Skip to main content

तुम इक गोरख धंदा हो

लेखक यकु यांनी गुरुवार, 07/06/2012 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे. आम्ही रडारवर बसलो होतो, आता तुमचा वरचा कॉन्टॅक्ट सुरु झालाय (दीक्षा देऊन झाल्यानंतर), सीमकार्ड, तुम्ही रिचार्ज करा, बॅलन्स संपलंय, पेट्रोल भरु, कुठंही गेलात तरी कॉन्टॅक्टमध्ये रहा, असल्या वरवर सोप्या पण अत्यंत गूढ, गहन प्रक्रिया सूचित करणार्‍या भाषेत बोलायचे. त्यांना लिहिता वाचता येत होतं, कारण नाथ संप्रदायाच्या नित्योपासनेच्या पुस्तकातले अभंग ढोलकीच्या अतिशय मनोहर तालावर नाथ महेश्वरच्या त्यांच्या छोट्याशा मठीत म्हणत उभे असतानाच मी आणि विलासराव त्यांची वाट पहात बाहेर घाटावर बसून होतो. सांगायचा मुद्दा हा की भरभक्कम संकल्पना, लंबंचौडं भाषण वगैरे नाथांचे विषय नव्हते - होता फक्त थेट अनुभव, मी जिकडे तिकडे प्रॅक्टीकल प्रॅक्टीकल म्हणून ओरडत होतो ते समोरासमोरचं प्रॅक्टीकल. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे थेट दाखवायचे - म्हणजे नुसती नजर टाकून थेट आजूबाजूची झाडं गदागदा हालवून दाखवायचे - तुफान आणून दाखवायचे आणि विचारायचे - चल बता ये क्या है? सांग मला हे समजून हे काय आहे ते. अर्थातच हे योगसाधनेच्या बळावर. मातृरुपी चामुंडा शक्तीच्या उपासनेच्या बळावर. महेश्वरचा त्यांचा रहाण्याचा एकूण गेटअप, ते करीत असलेले अचाट प्रकार पाहून मला मनात कुठेतरी हा माणूस वामाचारी आहे असं वाटत होतं. हो ना, आता एखादा माणूस अशा गोष्‍टी करत असतानाच पूर्ण करड्या रंगात रंगवलेलं शक्तीचं मंदीर, धड डॉबरमॅनही नाही आणि धड गावठीही नाही अशा कुत्र्यांना पाणथळ जागी डुंबताना दाखवून ते भैरव आहेत दर्शन घे, क्षणात तेच कुत्रे पुन्हा त्या शक्तीच्या मंदीराशेजारी आराम पडलेले दाखवून, गांजा वगैरे वरवरच्या गोष्‍टी पाहून आणखी वेगळं काय वाटणार? नाथांचे पाय पकडेपर्यंत आम्ही होतो युजीपंथीय - विचारांची साखळी, ती तोडा म्हणजे शरीराचा स्फोट होतो वगैरे गोष्‍टी युजींकडून ऐकलेल्या - म्हणजे 'मी' नावाचं 'Living Organism'कसं ऑपरेट होतं हे अनुभवता येईल वगैरे युजींचा अनुभव मी ताडून पहात होतो. डावं-उजवं होतंय ते तुटलं पाहिजे, म्हणजे स्फोट होतों, खरंय का असं मी विचारलं. तर डावं-उजवं ही नाथ पंथामधली ब्रह्मांडाचं संतुलन साधणारी विश्वव्यापक संकल्पना आहे - म्हणजे जगात सम आणि विषम आहे म्हणूनच विश्वाला गती आहे हे मज पामराला कसं ठावं असणार. नाथ पंथाची शिकवण अगदी साधी आणि थेट आहे - एका हाताने द्या आणि दुसर्‍या हाताने घ्या. वासना आहेत? तर आहेत! प्रेम आहे? तर आहे! द्वेष आहे? तर आहे! वाद आहे? तर आहे! या सगळ्या गोष्‍टींमध्‍ये संतुलन पाहिजे. म्हणजे द्वेष मिळाला - तर तो शून्य करण्यासाठी प्रेम वापरावं लागेल. मी स्वत:कडे एक विभक्त एंटीटी म्हणून पाहात होतो आणि जे काही होईल ते फक्त माझ्यात होईल असं मी समजत होतो. आणि नाथ तर कालभैरवाचंच रुप असल्याने मी शेवटी जागृत होऊनही कुठे पोहोचणार होतो? काळाच्या मुखातच ना? म्हणून महेश्वरच्या घाटावर कालभैरव बनून उभ्या असलेल्या नाथांना आधी सगळे चमत्कार दाखवावे लागले, मग मी नमस्कार केला. मग नाथांनी दीक्षा दिली. खरबूज कापून त्याचं अर्धं भक्कल न तोडता खायला लाऊन त्याद्वारे योगसाधनेच्या बळावर नाथांनी स्वत:चा डावा मेंदू माझ्या मेंदूत आरोपित केला, त्यांचा स्वत:चा देह महेश्वरहून अमरकंटकला जाऊन विसर्जीत केला. नाथांचा सगळं बोलणं कोड्यात. दीक्षा मिळाल्यानंतर दोन-चार दिवसांत एका सकाळी नाथांचा फोन आला - काय म्हणता यशवंत पाटील? हे असं वाट्टेल त्या नावाने कुणालाही हाक मारायचे. कधी म्हणायचे मी दगडधोंडे, लोखंडाचा डॉक्टर आहे, तु जीवाचा डॉक्टर आहेस - असं काहीही. तर मला त्या सकाळी ते फोनवर म्हणे, इंदूर स्टेशनवर या, अमरकंटकला निघालोय आणि मी काही खाल्लेलं नाही. येताना काहीतरी खायला घेऊन या. स्टेशनच्या उजव्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली मी थांबलोय वगैरे. तो स्टेशनवरचा दृष्‍टांत मी लिहिला पण आहे. स्टेशनवर नाथांचं दर्शन होऊ शकलं नाही. जवळपास होते तेवढ्या पिंपळांखाली मी जाऊन आलो. पण अमरकंटकला निघालेत म्हणजे देह विसर्जीत करायला निघालेत हे मला त्यावेळी कळलं नव्हतं. नाथांनीच नंतर खाणाखूणांद्वारे त्यांनी देह विसर्जीत केल्याचं कळवलं. घराच्या बाहेर पडलो तेव्हापासूनच आजूबाजूची झाडे गदागदा हालायला सुरुवात झालीच होती. ही नाथ खरोखर त्यांच्या देहाने इंदूरमध्‍ये आल्याची खूण होती. मग पुढे बर्‍याच खाणाखूणा. काल सूर्यावरुन झालेल्या शुक्राच्या अधिक्रमणादरम्यान माझ्या डाव्या मेंदूत असलेल्या नाथांच्या चेतनेने ही कव्वाली निवडली - आणि मला अखेरीस कळलं मी एक गोरखधंदा बनलोय. ग्रह गती आणि मानवी जीवन यांचा संबंध असतोच असतो, जे पिंडी ते ब्रह्मांडी! या कव्वालीच्या अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत. पण नुस़रत फतह अली खानांनी जेवढी म्हटलीय तेवढीच इथे घेतलीय. आता पाकिस्तानात लिहिल्या गेलेल्या कव्वालीत 'गोरखधंदा', 'दर्शन', 'वादात काही नाही' (शंकराचार्यांचा संदर्भ, बृहदारण्यकोपनिषदात 'ये बुराई, ये भलाई, ये जहन्नुम, ये बहिश्त' हेच संस्कृतमध्‍ये आलंय, कारण सगळं एक आहे) हे असं सांगणारे शब्द कसे आले? नाथपंथ त्या काळच्या भारतात कुठेपर्यंत पोहोचला असेल देव जाणे. मग एक मुसलमान कव्वाल 'तुम इक गोरख धंदा हो' गाणारच. हे मूळचं सूफी गीत आहे. यात सगळं अगदी थेट सांगितलंय, समोर मांडलंय, तुम्ही नेमके कसे आहात हे विचारलंय, ज्यांनी 'अनल हक़', 'मीच ईश्वर आहे' म्हटलं त्या मन्सूरचं काय झालं हेही सांगितलंय, ईश्वर का दिसू शकत नाही हे विचारलंय, सांगितलंय - एकूण अगदी प्रचंड अर्थ, दिसतील तेवढे अर्थ. आनंद घ्या. कभी यहां तूने ढूंढा कभी वहां पहूंचा तुम्हारी दीद की खातीर कहां कहां पहुंचा गरीब मिट गये पामाल हो गये लेकीन किसी तलक न तेरा आजतक निशां पहुंचा हो भी नहीं और हर जा हो हो भी नहीं और हर जा हो तुम इक गोरख धंदा हो हर जर्रे में किस शान से तु जलवा नुमां है.. तु जलवा नुमां है हैरान है मगर अक्ल के कैसे है तु क्या है? तुम इक गोरख धंदा हो तुझे दैर-ओ-हरम मैं ने ढूंढा तु नहीं मिलता मगर तशरीफ फरमा तुझको अपने दिल में देखा है तुम इक गोरख धंदा हो जब बजूझ तीर कोई दुसरा मौजूद नहीं फिर समझ में नहीं आता तेरा परदा करना तुम इक गोरख धंदा हो कोई फत में तुम्हारी खो गया है उसी खोए हुए को कुछ मिला है न बुतखाने ना काबे में मिला है मगर टूटे हुए दिल में मिला है अदम बनकर कहीं तु छूप गया है कहीं तू हस्त बनकर आ गया है नहीं है तू तो फिर इनकार कैसा नफिली तेरे होने का पता है मै जिसको कह रहां हू अपनी हस्ती अगर वो तू नहीं है तो क्या है? नहीं आया खयालों में अगर तू तो फिर मैं कैसे समझा तू खुदा है तुम इक गोरख धंदा हो हैरान हूंऽऽऽ मै हैरान हूंऽऽऽ इस बात पे तुम कौन हो क्या हो? हाथ आओ तो बुत, हाथ ना आओ तो खुदा हो अक्ल में जो गिर गया लाइंतहा तु कर हूआ जो समझ में आ गया फिर वो खुदा क्यूं कर हुआ फलसफी को बहस के अंदर खुदा मिलता नहीं छोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नहीं छुपते नहीं हो सामने आते नहीं हो तुम जलवा दिखाके जलवा दिखाते नहीं हो तुम बैरो हरम के झगडे मिटाते नहीं हो तुम जो अस्ल बात है वो बताते नहीं हो तुम हैरां हूं मेरे दिल में समाए हो किस तरहा हालां की दो जहां में समाते नहीं हो तुम ये मा बद ओ हरम हे कलीसा-ओ-दैर क्यूं हरजाई हो जभी तो बताते नहीं हो तुम तुम इक गोरख धंदा हो दिल पे हैरत ने अजब रंग जमा रक्खा है एक उलझी हुयी तस्वीर बना रक्खा है कुछ समझ में नहीं आता के ये चक्कर क्या है खेल क्या तुमने अजल से ये रचा रक्खा है रुह को जिस्म के पिंजरे का बनाकर कैदी उसपे फिर मौत का पेहरा भी बिठा रक्खा है दे के तदबीर के पंछी को उडाने तूने दाम-ए-तकदीर भी हर सम्त बिछा रक्खा है कर के अराइश क्वोनैन की बरसों तूने, खत्म करने का भी मनसूबा बना रक्खा है लामकानी का बहरहाल है दावा भी तु मे नाहनू अकरब का भी पैगाम भी सूना रक्खा है ये बुराई, वो भलाई, ये जहन्नुम, वो बहिश्त, इस उलटफेर में फरमाओ तो क्या रक्खा है? जुर्म आदम ने किया और सजा बेटों को अद्ल ओ इन्साफ़ मि'यार भी किया रक्खा है दे के इन्सान को दुनिया में ख़लाफत अपनी, इक तमाशा सा जमाने में बना रक्खा है अपनी पेहचान की खातीर है बनाया सबको, सब की नज़रों से मगर खुद को छुपा के रक्खा है तुम एक गोरख धंदा हो नीत नये नक्क्ष बनाते हो मिटा देते हो, जाने किस जुर्म-ए-तमन्ना की सजा देते हो कभी कंकड़ को बना देते हो हीरे की कनी, कभी हीरों को भी मिट्टी में मिला देते हो जिंदगी कीतने ही मुरदों को अता की जिसने, वो मसिहा को भी सलीबों पे सजा देते हो खाहिशे दी तो जो कर बैठे सरे तूर कोई, तूर ही बढके तजल्ली से जला देते हो नार-ए-नमरुद में डलवाते हो खुद अपना ख़लील खुद ही फीर नार को गुलज़ार बना देते हो चाहे किन आन में फेंको कभी माहे किन आं नूर याकूब की आंखो का बुझा देते हो दे के युसूफ को कभी मिस्र के बाजारों मे आखरे कार शह-ए मिस्र बना देते हो जज्ब़ो मस्ती की जो मंज़ील पे पहुंचता है कोई बैठकर दिल में अनल-हक़ की सज़ा देते हो खुद ही लगवाते हो फिर कुफ्ऱ के फ़तवे उसपर खुद ही मन्सूर को सूली पे चढा देते हो अपनी हस्ती भी इक रोज गवां बैठता है अपने दर्शन की लगन जिसको लगा देते हो कोई राँझा जो कभी खोज में निकले तेरी, तुम उसे झंग के बेले में रुला देते हो, जुस्तुजू लेके तुम्हारी जो चले क़ैस कोई, उसको मजनू किसी लैला का बना देते हो, जोत सस्सी के अगर मन में तुम्हारी जागे, तुम उसे तपते हुए थड़ में जला देते हो, सोहनी गर तुम्हे माहीवाल तस्सव्वुर कर ले, उसको बिफ़री हुई लहरों में बहा देते हो, ख़ुद जो चाहो तो सर-ए-अर्श बुला कर महबूब, एक ही रात में महराज करा देते हो! तुम इक गोरख धंदा हो जो कहता हूं माना तुम्हें लगता है बुरासा फिर भी है मुझे तुमसे बहरहाल गिला सा चुपचाप रहे देखते तुम अर्श-ए-बरी पर तपते हुये करबल में मुहम्मद का नवासा किस तरह़ पिलाता था लहू अपना वफ़ा को खुद तीन दिनों से वो अगरचे था प्यासा दुश्मन बहरतौर थे दुष्मन मगर अफसोस, तुमने भी फराहम ना किया पानी जरा सा हर जुल्म की तौफिक़ है जालीम की विरासत मज़लूम के हिस्से में तसल्ली ना दिलासा कल ताज सजा देखा था जिस शक्ख्स़ के सर पर है आज उसी शक्ख्स़ के हाथों मे हिक़ासा ये क्या है अगर पूछूं तो कहते हो जवाबन इस राज़ से हो सकता नहीं कोई श़नासा तुम इक गोरख धंदा हो राहे तहक़ीक में हर गाम पे उलझन देखूं वही हालात और खयालात में अनबन देखूं बनके रह जाता हूं तस्व़ीर परिशानी की ग़ौर से जब भी कभी दुनिया दरपन देखूं एक ही ख़ाक से फितरत के तजादाद़ इतने कितने हिस्सों मे बटा एक ही आँगन देखूं कहीं जह़मत की सुलगती हुयी पतझड का समां कहीं रह़मत के बरसते हुये सावन देखूं कहीं फुंकारते दरिया, कहीं खामोश पहाड़ कहीं जंगल, कहीं सेहरा, कहीं गुलश़न देखूं खून रुलाता है यह तक़सीम का अंदाज मुझे कोई धनवान यहांपर कोई निर्धन देखूं जिनके हाथों मे फकत एक सुलगता हुआ सूरज़ रात की मांग सितारों से मुज्जयन देखूं कहीं मुरझाये हुये फूल है सच्चाई के और कहीं झूठ के काटों पे भी जोबन देखूं रात क्या शय्है सवेरा क्या है, ये उज़ाला क्या, अंधेरा क्या है मै भी नाईब हूं तुम्हारा आखि़र तुम ये कहते हो तेरा क्या है? तुम इक गोरख धंदा हो

वाचने 37070
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

ओके. यकुचं जे चाल्लंय ते तुम्हाला पसंत नैये तर. ठीके, पण यकु तुमच्या हिशेबी चूक असला म्हणून त्याचा मार्ग चूक होतो असे मला नाही वाटत. संसारात असे काही ठेवले नाही की जे अपरिहार्य अतएव श्रेष्ठ आहे. ज्याला जे वाटेल त्याने ते करावे. कौटुंबिक जबाबदार्‍या होता होईल तो टाळू नयेत असे माझेदेखील मत आहे, पण काहीवेळेस समाजाच्या नजरेतून जी जबाबदारी असते ती वैयक्तिकरीत्या अडचणदेखील वाटू शकते. तशा व्यक्तींचे निकटवर्ति सगेसोयरे भले त्यमुळे त्यांना शिव्या घालोत, पण पूर्णपणे ते चूकच आहे असे नै वाटत मला. आता यकुच्या उदाहरणात तुम्हाला लॉजिकल असे काही दिसले नसेल, पण म्हणून त्या पूर्ण मार्गालाच रद्दबातल ठरवणे चूक आहे. तुमच्या आधीच्या आणि आत्ताच्या प्रतिसादावरूनदेखील हेच जाणवले त्याला माझा आक्षेप आहे. >>बाकि खर बोललात, तद्दन संसारी प्रतिक्रिया! ज्याच्या गाभ्यातुन तुम्ही मोठे होउ शकलात! मान्य. फक्त संसार-सुप्रीमसिस्ट (वादी?) असण्याला माझा आक्षेप आहे.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन मला काय वाटतय हे महत्वाच नाही आहे. ना ही यशवंतन भक्तीमार्ग वा साधुसंत होण्यावर माझा आक्षेप आहे. पण अध्यात्माच्या मार्गावर चमत्कारातुन भक्ती कडे जाण्या ऐवजी स्वतःच्या मनातुन ती निर्माण व्हावी असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. संसार काय हो आम्च्या सारखे सर्वसामान्य लोक पण करतात. पण यशवंत सारखी तरुण पिढीपण जर असल्या अंधविश्वासाच्या मार्गावर चालली, जो मार्ग धुमी धुनी अन धुरीच्या मार्गे जातो, तिथे कुणी तरी थोड रोखल पाहिजे ना? नसेल एखाद्याला वाटत लग्न करुन जोखिम घ्यावी. नको घेउ. नसेल करायचा समाजाच्या मागणी प्रमाणे नोकरी धंदा, नको करु. पण मग त्या बरोबर तेव्हढा त्याग ही करावा लागेल. तेंव्हा मग रस्त्यावर उभा राहुन चार पैसे फेकुन लस्सी प्यायची तुमची ताकद नसते, कारण तो पैसा तुम्ही कमावलेला नसतो. यशवंत हे नुसत एक उदाहरण आहे, अन त्याच्या वागण्याला माझा विरोध, तो समजुन आहे. कोणत्याही आईला वाटणार्‍या भावना जर माझ्या लिहिण्यातुन व्यक्त होत असतील तर त्यात वाईट काहीच नाही.

In reply to by स्पंदना

>>>>>>पण यशवंत सारखी तरुण पिढीपण जर असल्या अंधविश्वासाच्या मार्गावर चालली, जो मार्ग धुमी धुनी अन धुरीच्या मार्गे जातो, तिथे कुणी तरी थोड रोखल पाहिजे ना? यशवंत जाऊ इच्छित असलेल्या नाथपंथी मार्गावर (ज्याला तुम्ही अंधविश्वासाचा मार्ग म्हणता) त्यावर बर्‍याच शतकांपूर्वी एक यशवंतपेक्षा वयाने कितीतरी लहान असलेला मुलगा गेला होता. त्या मुलाचा गुरु त्याचा थोरला बंधू होता. जग त्या मुलाला ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी उर्फ संन्याशाचं पोर या नावाने ओळखते. बिचारे आईबापाविना जगणारे पोर...!!! त्याला रोखणारं कुण्णी कुण्णी नव्हतं हो... असो.

In reply to by नाना चेंगट

खुद्द ईश्वरच अनाथ आहे तर आपल्यासारख्या मरणधर्म्यांची काय कथा. पण नानासाहेबांचा प्रतिसाद खरोखर आवडला, अपर्णा अक्षय माझी चिंता वाटली त्याबद्दल धन्यवाद - पण आता ती सोडा.

In reply to by नाना चेंगट

__/\__ निवृत्तीनाथांबद्दल बोलताय ना तुम्ही? पण त्यांच परिवर्तन अस एकदम झाल होत का? अन हो हे ही खरच त्यांना अडवायला कुणी कुणी नव्हत. इथ मी आहे. अर्थात उद्या यशवंत्च दर्शन घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मी त्याला चार सुनवुनच मग जे काय असेल ते....

In reply to by स्पंदना

निवृत्तीनाथांबद्दल बोलताय ना तुम्ही? पण त्यांच परिवर्तन अस एकदम झाल होत का? अन हो हे ही खरच त्यांना अडवायला कुणी कुणी नव्हत. इथ मी आहे. अर्थात उद्या यशवंत्च दर्शन घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मी त्याला चार सुनवुनच मग जे काय असेल ते....
निवृत्तीनाथांबद्दल बोलत नाहीय मी - मी ईश्वराचा बाप कोण ते विचारतोय - हे सॉल्व्ह झालंच पाहिजे. मला माहितीय ईश्वर अनाथ असतो - म्हणून तो माणसामध्‍ये आश्रय शोधतो. त्यामुळं नानांनी म्हटलंय त्यात भर घालून म्हणतो की आईवडीलांच्या देहत्यागामुळे अनाथ झालेल्या ज्ञानदेवादीकांची किंवा इतर माणसांची चर्चा नंतर - आधी ईश्वराच्या अनाथ असण्याची आणि त्यानं काय करावं याची चर्चा - बाकी तुम्ही काहीही सुनावत राहिलात तरी ऐकत राहूच - पर्यायच नाही.

In reply to by स्पंदना

बाकी ठीक. पण >>नसेल एखाद्याला वाटत लग्न करुन जोखिम घ्यावी. नको घेउ. नसेल करायचा समाजाच्या मागणी प्रमाणे नोकरी धंदा, नको करु. पण मग त्या बरोबर तेव्हढा त्याग ही करावा लागेल. तेंव्हा मग रस्त्यावर उभा राहुन चार पैसे फेकुन लस्सी प्यायची तुमची ताकद नसते, कारण तो पैसा तुम्ही कमावलेला नसतो. या अधोरेखित वाक्याचे प्रयोजन नाही कळाले. भिक्षा मागण्याला आक्षेप ध्वनित होतो का यातून? तसे असेल तर...वेल, इथे मतभेद आहेत. पण असो. तो जास्त महत्वाचा मुद्दा नाही. >>यशवंत हे नुसत एक उदाहरण आहे, अन त्याच्या वागण्याला माझा विरोध, तो समजुन आहे. कोणत्याही आईला वाटणार्‍या भावना जर माझ्या लिहिण्यातुन व्यक्त होत असतील तर त्यात वाईट काहीच नाही. प्रश्न चांगल्या वाईटाचा नाहीच-तुमचे म्हणणे हे चांगले किंवा वाईट नाहिये, ते एकांगी आणि म्हणूनच चूक आहे इतकेच मला म्हणायचे आहे.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन, ज्ञानेश्वर हा एक आणि एकच जन्मतो. तुकारामाला सुद्धा संसार चुकला नव्हता आणि एकनाथांनी तर अध्यात्म आणि प्रपंच या दोन्हींची उत्तम सांगड घातली होती. तेव्हा सर्वसंगपरित्याग हा नेहमीच आवश्यक असतो असं नाही. प्रपंचात राहूनही तुम्ही ध्येय साध्य करू शकता. लग्न वगैरे नको असेल तर ठीक आहे. एखाद्याची जन्मजात प्रवृत्ती असते तशी, तर ठीकच आहे. पण तशी प्रवृत्ती नसलेला माणूस रातोरात बदलल्याची भाषा करू लागतो तेव्हा जरा काळजी वाटणं साहजिकच आहे. अपर्णाने आईबद्दल लिहिलंय ते प्रातिनिधिकच आहे. फक्त आईच नव्हे, तर आपल्यावर इतर ज्या काही जबाबदार्‍या असतील त्या टाळणं बरोबर नाही. आदिशंकराचार्यांनी संन्यास घेतल्यानंतरही आपल्या आईची काळजी वाहिली होती आणि तिचे अंत्यसंस्कारही केले होते. आपण त्यांना चूक म्हणू शकत नाही. अपर्णाने लिहिलंय तीही एक बाजू आहे, आणि व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहे. जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!

In reply to by पैसा

ज्ञानेश्वर हा एक आणि एकच जन्मतो.>> आक्षेप आहे. जगात चांगल्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर घडण्याची शक्यता नाकारायची कशासाठी? आत्मोन्नती* करायची संधी प्रत्येकाला मिळते. ती ज्ञानेश्वरांनी स्विकारली, इतकेच. *: आत्मोन्नती चा अर्थ एक जीव म्हणून, माणूस म्हणून अधिक प्रेमळ, अनुकंपायुक्त, सजग, सक्षम आणि संवेदनशील होणे असा मी घेते.

In reply to by कवितानागेश

आत्मोन्नतीची संधी प्रत्येकाला मिळते आणि प्रत्येकाने तसा प्रयत्न करायला पाहिजे हे १००% सत्य. पण ज्ञानेश्वरांना जन्माला येतानाच जे संचित मिळालं होतं ते आपल्यासारख्या सामान्यांकडे नसतं. आपल्यासारख्यांना तिथे पोचायचा कोणताही शॉर्टकट/बायपास नाही. प्रवास आणि मेहनत याला पर्याय नाही.

In reply to by कवितानागेश

आत्मोन्नती शब्द वाचुन आज गटणेंची आठवण झाली, पण मी म्हणतो हे एवढं सगळं वाचुन या आधी कुणालाच कशी यकु आणि गटणेंची तुलना करावी वाटली नाही, बहुदा गटणेंची साधना कमी पडली असावी.

In reply to by पैसा

>>पण तशी प्रवृत्ती नसलेला माणूस रातोरात बदलल्याची भाषा करू लागतो तेव्हा जरा काळजी वाटणं साहजिकच आहे. बरं ठीके, पण मग बुद्धाने तसंच केलं होतं ना! तुम्ही बाकी दिलेली उदाहरणे आहेत तसे हेदेखील आहेच की! बुद्धच का, समर्थ रामदासांनी पण तसेच केलं होतं. बुद्ध, ज्ञानेश्वर आणि रामदास हे एकेकच जन्मले म्हणून त्यांचा मार्ग चूक नाही ठरत. शंकराचार्यांनी केलं ते जर बरोबर, तर बुद्धाने केलं ते चूक? मुळात बरोबर-चूक या कल्पनाच सापेक्ष आहेत. >>अपर्णाने लिहिलंय तीही एक बाजू आहे, आणि व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहे. बरोबर च्या ऐवजी सुलभ असा शब्द असता तर पुर्णतः सहमत. तो शब्द नसल्यामुळे अंशतः सहमत. (५०% पेक्षा जास्त)

In reply to by बॅटमॅन

शंकराचार्य बरोबर म्हणताना दुसरा कोणी चूक असं मी अजिबात म्हटलेलं नाही. उलट
जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!
हेच माझंही म्हणणं आहे. बुद्धही त्याच्या जागी बरोबरच होता. पण सर्वसंगपरित्याग करून तो घर सोडून निघाला तेव्हा सिद्धार्थ गौतमच होता. "भगवान बुद्ध" होण्यापूर्वी त्याने एकांतात खडतर तपश्चर्या केली होती. त्याला कोणताही शॉर्टकट मिळाला नव्हता. ज्ञानेश्वरांबद्दल मी वर लिहिलंच आहे. त्यांना जन्माला येतानाच झुकतं माप मिळालं होतं. रामदासही त्यांच्या जागी बरोबरच होते. रामदासांनी ४ लोकांसारखा संसार केला नाही. तर अवघ्या विश्वाचाच संसार केला.
आपण दोघेही एकाच प्रकारचं बोलतोय! :D मी पण तेच म्हणतेय.
>जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!

In reply to by स्पंदना

अहो अपर्णाताई, यकु कशाला संन्यास घेतोय? नोकरी गेली म्हणून काय झाले? मिळेल परत. :) तो बघेल की त्याच्या आईवडलांकडे. शिवाय तो लग्न पण करणार आहे, असे त्यानीच कबूल केलंय इथेच कुठेतरी. उलट आधी तो लग्न करणार नाही, सगळे भंकस आहे, वगरै बोलायचा. असो.

गोष्ट ऐकीव आहे. एकदा मागे अशीच लिहिली होती. झेनकथा आहे असं म्हणतात. खरं खोटं माहिती नाही. तत्वज्ञानाचा प्राध्यापक आणि एक झेन साधू. साधूची कीर्ती ऐकून प्राध्यापक त्याच्याकडे चर्चेसाठी येतात. साधू तयार होतो. म्हणतो, "आपण आधी चहा घेऊ, मग चर्चा करू." साधू चहाची तयारी करू लागतो. प्राध्यापक आपले गोडवे गाऊ लागतात. आपला अभ्यास, आपलं लेखन, आपल्या विषयांची व्याप्ती वगैरे... तो बोलत राहतो... साधू कपबशीत चहा ओतू लागतो. ओतत जातो. कप भरतो, बशीत चहा उतरतो, बशी भरते, चहा आता जमिनीवर सांडणार ही स्थिती येते. प्राध्यापक म्हणतात, "अहो, काय करताय. चहा आता बशीतून सांडू लागेल." साधू म्हणतो, "हो. तेच सांगायचा प्रयत्न करतोय." यकुचं लेखन, त्यातले त्याचे विचार वाचून, 'मी कोण?, हे अस्तित्त्व कशासाठी?' वगैरे त्याला पडलेले प्रश्न आणि त्याची 'नवरत्न नाथांमुळं आपल्याला उत्तरं गवसली' असं मानत तो मांडत असलेलं त्यांचं स्वरूप (आशय नव्हे) समजून घेतल्यानंतर ही कथा आठवली. ते नवरत्न नाथ या जपानी साधूसारखे नसावेत. नाही तर ही स्थिती आली नसती. आता यकु म्हणेलच, 'तुम्ही फक्त प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचं स्वरूप समजून घेतलंत. आशय समजून घ्या, म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही.' माझं त्यावरचं उत्तर असं असेल - आशयही समजला. पण तो आंतरिक असल्यानं त्यांची जाहीर मांडणी मी करायची नसते, इतकं मला त्याला मिळालेल्या या 'अनुभूती'तून समजलं. :-)

In reply to by श्रावण मोडक

हाहाहा! फर्मास! या प्रतिसादातील शेवटच्या दोन ओळीतला एक शब्द हा सगळ्यात महत्वाचा, किंवा प्रथम महत्वाचा, आहे. तेच सांगायचा प्रयत्न चालू आहे. असो.

In reply to by श्रावण मोडक

>>>>पण तो आंतरिक असल्यानं त्यांची जाहीर मांडणी मी करायची नसते, इतकं मला त्याला मिळालेल्या या 'अनुभूती'तून समजलं. श्रामो, बुल्स आय... गोमाता म्हणू नका कुणी! ;) बाकी हे असंच आणखी चार दोन व्यक्तींना सांगावंसं वाटतं. त्यातली एक अस्मादिक. :)

काही दिवस जालनिवृत्ती घे रे बाबा, देशभ्रमण कर! इथे वाचणारी व तुझ्याशी चर्चा करत बसणारी लोक आहेत म्हणून तू लिहीतोस व चर्चेत रहायचा प्रयत्न करतोयस असे वाटतेय. तुझे गुरु काय इंटरनेट गुरु नव्हते ना? बाहेर जाउन शिष्य, भक्त गोळा केलेस , मठ बांधलास तर तेवढेच बरे. इथे ऑलरेडी नाडीबाबा, ज्योतिष-कुंडलीबाबा, टारोकार्डप्लेयर, सेल्फ हेल्फ कोच, शेयरबाजार कोच, नातेसंबध कोच व बरेच ऑलराउंडर गुर्जी आणि काका मंडळी आहेत. रांग मोठी आहे इतकेच नाही तर मिपावरच्या प्रत्येक काथ्याकुटात (विलासराव व मी वगळता ) जवळ जवळ सर्व मिपाकर बहुमूल्य सुचना देउ शकतात. व लॅटेक्सच्या जमान्यात आता कोणाला उर्ध्वरेतन क्रिया शिकायची नाही की शिकून फायदा नाही. तु काय मिपाच्या संपादकांना/ सदस्यांना पोस्टाने पत्र लिहून कोणामार्फत इथे टंकून घेतोस का? डायरेक्ट तुझ्या लॅपटॉपवरुन त्या त्या धाग्यावर स्व:ताच टंकतोस ना? मग रेडीमेड लॅटेक्स असता कोण कशाला कुठे काय सुरनळीत वळवेल.. लक्ष वेधून घ्यायचे प्रयत्न, सगळी लहान मुले असेच करतात पण नंतर मोठी होतात. फार तर लेटेस्ट सिनेमा परीक्षण / राजकीय काथ्याकूट टाकतात. असो लवकर मोठा हो*! * = श्रामोअव्हेर आपलं श्रेयअव्हेर [ तेच ते रेसीडेंट गुर्जी यांच्या नंतर बिकागुर्जींचा नंबर आहे दोघे अजुन गब्रु जवान आहेत, त्यामुळे रांग खूप मोठी आहे तिथेही लवकर नंबर लागायचा नाही] हा नवे संस्थळ काढलस तरच... मग बरेचसे तज्ज्ञ, जाणकार, गुरु तुझ्या प्रमुख कुलूगुरुपदाखाली येतील तेव्हाच तु मोठा ई-आचार्य बनशील. :-)

In reply to by सहज

आमची जवानी सर्टिफाय केल्याबद्दल खर्र्या खुर्र्या शुभेच्छा! ;) अवांतर : बसा खाली!

अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा माती भिडली आभाळा

काय चाललंय काय? आजपर्यंत नेहमीच मला "गुरु" नसल्याचं थोडंफार वाईट वाटायचं. काही लोकांनी पुस्तके-बिस्तके वाचायचा सल्ला दिला, पण आम्हीच नालायक म्हणून मानला नाही.. आता मात्र यकु आणि इतरांचेही काही लेख वाचून, अनुभूती आणि अनुभवहीन असल्याचा प्रचंड आनंद होतोय.. बाकी गविंप्रमाणे हा प्रश्न मलाही पडलाय की सरळसोपं इंद्रीय आनंदाचा मजा घेण्याऐवजी ही ऊर्ध्वरेतन वगैरे भानगड कशाला? पण जाऊ द्या, ज्याची त्याची इच्छा आणि अनुभूती..

यकु मित्रा... तु ते दिक्षा वगैरे भानगडी करुन काय मिळवलस देव जाणे... पण तुझी चिंता करणारे, हक्काने तुला समजावुन सांगणारे, मायेचा हक्क गाजवणारे हे ई-स्नेही हेच तुझं मिपावरचं संचीत. इतकं प्रेम इतर कुठल्या आयडी ला मिळाल्याचं बघितलं नाहि. भाग्यवान आहेस बाबा. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

हो आणि काही आयडिंना इतकं प्रेम मिळालं की त्यांना भावनिक मधुमेह झाला आणि डॉक्टरांच्या सांगण्यावरुन त्यांनी मिपा सोडुनच दिलं..

यकु, हे तुम्ही सिरियसली लिहिताय की हा एक पराकोटीचा उपहास आहे तेच कळत नाहीये... अभ्यास वाढवायला हवा, हेच खरं