बहुगुणी यांच्या मायामी बीच ऑटो शो या धाग्यातील फोटो बराच काळ डोळ्यासमोर पिंगा घालत राहिले. वाहनवेड्यासाठी वाहन काय असतं हे वेगळं सांगायला नको. तीच दारू असते, तेच प्रेम असतं, तोच जोश असतो, तेच समाधान असतं.
त्याच वरून प्रेरणा घेत सुचलेलं हे विडंबनकाव्य.
मूळ गाणं : कधी तू....
चित्रपट : मुंबई पुणे मुंबई
कधी तू.... स्टियरिंगवर बसण्याच्या क्षणात
कधी तू.... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात
कधी तू.... रस्ता एक स्ट्रेट, आपलं जणु जेट
स्पीडोमीटर वर एकशेसाठ
टर्न अप द स्टिरियो, रोल डाउन द विंडो
वेगाची मस्ती चाखण्यात
कधी तू... वळणावळणाचा एक घाट
कधी तू... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात
कधी तू... हॅचबॅकसारखी वळणारी, सेडानसारखी पळणारी,
क्रॉसओव्हरच्या त्या मिश्रणात
कधी तू... एसयुव्हीच्या त्या दिमाखात
कधी तू... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात
कधी तू... मर्सिडिजची चांदणी, बीएमडब्ल्यू ग्रिल किडनी,
किंवा औडीच्या बांगड्यांत
कधी तू... पोर्शाच्या मोठ्या त्या दिव्यांत
कधी तू... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात
कधी तू... पेट्रोलसारखी रिफाइन्ड, लिनियर आणि अलाइन्ड,
लोण्यापेक्षाही स्मूथ बात
कधी तू... डिज़लच्या रांगड्या टॉरकात
कधी तू... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात
कधी तू... लेदर सीटा मखमाली, चिल्ड चिल्ड एसी वाली,
बाहेर गरम अन थंड आत
कधी तू... कन्व्हर्टिबलची हवा खात
कधी तू... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात
कधी तू... रेसट्रॅकची अवचित वारी, रेड रेड हॉट फरारी
स्पोर्ट्सकारचा रोअर ऐकण्यात
कधी तू... फोरव्हीलड्राइव्ह त्या खडकांत
कधी तू... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात
कधी तू... डोळे चोळत उठूनि, शँपू नि पॉलिश घेऊनि
प्रेमाने गाडी ती धुण्यात
कधी तू... बघणा-यांच्या त्या जळण्यात
कधी तू... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात
कधी तू... दूरवर पसरला रस्ता, डेस्टिनेशन माहीत नसता,
वाटेल तिथे जात राहण्यात
कधी तू... स्वतः स्वतःला शोधण्यात
कधी तू... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात
कधी तू.... स्टियरिंगवर बसण्याच्या क्षणात
कधी तू.... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात
- अपूर्व ओक
प्रतिक्रिया
26 Nov 2014 - 3:43 pm | निखळानंद
मस्तच !
28 Nov 2014 - 8:33 am | आगाऊ म्हादया......
जमलंय...ऑडी च्या बांगड्यात...वाह वाह वाह.!
28 Nov 2014 - 9:07 pm | सूड
>>औडीच्या बांगड्यांत
हल्ली बांगडे पण द्यायला लागले ऑडीवाले?? *scratch_one-s_head*
1 Dec 2014 - 2:30 am | मुक्त विहारि
छान छान
1 Dec 2014 - 6:26 pm | Targat Porga
जाम आवडलं .
1 Dec 2014 - 11:18 pm | वेल्लाभट
सगळ्यांचे :)