'बघणं' राहूनच गेलं
.
शब्दांमागे धावण्यात
'बघणं' राहूनच गेलं
रस्त्याकडेचं इवलं रोपटं
कुणी न बघताच मेलं
शब्दांचा पसारा हवा
मोर-पिसारा नको
शब्दात उलगडून सांगा
'नुस्तं बघणं' नको
'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात
सौंदर्यगंध दरवळतो
समजून घेण्याच्या नादात
तोच नेमका हरपतो