माहिती
ए टी एम केंद्राची सुरक्षितता कुणाची जबाबदारी ?
पार्ल्याच्या श्री. प्रकाश जोशींचे युनियन बँकेच्या पार्ले पूर्व येथील शाखेत खाते आहे. १ मे २०१५ रोजी बँकेच्या ए टी एम केंद्रातून पैसे काढत असतांना एक माणूस आत शिरला. “मदत करू का ?” असे विचारू लागला. श्री. जोशींनी त्याला हटकलं. त्यावर मी सुरक्षा रक्षक आहे असे त्याने सांगितले. त्याचा गणवेष आणि ओळखपत्र कुठे असे विचारता त्याने अजून गणवेष मिळाला नाही असे सांगितले. जोशींनी त्याला बाहेर काढला. पण केंद्राच्या दाराला आतून कडी लावायची सोय नव्हती. पैसे काढून बाहेर आल्यावर २ मिनिटे थांबून इकडे-तिकडे कानोसा घेतला. ‘तो’ माणूस कुठे दिसला नाही.
आंतरजातीय विवाह
काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला.
भारताबाहेरील ऐतिहासिक हिंदू मंदिरे - भाग १
मिपावरील मित्र आणि मैत्रिणींनो,
इंटरनेटमुळे आजकाल कुठल्याही गोष्टीबद्दलची माहिती अगदी सहजपणे उपलब्ध झाली आहे. पण ही माहिती विखुरलेली असते आणि मुख्य म्हणजे ही माहिती इंग्रजीमध्ये असते. अशी माहिती संकलित करून ती मराठीमध्ये मिळाली तर वाचायचा आनंद काही औरच.
भारताबाहेरील काही ऐतिहासिक हिंदू मंदिरांविषयी माहिती संकलित करून (अर्थातच इंटरनेटवर) एक लेखांची मालिका लिहावी असा विचार मनात आला आणि मिपावरील एका मित्राच्या प्रोत्साहनाने थोडे फार लिखाण पूर्ण केले आहे.
याच मालिकेतील पहिला लेख आपल्यापुढे मांडत आहे.
भारतमाता की जय - वारीस पठाण आणि सर्वपक्षीय ठराव
"भारतमाता की जय" चा जयघोष स्वातंत्र्य पुर्व काळापासुन होत आहे. भारतमाता की जय असे म्हणणे स्वातंत्र्यपुर्व काळात देशद्रोहाचे लक्षण असेल तर स्वातंत्र्योत्तर काळात असे न म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे की काय असा चर्चेचा सुर आहे.
(छटाक)
"अरे सम्जता कोण तुम्ही स्वतःला ?" असला प्रश्न तू मिपाकर साहित्यीकांना विचारतोस. अरे असें विचारावं कसं वाटल तुला. फार धाडसी रे बुवा तू.अरे मिसा होणे म्हणजे काय गुट़का खायची गोष्ट वाटली काय तुला? उघडली पुडी लावली तोंडाला. आँ म्हणे काय समजता स्वतःला. अरे बच्चमजी फार कष्ट आणि निर्ढावलेपण आल्याखेरीज होता येणार नाही मिसा तूला.
कोषातून बाहेर (Ice-Breaker)
मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear)
मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting)
मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation)
मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech)
बोट - वादळवारा
नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते?
लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब.
यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी).
बोटीवरील जीवन
जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दिल
माहिती हवी: ६ महिन्याच्या बाळाचा आहार आणि त्याच्या योग्य वेळा
६ महिन्याच्या बाळासाठी कोणता आहार कोणत्या वेळी द्यावा, कृपया मार्गदर्शन करावे
सध्या खालील आहार देत आहोत
बदामाचे वेढे - १ वेळा
भाताची पेज - २ वेळी
डाळीचे पाणी - २ वेळी (भाताच्या पेजे ला पर्याय)
कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.