सूत्रांनी गुणांच्या कट काय केले
नी बंदीगृहांच्या प्रवासास सुरवात काय झाली
स्वतःचेच अपहरण करण्याची दिवा स्वप्ने पहात
सतत अपहरणातूनच तर पुढे सरकतोय .
अपहरणकर्ते फक्त बदलत जातात
अनेकदा अनुमती शिवाय ,
अनेकदा हातातन निसटणार्या अनुमतीने
अपहरणांच्या घटनांचे
हे आत्मचरीत्र
अद्याप बाकी आहे,
वाढवेन म्हणतोय
उसंत मिळेल तसे तसे
नव नव्या अपहरणकर्त्यांची
तेवढीच सोय
जुन्या अपहरणकर्त्यांना
जरासा दिलासा
प्रतिक्रिया
16 Mar 2018 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार
हे पण आवडले पण ....लैच थोडक्यात आटोपली
एखादे खंडकाव्य देखिल होउ शकते यावर....
पैजारबुवा,
16 Mar 2018 - 12:18 pm | माहितगार
अगदीच खंड काव्य नाही पण जराशी वाढवण्याचा विचार नक्कीच आहे, बैठक जुळून यावयास हवी. त्या शिवाय हिच कल्पना घेऊन आणखी एक कविता डोक्यात घोळतेय तीलाही वाट करुन दिली म्हणजे या कवितेचा मार्ग प्रशस्त राहील असे वाटते.