आवारा कृष्णमेघ आणि दिल्लीचे रस्ते

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
8 Aug 2016 - 7:28 pm

(मराठी सृष्टीत पूर्वप्रकाशित हि कथा कॉमनवेल्थ खेळांच्या आधी लिहिली होती - या पावसाळ्यात दिल्लीच्या रस्त्यांची दशा आणि देश्यात इतरत्र घडलेल्या घटना पाहून या लेखाची आठवण झाली. कथा काल्पनिक आहे, वास्तवाची काही एक संबंध नाही).

दरवर्षी श्रावणात कृष्णमेघ येतो व आपल्या प्रेमजलधारानी धरतीला गाढ़ आलिंगन देऊन चिम्ब भिजवितो. कृष्णमेघाने धरतीला तसे वचनच दिले आहे. सुन्दर युवतीही या कृष्ण मेघाच्या प्रेमात पडतात आणि श्रावणी जलधारांचा मनसोक्त आनंद घेतात. जलधारांत भिजलेल त्यांच सौन्दर्य आणि गालात पडलेली खळी पाहून तरुणांचे ह्रदय घायाळ होणारच मग ते साठीचे असो वा सोळाचे. असा हा मायावी कृष्णमेघ.

हे नेहमीचेच आहे, दिल्लीत पोहचल्यावर कृष्णमेघ, जसे निवडणूक जिंकल्यावर दिल्लीचे नेता आपले 'वादे' विसरतात, तसेच हा आवारा कृष्णमेघ दिलेले वचन सहजपणे विसरून जातो.

"दिल्ली की बरसात
नेताओं के वादों की तरह
गरजते हैं मेघ
लेकिन बरसते नही हैं".

पण या वर्षी नवल घडल. श्रावणात दिल्लीत क्वचितच बरसणारा असा हा दगाबाज आवरा कृष्णमेघ या वर्षी भरभरून बरसला. कारण हि तसेच होते. रस्ते हि महागडे सोंदर्य प्रसाधने वापरणाऱ्या षोडशी अप्सरे समान सुन्दर दिसत होते. अश्या सुंदर रस्त्यांना पाहून श्रावणातला आवारा कृष्णमेघ सुन्दर व नाजुक रस्त्यांचा प्रेमात पडला तर यात आश्चर्य काय! नावातच कृष्ण, सुंदर गोपिकांना आपल्या जाळ्यात ओढणारच. कृष्णमेघाने आपल्या प्रेमाचा वर्षाव रस्त्यांवर सुरु केला.या प्रेम वर्षावात भिजून रस्तेही आनंदित झाले. ते लज्जेने चूर-चूर झाले. लज्जेमुळे त्यांच्या सुन्दर मुलायम गालांवर खळ्या पडल्या (जागो-जागी खड्डे पडले). मग अश्या सुंदर खळ्या पडलेल्या खड्ड्यांना पाहून रस्त्यांवरून जाणारी वाहने ही या खड़यांच्या प्रेमात पड़ले तर नवल काय! कित्येक वाहने घायाळ झाली आणि हॉस्पिटल (वर्कशॉप') मधे पोहचली. कित्येक नेहमी करता कामातूनच गेली. वाहनांना घायाळ करणार असं हे रस्त्यांच आणि कृष्णमेघाच प्रेम!

दिल्लीत कॉमनवेल्थ होणार आणि रस्त्यांवर खड्डे! शासनाची झोप उडाली. एक चौकशी समिति नेमल्या गेली. चौकशी समितीने निष्कर्ष काढला - श्रावणातल्या आवरा कृष्णमेघाच्या प्रेमात पडल्यामुळे रस्ते निकामी झाले. त्यात बांधकाम विभागाचा काही एक दोष नाही. रस्त्यांना श्रावणातल्या या आवारा कृष्णमेघापासून दूर ठेवण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात नदीवरचा पूल वाहून गेला- कृष्णमेघाचे कारस्थान-...

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Aug 2016 - 8:10 pm | पैसा

तुमचे दिल्ली राज्य सर्कार भारी आहे! रस्त्याना पाव्सापासून दूर ठेवायचा काय नामी उपाय शोधला त्यांनी?

विवेकपटाईत's picture

9 Aug 2016 - 7:25 pm | विवेकपटाईत

पैसा ताई हि पावसात रस्ते खराब होणे हि समस्या भारतात सर्वत्र आहे. रस्ते का खराब होतात याची जवाबदारी कुठलाही सरकारी विभाग घेता नाही. सर्व फक्त पावसाला दोष देतात. असो.

मुक्त विहारि's picture

9 Aug 2016 - 9:04 pm | मुक्त विहारि

भारतात पडला तर रस्त्यावर खड्डे करतो आणि युरोप मध्ये पडला तर मात्र रस्त्यावर खड्डे तयार करत नाही.

विवेकपटाईत's picture

10 Aug 2016 - 7:32 pm | विवेकपटाईत

विहारी साहेब, युरोपियन स्त्रिया सुद्धा लाजत नाही, त्याच्या गालावर खळ्या पडत नाही, मग आवारा कृष्णमेघ प्रेमाचा वर्षाव कसा करणार? म्हणून तिथे रस्त्यावर खड्डे पडत नाही. असो.