वाट वेगळी तिथेच नक्की झाली
जगात साऱ्या ओळख पक्की झाली
या देशाची खूप तरक्की झाली
हाती मोठे घबाड आल्यावरती
नियत आपली चोरउचक्की झाली
दोन दिशांनी आलो होतो आपण
वाट वेगळी तिथेच नक्की झाली
दाणादाणा जमवीत आली जनता:
पीठ तयाचे,ज्याची चक्की झाली
पाउल माझे तेव्हा चुकले आहे
नजर तुझी जेव्हाही शक्की झाली
डॉ. सुनील अहिरराव