काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला.
शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.
पण मग माझं सिलेक्शन झालं आणि तुम्ही बघताच आहात की अवघा महाराष्ट्र सैराटमय झालाय. पण मग माझं आयुष्य बदललं त्याचं काय ?
तुम्हाला नाही माहित आताशा मला रोज प्रत्येक ठिकाणी शाळेत , शिकवणी, कुठे समारंभ असेल, कुठे उद्घाटन असेल तर माझ्या २ अंगरक्षांबरोबर जावे लागते.
खरं नुकसान तर माझं शाळेत झालंय आणी त्यानंतर येणारे महाविद्यालयीन जिवनात होणारे.
काय सांगु आणि कसं सांगु सातवी पर्यंत सगळे माझ्या मनासारखे होत होते. रोजचा दिवस चालु झाला की शाळेला मैत्रीणंबरोबर जायचे अभ्यास मस्ती, मैदानी खेळ, हारजीत झाली की मग ती चिडवा चिडवी सगळं संपलय.
बाकीच्या मैत्रीणींसारखं एखाद्या आवडत्या मुलाकडे चोरुन बघणे, मग त्याची नजरानजर झाल्यावर ती हृदयात उठणारी कळ (गुदगुल्या), वाढत जाणारी धडधड, पुढे चोरुन होणार्या गाठीभेटी हे सगळं माझ्या वाट्याला येणारच नाही. माझे आत्ता पर्यंत अनेक ठिकाणी सत्कार झालेत त्यात पुष्पगुच्छ मिळाले , कॉलेजच्या रोज-डे ला ही अनेक गुलाब येतील; पण गुपचुप "मला तु आवडतेस" म्हणणारा फक्त माझ्या प्रेमासाठीच असणारा एकच लाल गुलाब कदाचित पुढे येणारच नाही.
कारण आता ही मुले बिनधास्त माझ्याकडे एक हिरोईन म्हणुन बघतात, माझी सही घ्यायला पुढे येतात, माझ्या बरोबर फोटो काढुन फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्साप्वर टाकतात आणि मी त्यांची मैत्रीण आहे हे सार्या जगाला अभिमानाने सांगत सुटतात. शिक्षाकांची ही वागणुक बदलली आहे. मला जास्त ओरडा बसत नाही, अभ्यास राहिला तरी सांगतात मैत्रीणींच्या वहीमधुन पुर्ण कर आणि उद्या दाखव असं सांगतात.
एकीकडे गजबजलेलं फिल्मी दुनियेच्या ग्लॅमरस जीवनाचा आनंद उपभोगत असताना दुसरीकडे सामान्य माणसासारखं मित्रमैत्रीणंच्या गराड्यात, हसत्या खेळत्या , मोकळ्या आनंदी जीवनाला मी मुकतेय.
माझ्या मनाची काय घालमेल होत्येय हे तुम्हाला काय आणि कशी सांगु?
तुमची आर्ची
प्रतिक्रिया
28 Jul 2016 - 1:01 pm | गणामास्तर
वा वा !!! एका किशोरवयीन मुलीला अचानक मिळालेल्या ग्लॅमर मुळे बदललेले तिचे भावविश्व अत्यंत नेमके टिपले आहे . तुम्ही लिहीत राहा. अजून सल्या,लंगड्या आणि आनी बाकी आहे.
29 Jul 2016 - 12:12 pm | लोनली प्लॅनेट
खरे तर असे व्हायला नको होते कारण तो सिनेमा आणि त्यातील ती पोरं आपल्याला ते आपल्यासारखेच सामान्य होते म्हणूनच आवडले मग रिंकूला आता असामान्य मानणे चुकीचे आहे
28 Jul 2016 - 1:01 pm | सिरुसेरि
आर्ची हे पात्राचे नाव आहे . अभिनेत्रीचे नाही . हे अभिनेत्रीचे मनोगत वाटते .
28 Jul 2016 - 1:04 pm | स्पा
आँ, आँच्च जाँल्ल
28 Jul 2016 - 1:57 pm | किसन शिंदे
ट्रॅक बदल आता जरा, जूने झालेय आता हे
28 Jul 2016 - 2:13 pm | नाखु
उत्तेजन प्रोत्साहन द्यायची अभिनव पद्धत आहे (आणि या धाग्यावर अजून बुवा आले नाहीत मागोमाग) हे लक्षात आले काय?
निरिक्षक नाखु
28 Jul 2016 - 3:28 pm | जव्हेरगंज
असेल असेल!
आता आम्ही नेमकं करायचं काय?
28 Jul 2016 - 3:37 pm | आनंदराव
माझ्या मनाची काय घालमेल होत्येय हे तुम्हाला काय आणि कशी सांगु
इंग्लिश मध्ये सांग
28 Jul 2016 - 3:37 pm | आनंदराव
माझ्या मनाची काय घालमेल होत्येय हे तुम्हाला काय आणि कशी सांगु
इंग्लिश मध्ये सांग
28 Jul 2016 - 6:22 pm | गामा पैलवान
1. What an emotional rollercoaster !
2. What to speak of me craving for small joys !
-गा.पै.
28 Jul 2016 - 10:26 pm | संजय पाटिल
आ. न. र्हायलं वाट्टं..
28 Jul 2016 - 6:06 pm | ज्योति अळवणी
कूच पाने के लिये कूच खोना भी पडता हे। कदाचित् हे आर्चिला माहीत नसेल पण तिच्या आई-वडिलांना माहीत होत न? त्यांनी तेवढं तिला सांगितलं असेलच न? हे म्हणजे मला फेमसही व्हायच आहे, पैसा देखील हवा आहे आणि सामान्यही राहायचं आहे, असं म्हणणं झालं.
29 Jul 2016 - 12:40 pm | प्रसाद गोडबोले
मला आर्चीला एकच प्रश्न विचारायचाय -
येवढा मोठ्ठा ससा , नववीतच कसा ?
=))))
29 Jul 2016 - 1:21 pm | प्रमोद देर्देकर
वयाचा आणि चित्रपटांत काम करण्याचा काय संबंध?
29 Jul 2016 - 2:23 pm | नाखु
मिपावयाचा आणि मिपावर लिहिण्याचा काय संबध?