आस्वाद

अवघा महाराष्ट्र सैराटमय

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 9:27 am

नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट.

चित्रपटअभिनंदनआस्वादबातमी

कहे कबीर (३)- उड जायेगा हंस अकेला

मनमेघ's picture
मनमेघ in जनातलं, मनातलं
26 Apr 2016 - 4:25 pm

उड़ जाएगा हंस अकेला।
जग दर्शन का मेला ।। धृ ।।
जैसे पात गिरे तरुवर के ।
मिलना बहुत दुहेला ।
ना जानू किधर गिरेगा ।
लग्या पवन का रेला ।। 1 ।।
जब होवे उमर पूरी ।
जब छूटेगा हुकुम हुजूरी ।
जम के दूत बड़े मजबूत ।
जम से पड़ा झमेला ।।2 ।।
दास कबीर हर के गुण गावे ।
वा हर को पार न पावे ।
गुरु की करनी गुरु जाएगा ।
चेले की करनी चेला ।। 3 ।।

संगीतविचारआस्वादलेख

‎निर्गुणी भजने‬ (भाग १)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
26 Apr 2016 - 12:51 pm

मला गाण्यातलं फार कळत नाही. रागांची नावं वगैरे तर अजिबातच नाही. शाळेत संगीताच्या तासाला मी दाणी बाईंचा फार आवडता विद्यार्थी असावा. कारण रागाची नावे, त्यांची लक्षणगीते, ते कधी म्हणावेत याचे संकेत, या किंवा अश्या सारख्या सर्व प्रश्नांना तोंडी परीक्षेत मी केवळ एकच उत्तर देत असे, 'आठवत नाही'. त्यामुळे माझी तोंडी परीक्षा लवकर आटपायची आणि लेखी पेपर तर माझ्या पुढे बसलेल्या मुलाचा तपासला की माझे मार्क आपोआप ठरायचे. त्यामुळे बाईंच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षण मी वाचवले आहेत याची मला खात्री आहे. पण माझ्या मते मी उत्तम कानसेन आहे. सूर मला मोहात पाडतात. मनावर आलेली मरगळ घालवतात.

संगीतआस्वाद

चंदेरी : मियाजींचा घरी जेवणाचा किस्सा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
23 Apr 2016 - 12:32 pm

गेल्या वर्षी चंदेरीला गेलो होतो. दुपारच्या वेळी किल्याच्या भिंतीवर पत्रावळ ठेऊन जेवत असताना, खाली दूरवर पसरलेल्या चंदेरी नगरावर नजर केली. दूर कुठून ढोल ताश्यांचा आवाज येत होता, कुठली तरी मिरवणूक निघत होती. आपल्या मेहुणीला विचारल्यास कळले, आज रामापीरची जयंती आहे. रामापीरची शोभायात्रा निघत असेल. हिंदू- मुसलमान दोन्ही धर्माचे लोक रामा पीरला मानतात. हिंद-मुसलमान, सर्वजातीय लोक या शोभा यात्रेत भाग घेतात. चंदेरीची दुकाने हि आज बंद असतात. सकाळी जेवण बरोबर घेऊन अशोकनगरहून का निघालो होतो ते हि कळले.

संस्कृतीआस्वाद

कहे कबीरा (२)- सुनता है गुरु ग्यानी !!

मनमेघ's picture
मनमेघ in जनातलं, मनातलं
22 Apr 2016 - 6:04 pm

सुनता है गुरु ग्यानी ।
गगन में आवाज हो रही
झीनी झीनी ।

नभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात.
आणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात..
सुनता है गुरु ग्यानी? गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना?

संगीतवाङ्मयआस्वादलेख

दारावर भाजी महाग का?- स्पष्टीकरण भाजीवाल्याचे

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
19 Apr 2016 - 9:47 pm

हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे.

समाजआस्वाद

कहे कबीरा (१) - हीरना समझ बूझ बन चरना-

मनमेघ's picture
मनमेघ in जनातलं, मनातलं
18 Apr 2016 - 3:09 pm

हीरना समझ बूझ बन चरना ।।

कुणी तरी अमुक व्यक्ती चूक करणार आहे आणि ती चूक त्याच्या जिवावरच बेतणार आहे हे दुसऱ्या कुणा तमुक व्यक्तीला समजलं तर ती तमुक व्यक्ती अमुक व्यक्तीला सावध करेल. ती चूक करु नकोस म्हणून सांगेल. अमुक आणि तमुक जर खूप जवळचे असतील तर ज्या तळमळीने हे सावध करण्याचं काम होईल तीच तळमळ कबीरांची आहे आणि हे भजन गाणाऱ्या कुमारांचीही. कुमारांनी सुरुवातीचं 'हीरना'च असं काही म्हटलंय की ऐकताना ते आपल्यालाच उद्देशून आहे असं वाटतं.

संगीतआस्वादलेख

साथ : एक आकलन

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Apr 2016 - 5:34 pm

साथ : एक आकलन

- डॉ. सुधीर रा. देवरे

साथ

हा रस्त्यावरचा
दीप क्षीण तेजात
तेवतो एकटा
भीषण काळोखात
- तिष्ठते कुणि तरी
समोरच्या खिडकीत ;
केव्हढी तयाची
सोबत आणिक साथ.
- इंदिरा संत

साहित्यिकआस्वाद

संदीप खरे

अनुप देशमुख's picture
अनुप देशमुख in जनातलं, मनातलं
14 Apr 2016 - 3:06 pm

खर तर संदीप(एकेरी उल्लेखाबद्दल क्षमस्व पण संदीपला सर किंवा अहो म्हणण म्हणजे तो खूप लांब गेल्यासारखा वाटतो) तर संदीप माझ्या फार पूर्वीपासून ओळखीचा... म्हणजे माझ्या कॉलेज पासून फक्त ऐकलेला, तेव्हा नुकतेच मनात पालवी फुटण्याचे वय. आणि त्यातच संदिपच पहील गाण कानावर पडल ते म्हणजे सरीवर सर्.... नुकताच पाऊस पडून गेलेला..मला वाटत कोणीही शहाणा माणूस ते गाणं ऐकल्यावर त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही...तेव्हाच वाटल “कुछ तो बात है इस दिवाने कि बातो मे” ...अक्षरशः दीवाना केल त्याच्या शब्दांनी...

संगीतआस्वाद