प्राक्तनवेळा
क्षितिजाच्या पुसती रेषा
अंधार जसा दरवळतो.
काळीज कुणाचे रडते
चंद्र कुणाचा विव्हळतो.
काळाकडे घ्याव्या मागून
त्या हळव्या प्राक्तनवेळा.
विस्मृतीस कराव्या अर्पण
सुगंधी दुःखांच्या माळा.
रंगीत करावे डोळे
श्वासांना यावी भरती.
उगवून पुन्हा जन्मावे
पाऊस पडल्यावरती.
-कौस्तुभ