ते दोघे
पानगळीने रेखीव झालेल्या
त्या प्रचंड वृक्षातळी
ते दोघे होते मघामघाशी तर!
मी पाहीले त्यांना
बराच वेळ खाली मान घालून
एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना,
कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना,
अन् तेव्हा रस्ता हसताना...
मी पाहिले त्या दोघांना ,
हात हातात घेताना
'बाहों के बाहर
नजरों से ओझल होना ही
लकिरों पे लिखा है
तो वो लकिरे ही मिटा देते हैं'
त्याने एवढेच म्हणलेले
मला ऐकायला आले
नंतर मला ते दिसले नाहीत...