माहिती
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
ह्या आधी- दीपशिखा
दीपशिखा!
आजपासून शारदीय नवरात्राला सुरूवात होत आहे. घरोघरी घट बसले असतील. आदिशक्तीची आराधना वेगवेगळ्या पध्दतीने केली जाते. कोणी उपास करतात तर कोणी स्त्रीसूक्ताचे पठण करतात. नवरात्रीचा उत्सव हा आदिशक्तीचा, स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. कोमल आणि कणखर अशा स्त्रीत्वाच्या दोन टोकांचा उत्सव आहे. नवरात्रात देवीच्या नऊ रुपांची पूजा करतात. असंही म्हणता येईल की ही नऊ रुपे म्हणजे नऊ वेगवेगळी क्षेत्रे, वेगवेगळी क्षितीजे! आज साहित्य, कला, शास्त्र, खेळ, राजकारण, समाजकारण आदि सर्वच क्षेत्रातला स्त्रियांचा सहभाग नुसताच उल्लेखनीय नाही तर त्या त्या क्षेत्रातले एव्हरेस्ट गाठण्याचा पराक्रमही अनेक सौदामिनी करत आहेत.
पाश्चिमात्य साहित्य
महायुद्ध आणि इतर अनेक युद्धे, संघर्ष, महामंदी अशा अनेक उलथापालथीतून पाश्चिमात्य समाज गेला होता. या पार्श्वभूमीवर डोस्टोव्हस्की, फ्रँझ काफ्का, अल्बर्ट कामू, सार्त्र, अर्नेस्ट हेंमिग्वे, जाॅन स्टाईनबेख, डिकन्स, लाॅरेन्स अशा अनेक पाश्चिमात्य साहित्यिकांनी नीतिमत्ता, कुटुंबव्यवस्था, लैंगिकस्वातंत्र्य यासारख्या जीवनाची अनेक अंगे बघितली होती तसेच यांची स्वत:ची आयुष्य प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळेच त्यांचे साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटते. काही गाजलेली इंग्रजी पुस्तके -
:
१) लस्ट फाॅर लाईफ, आयर्विग स्टोन
मक्केतील उठाव १
११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेवर सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला झाला. त्याचे परिणाम सगळ्या जगावर झाले. तेव्हापासून अमेरिकेत एक वाक्प्रचार बनला आहे अमुक देशाचे ९/११. जसे २६/११ चा मुंबईवरील हल्ला हा भारताचे ९/११, स्पेनमध्ये माद्रिद येथे रेल्वे गाड्यांमध्ये अनेक स्फोट होऊन शेकडो लोक मेले त्याला स्पेनचे ९/११ म्हटले जाते. हाच नियम लावला तर मक्केतील १९७९ साली झालेला उठाव ह्याला सौदी अरेबियाचे ९/११ म्हणता येईल. ह्या घटनेने सौदी राजघराणे मुळापासून हादरले. बंडखोरांचा क्रूरपणे बिमोड केलाच. पण पुन्हा असे होऊ नये म्हणून त्यांनी आपली धोरणे पूर्णपणे बदलली.
मोहिम-ए-संपादक
तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला
झेपेनासे झाले.
नाकासमोर म्हणजेच वळत वळत? हा काय चावटपणा?
आपण नकाशावर जेव्हां भारताहून अमेरिकेकडे जाणार्या विमानांचे मार्ग बघतो तेव्हां आपल्याला एक गोष्ट खटकते. सारे मार्ग वक्राकार दिसतात. यूरोप (ऍटलांटिक) वरून जाणारा मार्ग सारखा डावीकडे वळत वळत गेल्यासारखा दिसतो आणि जपान (पॅसिफिक) वरून गेलेला उजवीकडे. तीच गत बोटींच्या मार्गांची. आकाशात आणि पाण्यात ट्रॅफिक नसतो, तर हे शहाणे सरळसोट का जात नाहीत? हा मुद्दा वेगवेगळ्या वेळेस मिपावर उपस्थित झाला आहे. शिवाय माझ्या व्यनिमध्ये देखील ही विचारणा झाली आहे.
विचारलंत ना? घ्या आता!
इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा
इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा
इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा.
मी इतक्यात अॅड्रुनोचा (अॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच. ज्यांना अॅड्रिनो ची अधिक माहिती हवी आहे त्यांनी इंग्रजी भाषेत येथे वाचावी -
https://www.arduino.cc/
https://en.wikipedia.org/wiki/Arduino
व्हाटसॅप समुह - वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, पुराणे, धार्मिक कथा, सणवार, प्राचीन भारतीय विज्ञान आदि विषयांवर चर्चा या साठी
नमस्कार
ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअॅप समुह
http://www.misalpav.com/node/36333
आणि
सायकल समुह
http://www.misalpav.com/node/33936
असे दोन समुह अतिशय उत्तम रितीने चालले आहेत. दोन्हीकडे विषयाशी संबंधित नसलेले कोणतेही फॉरवर्डस पाठवण्यास बंदी आहेत. आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे!
अनेक सदस्यांनी समुहांच्या शिस्ती विषयी अगत्याने कळवले आहे.
कावेलोसिम - स्वप्नातले गांव
लांऽऽबलचक सुट्टी हि प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याची गोष्ट असते. जर का ती नेमकी हवी त्या वेळी मिळाली तर होणारा आनंद काय वर्णावा, अर्थात हा आनंद फार कमी वेळा वाट्याला येतो म्हणा. सुट्टी घालवायची कशी हा सांप्रतला फार कठीण प्रश्न बनून राहिलेला आहे. 'सुट्टी घालवण्याची ठिकाणे' या बाबतीत प्रत्येकाच्या मनातील कल्पनांची जर का माहिती गोळा करायची ठरवली तर एक अत्यंत रोचक यादी तयार होईल यांत काही शंका नाही. पण खरा प्रश्न उभा राहतो तो इथेचं.