Mr.Bean
गोष्टी प्रथमदर्शनी जितक्या समजतात त्यापेक्षा जास्त त्या पुढल्या वेळी पाहताना कळतात.जितक्या जास्त वेळा पाहू तितक्या वेळा काहीतरी नवीन पाहिल्याचा बोध मला होतो. ही गोष्ट एका पंचवीस मिनिटांच्या बाळबोध टीव्ही मालिकेची आहे.
शाळेत असताना साधारण सहा वाजता टीव्हीवर लागणार ‘Mr.Bean’ नावाचा तो अर्ध्या तासाचा कार्यक्रम मी न चुकता बघायचो.कथानक,संगीत,नेपथ्य,भव्यता किव्वा तत्सम यापैकी एकही गोष्ट त्यामध्ये नाहीये.पण तेव्हा पाहताना मजा वाटायची.