हो...! मला तुमचा पैसा हवाय...-मर्लिन मुनरो
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघतेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...
आठवणीतला हॉलीवुड/तीन
‘हो...! मला तुमचा पैसा हवाय...! पण त्यांत गैर काय...तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला एखाद्या कंगाल, फाटक्या माणसाच्या पदरी घातलं असतं का...? नाही ना...मग मी स्वत:साठी तुमच्या पैसेवाल्या मुलाला पसंत केलं तर त्यांत गैर काय...?’