कला

आली गौराई अंगणी

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in जनातलं, मनातलं
30 Aug 2017 - 8:18 pm

नमस्कार मंडळी,
या चतुर्थीपासून उभ्या महाराष्ट्रात वातावरण कसे गणेशमय झालाय ना, आता कालपासून त्यात भर पडलीय गौरींची. पण तुम्ही एक गोष्ट अनुभवलीत का? आपला लाडका बाप्पा महाराष्ट्रभर घरोघरी येत नसला तरी त्याचे लाड आणि साजशृंगार मगाराष्ट्राभर जवळ जवळ जवळ जवळ सारखेच केले जातात. पण माहेरवाशीण बनून येणारी गौरीचं तसं नाहीये, ती घरोघरी येते आणि तिचं कोडकौतुक मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तिचं स्वरूपही वेगवेगळं असतं. म्हणून म्हटलं चला तुम्हाला आमच्या साध्या भोळ्या गौराईची ओळख करून द्यावी.

मांडणीकलासमाजजीवनमानअनुभव

जनरेशन गॅप आणि निळाई

झपाटलेला फिलॉसॉफर's picture
झपाटलेला फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
2 Aug 2017 - 12:43 pm

CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही.

वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.

कलानृत्यनाट्यइतिहासवाङ्मयकथाबालकथासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनआस्वादलेखअनुभवमदतविरंगुळा

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in जनातलं, मनातलं
31 Jul 2017 - 7:26 pm

माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेता आले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते.

वावरसंस्कृतीकलासंगीतलेख

निलपक्षी

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
29 Jul 2017 - 11:37 pm

सगळे रंग विरळ होत होत सर्वत्र शुभ्रतेची चादर समोर पसरत होती, वेडावाकडा मार्ग तुडवत पुढे पुढे जात राहिलो, अनंत अडथळे बाजूला सारत. मनात प्रश्न नाहित ना कुठले विचार. प्रत्येक जिवाला उपजतच ज्ञान होते की, श्वेतवाळवंटाच्या राज्यात कुठेतरी एक झरा आहे, ज्याचे अमृतमय पाणी अक्षय आनंद देतं, चिरंजीवीत्व देतं. हा शोध माझा नाही आहे. प्रत्येक जीव ते अमृत मिळवण्याचा अनंतकाळापासून प्रयत्न करत आहे, अगदी पहिला एकपेशीय जीव ते स्वतंत्र बुद्धी असलेला हा मानव! सर्वांनीच याचा शोध घेतला, घेण्याचा प्रयत्न केला.

कलाकथाआस्वादलेख

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
29 Jul 2017 - 2:04 pm

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

कलासंगीतधर्मकृष्णमुर्तीप्रकटनविचारआस्वाद

रश्दी अबाझा

खडूस काका's picture
खडूस काका in जनातलं, मनातलं
25 Jul 2017 - 6:00 pm

रश्दी अबाझाचा जन्म तेरेझा लुईगी, जी इटालियन होती आणि सैद अबाझा, जो जन्माने इजिप्तीयन होता या दांपत्याच्या पोटी ३ ऑगस्ट १९२६ ला झाला. रश्दी अबाझाचे कुटुंब खूप श्रीमंत होते आणि इजिप्तच्या राजकारणात मोठे स्थान होते. रश्दी च्या कुटुंबात बरेच लोक राजकारण, वकिली, पत्रकार, लेखक होते, पण त्याला शरीर सौष्ठव मध्ये रस होता. त्याचे अरबी सोबत इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच या भाषांन्वर प्रभुत्व होते.

कलाजीवनमानलेख

पाऊस...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जे न देखे रवी...
25 Jul 2017 - 5:58 am

मला पाऊस आवडतो,
मला पाऊस आवडत नाही...

मी शांत आहे, संयमी आहे...
पण तो अंत बघतो माझा...
वाट बघायला लावतो...
आला नाही तो की बिथरत जाते मी..
माझ्याही नकळत..
अवचित येतो मग तो.. कोसळतो...

मी भानावर येईतो
कोसळून झालेलं असतं त्याचं...

निथळत राहतो मग तो, पागोळ्यांमधून..
आर्त बघतो...

मी तुटून जाते... हरवते धुक्यात..
आणि तो पुन्हा बरसतो, चिंब भिजवतो, कुशीत घेतो अलगद..

मी विरघळत राहते..
संयमाचं बोट सुटलेलं...

माझी कविताकला

चित्रपट परिक्षण : डंकर्क

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in जनातलं, मनातलं
24 Jul 2017 - 4:38 pm

शक्यतो मी इंगजी चित्रपट कमी पाहातो. पण तोच जर ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक असेल तर मी जरुर पाहातो.

असाच मागच्या आठवड्यात डंकर्क चित्रपट पाहाण्याचा योग आला आणि माझा वेळ आणि पैसा वसुल!

हा चित्रपट दुसर्‍या महायुध्धातील एका सत्यकथेवर आधारित आहे. जर्मनी च्या नाझी फौजानी फ्रान्सच्या समुद्र किनार्‍यावर ब्रिटिश आणि फ्रेन्च फौजांना जमीन , वायु आणि समुद्र या सर्व ठिकाणाहुन प्रचंड हल्ले करुन सळो की पळो करुन सोडले असताना हे मित्र देश कसे आक्रमणातुन वाचतात आणि हजारो सैनिकांचे जीव कसे वाचवले जातात याचे सुन्दर चित्रण या चित्रपटात आहे.

कलाआस्वाद