नमस्कार
ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअॅप समुह
http://www.misalpav.com/node/36333
आणि
सायकल समुह
http://www.misalpav.com/node/33936
असे दोन समुह अतिशय उत्तम रितीने चालले आहेत. दोन्हीकडे विषयाशी संबंधित नसलेले कोणतेही फॉरवर्डस पाठवण्यास बंदी आहेत. आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे!
अनेक सदस्यांनी समुहांच्या शिस्ती विषयी अगत्याने कळवले आहे.
या नंतर फक्त धार्मिक तसेच आशावादी विषयाला वाहिलेला समुह तयार केला आहे.
धार्मिक आणि गप्पागोष्टी करणारा समुह असावा अशी कल्पना आहे.
या समुहात धार्मिक, भारतीय अध्यात्मिक चर्चा व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.
याशिवाय वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, पुराणे, धार्मिक कथा, सणवार, प्राचीन भारतीय विज्ञान आदि विषयांवर चर्चा होतील अशी अपेक्षा आहे. प्राचीन भारतीय विचारांचा आढावा त्यांचे श्रेष्ठत्व असे ही विचार यायला प्रत्यवाय नाही.
आपल्याला यात रस असेल तर या समुहात येण्यासाठी
आपले मोबाईल क्रमांक कृपया व्यक्तिगत निरोपातून पाठवावेत.
प्रतिक्रिया
15 Sep 2016 - 2:09 pm | अभ्या..
अर काय हितलं पब्लिक राजरोस तिकडं न्यायला काय?
नवीन ग्रुप काढायला विषय सुचला नाही तर वरची मेनु लिस्ट हाय बघा, त्यानुसार ग्रुप करा.
(अन हळद खेळा असे पण वाचा)
15 Sep 2016 - 2:58 pm | निनाद
तसे नव्हे!
सायकल आणि ज्योतिष दोन्ही समुहांवर शिस्त कसोशीने पाळली जाते.
आणि काही वेळा इतर काहीतरी पाठवायचे तर असते पण पाठवता येत नाही.
इअतर गप्पा मारता येत नाहीत.
तर ती सोय असावी म्हणून हे केले आहे.
मग सोय त्यांनाच का?
सर्वानाच यात येता यावे म्हणून धागाच काढला.
तेव्हा तसा गैरसमज नसावा!
15 Sep 2016 - 3:03 pm | निनाद
भारतीय अध्यात्म किंवा प्राचीन भारतीय विज्ञान असे नाव काढले तरी लोक तुटून पडतात.
अनेकांना पोटशूळ येतो. किंवा मळमळ होऊ लागते.
तसे होऊ नये आणि ज्योतिष समुहाप्रमाणे एक सुरक्षित जागा चर्चा करण्यास असावी अशी धारणा आहे.
15 Sep 2016 - 3:55 pm | प्रभास
अगदी सहमत...
15 Sep 2016 - 3:36 pm | पैसा
एक सुचवते. अशा ग्रुपवर काही चांगली चर्चा झाली तर तिच्याबद्दल मिपावर एक धागा काढ. म्हणजे ज्याना ग्रुपमधे यायचे नाही पण या विषयात रस आहे तेही भाग घेऊ शकतील.
15 Sep 2016 - 4:39 pm | निनाद
हो अगदी असेच करणार!!
15 Sep 2016 - 5:02 pm | अभ्या..
हां, असे काहीतरी करा. शुभेच्छा.
15 Sep 2016 - 9:24 pm | कंजूस
गटचर्चेचा विषय दिल्यावर सहमती विरोधी मत शिस्तीत नोंदवले तर इकडेही शक्य होईल.पण ती शिस्त पाळली पाहिजे.
16 Sep 2016 - 4:52 am | चौकटराजा
अरे बापरे ! आत्मा भारतीय, रशियन असा असतो हे नवीनच आहे मला.
16 Sep 2016 - 5:07 am | साहना
चर्चा फक्त मराठीतूनच होतील का ?
16 Sep 2016 - 6:35 am | निनाद
मराठी मध्ये होईल असे वाटते.. पण सदस्य अमराठी असतील
किंवा इंग्रजी प्रेमी असतील तर तसे!
17 Sep 2016 - 3:17 am | निनाद
सदस्यहो,
प्रतिसादासाठी धन्यवाद!
पण
कोणत्या समूहासाठी मोबाईल देत आहात हे कळवावे. कारण आता 4 समूह झाले आहेत.
ज्योतिष
सायकल,
प्राचीन भारतीय अध्यात्म आणि विज्ञान आणि
वाट्टेल ते.
समूहाचे नाव कळवले नाही तर कसे समजणार कुठे घ्यायचे ते?
तेव्हा नाव कळवा!
धन्यवाद!!
19 Sep 2016 - 4:01 am | निनाद
माझ्या अपेक्षेपक्षा खुपच जोरदार प्रतिसाद या समुहाला आहे
मला वाटले होते दोन चार जण निघतील... :)
याचा अर्थ भारतीय अध्यात्म वेद आणि विज्ञान या विषयात अनेकांना रुची आहे.
तसेच अजून पर्यंत कोणतेही कचरा फॉर्वर्ड नाहीत. फक्त विषयाला धरून चर्चा. सगळे सदस्य अतिशय मर्यादेत राहून सर्वजण नियम पाळून आहेत हे अतिशय स्पृहणिय आहे.
परत एकदा अनेकानेक धन्यवाद!
19 Sep 2016 - 10:22 am | शाम भागवत
निनाद साहेब,
खूप जणांना नामस्मरण,वेद,अध्यात्म,संत चरित्रे यात रस असतो. पण टिंगल होईल म्हणून त्याची वाच्यता कोणी करत नाही इत॑केच. जर टिंगल होणार नाही याची खात्री असेल तर प्रतिसाद चांगला मिळतो. निदान माझे तरी असे निरिक्षण आहे. अगदी मिपावर देखील अनेक अनुभवी लोक अशा प्रकारच्या चर्चात भाग घेत नाहीत. असो. तुम्हाला शुभेच्छा.
19 Sep 2016 - 11:39 am | प्रभास
अगदी सह्मत...
19 Sep 2016 - 11:13 am | कबीरा
भारतीय अध्यात्म वेद आणि विज्ञान हा विषय आत्ताच्या घडीला खरंच अभ्यासण्याची गरज आहे, आणि सध्याची एकंदर जीवनशैली बघता त्याची गरज दिवसेंदिवस वाढणार आहे.
19 Sep 2016 - 10:39 pm | प्रचेतस
अशा विषयांवर चर्चा करणे आवडले असते पण व्हाट्सअप ग्रुप नको वाटतो.