चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच..
चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच...
बघेल सारं जग आपल्याकडे
याची तमा कशाला बाळगायची...
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...
रोज रात्री चांदणी चोरुन चांदोबाला पहायची...
चंदाराजाचं लक्ष्य नाही म्हणून सारखीच रुसायची...
तरीही चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...
रुसता रुसता एखादी मधूनच चमकायची
अन् चांदोबाचं लक्ष्य स्वतःकडे वेधायची...
कारण चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...
प्रतिक्रिया
5 Nov 2014 - 11:34 am | रामदास
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच..
चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच...
नक्की कोण कोणाच्या मिठीत असणार आहे त्याचा निर्णय घ्या बॉ.
5 Nov 2014 - 11:38 am | टवाळ कार्टा
इथे चंद्र आणि चंद्रकोर म्हणजे एकच की वेगवेगळे ;)...चांदणीचा गोंधळ उडायला नको :)
5 Nov 2014 - 8:24 pm | विवेकपटाईत
काही तरी गोंधळ आहे....
चंद्रकोरीच्या मिठीत चांदणी जाणार. - याला काय म्हणावे ????
चंद्रमाच्या मिठीत चांदणी जाणार - कदाचित हेच म्हणायचं असेल
5 Nov 2014 - 11:26 pm | स्वप्नज
गोंधळ नाही हो विवेकजी, 'ती' चंद्रकोर, 'ती' चांदणी आणि तरीही त्यांची मिठी.....हे कायद्यालाही मान्य आहे हल्ली.... कवी पुरोगामी दिसतोय.
ह.घ्या.
5 Nov 2014 - 11:39 pm | स्वप्नज
१-२ तांत्रिक अडचणी सोडल्या तर कविता तशी मस्त आहे...भाव चांगला आहे कवितेतला. लुकलुकणारी चांदणी चंद्राचे लक्ष्य वेधण्यासाठी लुकलुकते ही कल्पना छान. अजून थोडीशी रंगवता आली असती..... छान आहे कविता.
6 Nov 2014 - 12:09 am | सुर्या गार्डी
सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे. चंद्र हाच नायक आहे व चांदणी नायिका. पूर्ण चंद्रावर चांदणीचे प्रेम आहेच, पण तिथे मिलनाची अभिलाषा नाही. हाच चंद्र जेव्हा अपूर्ण असतो चंद्कोरीच्या स्वरुपात,तेव्हा मात्र त्याची अपूर्णता दूर करण्यासाठी चांदणी त्याच्या मिठीत जातेय,असे सुचवायचे आहे.
6 Nov 2014 - 11:42 pm | बहुगुणी
पण
हाच चंद्र जेव्हा अपूर्ण असतो चंद्कोरीच्या स्वरुपात,तेव्हा मात्र त्याची अपूर्णता दूर करण्यासाठी चांदणी त्याच्या मिठीत जातेय,असे सुचवायचे आहे.
हा अर्थ अभिप्रेत असेल तर interesting germ आहे! (फक्त तो तसा कवितेत मात्र उतरला नाहीये...)6 Nov 2014 - 8:47 am | प्रचेतस
चांदणी म्हणजे रोहिणी का?
6 Nov 2014 - 4:08 pm | सुर्या गार्डी
चंद्राचे नशीब अंमळ चांगले आहे.. खुप चांदण्या असतात.. रोहिणी तो सिर्फ झांकी है ;
6 Nov 2014 - 4:46 pm | प्रचेतस
नाही ओ.
चांदण्या कितीही असल्या तरी बायको एकच. ती मात्र रोहिणी.
6 Nov 2014 - 10:55 pm | अत्रुप्त आत्मा
@चांदण्या कितीही असल्या तरी बायको एकच. >> =))))) सूचक आगोबा! =))
7 Nov 2014 - 12:02 pm | पाषाणभेद
मिपाकरांना काहीही द्या ते त्या काहीहीचे काहीही करुन दाखवतील.
:-)