एकदा टारझन अंगात आला

Primary tabs

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
24 Apr 2018 - 1:09 pm

एकदा टारझन अंगात आला

काढून टाकले कपडे सर्व

पायपुसण्याचा लंगोट केला

अन जंगल प्रवास सुरु झाला

कुणीही ओळखू नये

म्हणून हेल्मेट घातले

बाहेर येताक्षणी घराच्या

भरपूर सारे कुत्रे मागे लागले

वाट मिळेल तिकडे धावत सुटलो

पारंब्या अन वेली शोधू लागलो

नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून

उड्या मारू लागलो

आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता

कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता

स्टेमिनापण संपत आला होता

टारझन अंगातून कधीच निघून गेला होता

लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता

पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये

जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट

टारझन बनण्याच्या नादात

पुरता झालो होतो चेकमेट

सिद्धेश्वर विलास पाटणकर

अविश्वसनीयकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडचिकनजिलबीमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितामांडणीविनोद

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Apr 2018 - 1:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

कसं सुच्तं राव तुम्हाला ?
रोजच्या स्वप्नात येणार्‍या गोष्टींवर सकाळी कविता लिहिता काय ?

खिलजि's picture

24 Apr 2018 - 1:33 pm | खिलजि

धन्यवाद मेहेंदळे साहेब . या कल्पनेला अभिप्रायाचा प्रसाद दिल्याबद्दल

सिद्धेश्वर विलास पाटणकर

श्वेता२४'s picture

24 Apr 2018 - 1:34 pm | श्वेता२४

मला पण हाच प्रश्न पडलाय. (: )

जेम्स वांड's picture

24 Apr 2018 - 1:49 pm | जेम्स वांड

टमरेल प्रहरी सुचलेली कविता (?) का?

बिटाकाका's picture

24 Apr 2018 - 1:58 pm | बिटाकाका

पोट दुखायला लागलं हसून हसून! कमल आहे बुआ कल्पनाशक्तीची!

बिटाकाका's picture

24 Apr 2018 - 1:59 pm | बिटाकाका

कमल नाही कै, कमाल, कमाल!

mayu4u's picture

26 Apr 2018 - 10:35 am | mayu4u

२०१९ मध्ये पुन्हा उमलणार आहेच!

माहितगार's picture

24 Apr 2018 - 2:54 pm | माहितगार

अवघड आहे :))

हेल्मेट घालून गाड्या वेड्यावाकड्या चालवनार्‍यांनो ; टारझ्न किंवा ते जमले नाहीतर तशी कविता करणारे खिल्जी ही कदाचित तुमच्याही अंगात येऊ शकतील , सावधान :)

मला उगिच णिंबाळकराच्या टार्‍याचि आटवन आली. म्हनलं हे कस काय ह्येंच्या अंगात आलं.

असो. वाचाल तर लिहाल . सत श्री अकाल.

............
टारेश्वर झालास मटणकर

जेम्स वांड's picture

24 Apr 2018 - 3:12 pm | जेम्स वांड

आजकाल स्वतःच्या अंगात मावत नाही म्हणे, ह्यांच्या अंगात काय मावणार, परत अंगात आला अन ह्यांनी ह्यांच्याच त्या दोन भिकारी कवितेप्रमाणे काही केले तर त्याची वाईट लागेल, वाट म्हणतोय मी!.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Apr 2018 - 9:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मलापण तोच टारझण आटवला... :P :P

लै आटवू नकोस, चारजण चा एकजण होईल.

श्वेता२४'s picture

24 Apr 2018 - 3:27 pm | श्वेता२४

ट्रॅफीक पोलिसांनी शिक्षा म्हणून वेड्यावाकड्या बाईक चालवणाऱ्यांच्या अंगावर या टारझनला सोडावे म्हणजे त्यांना कळेल सामान्य माणसाचे दुख

अनन्त्_यात्री's picture

24 Apr 2018 - 3:36 pm | अनन्त्_यात्री

सांप्रत उमललेल्या इतक्या _चाट काव्यप्रतिभेने दिपून काही वाचकांस तोंडात _ट घालावेसे वाटत असेल काय?

अभिजीत अवलिया's picture

24 Apr 2018 - 10:48 pm | अभिजीत अवलिया

नक्कीच.
'कविता करणे हे केवळ प्रतिभावान लोकांचे काम' हा माझा आतापर्यंतचा समज खिलजिंनी दूर पॅसिफिक महासागरात नेऊन बुडवला.

सही —>
आयुष्यात एक चारोळी लिहीणे देखील न जमलेला एक अभियंता

कंजूस's picture

24 Apr 2018 - 9:19 pm | कंजूस

बालगीत आहे.
चॅाकलेटचा बंगला असतो, बसवर उड्या मारणारा रितिक असतो तर हेल्मेटवाला टालझन का नसावा?

जव्हेरगंज's picture

24 Apr 2018 - 10:23 pm | जव्हेरगंज

=))

दुर्गविहारी's picture

24 Apr 2018 - 10:40 pm | दुर्गविहारी

आवरा ! ;-)

चित्रगुप्त's picture

25 Apr 2018 - 12:39 am | चित्रगुप्त

चित्रकराने एकादी कल्पना सुचताच पटकन एकादे स्केच करावे तसे हे शीघ्र-काव्य आहे. यात अ‍ॅक्युरेटत्व, बारकावे, तपशील, थोर विचार असले काही नसण्यातच त्याची गंमत आहे. जियो खिलजी और हमारी तरफसे ये तोहफा कुबूल करो:

...

...

...

...

खिलजि's picture

25 Apr 2018 - 6:16 pm | खिलजि

तोहफा कबुल हय आणि अच्छा भी हय . चित्रगुप्त साहेब

सिद्धेश्वर विलास पाटणकर

मार्कस ऑरेलियस's picture

25 Apr 2018 - 1:06 am | मार्कस ऑरेलियस

लहानपणी आम्ही टारझन चित्रपट पाहिला होता , त्याचा अठवणी जाग्या झाल्या ! आजही पुलाखालुन इतके पाणी वाहुन गेल्यानंतरही टारझन हाच आमचा आवडता नंबर एक चित्रपट आहे . स्ट्ग्नेटीचा बदला हा त्या खालोखालचा आवडता चित्रपट म्हणता येईल पण त्यालाही टारझन ची तोड नाही ! ;)

mayu4u's picture

26 Apr 2018 - 10:36 am | mayu4u

याचा आधीचा भाग "सागरी लुटारू" हा पण चांगला आहे ;)

चित्रगुप्त's picture

25 Apr 2018 - 2:24 am | चित्रगुप्त

@मार्कसपंत,

लहानपणी आम्ही टारझन चित्रपट पाहिला होता

हा नेमका कोणता चित्रपट होता ? साधारणतः कोणत्या सालचा असावा ? टारझनची भूमिका कुणी केली असावी ?
(कदाचित जॉनी वेसमुल्लर किंवा गॉर्डन स्कॉट असेल)

.
(टारझन च्या भूमिकेत गॉर्डन स्कॉट : पुस्तकाचे मुखपृष्ठ)

माझ्या लहानपणी वरील चित्र कव्हरवर असलेले इंग्रजी पुस्तक एका दुकानात शोकेस मधे ठेवलेले होते. माझा मोठा भाऊ कॉलेजला जाता-येताना त्या दुकानासमोर सायकल थांबवून बराच वेळ ते चित्र बघत उभा रहायचा, पण ते विकत घेण्याची ऐपत नव्हती. शेवटी एकदा हिम्मत करून त्याने दुकानदाराला विचारले की पुस्तकाचे फक्त कव्हर मला हवे आहे, ते केवढ्याला देशील ? तर दुकानदाराने लगेचच ते कव्हर काढून भावाला विनामूल्य दिले. आम्हा सगळ्या भावंडांना खूपच आनंद झाला. फ्रेम करण्याएवढेही पैसे तेंव्हा नसत, मग भावाने खोक्याच्या फळ्या कापून, घासून , रंगवून स्वतःच फ्रेम बनवली. ते चित्र बरीच वर्षे आमच्या घरात होते. आज जालावर हे चित्र मिळालेले बघून खूप आनंद झाला आणि या सर्व आठवणी जाग्या झाल्या.

मार्कस ऑरेलियस's picture

25 Apr 2018 - 7:28 am | मार्कस ऑरेलियस

हा नेमका कोणता चित्रपट होता ? साधारणतः कोणत्या सालचा असावा ? टारझनची भूमिका कुणी केली असावी ?
>> हा हा हा . तेव्हा काहीही नोटीस केले नव्हते , कारण घाबरत घाबरत पाहिलेला पहिला चित्रपट ;)
1

असो आता आठवण आलीच आहे तर शोधणे आणि परत पहाणे आले ;) =))

प्रचेतस's picture

25 Apr 2018 - 9:36 am | प्रचेतस

तुम्ही म्हणताय तो टारझन चित्रपट एकेकाळी लैच पापिलवार होता. तो चित्रपट म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईतच होता.

मार्कस ऑरेलियस's picture

25 Apr 2018 - 10:45 am | मार्कस ऑरेलियस

आत्ताच परत पाहिला ! इथे पहाणे लीगल आहे ; #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा

अप्रतिम आहे ! बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ;) सगळे केलेले जुगाड आणि सेटिंग्स आठवले , त्यात काही तरि वेगळे थ्रिल होते ! आता म्हणाजे सगळे नुसत्या क्लिक च्या अंतरावर आहे , ते थ्रिल कुठे तरी हरवली ह्या इन्टरनेटच्या युगात !
त्या चित्रपटात कसे शेवटी टारझन शहरी जीवनाला , त्यातल्या "धकाधकीच्या" "धावपळीच्या" जीवनाला कंटुनुन शेवटी कपडे फाडुन परत जंगलात निघुन जातो , तसे काहीतरी करायची सोय असली पाहिजे ! ख्या ख्या ख्या !

असो.

प्रचेतस's picture

25 Apr 2018 - 1:27 pm | प्रचेतस

लीगल असलेले पाहण्यापेक्षा इल्लीगल असलेले पाहण्यातच जास्त मजा होती असे नै वाटत का तुम्हास मार्कस सर?

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 2:25 pm | जेम्स वांड

तुम्ही आज लैच कंदारिया महादेव मंदिर संकुल मूड मध्ये दिसताय प्रचेतस भाऊ

Big Teeth

प्रचेतस's picture

25 Apr 2018 - 2:58 pm | प्रचेतस

जुन्या आठवणी हो, बाकी कै नै =))

तेव्हा एक्सेस कठीण असल्यानं ध्येयप्राप्तीचा आनंद अधिक असायचा!

आदूबाळ's picture

27 Apr 2018 - 2:13 pm | आदूबाळ

त्या चित्रपटात कसे शेवटी टारझन शहरी जीवनाला ...

शेवटपर्यंत पाहिला आणि कथावस्तू लक्षात ठेवली या ध्येयनिष्ठेची कमाल आहे! भार्ताला आज तुमच्यासारख्याच नऊ जवानांची गरज आहे. सलाम.

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 9:49 am | जेम्स वांड

मार्कसपंतांसी बहुतेक हेमंत बिरजे अन किमी काटकर असलेला ऍडव्हेंचर्स ऑफ टारझन सिनेमा
अभिप्रेत असावा, कालानुरूप बऱ्यापैकी गरम दृष्ये असलेला हा सिनेमा पोरांना चोरुनमारुनच पहावा लागे.

.

प्रचेतस's picture

25 Apr 2018 - 9:54 am | प्रचेतस

तो हा नव्हेच :)

जेम्स वांड's picture

25 Apr 2018 - 10:25 am | जेम्स वांड

फक्त फट म्हणता सायलेंट (संपादक) अटॅक येऊन आयडी उडू नये म्हणून हा 'मध्यमार्ग प्रतिपाद' शिनुमा चिकटवलाय इथे, त्यो पिच्चर अन त्यातले कलाकार (!) नीट ठाऊक आहेत

Happy wink

प्रचेतस's picture

25 Apr 2018 - 10:48 am | प्रचेतस

=))

अभिजीत अवलिया's picture

27 Apr 2018 - 7:31 pm | अभिजीत अवलिया

शेवटपर्यंत कुणीही टारझनच्या 'त्या' चित्रपटाचे नाव सांगितले नाही.

कंजूस's picture

25 Apr 2018 - 7:20 am | कंजूस

कवर श्टुरी झकास!!

जंगलात प्राण्यांनी वाढवलेली मुलंमुली इंग्रजी च कसे बोलतात? शकु (शकुंतला) इंग्रजी बोलायची का टकाटक/फाडफाड/कूल?

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 8:17 am | मार्मिक गोडसे

पारंब्या अन वेली शोधू लागलो
अख्ख्या शहरात पसरलेल्या केबलच्या जाळ्याची एकही केबल दिसली नाही का टारझनला ? केबल पकडून प्रत्येक घराघरात पोचला असता 3D अवतारात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Apr 2018 - 12:50 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रतिसाद वाचायला परत परत या धाग्यावर फेरी मरुन जातोय :)

त्य निमित्ताने बर्‍याच लोकांच्य बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या हेही छानच

खिलजि's picture

25 Apr 2018 - 6:17 pm | खिलजि

सर्व रसिकांचे/वाचकांचे/प्रसादकांचे मनापासून आभार

सिद्धेश्वर विलास पाटणकर

manguu@mail.com's picture

25 Apr 2018 - 8:07 pm | manguu@mail.com

छान.

manguu@mail.com's picture

25 Apr 2018 - 8:07 pm | manguu@mail.com

छान.

चित्रगुप्त's picture

25 Apr 2018 - 10:08 pm | चित्रगुप्त

अरे काय लावलंय काय हे, आँ ?? ....'घाबरत घाबरत पाहिलेला पहिला चित्रपट काय, लैच पापी-लवार तरुणाईच्या गळ्यातील ताईतच" काय, कंदारिया महादेव मंदिर संकुल मूड काय, पोरांना चोरुनमारुनच पहावा लागणे काय, त्यो पिच्चर अन त्यातले कलाकार (!) नीट ठाऊक असणे काय, असले कंपूबाहेरच्या जन्तेला अगम्य प्रतिसाद....??
आम्ही आपले सज्जनपणाने जॉनी वेसमुल्लर का गॉर्डन स्कॉट असे विचारले, त्यावर एवढा शिमगा? आम्हाला मार्कस ओरालियस म्हणजे 'मार-कंस, उरेल यश' असे काहीतरी सात्विक,पौराणिक, मराठमोळे वाटत होते, पण आता ते 'मार-कश, ओरल यस' असे बेंगरूळ हिंग्लीश आहे की काय, असे वाटू लागले आहे.
तेंव्हा आतातरी कुणीतरी 'त्या' टारझनपटाचे नाव सांगा बरे.

मार्कस ऑरेलियस's picture

26 Apr 2018 - 2:07 am | मार्कस ऑरेलियस

आतातरी कुणीतरी 'त्या' टारझनपटाचे नाव सांगा बरे.

Tarzan - Shame of Jane १९९४
टारझन च्या भुमिकेत रोक्को सिफ्रेदी आणि जेन च्या भुमिकेत रोसा कॅरास्सिओलो !!

जेम्स वांड's picture

26 Apr 2018 - 8:29 am | जेम्स वांड

हे हे हे हे हे हे, रोजा म्हणजे काय हे आपलं ते हे हे हे हे हे हे हे

Blushing

नाखु's picture

25 Apr 2018 - 10:44 pm | नाखु

टारझन महाशयांनी लक्ष्मी रस्त्यावर चक्कर मारली असती तर नवीन कपड्यांचा वापर करता आला असता

अखिल मिपा विविध भारती "बाळाराम मार्केट"मधुमालती कार्येक्रम श्रोते संघ सामान्य सदस्य नाखु

चांदणे संदीप's picture

26 Apr 2018 - 12:28 am | चांदणे संदीप

अय्या टारझन! तो पण बाळाराम मार्केटमध्ये!
"सुटाकाना, शर्टाकाना, सफारीकाना!

लोल! =))

Sandy

माहितगार's picture

26 Apr 2018 - 4:12 pm | माहितगार

बाकी सर्व ठिक - अभिव्यक्ती स्वातंत्र्य योग्यच हो मंडळी , पण कविता (धागा लेखातलीच ) कविता म्हणून कशी वाटली ? ते भाबड्या कवि महोदयांना कुणि मोकळेपणाने सांगाल की नाही .

उपाशी बोका's picture

27 Apr 2018 - 7:59 pm | उपाशी बोका

छान आहे, पण मोकलाया जास्त आवडते. :P

गामा पैलवान's picture

27 Apr 2018 - 2:50 am | गामा पैलवान

चेहरा हेल्मेटने झाकलेला आहे. मग लंगोट सुटला तरी हरकत नाही. लाज चेहऱ्यावर असते.

-गा.पै.

मला उगिच णिंबाळकराच्या टार्‍याचि आटवन आली. म्हनलं हे कस काय ह्येंच्या अंगात आलं.
हा.हा. हा... अगदी णाही णाही ते आठवले ! तो असाता तर या धाग्यात टारझनचं झाकलेलं केळं म्हणुन त्याने फोटो सकट प्रतिसादात दिला असता ! :प

बाकी या धाग्यात ज्या काही टारझन अवतारांचा उल्लेख झाला आहे त्यातले दोन टारझनपट पाहिले आहेत. ;) मला काटकरां ची किमीला जेन म्हणुन पाहिल्यावर त्या टारझानच्या भाग्योदयाचा हेवा वाटला होता ! आम्ही साले शहरात राहुन पाप करतोय... असे त्याकाळी वाटले होते !

आता दुसरा टारझन... तो सुद्धा त्याकाळी बराच फेमस होता ! जेन सारखी "कोवळी काकडी" चक्क जंगलात मिळाली तर फेमस होणारच ना ? जंगलात लॉटरी लागणे याचा प्रत्यय त्याला आला असावा !

बा द वे टारझनचा अ‍ॅनाकोंडा हा नविन भाग आला आहे हे हल्लीच कळाले आहे ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maska Teaser | Marathi Movie | 1 June

समाधान राऊत's picture

5 May 2018 - 7:39 pm | समाधान राऊत

नाही आवडली.... कविता वैगेरे...

खिलजि's picture

7 May 2018 - 1:44 pm | खिलजि

कधीतरी आवडेल एखादी कल्पना .. तोपर्यंत वाचत राहा हि नम्र विनन्ती

सिद्धेश्वर विलास पाटणकर

अक्षय कापडी's picture

7 May 2018 - 6:46 pm | अक्षय कापडी

परसाकडे जाउन पाडुन आलात ना एक नवी कविता वाटलंच होतं मला

खिलजि's picture

7 May 2018 - 7:24 pm | खिलजि

अरे यार , अक्षरशः कार्टून आहेस तू . एक सांगू तुला , तुझा हा अल्लडपणा मला खूप आवडला पण जरा दमाने घे . इथे तिथे असाच मुक्त फिरू नकोस . नाहीतर पुनर्जन्म घ्यावा लागेल (माझ्यासारखा ), नव्या आय डी सह . मला चालतील तू असे अभिप्राय दिलेस तर मी नेहेमी हलकेच घेईन पण कदाचित इतर कुणाला आवडेल ना आवडेल सांगता येणार नाही .

सिद्धेश्वर