अनोळखी वाट घनदाट वनी मला नेते
निब्बरल्या तनामना नितळ सावली देते
हिरव्या रंगाच्या छटा पानोपानी अगणित
सळसळ लहरते वार्यासंगे अविरत
विजनात दूरवर घुमतसे घुघुत्कार
पसरती अंधाराचे पडसाद रानभर
पाखरांनो घरट्यात पिले हळूच जोजवा
लखलख काजव्यांचा झाडाझाडावर दिवा