मेघ बरसला
मेघ बरसला
विरही अश्रूंचा
खारा खारा.
मेघ बरसला
प्रथम आषाढी
प्रिय वार्तेचा.
मेघ बरसला
माळात रानात
काळा काळा.
मेघ बरसला
भिजली धरणी
हिरवी हिरवी.
मेघ बरसला
विरही अश्रूंचा
खारा खारा.
मेघ बरसला
प्रथम आषाढी
प्रिय वार्तेचा.
मेघ बरसला
माळात रानात
काळा काळा.
मेघ बरसला
भिजली धरणी
हिरवी हिरवी.
प्रहर चालला तो दुपारचा
त्यातून घन आलेले दाटून
दमट जराशी हवा पसरली
लपाछपी खेळतसे ऊन
दूर कुठे तो बसून रावा
घालीत होता किर किर शीळ
उदास होते आयुष्य झाले
सरता सरेना आजची वेळ
अशाच वेळी बसून एकटा
हळूच असे तो निरखत तिजला
एक भेंडोळे एक लेखणी
होता हाती घेऊन बसला
काही अंतरावर ती होती
घागर बुडवीत पाण्यामध्ये
रेखीव काया लवचिक बांधा
वर्ण गोमटा कपडे साधे
तिला ना होती जाणीव त्याची
गुणगुणतसे आपल्या तंद्रीत
आडोशास तो बसला होता
काही खोडीत काही लिहीत
खरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते
भितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये
क्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते
हरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण
हवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते
सारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा
तुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते
तू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही
काय करू मी? हाय! तुझ्याहून याद तुझी कस्तुरी वाटते
सखे आज तू मला तुझे नि गगनाचे या नाते सांग
कशी तुझ्यासोबत असताना , सांज अजून सिंदूरी वाटते
बांडगूळं आधीही दिसायची…
पण, ती रानात.
राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर…
....जुन्या खोडांवर.
आता मात्र ती दिसतात
अगदी कुठेही…
म्हणजे...
रोपांवर वगैरे.
इथपर चाललं असतं
पण आता ती
यायला लागलीत
तणांवर..
माजलेल्या…
…विचारांच्या तणांवर!
संदीप चांदणे (११/६/२०१८)
मोरांपासून बेडकांपर्यंत सारे आकाशाकडे डोळे लावून बसलेयत
तुझ्या वर्षावात चिंब व्हायला
अभिजात कवींपासून र ट फ शब्दजुळार्यांपर्यंत सगळे टपलेयत तुझी रिमझिम अन् आपापल्या उबळी
शब्दात कोंबायला
बकाल महानगरातली पाताळधुंडी माणूसगिळी मॅनहोलं कचरतायत
तुझ्या ढगफुटीत तुंबायला.
यंदा तरी भरभरून येशील?
बघ, तुझ्या आशेवर तर पार भेगाळलेला शेतकरी तयार आहे पुढच्या दुष्काळापर्यंत
आत्महत्या लांबवायला.
अनोळखी वाट घनदाट वनी मला नेते
निब्बरल्या तनामना नितळ सावली देते
हिरव्या रंगाच्या छटा पानोपानी अगणित
सळसळ लहरते वार्यासंगे अविरत
विजनात दूरवर घुमतसे घुघुत्कार
पसरती अंधाराचे पडसाद रानभर
पाखरांनो घरट्यात पिले हळूच जोजवा
लखलख काजव्यांचा झाडाझाडावर दिवा
दुःखाच्या डोहामधुनी
करुणेची येते गाज
कुठलेसे पान तरंगत
लहरींना देते व्याज
कलतात उन्हे सोनेरी
रंगांची उधळत माया
डोहावर पसरत जाती
वृक्षांच्या काजळ छाया
ती काठावरती बसते
बुडवून स्वतःचे पाय
अन् हा हा म्हणता येते
पाण्यावर मोहक साय
मी 'कविता',वाचत असता
ती शांतच असते बहुधा
जणु चंद्रसरींनी भिजते
नित-निळी सावळी वसुधा!
—सत्यजित
लाल करा ओ , माझी लाल करा
येता जाता लाल करा
पुसा मला तुम्ही येता जाता
पुसूनि पुरते हाल करा ,
लाल करा ओ लाल करा
येता जाता लाल करा
भजा मज तुम्ही भाई दादा
तुमचाच राहीन , हा पक्का वादा
गॉड बोलुनी बेहाल करा
लाल करा ओ माझी लाल करा
येता जाता लाल करा
समजू नका मज ऐरागैरा
नीट बघून घ्या माझा चेहरा
या गोंडस, लोभस मित्रासाठी
प्रेमाची पखाल करा
लाल करा ओ माझी लाल करा
येता जाता लाल करा
नका कटू कधी बोलत जाऊ
बनेन मग मी शंभू न शाहू
ठोकत राहा
घडत जाईन
बोलत राहा
ऐकत जाईन
येऊन दे मनातले बाहेर सारे
कल्पनेला अनाहूत बळ मिळेल
शब्दपंखानी उडत जाईन
पोहोचेन सत्वर कवींच्या गावा
सुंदर कविता लिहीत जाईन
रांगतोय सध्यातरी असं वाटतेय
हळूहळू तुमच्या जवळ येत जाईन
प्रेमाने प्रेमाला जोडत जाईन
ठोकत राहा असेच
हळूहळू घडत जाईन
शोधत राहा स्वतःमध्ये मला
इथेच पुढे असेन तुमच्यासमोर
जवळ येता जरा , दूर दूर जात राहीन
बनायचंय थंडगार बर्फ़ावानी
माया करा मजवर आपुल्या लेकरावानी
कल्पनेच्या जगात रमतो मी
बाई पलंगावर बसून होती
गुलाबराव मस्त मळत होते
मळता मळता बघत होते
बाईकडं गिधाडावानी
बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे
कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे
मळता मळता थाप मारली
राळ उडालेली नाकात बसली
शिंकेवरती शिंक आली
शिंकण्यातच सारी रात गेली
आवाजाने गावाला जाग आली
बाई जाम उखडली
वाहून शिव्यांची लाखोली
चरफडत चोरपावलांनी निघून गेली
रात बी गेली अन बाई बी
थापा मारण्यातच वेळ गेली
{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}