शृंगार

वंगाळ !

सुहास..'s picture
सुहास.. in जे न देखे रवी...
28 Aug 2014 - 2:20 am

साद झलकेची ,
मना मंदी चाळं,
शरावणातल बेडकं स्साल,
वंगाळ वंगाळ

गव्हाळ मानंखाली
तीळ मस्त काळं
चवचाल जीभ स्साली
वंगाळ वंगाळ

लाजुन पाठमोरी
बसली दातखीळं
कलिजा खल्लास स्साला
वंगाळ वंगाळ

पदराला पुरना कापड
अंगी रतीच मुळं
दमच निघना स्साला
वंगाळ वंगाळ

दोन चंद्राची रात म्हणं
गारवा आनं ढगाळं
सरना च आज स्साली
वंगाळ वंगाळ

शृंगारमुक्तक

छंद तुझा ..

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
1 Aug 2014 - 12:17 pm

नभामध्ये तारकांचा
थवा धुंद आहे,
झुळूझुळू वाहणारा
'अनिल' मंद आहे !!

पावलात तुझ्या
घुंगरूचा नाद तो,
तालावर बेहोष
मी बेधुंद आहे !!

केसांत अडखळून
वाऱ्यास गंध आहे,
गालावरच्या खळीचा
हृदयास छंद आहे !!

रक्तिम ओठ चावताना
तू दिसतेस अशी,
तुझ्या त्या इशाऱ्यावर
मन गुंग आहे !!

तो कटाक्ष तिरका
अन निर्मळ हास्य,
कसं सांगू सखे
मी बेबंद आहे !!
...खरंच बेबंद आहे !!

शृंगारप्रेमकाव्य

स्वप्नातली ती

चैतू's picture
चैतू in जे न देखे रवी...
10 Jul 2014 - 4:35 pm

स्वर्गातून अवतरली तु, जणु मदनाची रती,
लावण्यवती परी तु, पाहताक्षणी गुंग झाली मती
तु येताच पक्षी, गातात स्वागतगीते,
दवावरून चालते तु, तेव्हा गवतही शहारते
केसांशी खेळत जेव्हा, वारा तुला झोंबी घालतो,
मनातल्या मनात तेव्हा, त्याचाही हेवा वाटतो
शृंगारासाठी तु एक, टवटवीत गूलाब हाती घेतला,
पण सौँदर्य तुझे पाहुन, बिचारा गूलाबही लाजला
तु जिथे ठेवते पाऊल, तिथे धरणीलाही प्रेमांकुर फूटतो,
आणि तुझ्या बागडण्याने, प्रेमाचा सुगंध दरवळतो
चिँब पावसात भिजताना, तु बेधुंद झाली,
आणि तुझ्यासमवेत नशा, मलाही चढत गेली

शृंगारकविताप्रेमकाव्य

चव

भृशुंडी's picture
भृशुंडी in जे न देखे रवी...
3 Jul 2014 - 9:48 pm

सोडी केशसंभार
विखुरला स्तनांवर
दृश्य वेड लावी मला
नग्न सावळ्या रूपाचे

हात वेढले उराशी
त्याचे होता युग्मपाश
बोटे आतुर धावती
तप्त देठांपाशी

खोल जाता नाभी-डोही
घनदाट होई सृष्टी
अंधारात साथ देती
तुझे चित्कार

चिंब ओल्या पाकळ्यांत
होती जिव्हेचेच दंश
माझ्या ओठांवर चव
तुझ्या अमृताची

शृंगारकविता

सौंदर्यवती तू ......

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
1 Jul 2014 - 11:15 am

असं गं रक्तिम मुख तुझं
जसं मिटल्या लाजाळूचं पान ,
त्यावर टेचात चालणं गं
वळवी वैराग्याची मान !!

मीच थिटा वर्णू कसा
सृष्टीत तूच महान,
सुरमयी कटी सखे
तुझा कुमुदिनीचा वाण !!

एक पाचोळाच मी सखे
ज्याला कुठून देहभान ?
मन आलं दबकत चाखण्या
तुझे ओठ रंगले पान !!

बेहोष गंध तुझा तो
त्यात रेखीव कमान,
बेसावध तुझ्यात तू मात्र
भुंग्यांना त्याची जाण !!

कधी जाण हृदय हेही
खुपसे तुझ्यावर कुर्बान,
मला लाभावं माळण्या
वेणी गजरयाचा मान !!

शृंगारकविता

निर्मोही

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
17 Feb 2014 - 7:13 pm

अंशात तुझ्या वसलो मीही
वाहिले हवे ते निर्मोही
समिधा सुखदा अक्षत ग्वाही
आतंक मनी कुठला नाही

मन अबोलसे स्वर विकलांगी
प्रतिमा न कधीही एकांगी
ध्वनि छेडतसे सम प्रतिध्वनी
हृदयात वलय लय शतरंगी

लाटेस काठ हळवा म्हणुनी
खेळते किनाऱ्यावर पाणी
भारती ओहटते ओघळुनि
डोहात माणकांच्या खाणी

………अज्ञात

शृंगारकविता

मदगन्ध

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
31 Jan 2014 - 2:58 pm

ओठावर प्रणयी ओल स्नेहमय शब्द जिव्हाळ्याचे
ओषाड घनातिल जणू धरेवर अगतिक वळवाचे
सढळ समागम तृप्त विसावा खेळ ऐहिकाचे
मोहरलेले अंग अंग उधळी मदगंध मनाचे

……… अज्ञात

शृंगारकविता

नविनच

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
7 Jan 2014 - 12:39 pm

पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे
हे जरा नविनच होते
चिंब होऊनही मी धुंद न होणे
हे जरा नविनच होते
.
हा कुठला नवा खेळ?
.
दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो
'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो
ढग फुटून 'तो' असा काही बरसतो
त्या गंधाने मी आकंठ मोहरतो
.
नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो
सचैल भिजून भान हरपतो
कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात
हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते
मनात वसंत रुंजी घालाया लागतो
मग आजच असे का व्हावे?
.
हा वर्षाव कोरडा का वाटावा

शृंगारशांतरसकविताप्रेमकाव्य

प्रेम-एक काव्यगुण

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
1 Dec 2013 - 6:18 pm

प्रेमाच्या उगमी येथे,
सहजी कवित्व झरते
जे बोलत जातो मी ही
ते ते कवित्व होते

जरूरी ना काव्यगुणांची
श्वासासम सहजी येते
कुणी न करताही तेथे
ती-कविता होऊन जाते

उस्फूर्तता ही कैशी?,
प्रतिभेशी नाही घेणे
ते देवाजीच्या घरचे
सहजाचे साधे लेणे.

कधी हात तिचे दिसतात
मज मेहेंदी दिसून येते
स्पर्शाची अठवण का ही?
मग मनात उरुनी जाते?

शरीराचा गंध तसाही
मज वेडाऊनच जाई
शब्दांचे सरते काम
अन कविता केवळ राही

शृंगारकविता

~~~ तुझीच मी ~~~

प्रिया ब's picture
प्रिया ब in जे न देखे रवी...
18 Nov 2013 - 2:15 pm

असशील का तू स्वप्नातला माझ्या?
असेन का मी ही मनातली तुझ्या?
असतील का आपल्या आवडी सारख्या?
जरी नसल्या, तरी त्या आपण स्विकारुया!!!

असे… आणि ह्या सारखे अनेक प्रश्न होते डोकावत
पहिल्या भेटीनंतरचे माझे अस्वस्थ मन… नव्हते काही कळत
अनेक प्रश्नांनी तू देखील गेला असशील भांबावून
हीच असेल का "ती"? घेईल का सर्वांना सांभाळून?

काही भेटीनंतर निर्णय पक्का केला शेवटी
दोन जीव आलो एकत्र, होतो थोडे अनोळखी
सगळच नवीन असेल, कदाचित सगळ्या नाही पटणार आपल्याला गोष्टी
मात्र समजून घ्यायची आहे ना आपली तयारी?

शृंगारकविता