वाटतं असं... की!
वाटतं असं... की
तुझ्या हातात मोगरा भरभरून ठेवावा..
आणि सुगंधाशी सुगंधाला स्पर्धा करू द्यावी..
नक्की मला वेडं करणारा त्यातला कोणता आहे? ते शोधण्यासाठी!
वाटतं असं... की
पावसाने शांत झालेल्या मऊशार हिरवळीत तुझ्यासवे एकरूप व्हावं..
खऱ्या मीलनाचा मृद्गंध
कळण्यासाठी!
वाटतं असं... की
तुझ्या हातांशी एकरूप झालेली मेहेंदी , मी नेहमी आठवावी..
हव्यास आणि सहजतेची ओढ यातला फरक..
मला समजण्यासाठी.