माझी कविता

दोन भिकारी भीक मागती, पुलाखाली करिती वस्ती

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
21 Apr 2018 - 7:27 pm

दोन भिकारी भीक मागती

पुलाखाली करिती वस्ती

नेहेमी नेहेमी करुन याचना

भुलवी फसवी पांथस्थांना

एके दिवशी सांज वेळी

अशीच होती रीती झोळी

कोसुनी त्या चंद्रमौळी

करिती याचना भरण्या झोळी

धूर प्रकटला, डोळे दिपले

शिवशंभोने दर्शन दिधले

दोघांसी तीन अंडे दिले

इच्छा धरुनी फोड तयासी

इप्सित मिळेल त्वरित तुम्हांसी

दोघेही ते खुश जाहले

परतीच्या प्रवासा निघाले

दोघांच्याही दोन वेगळ्या वाटा

जाण्यापूर्वी गळाभेटा

वर्षानंतर भेटू पुन्हा आपण

देऊ यथेच्छ एकमेका आलिंगन

अविश्वसनीयइशाराकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडछावाजिलबीमाझी कवितामार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कविताधोरणमांडणी

हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
18 Apr 2018 - 12:00 pm

तिच्या आवडीनिवडीसाठीच

मी मैत्रीलाच गहाण ठेवलं

ते बोलावयाचे नेहेमी मजला

यायला सांगायचे नाक्यावर

एकही धड वाटत नव्हता तिला

एकेकाचं हळूहळू शिरकाण करून टाकलं

शिकाऱ्यावानी माग काढत होती माझा

नजरेत असावं म्हणून समोरच मचाण बांधून टाकलं

त्यांना खबर पोहोचताच याची

सुटकेसाठी त्यांनी जीवाचं रान करून टाकलं

लग्नाआधीच तिच्याविरुद्ध माझं कान भरून टाकलं

चंडी रूप धारण करून मग तिनं

सर्वांचंच पायताण करून टाकलं

प्रत्येक चीअर्सबरोबर एकेक थेम्ब सर्वानी ओवाळून टाकला

माझी कवितामार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कविताधोरण

सगळीकडे सारखेच

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
17 Apr 2018 - 11:55 am

सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला
मैदानावर जमल्यावरच्या गप्पा

ते यूपी बिहारवाले लै भुरटे
विश्वास न ठेवण्याच्या लायकीचे

दिल्ली हरयाणावाले तर आगाव
एकजात सगळे माजोरडे साले

गुजराती मारवाडी तर काय
लुटायलाच बसलेत सारे

चांगले वाटतात बाहेरून पण हे
मल्लू मद्राशी पक्के आतल्या गाठीचे

आसामी बंगाली पण त्यातलेच
गोड बोलून गंडा बांधणारे

दुपारी जेवल्यानंतर टपरीवर जमलो
चहा बिडीकाडी करत बोलू लागलो

धुळे जळगाव खानदेशवाले अमुक
हे नागपूर विदर्भवाले तमुक

कविता माझीमाझी कविताकविता

लेक...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
2 Apr 2018 - 9:38 pm

सोनसावळी स्वप्ने सगळी सुखेच लेवुन आली
सोनपावले कुणा परीची हळुच उमटली दारी

कुणी रेखिल्या त्या गालावर मोरपिसांच्या ओळी
गाल गोबरे, गोड गुलाबी राजकुमारी प्यारी

नाजुक काया प्राजक्तासम कुरळे कुंतल भाळी
अप्सरा कुणी, शापभ्रष्ट ती मदनशराची स्वारी

लेक असावी एक गोडशी नको धनाच्या राशी
कुशीत घेवुन तिज सांगावी रोज कहाणी न्यारी

हातात तिचे बोट कर्दळी जबाबदारी खाशी
कोण परी ही? वळता नजरा, सुख वाटावे भारी

तिने रुसावे, रुसुन बसावे, कासाविस मी व्हावे
डोळ्यात तिच्या मला दिसावी माझी सौख्ये सारी

माझी कविताशांतरसकविता

गणपत वाणी, सतत मागणी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
2 Apr 2018 - 5:58 pm

गणपत वाणी, सतत मागणी.

विड्या ओढून थकलेला गणपत वाणी
कवितेच्या छपराखाली
अलंकार गोळा करताना मला दिसला.

म्हणाला,
'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता
कोण कवी वापरतो?
तसा एखाद दुसरा हौशी असतो
नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?'

त्याला एकदा मालक म्हन्ले,
'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही
काव्यापेक्षा कवित्व जड
आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात
कवितेला हाणून पाडतात.
गणप्या, आता तुझं काम एकच,
अलंकार काढायचे, अन
कविता वाळत टाकायची.'

'मग काय होईल मालक?'

अदभूतअनर्थशास्त्रकविता माझीकाणकोणकालगंगामाझी कवितामुक्त कवितावाङ्मयशेतीमांडणीसंस्कृतीवाङ्मयकवितामुक्तकभाषाशब्दार्थसाहित्यिकसमाजप्रवास

अपहरण

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
16 Mar 2018 - 8:10 am

सूत्रांनी गुणांच्या कट काय केले
नी बंदीगृहांच्या प्रवासास सुरवात काय झाली
स्वतःचेच अपहरण करण्याची दिवा स्वप्ने पहात
सतत अपहरणातूनच तर पुढे सरकतोय .

अपहरणकर्ते फक्त बदलत जातात
अनेकदा अनुमती शिवाय ,
अनेकदा हातातन निसटणार्‍या अनुमतीने

अपहरणांच्या घटनांचे
हे आत्मचरीत्र
अद्याप बाकी आहे,
वाढवेन म्हणतोय
उसंत मिळेल तसे तसे
नव नव्या अपहरणकर्त्यांची
तेवढीच सोय

जुन्या अपहरणकर्त्यांना
जरासा दिलासा

प्रेर्ना

फ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताकवितामुक्तक

निरगाठ गहनाची

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
14 Mar 2018 - 4:57 pm

दिशा, मिति, कालगति
जिथे सापेक्ष उरती
तिथे स्थिर, अविनाशी
शोधण्यात श्रमू किती ?

कार्य-कारण नियम
थिटा पडतो कशाने?
निरगाठ गहनाची
उकलेल का प्रज्ञेने ?

अंध:कार अज्ञाताचा
कधी वाट उजळेल?
मृगतृष्णा जिज्ञासेची
कोण, कधी शमवेल?

गुंता जटिल, कठिण
कधी सुटेल की नाही?
जड-चैतन्यामधली
सीमा धूसरून जाई

माझी कवितामुक्तक

प्रेम रंग

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
12 Mar 2018 - 12:36 am

प्रेम रंग ही कविता  प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू  शकता.

प्रेम रंग

रंगते मी नेहमीच
तुझ्या रंगांमध्ये
हसते मी नेहमीच
तुझ्या हसण्यामध्ये

खरंच खूप सोपी नसत
दुसऱ्यान मध्ये रंगण
तुझ्या साठी केलंय मी
माझं सोपी जगणं

तुझ्या माझ्यातले रंग
अशेच नेहमी उमलु दे
तुझ माझ प्रेम
कायमच मनी बहरूदे

रंगताना मला तुझी
साथ असुदे
चुकली जरी वाट माझी
तरी हाथी हाथ असुदे....

कविता माझीप्रेम कवितामाझी कविताकविताप्रेमकाव्य

नव्या वादळी नाव हाकारतो

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
25 Feb 2018 - 11:39 am

कुठे भेदूनि दाट अभ्रांस थोडा
फिका चंद्र क्षणमात्र तेजाळतो
निळी पेटती रेष रेखीत गगनी
अनामिक उल्केस बोलावितो

भणाणून आवर्त झोंबे शिडांसी
सुकाणू दिशाहीन कैसे फिरे
पुन्हा का अकस्मात तारा खुणेचा
कुणाला न ठाऊक कोठे विरे

जिभा अंध:कारास फुटती हजारो
तशी गाज ह्या सागराची उठे
रोरावती मत्त लाटा अनादि
किनाऱ्यावरी गर्व त्यांचा फिटे

उद्याच्या उषेचीच आता प्रतीक्षा
उद्याच्याच सूर्यास मी जाणतो
तमाची तमा नाही आता जराही
नव्या वादळी नाव हाकारतो

माझी कविताकविता

मातृभाषा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
22 Feb 2018 - 12:19 am

तू
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
हळूहळू लिहित जातोस,
तेव्हा
मी तुझे
राजस हात
लोभस डोळे
पहात राहते.

तुझ्यात इतका जीव का गुंतावा?

तू माझ्या हातांचे
देवनागरी चुंबन
घेऊन म्हणावे,
मातृभाषा कि काय
तिच्यातच जीव अडकतो बघ,
आई गंssss म्हटल्याशिवाय
प्राणसुद्धा जात नाही....

शाईचे बोट धरुन
तू परत रात्रीच्या
शांतप्रहरी
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
तुझेमाझे हितगुज
हळूहळू लिहित राहतोस...

कविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविताधोरणमांडणीसंस्कृतीवाङ्मयकविताभाषासाहित्यिकसमाज