बांडगूळं

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
11 Jun 2018 - 3:13 pm

बांडगूळं आधीही दिसायची…
पण, ती रानात.
राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर…
....जुन्या खोडांवर.
आता मात्र ती दिसतात
अगदी कुठेही…
म्हणजे...
रोपांवर वगैरे.
इथपर चाललं असतं
पण आता ती
यायला लागलीत
तणांवर..
माजलेल्या…
…विचारांच्या तणांवर!

संदीप चांदणे (११/६/२०१८)

माझी कविताकवितामुक्तकसाहित्यिक

प्रतिक्रिया

विशुमित's picture

11 Jun 2018 - 3:57 pm | विशुमित

जबरा..!!
आवडली!

नाखु's picture

11 Jun 2018 - 4:38 pm | नाखु

एकदम बाराच्या भावात (जबरा) कविता

तृणधान्य मूलक नाखु पांढरपेशा

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2018 - 5:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

चपखल !

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2018 - 12:26 am | अत्रुप्त आत्मा

प्लस वण! एकच नंबर!

खिलजि's picture

11 Jun 2018 - 5:39 pm | खिलजि

खरंय मित्रा

बांडगुळ जागोजागी दिसाया लागलंय

लोकांना रानपण कमी पडाया लागलंय

शहरीकरणाच्या नावाखाली कुटुंबाचे तुकडे तुकडे झाले

इतस्ततः सारे रानातच विखुरले गेले

वृक्षाएवढ्या विचारांची(एकत्र कुटुंब पद्धत) हळूहळू रोपे नंतर तण झाले

मोकळे रान नष्ट होऊन बांडगुळासारखे मन झाले

बांडगुळासारखे मन झाले

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रचेतस's picture

11 Jun 2018 - 7:29 pm | प्रचेतस

सुरेख कविता

अनन्त्_यात्री's picture

11 Jun 2018 - 8:00 pm | अनन्त्_यात्री

ऐका पुढल्या हाका..

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jun 2018 - 11:37 am | ज्ञानोबाचे पैजार

ही बांडगुळे बर्‍याच वेळा आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर देखिल उगवतात.
ती उगवली आहेत हे समजणे आणि त्यांना वेळेवर छाटून टाकणे फार महत्वाचे आहे.

पैजारबुवा,

श्वेता२४'s picture

12 Jun 2018 - 2:37 pm | श्वेता२४

मस्तच कविता खूप आवडली

अगदी! अगदी!!

आवडली. मस्तच.

यशोधरा's picture

13 Jun 2018 - 10:52 am | यशोधरा

आवडली...

चौथा कोनाडा's picture

18 Jun 2018 - 8:08 am | चौथा कोनाडा

भारी ! कविता आवडली. कविता बरंच काही सांगुन जातेय, वैयक्तिक, सामाजिक वै.

काढता आली नाहीत तर या बांडगुंळांचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो, हतबलता येते.

चांदणे संदीप's picture

18 Jun 2018 - 9:10 am | चांदणे संदीप

कविता पोचली याचा आनंद आहे!

Sandy

चाणक्य's picture

18 Jun 2018 - 10:53 am | चाणक्य

मार्मिक.

दुर्गविहारी's picture

20 Jun 2018 - 5:39 pm | दुर्गविहारी

मस्तच. अगदी नेमके हाणलयं.