मुंबई लोकलने प्रवास कसा करावा?
मुंबईची रेल्वे लोकल(उपनगरीय रेल्वे सेवा) हा मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. १६ एप्रिल १८५३ साली पहिल्यांदा भारतातच नव्हे तर आशिया खंडामध्ये सर्वात पहिले रेल्वेची गाडी धावली ती मुंबईतच. तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा रेल्वेचा प्रवास थक्क करणारा आहे. आज जी काही मुंबईची प्रगती झाली,विकास झाला त्यात मुंबईच्या लोकल रेल्वेचा मोठा वाटा आहे. जरा का मुंबईत रेल्वे नसती तर मुंबईची कशी आणि किती प्रगती झाली असती याबाबत शंकाच आहे. मुंबईच्या दळणवळणाचा विचार केल्यास रेल्वेचा प्रवास मुंबईमध्ये अतिशय स्वस्तातला आणि कमी वेळात होणारा आहे.