तुम इक गोरख धंदा हो

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
7 Jun 2012 - 9:21 am

नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे. आम्ही रडारवर बसलो होतो, आता तुमचा वरचा कॉन्टॅक्ट सुरु झालाय (दीक्षा देऊन झाल्यानंतर), सीमकार्ड, तुम्ही रिचार्ज करा, बॅलन्स संपलंय, पेट्रोल भरु, कुठंही गेलात तरी कॉन्टॅक्टमध्ये रहा, असल्या वरवर सोप्या पण अत्यंत गूढ, गहन प्रक्रिया सूचित करणार्‍या भाषेत बोलायचे. त्यांना लिहिता वाचता येत होतं, कारण नाथ संप्रदायाच्या नित्योपासनेच्या पुस्तकातले अभंग ढोलकीच्या अतिशय मनोहर तालावर नाथ महेश्वरच्या त्यांच्या छोट्याशा मठीत म्हणत उभे असतानाच मी आणि विलासराव त्यांची वाट पहात बाहेर घाटावर बसून होतो. सांगायचा मुद्दा हा की भरभक्कम संकल्पना, लंबंचौडं भाषण वगैरे नाथांचे विषय नव्हते - होता फक्त थेट अनुभव, मी जिकडे तिकडे प्रॅक्टीकल प्रॅक्टीकल म्हणून ओरडत होतो ते समोरासमोरचं प्रॅक्टीकल. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे थेट दाखवायचे - म्हणजे नुसती नजर टाकून थेट आजूबाजूची झाडं गदागदा हालवून दाखवायचे - तुफान आणून दाखवायचे आणि विचारायचे - चल बता ये क्या है? सांग मला हे समजून हे काय आहे ते. अर्थातच हे योगसाधनेच्या बळावर. मातृरुपी चामुंडा शक्तीच्या उपासनेच्या बळावर. महेश्वरचा त्यांचा रहाण्याचा एकूण गेटअप, ते करीत असलेले अचाट प्रकार पाहून मला मनात कुठेतरी हा माणूस वामाचारी आहे असं वाटत होतं. हो ना, आता एखादा माणूस अशा गोष्‍टी करत असतानाच पूर्ण करड्या रंगात रंगवलेलं शक्तीचं मंदीर, धड डॉबरमॅनही नाही आणि धड गावठीही नाही अशा कुत्र्यांना पाणथळ जागी डुंबताना दाखवून ते भैरव आहेत दर्शन घे, क्षणात तेच कुत्रे पुन्हा त्या शक्तीच्या मंदीराशेजारी आराम पडलेले दाखवून, गांजा वगैरे वरवरच्या गोष्‍टी पाहून आणखी वेगळं काय वाटणार? नाथांचे पाय पकडेपर्यंत आम्ही होतो युजीपंथीय - विचारांची साखळी, ती तोडा म्हणजे शरीराचा स्फोट होतो वगैरे गोष्‍टी युजींकडून ऐकलेल्या - म्हणजे 'मी' नावाचं 'Living Organism'कसं ऑपरेट होतं हे अनुभवता येईल वगैरे युजींचा अनुभव मी ताडून पहात होतो. डावं-उजवं होतंय ते तुटलं पाहिजे, म्हणजे स्फोट होतों, खरंय का असं मी विचारलं. तर डावं-उजवं ही नाथ पंथामधली ब्रह्मांडाचं संतुलन साधणारी विश्वव्यापक संकल्पना आहे - म्हणजे जगात सम आणि विषम आहे म्हणूनच विश्वाला गती आहे हे मज पामराला कसं ठावं असणार. नाथ पंथाची शिकवण अगदी साधी आणि थेट आहे - एका हाताने द्या आणि दुसर्‍या हाताने घ्या. वासना आहेत? तर आहेत! प्रेम आहे? तर आहे! द्वेष आहे? तर आहे! वाद आहे? तर आहे! या सगळ्या गोष्‍टींमध्‍ये संतुलन पाहिजे. म्हणजे द्वेष मिळाला - तर तो शून्य करण्यासाठी प्रेम वापरावं लागेल. मी स्वत:कडे एक विभक्त एंटीटी म्हणून पाहात होतो आणि जे काही होईल ते फक्त माझ्यात होईल असं मी समजत होतो. आणि नाथ तर कालभैरवाचंच रुप असल्याने मी शेवटी जागृत होऊनही कुठे पोहोचणार होतो? काळाच्या मुखातच ना? म्हणून महेश्वरच्या घाटावर कालभैरव बनून उभ्या असलेल्या नाथांना आधी सगळे चमत्कार दाखवावे लागले, मग मी नमस्कार केला. मग नाथांनी दीक्षा दिली. खरबूज कापून त्याचं अर्धं भक्कल न तोडता खायला लाऊन त्याद्वारे योगसाधनेच्या बळावर नाथांनी स्वत:चा डावा मेंदू माझ्या मेंदूत आरोपित केला, त्यांचा स्वत:चा देह महेश्वरहून अमरकंटकला जाऊन विसर्जीत केला. नाथांचा सगळं बोलणं कोड्यात. दीक्षा मिळाल्यानंतर दोन-चार दिवसांत एका सकाळी नाथांचा फोन आला - काय म्हणता यशवंत पाटील? हे असं वाट्टेल त्या नावाने कुणालाही हाक मारायचे. कधी म्हणायचे मी दगडधोंडे, लोखंडाचा डॉक्टर आहे, तु जीवाचा डॉक्टर आहेस - असं काहीही. तर मला त्या सकाळी ते फोनवर म्हणे, इंदूर स्टेशनवर या, अमरकंटकला निघालोय आणि मी काही खाल्लेलं नाही. येताना काहीतरी खायला घेऊन या. स्टेशनच्या उजव्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली मी थांबलोय वगैरे. तो स्टेशनवरचा दृष्‍टांत मी लिहिला पण आहे. स्टेशनवर नाथांचं दर्शन होऊ शकलं नाही. जवळपास होते तेवढ्या पिंपळांखाली मी जाऊन आलो. पण अमरकंटकला निघालेत म्हणजे देह विसर्जीत करायला निघालेत हे मला त्यावेळी कळलं नव्हतं. नाथांनीच नंतर खाणाखूणांद्वारे त्यांनी देह विसर्जीत केल्याचं कळवलं. घराच्या बाहेर पडलो तेव्हापासूनच आजूबाजूची झाडे गदागदा हालायला सुरुवात झालीच होती. ही नाथ खरोखर त्यांच्या देहाने इंदूरमध्‍ये आल्याची खूण होती. मग पुढे बर्‍याच खाणाखूणा. काल सूर्यावरुन झालेल्या शुक्राच्या अधिक्रमणादरम्यान माझ्या डाव्या मेंदूत असलेल्या नाथांच्या चेतनेने ही कव्वाली निवडली - आणि मला अखेरीस कळलं मी एक गोरखधंदा बनलोय. ग्रह गती आणि मानवी जीवन यांचा संबंध असतोच असतो, जे पिंडी ते ब्रह्मांडी! या कव्वालीच्या अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत. पण नुस़रत फतह अली खानांनी जेवढी म्हटलीय तेवढीच इथे घेतलीय. आता पाकिस्तानात लिहिल्या गेलेल्या कव्वालीत 'गोरखधंदा', 'दर्शन', 'वादात काही नाही' (शंकराचार्यांचा संदर्भ, बृहदारण्यकोपनिषदात 'ये बुराई, ये भलाई, ये जहन्नुम, ये बहिश्त' हेच संस्कृतमध्‍ये आलंय, कारण सगळं एक आहे) हे असं सांगणारे शब्द कसे आले? नाथपंथ त्या काळच्या भारतात कुठेपर्यंत पोहोचला असेल देव जाणे. मग एक मुसलमान कव्वाल 'तुम इक गोरख धंदा हो' गाणारच. हे मूळचं सूफी गीत आहे. यात सगळं अगदी थेट सांगितलंय, समोर मांडलंय, तुम्ही नेमके कसे आहात हे विचारलंय, ज्यांनी 'अनल हक़', 'मीच ईश्वर आहे' म्हटलं त्या मन्सूरचं काय झालं हेही सांगितलंय, ईश्वर का दिसू शकत नाही हे विचारलंय, सांगितलंय - एकूण अगदी प्रचंड अर्थ, दिसतील तेवढे अर्थ. आनंद घ्या.

कभी यहां तूने ढूंढा कभी वहां पहूंचा
तुम्हारी दीद की खातीर कहां कहां पहुंचा
गरीब मिट गये पामाल हो गये लेकीन
किसी तलक न तेरा आजतक निशां पहुंचा

हो भी नहीं और हर जा हो
हो भी नहीं और हर जा हो
तुम इक गोरख धंदा हो

हर जर्रे में किस शान से तु जलवा नुमां है.. तु जलवा नुमां है
हैरान है मगर अक्ल के कैसे है तु क्या है?
तुम इक गोरख धंदा हो

तुझे दैर-ओ-हरम मैं ने ढूंढा तु नहीं मिलता
मगर तशरीफ फरमा तुझको अपने दिल में देखा है
तुम इक गोरख धंदा हो

जब बजूझ तीर कोई दुसरा मौजूद नहीं
फिर समझ में नहीं आता तेरा परदा करना
तुम इक गोरख धंदा हो

कोई फत में तुम्हारी खो गया है
उसी खोए हुए को कुछ मिला है
न बुतखाने ना काबे में मिला है
मगर टूटे हुए दिल में मिला है
अदम बनकर कहीं तु छूप गया है
कहीं तू हस्त बनकर आ गया है
नहीं है तू तो फिर इनकार कैसा
नफिली तेरे होने का पता है
मै जिसको कह रहां हू अपनी हस्ती
अगर वो तू नहीं है तो क्या है?
नहीं आया खयालों में अगर तू
तो फिर मैं कैसे समझा तू खुदा है
तुम इक गोरख धंदा हो

हैरान हूंऽऽऽ मै हैरान हूंऽऽऽ इस बात पे तुम कौन हो क्या हो?
हाथ आओ तो बुत, हाथ ना आओ तो खुदा हो
अक्ल में जो गिर गया लाइंतहा तु कर हूआ
जो समझ में आ गया फिर वो खुदा क्यूं कर हुआ
फलसफी को बहस के अंदर खुदा मिलता नहीं
छोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नहीं
छुपते नहीं हो सामने आते नहीं हो तुम
जलवा दिखाके जलवा दिखाते नहीं हो तुम
बैरो हरम के झगडे मिटाते नहीं हो तुम
जो अस्ल बात है वो बताते नहीं हो तुम
हैरां हूं मेरे दिल में समाए हो किस तरहा
हालां की दो जहां में समाते नहीं हो तुम
ये मा बद ओ हरम हे कलीसा-ओ-दैर क्यूं
हरजाई हो जभी तो बताते नहीं हो तुम
तुम इक गोरख धंदा हो
दिल पे हैरत ने अजब रंग जमा रक्खा है
एक उलझी हुयी तस्वीर बना रक्खा है
कुछ समझ में नहीं आता के ये चक्कर क्या है
खेल क्या तुमने अजल से ये रचा रक्खा है
रुह को जिस्म के पिंजरे का बनाकर कैदी उसपे फिर मौत का पेहरा भी बिठा रक्खा है
दे के तदबीर के पंछी को उडाने तूने
दाम-ए-तकदीर भी हर सम्त बिछा रक्खा है
कर के अराइश क्वोनैन की बरसों तूने, खत्म करने का भी मनसूबा बना रक्खा है
लामकानी का बहरहाल है दावा भी तु मे
नाहनू अकरब का भी पैगाम भी सूना रक्खा है
ये बुराई, वो भलाई, ये जहन्नुम, वो बहिश्त, इस उलटफेर में फरमाओ तो क्या रक्खा है?
जुर्म आदम ने किया और सजा बेटों को
अद्ल ओ इन्साफ़ मि'यार भी किया रक्खा है
दे के इन्सान को दुनिया में ख़लाफत अपनी, इक तमाशा सा जमाने में बना रक्खा है
अपनी पेहचान की खातीर है बनाया सबको, सब की नज़रों से मगर खुद को छुपा के रक्खा है
तुम एक गोरख धंदा हो
नीत नये नक्क्ष बनाते हो मिटा देते हो, जाने किस जुर्म-ए-तमन्ना की सजा देते हो
कभी कंकड़ को बना देते हो हीरे की कनी, कभी हीरों को भी मिट्टी में मिला देते हो
जिंदगी कीतने ही मुरदों को अता की जिसने, वो मसिहा को भी सलीबों पे सजा देते हो
खाहिशे दी तो जो कर बैठे सरे तूर कोई,
तूर ही बढके तजल्ली से जला देते हो
नार-ए-नमरुद में डलवाते हो खुद अपना ख़लील
खुद ही फीर नार को गुलज़ार बना देते हो
चाहे किन आन में फेंको कभी माहे किन आं
नूर याकूब की आंखो का बुझा देते हो
दे के युसूफ को कभी मिस्र के बाजारों मे
आखरे कार शह-ए मिस्र बना देते हो
जज्ब़ो मस्ती की जो मंज़ील पे पहुंचता है कोई
बैठकर दिल में अनल-हक़ की सज़ा देते हो
खुद ही लगवाते हो फिर कुफ्ऱ के फ़तवे उसपर
खुद ही मन्सूर को सूली पे चढा देते हो
अपनी हस्ती भी इक रोज गवां बैठता है
अपने दर्शन की लगन जिसको लगा देते हो
कोई राँझा जो कभी खोज में निकले तेरी, तुम उसे झंग के बेले में रुला देते हो,
जुस्तुजू लेके तुम्हारी जो चले क़ैस कोई, उसको मजनू किसी लैला का बना देते हो,
जोत सस्सी के अगर मन में तुम्हारी जागे, तुम उसे तपते हुए थड़ में जला देते हो,
सोहनी गर तुम्हे माहीवाल तस्सव्वुर कर ले, उसको बिफ़री हुई लहरों में बहा देते हो,
ख़ुद जो चाहो तो सर-ए-अर्श बुला कर महबूब, एक ही रात में महराज करा देते हो!
तुम इक गोरख धंदा हो
जो कहता हूं माना तुम्हें लगता है बुरासा
फिर भी है मुझे तुमसे बहरहाल गिला सा
चुपचाप रहे देखते तुम अर्श-ए-बरी पर
तपते हुये करबल में मुहम्मद का नवासा
किस तरह़ पिलाता था लहू अपना वफ़ा को
खुद तीन दिनों से वो अगरचे था प्यासा
दुश्मन बहरतौर थे दुष्मन मगर अफसोस, तुमने भी फराहम ना किया पानी जरा सा
हर जुल्म की तौफिक़ है जालीम की विरासत
मज़लूम के हिस्से में तसल्ली ना दिलासा
कल ताज सजा देखा था जिस शक्ख्स़ के सर पर
है आज उसी शक्ख्स़ के हाथों मे हिक़ासा
ये क्या है अगर पूछूं तो कहते हो जवाबन
इस राज़ से हो सकता नहीं कोई श़नासा
तुम इक गोरख धंदा हो
राहे तहक़ीक में हर गाम पे उलझन देखूं
वही हालात और खयालात में अनबन देखूं
बनके रह जाता हूं तस्व़ीर परिशानी की
ग़ौर से जब भी कभी दुनिया दरपन देखूं
एक ही ख़ाक से फितरत के तजादाद़ इतने
कितने हिस्सों मे बटा एक ही आँगन देखूं
कहीं जह़मत की सुलगती हुयी पतझड का समां
कहीं रह़मत के बरसते हुये सावन देखूं
कहीं फुंकारते दरिया, कहीं खामोश पहाड़
कहीं जंगल, कहीं सेहरा, कहीं गुलश़न देखूं
खून रुलाता है यह तक़सीम का अंदाज मुझे
कोई धनवान यहांपर कोई निर्धन देखूं
जिनके हाथों मे फकत एक सुलगता हुआ सूरज़
रात की मांग सितारों से मुज्जयन देखूं
कहीं मुरझाये हुये फूल है सच्चाई के
और कहीं झूठ के काटों पे भी जोबन देखूं
रात क्या शय्है सवेरा क्या है, ये उज़ाला क्या, अंधेरा क्या है
मै भी नाईब हूं तुम्हारा आखि़र
तुम ये कहते हो तेरा क्या है?
तुम इक गोरख धंदा हो

संस्कृतीनृत्यसंगीतधर्मइतिहासवाङ्मयकथाकविताप्रेमकाव्यभाषातंत्रशिक्षणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनसद्भावनाशुभेच्छाआस्वादअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

9 Jun 2012 - 2:16 pm | भडकमकर मास्तर

अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा अजब सोहळा
माती भिडली आभाळा

चिगो's picture

9 Jun 2012 - 11:07 pm | चिगो

काय चाललंय काय? आजपर्यंत नेहमीच मला "गुरु" नसल्याचं थोडंफार वाईट वाटायचं. काही लोकांनी पुस्तके-बिस्तके वाचायचा सल्ला दिला, पण आम्हीच नालायक म्हणून मानला नाही.. आता मात्र यकु आणि इतरांचेही काही लेख वाचून, अनुभूती आणि अनुभवहीन असल्याचा प्रचंड आनंद होतोय..

बाकी गविंप्रमाणे हा प्रश्न मलाही पडलाय की सरळसोपं इंद्रीय आनंदाचा मजा घेण्याऐवजी ही ऊर्ध्वरेतन वगैरे भानगड कशाला? पण जाऊ द्या, ज्याची त्याची इच्छा आणि अनुभूती..

अर्धवटराव's picture

9 Jun 2012 - 11:59 pm | अर्धवटराव

यकु मित्रा... तु ते दिक्षा वगैरे भानगडी करुन काय मिळवलस देव जाणे... पण तुझी चिंता करणारे, हक्काने तुला समजावुन सांगणारे, मायेचा हक्क गाजवणारे हे ई-स्नेही हेच तुझं मिपावरचं संचीत. इतकं प्रेम इतर कुठल्या आयडी ला मिळाल्याचं बघितलं नाहि. भाग्यवान आहेस बाबा.

अर्धवटराव

५० फक्त's picture

10 Jun 2012 - 1:09 pm | ५० फक्त

हो आणि काही आयडिंना इतकं प्रेम मिळालं की त्यांना भावनिक मधुमेह झाला आणि डॉक्टरांच्या सांगण्यावरुन त्यांनी मिपा सोडुनच दिलं..

अर्धवटराव's picture

11 Jun 2012 - 9:11 pm | अर्धवटराव

मिपा वर इन्स्युलीन ची सोय करायला हवी ;)

अर्धवटराव

आबा's picture

11 Jun 2012 - 8:02 pm | आबा

यकु,
हे तुम्ही सिरियसली लिहिताय की हा एक पराकोटीचा उपहास आहे तेच कळत नाहीये...
अभ्यास वाढवायला हवा, हेच खरं

नुसरत आणि अमिताभ बच्चन, तुम एक गोरख धंदा हो