दारावर भाजी महाग का?- स्पष्टीकरण भाजीवाल्याचे
हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे.
हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे.
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
हीरना समझ बूझ बन चरना ।।
कुणी तरी अमुक व्यक्ती चूक करणार आहे आणि ती चूक त्याच्या जिवावरच बेतणार आहे हे दुसऱ्या कुणा तमुक व्यक्तीला समजलं तर ती तमुक व्यक्ती अमुक व्यक्तीला सावध करेल. ती चूक करु नकोस म्हणून सांगेल. अमुक आणि तमुक जर खूप जवळचे असतील तर ज्या तळमळीने हे सावध करण्याचं काम होईल तीच तळमळ कबीरांची आहे आणि हे भजन गाणाऱ्या कुमारांचीही. कुमारांनी सुरुवातीचं 'हीरना'च असं काही म्हटलंय की ऐकताना ते आपल्यालाच उद्देशून आहे असं वाटतं.
साथ : एक आकलन
- डॉ. सुधीर रा. देवरे
साथ
हा रस्त्यावरचा
दीप क्षीण तेजात
तेवतो एकटा
भीषण काळोखात
- तिष्ठते कुणि तरी
समोरच्या खिडकीत ;
केव्हढी तयाची
सोबत आणिक साथ.
- इंदिरा संत
खर तर संदीप(एकेरी उल्लेखाबद्दल क्षमस्व पण संदीपला सर किंवा अहो म्हणण म्हणजे तो खूप लांब गेल्यासारखा वाटतो) तर संदीप माझ्या फार पूर्वीपासून ओळखीचा... म्हणजे माझ्या कॉलेज पासून फक्त ऐकलेला, तेव्हा नुकतेच मनात पालवी फुटण्याचे वय. आणि त्यातच संदिपच पहील गाण कानावर पडल ते म्हणजे सरीवर सर्.... नुकताच पाऊस पडून गेलेला..मला वाटत कोणीही शहाणा माणूस ते गाणं ऐकल्यावर त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही...तेव्हाच वाटल “कुछ तो बात है इस दिवाने कि बातो मे” ...अक्षरशः दीवाना केल त्याच्या शब्दांनी...
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्
वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः
समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.
हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे.
"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच!
कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर!
रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता.
वाघाने डरकाळी फोडली. माकड झाडावर चढले.
शेंड्यावर लपून अद्भुत हसले. अन तिथूनच घेतली उडी. खालच्या फांदीवर.
वाघ झाडाखाली आला. जिभल्या चाटत पाणी पिला.
अन घेतला एक सूर. पाणवठ्यात.
ऊन तापले. पाणवठ्याच्या अवतीभवती गिधाडे.
सूक्ष्मजंतूंचा नायनाट.अन पाण्यातला वाघ गारगार.
कुठून आलं एक हरिण. बिथरुन बसलं काठावर.
अन सुसाट पळालं माघारी. सैरावैरा.
वाघाने जलक्रिडा केली. मग आला काठावर.
अन झाडून अंग फोडली एक डरकाळी. भयचकीत.
माकड पुन्हा शेंड्यावर. गिधाडे उडाली आकाशी.
अन जंगलातली हरणे हिरव्या कुरणावर. सुसाट पळाली.
१. सु.शिं.चे मानसपुत्र
दारा बुलंद
नमस्कार मंडळी,
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - रस्ता. जो आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. जे छायाचित्र पाहिल्यावर रस्ता हा त्याचा मुख्य विषय वाटेल असे छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे.