैर क्यूं
हरजाई हो जभी तो बताते नहीं हो तुम
तुम इक गोरख धंदा हो
दिल पे हैरत ने अजब रंग जमा रक्खा है
एक उलझी हुयी तस्वीर बना रक्खा है
कुछ समझ में नहीं आता के ये चक्कर क्या है
खेल क्या तुमने अजल से ये रचा रक्खा है
रुह को जिस्म के पिंजरे का बनाकर कैदी उसपे फिर मौत का पेहरा भी बिठा रक्खा है
दे के तदबीर के पंछी को उडाने तूने
दाम-ए-तकदीर भी हर सम्त बिछा रक्खा है
कर के अराइश क्वोनैन की बरसों तूने, खत्म करने का भी मनसूबा बना रक्खा है
लामकानी का बहरहाल है दावा भी तु मे
नाहनू अकरब का भी पैगाम भी सूना रक्खा है
ये बुराई, वो भलाई, ये जहन्नुम, वो बहिश्त, इस उलटफेर में फरमाओ तो क्या रक्खा है?
जुर्म आदम ने किया और सजा बेटों को
अद्ल ओ इन्साफ़ मि'यार भी किया रक्खा है
दे के इन्सान को दुनिया में ख़लाफत अपनी, इक तमाशा सा जमाने में बना रक्खा है
अपनी पेहचान की खातीर है बनाया सबको, सब की नज़रों से मगर खुद को छुपा के रक्खा है
तुम एक गोरख धंदा हो
नीत नये नक्क्ष बनाते हो मिटा देते हो, जाने किस जुर्म-ए-तमन्ना की सजा देते हो
कभी कंकड़ को बना देते हो हीरे की कनी, कभी हीरों को भी मिट्टी में मिला देते हो
जिंदगी कीतने ही मुरदों को अता की जिसने, वो मसिहा को भी सलीबों पे सजा देते हो
खाहिशे दी तो जो कर बैठे सरे तूर कोई,
तूर ही बढके तजल्ली से जला देते हो
नार-ए-नमरुद में डलवाते हो खुद अपना ख़लील
खुद ही फीर नार को गुलज़ार बना देते हो
चाहे किन आन में फेंको कभी माहे किन आं
नूर याकूब की आंखो का बुझा देते हो
दे के युसूफ को कभी मिस्र के बाजारों मे
आखरे कार शह-ए मिस्र बना देते हो
जज्ब़ो मस्ती की जो मंज़ील पे पहुंचता है कोई
बैठकर दिल में अनल-हक़ की सज़ा देते हो
खुद ही लगवाते हो फिर कुफ्ऱ के फ़तवे उसपर
खुद ही मन्सूर को सूली पे चढा देते हो
अपनी हस्ती भी इक रोज गवां बैठता है
अपने दर्शन की लगन जिसको लगा देते हो
कोई राँझा जो कभी खोज में निकले तेरी, तुम उसे झंग के बेले में रुला देते हो,
जुस्तुजू लेके तुम्हारी जो चले क़ैस कोई, उसको मजनू किसी लैला का बना देते हो,
जोत सस्सी के अगर मन में तुम्हारी जागे, तुम उसे तपते हुए थड़ में जला देते हो,
सोहनी गर तुम्हे माहीवाल तस्सव्वुर कर ले, उसको बिफ़री हुई लहरों में बहा देते हो,
ख़ुद जो चाहो तो सर-ए-अर्श बुला कर महबूब, एक ही रात में महराज करा देते हो!
तुम इक गोरख धंदा हो
जो कहता हूं माना तुम्हें लगता है बुरासा
फिर भी है मुझे तुमसे बहरहाल गिला सा
चुपचाप रहे देखते तुम अर्श-ए-बरी पर
तपते हुये करबल में मुहम्मद का नवासा
किस तरह़ पिलाता था लहू अपना वफ़ा को
खुद तीन दिनों से वो अगरचे था प्यासा
दुश्मन बहरतौर थे दुष्मन मगर अफसोस, तुमने भी फराहम ना किया पानी जरा सा
हर जुल्म की तौफिक़ है जालीम की विरासत
मज़लूम के हिस्से में तसल्ली ना दिलासा
कल ताज सजा देखा था जिस शक्ख्स़ के सर पर
है आज उसी शक्ख्स़ के हाथों मे हिक़ासा
ये क्या है अगर पूछूं तो कहते हो जवाबन
इस राज़ से हो सकता नहीं कोई श़नासा
तुम इक गोरख धंदा हो
राहे तहक़ीक में हर गाम पे उलझन देखूं
वही हालात और खयालात में अनबन देखूं
बनके रह जाता हूं तस्व़ीर परिशानी की
ग़ौर से जब भी कभी दुनिया दरपन देखूं
एक ही ख़ाक से फितरत के तजादाद़ इतने
कितने हिस्सों मे बटा एक ही आँगन देखूं
कहीं जह़मत की सुलगती हुयी पतझड का समां
कहीं रह़मत के बरसते हुये सावन देखूं
कहीं फुंकारते दरिया, कहीं खामोश पहाड़
कहीं जंगल, कहीं सेहरा, कहीं गुलश़न देखूं
खून रुलाता है यह तक़सीम का अंदाज मुझे
कोई धनवान यहांपर कोई निर्धन देखूं
जिनके हाथों मे फकत एक सुलगता हुआ सूरज़
रात की मांग सितारों से मुज्जयन देखूं
कहीं मुरझाये हुये फूल है सच्चाई के
और कहीं झूठ के काटों पे भी जोबन देखूं
रात क्या शय्है सवेरा क्या है, ये उज़ाला क्या, अंधेरा क्या है
मै भी नाईब हूं तुम्हारा आखि़र
तुम ये कहते हो तेरा क्या है?
तुम इक गोरख धंदा हो
प्रतिक्रिया
7 Jun 2012 - 9:26 am | ऋषिकेश
कव्वाली आवडली!
7 Jun 2012 - 10:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कव्वाली आवडली.
अपनी पेहचान की खातीर है बनाया सबको, सब की नज़रों से मगर खुद को छुपा के रक्खा है
तुम एक गोरख धंदा हो
स्सही.
-दिलीप बिरुटे
7 Jun 2012 - 9:42 am | llपुण्याचे पेशवेll
छान.
गोरख - गोरख या नावाचा अर्थ एका सत्पुरुषांनी असा सांगितला होता की गोरख हे नाव मूळ श्रीकृष्णाचे म्हणजे (गो म्हणजे धेनू त्या राखणारा गोरख हा एक लौकीक अर्थ झाला) गो म्हणजे इंद्रिये जो इंद्रियांवर नियंत्रण ठेऊन आहे तो म्हणजे जितेंद्रीय असा योगेश्वर श्रीकृष्ण. गोरखनाथांनाही हे नाव केवळ शेणातून जन्मलेला अशा अर्थापेक्षा इंद्रिय जिंकलेला अशाच अर्थाने जास्त लागू पडतो.
7 Jun 2012 - 9:59 am | यकु
आणि गाईच्या पोटात 33 कोटी देव ! मग कृष्ण कन्हैय्या गाई राखणारच.
फक्त तसं म्हणायची एक पद्धत, दृष्टांत - शेणातून आले म्हणजे कुठून आले? तर गाईच्या पोटातून. नाथपंथात कशाचंही काहीही होऊ शकतं. :)
पुपे पण गोरखनाथांचा जन्म गाईच्या पोटातून झाला हे मात्र आत्ताच कळलं - मी अजून नवनाथ अवतारांबद्दलची पोथी (ही फक्त मराठी भाषेतच आहे असं कुठेतरी वाचलं) वाचलेली नाही, वडलांना अशात कुणीतरी वाचायला सांगितलीय म्हणे, त्यांना विचारावं लागेल वाचतायत की नाही आणि मलाही वाचावी लागणार आहे.
7 Jun 2012 - 11:16 am | मन१
अंधुकशी आठवणारी कथा लिहितोयः-
महागुरु, आदिनाथ शंकराचे थेट शिष्य मत्स्येंद्रनाथांना कुठल्याशा विवाहित जोडप्याने नवस केला मुलगा होउ दे, तुम्हाला अर्पण़ करिन वगैरे. त्यांनी तसे व्हावे म्हणून आशिर्वादरूपी / प्रसादरूपी एक विभूती/दिव्यभुकटी दिली.
त्या स्त्रीस काय बुद्धी झाली कुणास ठाउक. तिने ती विभूती नाथ महाराज जाताच धाडकन शेणात टाकली.
काही वर्षांनी आपल्या कृपेने झालेला पुत्र परत मागण्यास मच्छिंद्रनाथ/ मत्स्येंद्रनाथ आले. त्यांना विभूती शेणात टाकली गेल्याचे समजले. तत्क्षणी ते घरामागच्या शेणाने भरलेल्या गोठ्यात जाउन "चल बेटा गोरख, ऊठ मोठा झालायेस आता" असे म्हणताच गाईच्या शेणातून(की शेणाच्या/गोवर्यांच्या राखेतून?? ) एक तेजस्वी युवक बाहेर आला. ब्रम्हचर्याचे तेज** त्याच्या चेहर्यावर्,कांटीवर झळकत होते. मत्स्येंद्रनाथ त्याला घेउन निघून गेले.
पुढे काही काळाने खुद्द मत्स्येंद्रनाथच एका स्त्रीराज्यात* भ्रमित होउन अडकले, मूळ नाथपंथी रूप विसरले. तेव्हा ह्याच त्यांच्या शिष्याने, गोरखनाथाने महत्प्रयासाने त्यांना परत आणले. लोककथा म्हणते त्यानुसार त्यांनी नर्तन्-वादन करणार्याच्या वेशात स्त्री राज्यात प्रवेश केला आणि तिथे ढोल्/ मृदुंग वाजवतानाच त्यातून "चल मच्छिंदर गोरख आया" असा ध्वनी उमटला. गुरु-शिष्य भेट होताच स्व-रूपाची जाणीव होउन मच्छिंद्र परतले.
ह्या सगळ्या कथेचा आधार काय ठाउक नाही. मौखिक परंपरेत अगदि लहानपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी एक आहे.
ह्यातला आध्यात्मिक म्हटला जाणारा अर्थही समजलेला नाही.
ह्याच कथेची पुढची व्हर्जन चोप्य पस्ते करतोय.
http://mr.upakram.org/node/1372#comment-22279
प्रेषक विसुनाना (मंगळ, 08/05/2008 - 08:24)
रा.चिं. ढेरेंच्या 'नाथ संप्रदायाचा इतिहास' मधून आठवेल तसे -
मच्छिन्द्रनाथ मजल-दरमजल करीत देशाटन करत असता आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथे पोचले. तेथे तांत्रिक योगिनींचा एक मठ होता.या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत. (त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.)
या योगिनींनी मच्छिन्द्रांना हटयोगातील वेगवेगळ्या आसनांचे आव्हान दिले. त्यातील बरीच आसने त्यांनी केली.
परंतु 'उर्ध्वरेता'(http://en.wikipedia.org/wiki/The_Perfect_Matrimony#cite_note-8) या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो. तो करताना ते मायेच्या बंधनात अडकले. पुढे १२ वर्षे ते त्या योगिनींच्या जाळ्यात अडकले. तेंव्हा त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा शिष्य गोरक्ष तिथे पोचला. त्यालाही त्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. 'उर्ध्वरेता' सकट सर्व आसने करून त्यांनी मच्छिंद्रांची मुक्ती मिळवली.
*स्त्री राज्य म्हणजे जिथे सर्व कारभार स्त्रिया करतात असे काहिसे.
**ह्याचा नक्की अर्थ ठाउक नाही.
7 Jun 2012 - 11:20 am | प्रचेतस
नाथपंथी म्हणजेच शाक्तपंथीय का? तांत्रिक पूजेवर विश्वास असणारा हाच पंथ काय?
7 Jun 2012 - 11:23 am | मन१
बहुतेक नाही.
ह्यांना शाक्तपंथासारखा स्वैराचार्,वामाचार किंवा व्य्भिचार मान्य नव्हता.
शाक्त म्हणजे बहुतेक ते पाच "म" वाले. मदिरा,मथुन, मदिराक्षीचा तडकून उपभोग घ्यायचा असा काहितरी फंडा आहे.
7 Jun 2012 - 10:30 am | कापूसकोन्ड्या
..मै कहां हूं?
7 Jun 2012 - 11:11 am | यकु
सौदी अरेबिया! त्या मुक्त विहारींची आणि तुमची ओळख आहे की नाही? ते पण सऊदीमध्येच आहेत म्हणे ;-)
7 Jun 2012 - 8:48 pm | कापूसकोन्ड्या
मै कहां हूं? हे एक एक्स्प्रेशन आहे प्रश्न नव्हे. '' May I ask your name?'' सारखे वाक्य हे expression आहे
असो.
मला यातलं काहीही *ट किंवा *टा सुद्धा कळले नाही म्हणून मै कहां हूं? पुन्हा असो.
-पुलेशु.
7 Jun 2012 - 9:26 pm | यकु
सो व्हॉट वॉज दी प्रॉब्लेम?
7 Jun 2012 - 9:34 pm | राजेश घासकडवी
प्रॉब्लेम हा की तुम्ही आत्तापर्यंत शब्द निरर्थक असतात; भावना, अनुभूती महत्त्वाच्या असतात असं म्हणत आला आहात. अशी विचारसरणी असताना भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं तुमच्याच विचारांशी विसंगत आहे. अशी विसंगती दिसली की प्रॉब्लेम जाणवतोच.
7 Jun 2012 - 10:15 pm | यकु
हाऊ कॅन आय एंटर इन अदर पर्सन सर? इज देअर एनि वे टू गिव्ह अनुभूती टू अदर पर्सन? माय गुरु वॉज ए ग्रेट विझार्ड - ही हॅड दॅट स्कील टू एन्क्रोच अॅण्ड शो दी रिअल थिंग. आय अॅम हेल्पलेस. मग मला शब्द वापरून घुसावं लागतं - मी माझ्यात घुसण्याच्या प्रयत्न करतो - आय ले माय सेल्फ इन ओपन अँण्ड टॉर्चर इट टू सी इफ भावना लक्षात येतायत का? हुज धीज भावना आर?
8 Jun 2012 - 12:46 am | राजेश घासकडवी
शरीरात शिरणं, मनात शिरणं वगैरे कशाला लागतं? 'मै कहॉं हू?' या शब्दप्रयोगांचा उपयोग खरोखरच 'मी कुठे आहे' हे विचारण्यासाठी नाही हे स्वयंस्पष्ट आहे. इतकंच. तुम्ही त्या शब्दांमधले दाणे शोधण्याऐवजी फोलपटं निवडली. तुमचा चॉइस.
विसंगती आहे इतकं मान्य करा एवढंच म्हणणं आहे. यु शुड फॉलो व्हॉट यू प्रीच.
8 Jun 2012 - 11:38 am | कापूसकोन्ड्या
काही वाक्प्रचार आठवले. एकच लक्षात येतो, बाकीचे विसरले.
मै कहाँ हूं ?
7 Jun 2012 - 11:19 am | मन१
प्रथमच यकुज लेख नीट,पूर्ण वाचला.
7 Jun 2012 - 11:23 am | सहज
खरबूज कापून त्याचं अर्धं भक्कल न तोडता खायला लाऊन त्याद्वारे योगसाधनेच्या बळावर नाथांनी स्वत:चा डावा मेंदू माझ्या मेंदूत आरोपित केला, त्यांचा स्वत:चा देह महेश्वरहून अमरकंटकला जाऊन विसर्जीत केला.
मला कशातलं काही कळत नाही, आणि मी वाद घालत नाही. उगाच रोजचा टकुर्याला ताण नको. - श्री श्री साईविलास
7 Jun 2012 - 11:51 am | विसुनाना
म्हणजे नवरत्ननाथांनी (देहरूपाने) इहलोकीची यात्रा संपवली? अरेरे, असे कसे झाले? नक्की काय झाले? महाराजांचा मृतदेह सापडला काय?
मप्रच्या पश्चिम टोकापासून ते पूर्व टोकापर्यंत (महेश्वर ते अमरकंटक) हा शेवटचा प्रवास त्यांनी का केला असावा? याचे गूढ वाटले.
7 Jun 2012 - 11:59 am | यकु
नर्मदे हर ! मुर्दों को जो जिंदा कर दे अशा माणसाच्या मृत देहाचं काय झालं ही खरीतर गौण बाब आहे, त्यांनी मला कळवली नाही - फक्त खुंटीवर टांगलेल्या कपड्याकडे आणि वीजेच्या तारेकडे माझ्या नेत्रचेतनेला वळवून त्यांनी देह सोडलाय एवढंच माझ्यापर्यंत पोहोचवलं. वाईट वाटलं, शेवटी कितीही सिद्धपुरुष झाला तरी त्यांच्या देहाचं काय झालं हे मला कसं समजावं?
पुनरपि जननं पुनरपि मरणं - पुनरपि माता उदरे शयनं. जातील कुठे?
7 Jun 2012 - 12:14 pm | विसुनाना
- याच अर्थ तुमच्या चेतनेला त्यांनी जाणीव करून दिली की यापुढे आपली देहरूपाने भेट नको. त्यांच्या मनात आले तर पुन्हा ते भेटतीलसुद्धा.
-म्हणजे तुम्हालाही त्यांच्या 'या जन्मातल्या' देहाच्या कायमस्वरूपी नष्ट होण्याची खात्री नाही.
-ते तर आहेच! शिवाय असा सिद्ध पुरुष 'माता-उदरे शयनं' न करताही आपला पडलेला देह उठवू शकतो. नाही का?
बाकी मला तरी तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते कळत नाही. :(
7 Jun 2012 - 12:27 pm | यकु
नक्कीच भेटतील.
माझ्यासमोर दहन वगैरे झालेलं नाही, किंवा दहन झाल्याचं मला कुणी कळवलं नाही, म्हणून जे चेतनेद्वारे बुद्धीगम्य झालं ते मी मानलं. हे माझं इंटरप्रिटेशन चूक ठरावं आणि नाथांची त्यांच्या त्या सर्वहर देहातच भेट व्हावी असं मला वाटतंच.
बिलकुल!
:(
7 Jun 2012 - 1:30 pm | jaypal
तुझ्या भेटीनंतरच त्यांनी देहत्याग केलाय. ( येवढा का रे शॉटदिलास त्यां पुण्यात्म्याच्या डोक्याला ? ;-))
7 Jun 2012 - 1:33 pm | यकु
बिवेअर !
:p
7 Jun 2012 - 11:51 am | यकु
मनोबा,
असतील, अक्कमहादेवी आणि लल्लेश्वरी देखील वस्त्र वापरायच्या नाहीत असे वाचलेय. लल्लेश्वरी म्हणजेच जैनांच्या एका तीर्थंकरांपैकी एक असंही म्हटलं जातं. जैन तीर्थंकर नग्न असतात.
झूठ है! म्हणजे एक पुरुष आणि स्त्री खरोखर संग करतात असे नव्हे, पुरुष आणि स्त्री हे द्वैत संपलं की ते जे Living Organism शिल्लक राहिल त्याला काय म्हणणार? इव्हन जो या मार्गावरुन चालतो त्याला तो पुरुष असला तरी त्याने स्वत:ला पुरुष मानणं अपेक्षित नसतं, तो मानत नसतोच. अशा अवलिया, फकीर माणसांनी खरोखरची स्त्री शोधायची कुठे? सो उर्ध्वरेतनात स्त्रीसंग अपेक्षित असतो इज ए बोगस फोकलोर. हां, मच्छिंद्रनाथ निश्चितच विवस्त्र योगीनींच्या राज्यात गेले असतील आणि योगीनींनी त्यांना हठयोगातील आसनांचे आव्हानही दिले असेल, बट नॉट इन दी सेन्स ऑफ मेल- फिमेल इंटरकोर्स. उर्ध्वरेतन करु शकतोस तर दाखव बरं मग ! असं काही झालं असेल. मच्छिंद्रनाथांची जस्ट एक सदिच्छा भेट दिली असेल योगीनींना. एरव्ही दिसायला स्त्री-पुरुष असले म्हणून काय त्यांनी भेटू पण नये का? मच्छिंद्रनाथ योगीनींच्या राज्यात रमले म्हणजे स्त्री-पुरुषांमध्ये शारीरिक संग वगळताही अख्ख्या जगभरातल्या गोष्टी असतातच की. योगीनींनी चांगला स्वयंपाक केला असेल, प्रेमानं खाऊ घातलं असेल - चर्चा केली असेल - म्हणून रमले असतील. आणि ज्या मच्छिंद्रनाथांनी ओज-तेज ही वस्तू उदीच्या रुपात देऊन, ती शेणात पडूनही गोरक्षनाथांचा जन्म झाला त्या मुलानेच बापाला काही शिकवावं हे असंभव.
म्हणूनच लल्लेश्वरी जैनांचा एक पुरुष तीर्थंकर होऊ शकणं स्वाभाविक वाटतं, कट्टर जैनांना पटो न पटो. लल्लेश्वरीच जैनांच्या तीर्थंकरांपैकी आहेच असा बराच रेटा ओशोने लावलाय - हे ओशो मूळचे जातीने जैनच होते हे आणखी एक.
7 Jun 2012 - 11:59 am | विसुनाना
माझ्याकडे फार पूर्वी प्रकाशित झालेले (म्हणजे १९४२ साली) 'पतंजली योगदर्शन' आहे. त्यातील मूळ शब्दात (असेल तर संस्कृत श्लोकासह) 'ऊर्ध्वरेता' म्हणजे नक्की काय ते इथे सांगतो.
-->>आता आठवते त्याप्रमाणे, स्त्री योनीत सोडलेले वीर्य शिस्नाद्वारे परत खेचणे ही क्रिया 'ऊर्ध्वरेता' म्हणून ओळखली जाते. यात स्त्रीसंग अपेक्षित आहे असे वाटते. चुभूद्याघ्या <<--
7 Jun 2012 - 12:07 pm | यकु
हे असं पाहिजे -
आता आठवते त्याप्रमाणे, स्त्री योनीत सोडलेले वीर्य शिस्नाद्वारे परत खेचणे ही क्रिया 'ऊर्ध्वरेता' म्हणून ओळखली जाते. यात स्त्रीसंग अपेक्षित आहे असे वाटते. चुभूद्याघ्या
;-)
उर्ध्वरेतनात स्त्री योनीत वीर्य वगैरे शिस्नाद्वारे वीर्य सोडलं जात नाही, बाहेर ओढण्याचा प्रश्नच नाही. डोळ्यांतून जितक्या सहज अश्रू बाहेर पडतात तितक्याच सहज वीर्य, वीर्य कोशिकांमधून स्रवणे आणि उर्ध्व म्हणजे सहस्रारात जाणे हे उर्ध्वरेतन. अर्थातच यासाठी योग्यांना ध्यानसाधना करावी लागते - ट्रायल अॅण्ड एरर इथेही असेलच. नाथ भेटेपर्यंत माझ्याकडे ध्यान होतं, हे उर्ध्वरेतन वगैरे माझ्या साधनेचा भाग नाही - नाथांच्या दीक्षा कृपेचा आहे.
7 Jun 2012 - 12:19 pm | विसुनाना
तुम्ही ठळक केलेला ठशातला मजकूर माझ्या दृष्टीने तसा ठळक असू नये. तो मजकूर माझ्या दृष्टीने पांढर्या ठशातच हवा आहे.
हे झाले माझे स्पष्टीकरण. बाकी तुम्हाला काय योग्य वाटते ते तुम्ही केलेच आहे. :)
7 Jun 2012 - 12:32 pm | यकु
हाहाहा
काळं - आणि पांढरं सेमच हो विसूनाना.
7 Jun 2012 - 1:56 pm | विसुनाना
काळं आणि पांढरं एकच दिसतं ते तुम्हासारख्या सम्यक दृष्टीच्या महान योगी पुरुषांना. आम्हाला मात्र काळं ते काळं दिसतं आणि पांढरं ते पांढरंच! . ;)
7 Jun 2012 - 12:46 pm | गवि
माफ करा. आता राहवत नाही. एक मूलभूत शंका विचारतो. हाय काँटेक्स्ट चर्चेत ती मूर्खपणाची ठरु शकते.
योनीत सोडलेलं वीर्य शिश्नाद्वारे परत खेचणं किंवा सोडण्यापूर्वीच ते वीर्य उर्ध्व म्हणजे सहस्रारात धाडणे या दोन्ही गोष्टींना काय अर्थ आहे? असं कशाला करायचं?
वीर्य जिथे आपोआप जातंय ती जागा टाळून पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळवण्याचे हे प्रयत्न कशासाठी? त्यातून काय सिद्धी / साध्य होतं?
धन्यवाद.
7 Jun 2012 - 1:01 pm | यकु
संन्यास घेतल्यानंतर प्रत्यक्ष स्त्री संगाचा शास्त्राने निषेध केला आहे. पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळविण्याचे प्रयत्न अशासाठी की त्यालाच पंथ, साधना (ऑनगोईंग प्रोसेस), रिअलायझेशन, ईश्वरप्रणिधान म्हटलं गेलंय.
करायचं नाही, आत्मा मुक्त झाला असला तरी तो देहामध्ये, देहधारी असतोच - मुक्त झालेल्या आत्म्याच्या देहातही निसर्गनियमाप्रमाणे वीर्य वगैरे सगळ्या गोष्टी निर्माण होतातच. म्हणून उर्ध्वरेतनाद्वारे ते सहस्रारात न्यायचं. आणि तपसंचय करुन माझ्यासारख्याला दीक्षा द्यायची, मुक्तीच्या मार्गाने अग्रसर करायचं.
7 Jun 2012 - 1:38 pm | jaypal
या अश्या रेतन पध्द्तिने पुरुषांची पण डोहाळ जेवण घालावि लागतिल. ;-)
तो निसर्ग चु* येड** आहे. त्याला आक्कलच नाही उगाचच त्याने प्रजनन अंगांची निर्मीती केली.
7 Jun 2012 - 1:50 pm | यकु
निसर्गाची माय कशाला उद्धरताय;-)
प्रजनन अंगे नीट कामं करतायत तरी कशाला तापताय उगाच?
निसर्ग आपला गप राहून सगळ्याच मार्गांनी सक्रिय असतो, गप पडून रहा.
7 Jun 2012 - 2:10 pm | पैसा
तू अजून संन्यास घेतलेला नाहीस. तुझ्या आईची परवानगी घेतलीस का कधी? साक्षात आदिशंकराचार्यांना सुद्धा आईची परवानगी मिळवावी लागली होती.
सगळे आश्रम क्रमाने भोगून झाले की संन्यास घ्यायचा अशी खरी तर पद्धत. उड्या मारू नको. :P
7 Jun 2012 - 2:12 pm | यकु
हाहाहा
बरं आईसाहेब ;-)
7 Jun 2012 - 12:09 pm | शिल्पा ब
छानच.
हे असे धागे अन त्यात चेंगटांचा मृत्युचा धागा असं सगळं वाचुन एकदम संन्यास घ्यावासा वाटतोय. कदाचित घेतलाही असेल...शरीर घरीच ए पण आत्म्याने संन्यास घेतलाय. (आत्मा म्हणजे आत्मु नव्हे तर शरीरात वसणारा एक घटक असतो म्हणे..)
असो. एक मात्र झालं..मिपावर अशा संन्यासी/ अध्यात्मिक वृत्तींच्या लेखांचा एकदम सुकाळु होउन गेलाय एवढं मात्र खरं!
7 Jun 2012 - 12:47 pm | यकु
एकदम योग्य वाटतंय - भवानीला :p संन्यासच घ्यावा वाटणार!
7 Jun 2012 - 12:15 pm | जयंत कुलकर्णी
मला वाटते आता यशवंत एक काल्पनिक कथा लिहितोय.............:-)
7 Jun 2012 - 12:40 pm | ५० फक्त
एका मुलाला चित्र काढायला सांगितलं, गवत खाणारी गाय,
अर्धा तासानं बाईनी पाहिलं, कागद कोराच, विचारलं - गवत कुठंय
मुलगा - खाल्लं गाईनी
बाई - गाय कुठाय
मुलगा - ती कशाला थांबतीय, ती गेली पळुन कधीच.
7 Jun 2012 - 12:34 pm | कवितानागेश
'उर्ध्वरेतन' या क्रियेबद्दल मुक्तानंदांनी त्यांच्या कुंडलिनी जागृती साधनेबद्दलच्या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे.
7 Jun 2012 - 12:43 pm | यकु
एक कॉपी मला पाहिजे माऊ - माझ्यात प्रॅक्टीकल होतंय - डॉक्युमेंटेशन अजून वाचलेलं नाहीय मी.
7 Jun 2012 - 1:09 pm | गणपा
किंवा
Whichever is applicable.
;)
7 Jun 2012 - 1:12 pm | यकु
गणाधिश जो इश सर्वा गुणांचा ;-)
मी कुठे विकेटा काढतोय आं?
7 Jun 2012 - 1:52 pm | निश
गणपा साहेबांच्या मताशी सहमत. यकुसाहेब लवकर बरे व्हा.
7 Jun 2012 - 2:00 pm | यकु
थँक्यू.
7 Jun 2012 - 1:11 pm | JAGOMOHANPYARE
ऊर्ध्वरेता यावर सचित्र चर्चा झालेली आहे.
7 Jun 2012 - 1:29 pm | यकु
हो.
चर्चा झालीय.
7 Jun 2012 - 1:30 pm | JAGOMOHANPYARE
कव्वाली छान आहे. . मधमाद सारंग रागात आहे.
7 Jun 2012 - 1:59 pm | JAGOMOHANPYARE
http://www.youtube.com/watch?v=IvZrk6mqSY8&feature=fvsr
इथे अर्थ आहे.. गोरख धंदा ट्रिकी बिजनेस
7 Jun 2012 - 2:13 pm | यकु
शंकराच्या काळ्याभोर पिंडीसारख्या रंगावर इथलीच अक्षरे विभूतीच्या पांढर्या रंगात - उमटताना दिसत आहेत.-
शिवशंभोचं भस्मलेपन सुरु आहे.
7 Jun 2012 - 2:04 pm | llपुण्याचे पेशवेll
http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/pothi/navanath/z80531181515....
7 Jun 2012 - 2:10 pm | यकु
थँक्स ! थँक्स ! थँक्स !!!
:)
ओवीबद्ध नाहीय - निवेदन आहे.
ओवीबद्ध वाचायला फार मजा येते - जुनी खोड ;-) - गावातल्या मंदीरात रामविजय वाचायची.
इथे राम मंदीर आहे, तिथे मिळते का पहातो.
7 Jun 2012 - 4:38 pm | इनिगोय
ओवीबद्ध नवनाथ भक्तीसार इथे आहे.
नवनाथांच्या कथांचे पारायण हा अनुभव अगदी ताजा आहे, विलक्षण कथा आहेत, आणि त्यांची अनुभूती येते.
बाकी पु.वा.शु.
7 Jun 2012 - 5:13 pm | यकु
थँक्यू इनिगोय :)
बादवे "इनिगोय म्हंजे कै हो?"
वाय ओ जी आय एन आय का? :p
7 Jun 2012 - 4:02 pm | गणेशा
इतक्या लवकर ते देह सोडुन गेले ?
मला वाटते तुला जी दिक्षा दिली ती शेवटचीच होती वाटते त्यांची..
पण देह कसा सोडुन जाता येतो.. की त्याला आत्महत्या म्हणायचे की आत्ममुक्ती ?
पण ते तर नर्मदेची परिक्रमा करत होते ना ? आणि कोणी त्यांना जर
तुझ्यात उध्वरेतन प्रॅक्टीकल होतय म्हणजे काय होतय ?
तुला दिलेली दिक्षा विलासरावांनी बघितली आहे काय ?
दिक्षा अशी एक दोन दिवसात पाहुन लगेच दिली जाते का ? की कोणाला पण ज्याला हवी आहे त्याला दिली जाते.
दिक्षा दिली की लगेच देह सोडावा लागतो का ?
सॉर्री, प्रश्न खुप आहेत, पण एक सामान्य माणुस म्हणुन मला अशेच प्रश्न उभे राहिल्याने तसे लिहिले आहे.
7 Jun 2012 - 4:13 pm | नाना चेंगट
अच्छा मला वाटले की....असो.
7 Jun 2012 - 4:19 pm | यकु
ते पण एक कोडं आहे.. नर्मदा परिक्रमा म्हणजे काय? जन्म मरणाचा फेरा. अमरकंटक. अशा सिद्ध पुरुषांची कूट भाषा असते - वेदांतल्या ऋचांसारखी - आणि तिचे अर्थ थेट जीवनातल्या घडामोडींतून प्रगटतात. ए लव्हली मॅन इन्डीड.
माझं वर्णन वाचून तुला काही मिळणार नाही. कधी आपला आमनासामना झाला आणि माझ्या गुरुंना वाटलं तर ते तुला तुझ्या शरीराच्या माध्यमातून दाखवतील.
मोमेंट टू मोमेंट - तु 'गुप्तकाशीचा योगी' नावाने दोन भागात लिहिलेले लेख वाचलेले दिसत नाहीत.
पात्र तयार असलं की त्यात आपोआप पडतंच, हे मला माझ्या गुरुंनी सांगितलंय मला दीक्षा दिल्यानंतर. त्यापूर्वी कोण नवरत्न नाथ ते मला आयुष्यात कधी माहित नव्हतं.
हवी असत नाही. दोन दिवस उपास केल्यानंतर भुक जशी राक्षसासारखी उफाळून येते तशी भूक निर्माण व्हायला पाहिजे.
माझ्या गुरुंनी माझ्यामार्फत कुणाला दीक्षा दिली आणि माझा देह पडला तर या प्रश्नाचं उत्तर हो समजावं लागेल.
7 Jun 2012 - 11:06 pm | ५० फक्त
कधी आपला आमनासामना झाला आणि माझ्या गुरुंना वाटलं तर ते तुला तुझ्या शरीराच्या माध्यमातून दाखवतील. -
दोघांनाही एक विनंती, हा किंवा अशा सदृश्य कोणताही कार्यक्रम कोणत्याही सार्वजनिक कट्ट्यावर करु नये.
7 Jun 2012 - 11:23 pm | यकु
ढोल ताशे वाजवत, पेंडॉल टाकून करुन दाखवीन!
सेक्स ऑर्गिज अँण्ड फूड ऑर्गिज आर ऑल दी सेम !
अॅण्ड अल्टीमेटली धीस इज गोईंग टू बी वन मॅन शो, काळजी नसावी.
8 Jun 2012 - 10:09 am | ५० फक्त
पंडॉलला पडदे लावाल ही माफक अपेक्षा,
..
.
.
.
..
म्हणजे तिकिट लावुन तेवढाच धंदा करता येईल, किमान खरबुज, चिलिम, कोंळसा, गांजा आणि काडेपेटीची तरी सोय होईल
8 Jun 2012 - 6:52 am | स्पंदना
यशवंत वर पैसान म्हंटलय तेच म्हणेन, आईची परवानगी घेतलीस का?
मुर्ख माणसा, कोण कुठला स्वतःला योगी म्हणवणारा तुला दोन दिवसात भुरळ घालतो अन तु त्याच्या मागुन काय ती दिक्षा घेत फिरतोस , मला खरच कळत नाही आहे. सारी विचार शक्तीच नष्ट होते का रे तुमची? काय बॅकरांउंड होती रे त्या नाथाची? विचारलस कधी? नाही, घ्यायचच तर पारखुन घ्याव. हे सार मला खुळचट्पणा वाटतय. आजवर बाकी काही अचिव्ह करायला एव्हढ धडपडलास का? आता तरी कुठ धडपडतोय्स म्हणा, नुसता टाईमपास्..बाकि काही नाही. अन मग असला पळपुटेपणा, दिक्षा म्हणे! पहिला आधिची ऋण फेड, त्या आईला आपल्याही मुलान निदान सामान्यतरी होउन दाखवाव अस नक्किच वाटत असेल, ते मातृ ऋण फेड पहिला. बसु दे तिला चार घटका जिवाला घोर न लागता. घाल तिला तुझ्या कमाईचे चार घास, अन बघु दे तिला तुझ्या चेहर्यावर समाधान.
यशवंत नाव बदललस्(आयडीच) ते ही वाईट म्हणुन, एकुण तुला चांगल व्हायच नाही अस ठरवल आहेस का तु? स्वतःच नाव स्विकार पहिला, जसा आहेस तसा स्वतःल स्विकार! मग जगभरची तत्वज्ञान पालथी घाल. मला विचारशील तर तळपट होवो त्या युजीच अन आगित जळो तो नाथ! एक साध चांगल्या घरच पोर बिघडवल.
8 Jun 2012 - 8:30 am | अर्धवटराव
थोडं अगोदर भेटल्या असता तर आम्हि निदान पाऊणराव तरी झालो असतो...
अर्धवटराव
8 Jun 2012 - 1:41 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. आम्ही पण पेशवे न होता छत्रपती झालो असतो. :)
8 Jun 2012 - 2:28 pm | नाना चेंगट
सहमत आहे. आमच्याही आयुष्यातला ना ना निघून गेला असता
9 Jun 2012 - 5:57 am | स्पंदना
आमच्या ही आयुष्यात नुसता 'अ अ ' वा 'a a' न रहाता निदान ह ळ क्ष ज्ञ वा x y z पर्यंत पोहोचलो असतो आम्ही. बसलोय अजुन घासत 'अ अ '
8 Jun 2012 - 8:37 am | हंस
अगदी अगदी, माझ्या मनातलं बोललात अपर्णाताई. सादर दंडवत स्विकारावा!
मला कळत नाही, माणुस इतका कसा बदलु शकतो आणि तो ही इतक्या कमी कालावधीसाठी एखाद्या माणसाच्या/बुवाच्या संपर्कात आल्यावर. पण तुम्ही अगदी माझ्यामनातील भावना बोलुन दाखवलीत. माझेही दोन मित्र असेच बुवांच्या नादी लागले होते, पण लग्न झाल्यावर आलेत आता वठणीवर, तेव्हा यकु लवकर लग्न कर बाबा, त्या माऊलीला सुनमुख दाखवुन निश्चिंत कर रे बाबा.
8 Jun 2012 - 9:27 pm | गणेशा
याचे उत्तर आहे चंचल प्रवृत्ती.
चंचल पणा मुळे माणुस स्थीर आणि ठोस असे काहीच कार्य करु शकत नाहि.
9 Jun 2012 - 2:09 pm | हंस
<याचे उत्तर आहे चंचल प्रवृत्त>
हो खरय!
9 Jun 2012 - 2:26 am | बॅटमॅन
टिपिकल संसारी प्रतिक्रिया. दुस्र्या बाजूचं कै न विचारात घेताच अशी टिप्पणी करणे लै म्हंजे लै चूक.
(अन हा उपरोध नैये, खरंच बोल्तोय)
9 Jun 2012 - 5:54 am | स्पंदना
त्याच काय आहे, रोग जितका जालिम तेव्हढ जालिम " अँ टि बायोटिक" देतात डॉक्टर बॅटमॅन. तुम्ही सुद्धा शिकुन घ्या नाहीतर उडता नाही यायच.
मला सांगा ह्या यकुला आधि देवच मान्य नव्हता, जो साधा सरळ जगन नियंता आहे. पण कोणी तरी एक गांजाची चिलम फुकायला देतो आणि ह्याला सरळ भैरव डबक्यात डूंबायला लागलेलेल दिसतात. ह्याची झाड म्हणे गदागदा हलतात. याचा त्या झाड निर्माण करणार्यावर नाही पण ती आयती हलवणार्यावर विश्वास!
ह्याला अजुन सरळ 'वहायला ' नसेल जमल तोवर उलट वहायला शिकायची हौस!
आता या असल्या 'बाजुला' तुम्ही 'दुसरी' बाजु म्हणताय का? अहो याचा जन्म हा एक काय कमी चमत्कार आहे का? ८४ दशलक्ष योनितुन एकदा लाभलेला हा मनुष्य जन्म. या एकाच जन्मात तुम्ही तुमच्या मातःपित्याच ऋण उतरु शकता, सहचारिणीला, फक्त नैसर्गिक भुक म्हणौन न पहाता, एक साथिदारिण म्हणुन पाहु शकता. स्वतःच्या जिन्स वहाणारे साधन म्हणुन जन्माला घालण्याऐवजी पालन पोषण करुन एक चांगल व्यक्तिमत्व घडवु शकता. ज्या समाजात रहाता त्या समाजाला काहीतरी चांगल परत देउ शकता. ते सगळ राहिल बाजुला. एक चिलिम काय फुकली लगोलग दिक्षाच! वर आणि तो कोण नाथ 'फोन' करुन बोलतो. आता जर हा नाथ कुठ कपडे अन विजेच्या तारा कड नजर वळवुन बोलत असेल तर त्याच मार्गान बोलायच ना ? उगा फोनचा आटापिटा कश्याला?
राहु दे किस पाडायचा म्हंटला तर वाक्या वाक्याचा पाडीन , तेव्हढी तयारी असल्या शिवाय इथ यायच धाडस नसत केल. पण 'वेळ'. मला माझा 'संसार ' बोलोवतो आहे.
बाकि खर बोललात, तद्दन संसारी प्रतिक्रिया! ज्याच्या गाभ्यातुन तुम्ही मोठे होउ शकलात!
9 Jun 2012 - 8:28 am | बॅटमॅन
ओके. यकुचं जे चाल्लंय ते तुम्हाला पसंत नैये तर. ठीके, पण यकु तुमच्या हिशेबी चूक असला म्हणून त्याचा मार्ग चूक होतो असे मला नाही वाटत. संसारात असे काही ठेवले नाही की जे अपरिहार्य अतएव श्रेष्ठ आहे. ज्याला जे वाटेल त्याने ते करावे. कौटुंबिक जबाबदार्या होता होईल तो टाळू नयेत असे माझेदेखील मत आहे, पण काहीवेळेस समाजाच्या नजरेतून जी जबाबदारी असते ती वैयक्तिकरीत्या अडचणदेखील वाटू शकते. तशा व्यक्तींचे निकटवर्ति सगेसोयरे भले त्यमुळे त्यांना शिव्या घालोत, पण पूर्णपणे ते चूकच आहे असे नै वाटत मला. आता यकुच्या उदाहरणात तुम्हाला लॉजिकल असे काही दिसले नसेल, पण म्हणून त्या पूर्ण मार्गालाच रद्दबातल ठरवणे चूक आहे. तुमच्या आधीच्या आणि आत्ताच्या प्रतिसादावरूनदेखील हेच जाणवले त्याला माझा आक्षेप आहे.
>>बाकि खर बोललात, तद्दन संसारी प्रतिक्रिया! ज्याच्या गाभ्यातुन तुम्ही मोठे होउ शकलात!
मान्य. फक्त संसार-सुप्रीमसिस्ट (वादी?) असण्याला माझा आक्षेप आहे.
9 Jun 2012 - 6:07 pm | स्पंदना
बॅटमॅन मला काय वाटतय हे महत्वाच नाही आहे. ना ही यशवंतन भक्तीमार्ग वा साधुसंत होण्यावर माझा आक्षेप आहे. पण अध्यात्माच्या मार्गावर चमत्कारातुन भक्ती कडे जाण्या ऐवजी स्वतःच्या मनातुन ती निर्माण व्हावी असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. संसार काय हो आम्च्या सारखे सर्वसामान्य लोक पण करतात. पण यशवंत सारखी तरुण पिढीपण जर असल्या अंधविश्वासाच्या मार्गावर चालली, जो मार्ग धुमी धुनी अन धुरीच्या मार्गे जातो, तिथे कुणी तरी थोड रोखल पाहिजे ना? नसेल एखाद्याला वाटत लग्न करुन जोखिम घ्यावी. नको घेउ. नसेल करायचा समाजाच्या मागणी प्रमाणे नोकरी धंदा, नको करु. पण मग त्या बरोबर तेव्हढा त्याग ही करावा लागेल. तेंव्हा मग रस्त्यावर उभा राहुन चार पैसे फेकुन लस्सी प्यायची तुमची ताकद नसते, कारण तो पैसा तुम्ही कमावलेला नसतो.
यशवंत हे नुसत एक उदाहरण आहे, अन त्याच्या वागण्याला माझा विरोध, तो समजुन आहे. कोणत्याही आईला वाटणार्या भावना जर माझ्या लिहिण्यातुन व्यक्त होत असतील तर त्यात वाईट काहीच नाही.
9 Jun 2012 - 6:48 pm | नाना चेंगट
>>>>>>पण यशवंत सारखी तरुण पिढीपण जर असल्या अंधविश्वासाच्या मार्गावर चालली, जो मार्ग धुमी धुनी अन धुरीच्या मार्गे जातो, तिथे कुणी तरी थोड रोखल पाहिजे ना?
यशवंत जाऊ इच्छित असलेल्या नाथपंथी मार्गावर (ज्याला तुम्ही अंधविश्वासाचा मार्ग म्हणता) त्यावर बर्याच शतकांपूर्वी एक यशवंतपेक्षा वयाने कितीतरी लहान असलेला मुलगा गेला होता.
त्या मुलाचा गुरु त्याचा थोरला बंधू होता.
जग त्या मुलाला ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी उर्फ संन्याशाचं पोर या नावाने ओळखते.
बिचारे आईबापाविना जगणारे पोर...!!!
त्याला रोखणारं कुण्णी कुण्णी नव्हतं हो... असो.
9 Jun 2012 - 7:04 pm | यकु
खुद्द ईश्वरच अनाथ आहे तर आपल्यासारख्या मरणधर्म्यांची काय कथा.
पण नानासाहेबांचा प्रतिसाद खरोखर आवडला, अपर्णा अक्षय माझी चिंता वाटली त्याबद्दल धन्यवाद - पण आता ती सोडा.
9 Jun 2012 - 7:06 pm | स्पंदना
__/\__
निवृत्तीनाथांबद्दल बोलताय ना तुम्ही? पण त्यांच परिवर्तन अस एकदम झाल होत का? अन हो हे ही खरच त्यांना अडवायला कुणी कुणी नव्हत. इथ मी आहे. अर्थात उद्या यशवंत्च दर्शन घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मी त्याला चार सुनवुनच मग जे काय असेल ते....
9 Jun 2012 - 7:17 pm | यकु
निवृत्तीनाथांबद्दल बोलत नाहीय मी - मी ईश्वराचा बाप कोण ते विचारतोय - हे सॉल्व्ह झालंच पाहिजे.
मला माहितीय ईश्वर अनाथ असतो - म्हणून तो माणसामध्ये आश्रय शोधतो.
त्यामुळं नानांनी म्हटलंय त्यात भर घालून म्हणतो की आईवडीलांच्या देहत्यागामुळे अनाथ झालेल्या ज्ञानदेवादीकांची किंवा इतर माणसांची चर्चा नंतर - आधी ईश्वराच्या अनाथ असण्याची आणि त्यानं काय करावं याची चर्चा - बाकी तुम्ही काहीही सुनावत राहिलात तरी ऐकत राहूच - पर्यायच नाही.
9 Jun 2012 - 11:35 pm | बॅटमॅन
बाकी ठीक. पण
>>नसेल एखाद्याला वाटत लग्न करुन जोखिम घ्यावी. नको घेउ. नसेल करायचा समाजाच्या मागणी प्रमाणे नोकरी धंदा, नको करु. पण मग त्या बरोबर तेव्हढा त्याग ही करावा लागेल. तेंव्हा मग रस्त्यावर उभा राहुन चार पैसे फेकुन लस्सी प्यायची तुमची ताकद नसते, कारण तो पैसा तुम्ही कमावलेला नसतो.
या अधोरेखित वाक्याचे प्रयोजन नाही कळाले. भिक्षा मागण्याला आक्षेप ध्वनित होतो का यातून? तसे असेल तर...वेल, इथे मतभेद आहेत. पण असो. तो जास्त महत्वाचा मुद्दा नाही.
>>यशवंत हे नुसत एक उदाहरण आहे, अन त्याच्या वागण्याला माझा विरोध, तो समजुन आहे. कोणत्याही आईला वाटणार्या भावना जर माझ्या लिहिण्यातुन व्यक्त होत असतील तर त्यात वाईट काहीच नाही.
प्रश्न चांगल्या वाईटाचा नाहीच-तुमचे म्हणणे हे चांगले किंवा वाईट नाहिये, ते एकांगी आणि म्हणूनच चूक आहे इतकेच मला म्हणायचे आहे.
9 Jun 2012 - 11:51 pm | पैसा
बॅटमॅन, ज्ञानेश्वर हा एक आणि एकच जन्मतो. तुकारामाला सुद्धा संसार चुकला नव्हता आणि एकनाथांनी तर अध्यात्म आणि प्रपंच या दोन्हींची उत्तम सांगड घातली होती. तेव्हा सर्वसंगपरित्याग हा नेहमीच आवश्यक असतो असं नाही. प्रपंचात राहूनही तुम्ही ध्येय साध्य करू शकता.
लग्न वगैरे नको असेल तर ठीक आहे. एखाद्याची जन्मजात प्रवृत्ती असते तशी, तर ठीकच आहे. पण तशी प्रवृत्ती नसलेला माणूस रातोरात बदलल्याची भाषा करू लागतो तेव्हा जरा काळजी वाटणं साहजिकच आहे. अपर्णाने आईबद्दल लिहिलंय ते प्रातिनिधिकच आहे. फक्त आईच नव्हे, तर आपल्यावर इतर ज्या काही जबाबदार्या असतील त्या टाळणं बरोबर नाही. आदिशंकराचार्यांनी संन्यास घेतल्यानंतरही आपल्या आईची काळजी वाहिली होती आणि तिचे अंत्यसंस्कारही केले होते. आपण त्यांना चूक म्हणू शकत नाही.
अपर्णाने लिहिलंय तीही एक बाजू आहे, आणि व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहे. जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!
10 Jun 2012 - 12:12 am | कवितानागेश
ज्ञानेश्वर हा एक आणि एकच जन्मतो.>>
आक्षेप आहे.
जगात चांगल्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर घडण्याची शक्यता नाकारायची कशासाठी?
आत्मोन्नती* करायची संधी प्रत्येकाला मिळते.
ती ज्ञानेश्वरांनी स्विकारली, इतकेच.
*: आत्मोन्नती चा अर्थ एक जीव म्हणून, माणूस म्हणून अधिक प्रेमळ, अनुकंपायुक्त, सजग, सक्षम आणि संवेदनशील होणे असा मी घेते.
10 Jun 2012 - 8:01 am | पैसा
आत्मोन्नतीची संधी प्रत्येकाला मिळते आणि प्रत्येकाने तसा प्रयत्न करायला पाहिजे हे १००% सत्य. पण ज्ञानेश्वरांना जन्माला येतानाच जे संचित मिळालं होतं ते आपल्यासारख्या सामान्यांकडे नसतं. आपल्यासारख्यांना तिथे पोचायचा कोणताही शॉर्टकट/बायपास नाही. प्रवास आणि मेहनत याला पर्याय नाही.
10 Jun 2012 - 12:56 pm | ५० फक्त
आत्मोन्नती शब्द वाचुन आज गटणेंची आठवण झाली, पण मी म्हणतो हे एवढं सगळं वाचुन या आधी कुणालाच कशी यकु आणि गटणेंची तुलना करावी वाटली नाही, बहुदा गटणेंची साधना कमी पडली असावी.
10 Jun 2012 - 12:15 am | बॅटमॅन
>>पण तशी प्रवृत्ती नसलेला माणूस रातोरात बदलल्याची भाषा करू लागतो तेव्हा जरा काळजी वाटणं साहजिकच आहे.
बरं ठीके, पण मग बुद्धाने तसंच केलं होतं ना! तुम्ही बाकी दिलेली उदाहरणे आहेत तसे हेदेखील आहेच की! बुद्धच का, समर्थ रामदासांनी पण तसेच केलं होतं. बुद्ध, ज्ञानेश्वर आणि रामदास हे एकेकच जन्मले म्हणून त्यांचा मार्ग चूक नाही ठरत. शंकराचार्यांनी केलं ते जर बरोबर, तर बुद्धाने केलं ते चूक? मुळात बरोबर-चूक या कल्पनाच सापेक्ष आहेत.
>>अपर्णाने लिहिलंय तीही एक बाजू आहे, आणि व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहे.
बरोबर च्या ऐवजी सुलभ असा शब्द असता तर पुर्णतः सहमत. तो शब्द नसल्यामुळे अंशतः सहमत. (५०% पेक्षा जास्त)
10 Jun 2012 - 8:14 am | पैसा
शंकराचार्य बरोबर म्हणताना दुसरा कोणी चूक असं मी अजिबात म्हटलेलं नाही. उलट
हेच माझंही म्हणणं आहे.
बुद्धही त्याच्या जागी बरोबरच होता. पण सर्वसंगपरित्याग करून तो घर सोडून निघाला तेव्हा सिद्धार्थ गौतमच होता. "भगवान बुद्ध" होण्यापूर्वी त्याने एकांतात खडतर तपश्चर्या केली होती. त्याला कोणताही शॉर्टकट मिळाला नव्हता. ज्ञानेश्वरांबद्दल मी वर लिहिलंच आहे. त्यांना जन्माला येतानाच झुकतं माप मिळालं होतं. रामदासही त्यांच्या जागी बरोबरच होते. रामदासांनी ४ लोकांसारखा संसार केला नाही. तर अवघ्या विश्वाचाच संसार केला.
आपण दोघेही एकाच प्रकारचं बोलतोय! :D मी पण तेच म्हणतेय.
10 Jun 2012 - 3:08 pm | बॅटमॅन
आता ठीके :)
9 Jun 2012 - 11:52 pm | कवितानागेश
अहो अपर्णाताई,
यकु कशाला संन्यास घेतोय?
नोकरी गेली म्हणून काय झाले? मिळेल परत. :)
तो बघेल की त्याच्या आईवडलांकडे.
शिवाय तो लग्न पण करणार आहे, असे त्यानीच कबूल केलंय इथेच कुठेतरी.
उलट आधी तो लग्न करणार नाही, सगळे भंकस आहे, वगरै बोलायचा.
असो.
8 Jun 2012 - 10:44 am | श्रावण मोडक
गोष्ट ऐकीव आहे. एकदा मागे अशीच लिहिली होती. झेनकथा आहे असं म्हणतात. खरं खोटं माहिती नाही.
तत्वज्ञानाचा प्राध्यापक आणि एक झेन साधू. साधूची कीर्ती ऐकून प्राध्यापक त्याच्याकडे चर्चेसाठी येतात. साधू तयार होतो. म्हणतो, "आपण आधी चहा घेऊ, मग चर्चा करू." साधू चहाची तयारी करू लागतो. प्राध्यापक आपले गोडवे गाऊ लागतात. आपला अभ्यास, आपलं लेखन, आपल्या विषयांची व्याप्ती वगैरे... तो बोलत राहतो... साधू कपबशीत चहा ओतू लागतो. ओतत जातो. कप भरतो, बशीत चहा उतरतो, बशी भरते, चहा आता जमिनीवर सांडणार ही स्थिती येते. प्राध्यापक म्हणतात, "अहो, काय करताय. चहा आता बशीतून सांडू लागेल." साधू म्हणतो, "हो. तेच सांगायचा प्रयत्न करतोय."
यकुचं लेखन, त्यातले त्याचे विचार वाचून, 'मी कोण?, हे अस्तित्त्व कशासाठी?' वगैरे त्याला पडलेले प्रश्न आणि त्याची 'नवरत्न नाथांमुळं आपल्याला उत्तरं गवसली' असं मानत तो मांडत असलेलं त्यांचं स्वरूप (आशय नव्हे) समजून घेतल्यानंतर ही कथा आठवली. ते नवरत्न नाथ या जपानी साधूसारखे नसावेत. नाही तर ही स्थिती आली नसती. आता यकु म्हणेलच, 'तुम्ही फक्त प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचं स्वरूप समजून घेतलंत. आशय समजून घ्या, म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही.' माझं त्यावरचं उत्तर असं असेल - आशयही समजला. पण तो आंतरिक असल्यानं त्यांची जाहीर मांडणी मी करायची नसते, इतकं मला त्याला मिळालेल्या या 'अनुभूती'तून समजलं. :-)
8 Jun 2012 - 11:04 am | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा! फर्मास! या प्रतिसादातील शेवटच्या दोन ओळीतला एक शब्द हा सगळ्यात महत्वाचा, किंवा प्रथम महत्वाचा, आहे. तेच सांगायचा प्रयत्न चालू आहे. असो.
8 Jun 2012 - 2:31 pm | प्यारे१
>>>>पण तो आंतरिक असल्यानं त्यांची जाहीर मांडणी मी करायची नसते, इतकं मला त्याला मिळालेल्या या 'अनुभूती'तून समजलं. <<<
श्रामो, बुल्स आय... गोमाता म्हणू नका कुणी! ;)
बाकी हे असंच आणखी चार दोन व्यक्तींना सांगावंसं वाटतं. त्यातली एक अस्मादिक. :)
8 Jun 2012 - 11:42 am | सहज
काही दिवस जालनिवृत्ती घे रे बाबा, देशभ्रमण कर! इथे वाचणारी व तुझ्याशी चर्चा करत बसणारी लोक आहेत म्हणून तू लिहीतोस व चर्चेत रहायचा प्रयत्न करतोयस असे वाटतेय. तुझे गुरु काय इंटरनेट गुरु नव्हते ना? बाहेर जाउन शिष्य, भक्त गोळा केलेस , मठ बांधलास तर तेवढेच बरे. इथे ऑलरेडी नाडीबाबा, ज्योतिष-कुंडलीबाबा, टारोकार्डप्लेयर, सेल्फ हेल्फ कोच, शेयरबाजार कोच, नातेसंबध कोच व बरेच ऑलराउंडर गुर्जी आणि काका मंडळी आहेत. रांग मोठी आहे इतकेच नाही तर मिपावरच्या प्रत्येक काथ्याकुटात (विलासराव व मी वगळता ) जवळ जवळ सर्व मिपाकर बहुमूल्य सुचना देउ शकतात. व लॅटेक्सच्या जमान्यात आता कोणाला उर्ध्वरेतन क्रिया शिकायची नाही की शिकून फायदा नाही. तु काय मिपाच्या संपादकांना/ सदस्यांना पोस्टाने पत्र लिहून कोणामार्फत इथे टंकून घेतोस का? डायरेक्ट तुझ्या लॅपटॉपवरुन त्या त्या धाग्यावर स्व:ताच टंकतोस ना? मग रेडीमेड लॅटेक्स असता कोण कशाला कुठे काय सुरनळीत वळवेल..
लक्ष वेधून घ्यायचे प्रयत्न, सगळी लहान मुले असेच करतात पण नंतर मोठी होतात. फार तर लेटेस्ट सिनेमा परीक्षण / राजकीय काथ्याकूट टाकतात. असो लवकर मोठा हो*!
* = श्रामोअव्हेर आपलं श्रेयअव्हेर [ तेच ते रेसीडेंट गुर्जी यांच्या नंतर बिकागुर्जींचा नंबर आहे दोघे अजुन गब्रु जवान आहेत, त्यामुळे रांग खूप मोठी आहे तिथेही लवकर नंबर लागायचा नाही]
हा नवे संस्थळ काढलस तरच... मग बरेचसे तज्ज्ञ, जाणकार, गुरु तुझ्या प्रमुख कुलूगुरुपदाखाली येतील तेव्हाच तु मोठा ई-आचार्य बनशील. :-)
8 Jun 2012 - 11:45 am | बिपिन कार्यकर्ते
आमची जवानी सर्टिफाय केल्याबद्दल खर्र्या खुर्र्या शुभेच्छा! ;)
अवांतर : बसा खाली!