TE३N पाहिला. बरा आहे. थोडा confusing आहे. अजून छान होऊ शकला असता. दिग्दर्शकाने जर नवीन प्रयोग म्हणून Thriller चा वेग कमी ठेवला असेल तर तो प्रयोग कधीकधी पडतो. मुख्य problem हा आहे की लोक involve होत नाहीत. कथा involve होण्यासारखी असूनही.
एक सत्तरीच्या घरातला माणूस, त्याची व्हीलचेअरला खिळलेली पत्नी. गेली ८ वर्षे तो दररोज पोलिस स्टेशनला भेट देतोय. ८ वर्षांपूर्वी त्याच्या नातीचं अपहरण झालंय आणि तिचा मृत्यूही झालाय. तिला न्याय मिळवून देणं आणि या अपहरणकर्त्याला लोकांसमोर आणणं हा या माणसाच्या जगण्याचा एकमेव हेतू आहे. कुठेतरी तो आपल्या नातीच्या मृत्यूसाठी स्वतःला जबाबदार धरतोय. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस
अधिका-यानेही नोकरी सोडलीय. तो आता चर्चमध्ये फादर आहे. काही घटना घडतात. एका लहान मुलाचं अपहरण होतं. त्यामुळे या ८ वर्षे जुन्या प्रकरणावरची धूळ झटकली जाते आणि पोलिसांना आता धर्मोपदेशक झालेल्या फादर मार्टिनची, एकेकाळच्या इन्स्पेक्टर मार्टिनची मदत घ्यावी लागते.
८ वर्षांपूर्वी अपहरणाचा गुन्हा करणारा आणि आत्ता अपहरण करणारा एकच माणूस असावा असे काही धागेदोरे पोलिसांना मिळतात. त्यावरून एक माणूस पकडलाही जातो. पण मार्टिनला काही शंका येतात. तो आपल्या पद्धतीने शोध घ्यायचा प्रयत्न चालू करतो आणि ...
अशी एकंदरीत कथा आहे, जी खूप छान फुलवता आली असती, पण त्यातच दिग्दर्शक कमी पडतो. अग्ली मध्ये अनुराग कश्यपने जो ताण शेवटपर्यंत निर्माण केला होता तसा ताण इथे जाणवतच नाही.
अमिताभ बच्चन मस्त. सत्तरीला आलेला, डोळ्यांत सतत अपराधी भाव असलेला जाॅन बिश्वास त्याने सुंदर उभा केलेला आहे. नवीन धागेदोरे मिळाल्यावर त्याच्या डोळ्यांत येणारी चमक तर जबरदस्त. त्याच्यासारख्या पडद्यावर अत्यंत smartly वावरणाऱ्या अभिनेत्याने संपूर्ण चित्रपटात, शेवट सोडला तर, एकदम बेंगरूळ, गोंधळलेल्या माणसाचं जे bearing घेतलं आहे, त्यासाठी तरी हा चित्रपट बघायला हरकत नाही.
नवाजुद्दीनही तितकाच तोडीस तोड आहे. दोघेही एका frame मध्ये असताना चित्रपट पकड घेतो, पण इतर दृश्यांमध्ये ती ढेपाळते. दोघांमध्ये ठिणग्या उडाव्यात अशी अभिनयाची जुगलबंदी जरी झडत नसली तरी ते एकमेकांना अप्रतिम साथ देतात.
विद्या बालनच्या व्यक्तिरेखेला श्रेयनामावलीत guest appearance असं का संबोधण्यात आलेलं आहे, हे अनाकलनीय आहे. तिची पूर्ण लांबीची व्यक्तिरेखा आहे. तिला दिग्दर्शकाने सुदैवाने पोलिस uniform दिलेला नाही. तो अत्याचार झाला असता. तिची एकदम एकसुरी भूमिका आहे. एकदाच तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलचा संदर्भ येतो पण तेवढंच.
चित्रपटाचा सर्वात मोठा problem म्हणजे यात मुख्य गुन्हा का घडतो याबद्दलचं स्पष्टीकरण इतकं filmy आणि न पटण्यासारखं आहे की ते समजल्यावर धक्का बसण्याऐवजी भ्रमनिरास झाल्यासारखं वाटतं.
त्यामुळे इमारतीचा सांगाडा आकर्षक पण बांधकाम पूर्ण झाल्यावर ' कुछ जमा नही ' असं वाटत राहतं.
अजून एक. छायाचित्रकाराने टिपलेलं कोलकाता शहर अप्रतिम. In fact, शहर हीसुद्धा एक व्यक्तिरेखा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ज्याप्रकारे कहानी मध्ये कोलकाता, तिथले लोक, चालीरीती हे कथेत भिनतात तसं इथे होत नाही. त्यामुळे कहानी जसा कोलकाताशिवाय कुठे इतर ठिकाणी घडूच शकत नाही, तसं तीन चं होत नाही. तो दिल्ली, मुंबई - कुठेही घडू शकतो.
चित्रपट जरी निराशा करतो तरी अभिनयाच्या जोरावर अमिताभ आणि नवाजुद्दीन आणि थोडीफार विद्या बालन त्याला उचलून धरतात. त्यासाठी तरी तो बघायला हरकत नाही.
मी चित्रपटाला २ स्टार्स देईन. हा ५ स्टार्सवाला होऊ शकला असता. पण...
ता.क. हा चित्रपट कोरियन चित्रपट Montage वरुन घेतल्याचा श्रेयनामावलीत स्पष्ट उल्लेख आहे. पण त्याबद्दल निर्माता - दिग्दर्शकाचं कौतुक करावं की उघडउघड copy पण नीट न केल्याबद्दल टीका करावी ते समजत नाहीये.
प्रतिक्रिया
12 Jun 2016 - 10:33 am | संजय पाटिल
छान परिक्षण..
आता तुम्हीच बघायला हरकत नाहि म्हणताय तर बघतो एकदा..
12 Jun 2016 - 12:03 pm | अजया
छान परिक्षण.अमिताभसाठी कोणताही पिक्चर एकदा बघावाच लागतो!
12 Jun 2016 - 12:10 pm | चलत मुसाफिर
या चित्रपटाचे संपूर्ण अंतगुपित आंतरजालावर फोडण्यात आलेले असून ते कालच वाचले.
अर्थात खरे-खोटे कळण्याचा काही मार्ग नसतो. पूर्वी धूम३ प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटात आमिर खान मरतो आणि त्याचा मुखवटा लावून कमल हासन वावरतो असे "गुपित" कुणीतरी फोडलेले वाचले होते!
पण सदरचे परीक्षण वाचून, यावेळी वाचलेले कथानक बरोबरच असावे असे वाटते आहे.
12 Jun 2016 - 12:16 pm | कैलासवासी सोन्याबापु
पैशे वाचवल्याबद्दल आभार बोका भाऊ गाववाले! कहानी ची फ्रेम वापरलेले एक अजुन थ्रिलर रसायन म्हणता येईल का ह्या सिनेमाला
12 Jun 2016 - 8:01 pm | बोका-ए-आझम
पण कहानीला मी ४.५ स्टार्स दिले असते. त्यातला एकंदरीत suspense आणि ज्या प्रकारे प्रेक्षकाला बांधून ठेवलं होतं ते इथे दिसलं नाही.
12 Jun 2016 - 1:25 pm | वाल्मिक
मस्त परीक्षण
==================================
स्वाक्षरी
हाउस फुल ,झाली हौस करून
http://www.misalpav.com/node/36320
12 Jun 2016 - 1:33 pm | आनंद कांबीकर
'टे३ण' चा 'वजीर' झाला वाटतं.
12 Jun 2016 - 1:34 pm | निशांत_खाडे
TE3N आजच पाहिला. शंभर टक्के सहमत आहे.
12 Jun 2016 - 2:37 pm | पद्मावति
खूप मस्तं परीक्षण!!
5 स्टार चं potential असलेला सिनेमा चांगल्या दिग्दर्शकाच्या हाती पडला असता तर छान झालं असतं.
12 Jun 2016 - 5:45 pm | रेवती
छान परिक्षण बोकेराव!
जालावर आल्यानंतर शिनेमा पाहीन.
12 Jun 2016 - 5:47 pm | प्रचेतस
अमिताभसाठी हा चित्रपट पाहिन.
13 Jun 2016 - 2:27 pm | नाखु
आणि अता अमिताभसाठी नक्की बघेन... लेकाने ह्याला विरोध दर्शवून कुठला तरी भुताचा सिनेमा बघायचा आहे म्हणून बेत हाणून पाडला.
तो भुताचा सिनेमा नक्की कसा आहे हे मिपा भुतावळीने सांगावे.
परिक्षण मापात (अजिबात) पाप न केलेले.
अज्ञ पालक नाखु
13 Jun 2016 - 3:19 pm | चलत मुसाफिर
The Conjuring 2 म्हणत असणार तो. अजून पाहायचाय, त्यामुळे मतशांतता.
त्या दिग्दर्शकाचे The Conjuring 1 आणि Insidious हे दोन्ही horror चित्रपट जबरदस्त आहेत
13 Jun 2016 - 4:37 pm | नाखु
कुणीतरी इंग्लीश्वाल्यांनी सांगा कसा आहे तो.
पुन्हा शंकावाला नाखु
13 Jun 2016 - 6:04 pm | बोका-ए-आझम
हा शब्द आवडला.
13 Jun 2016 - 6:33 pm | मारवा
त्या दिग्दर्शकाचे The Conjuring 1 आणि Insidious हे दोन्ही horror चित्रपट जबरदस्त आहेत
अहो या चित्रपटाची मला किमान १० जणांकडुन बघच रे एकदा अशी शिफारस झालेली आहे. पण त्यात नक्की काय आहे ते कुणीच सांगत नाही.
तु बघ फक्त म्हणतात सांगितल तर मजा जाईल
आखिर ऐसा क्या है इस मुव्ही मे ?
तुम्ही ही अस नका सांगु बघा फक्त थोडी तरी आयडीया द्या राव एकदम नाहीतर ४-५ तास वेस्ट होतात
वाचत मुद्दाम नाही त्यात जास्तच माहीती समजुन जाते.
13 Jun 2016 - 6:34 pm | मारवा
अस काय वेगळ हॉरर आहे यात ?
13 Jun 2016 - 3:23 pm | शि बि आय
आसं आहे तर…
तरी आपल्या तरुण म्हातार बाबांसाठी बघावा वाटतोय
13 Jun 2016 - 3:25 pm | जगप्रवासी
जालावर आल्यावर बघेन
13 Jun 2016 - 4:40 pm | palambar
वजीर सारखाच वाटतोय.
13 Jun 2016 - 5:13 pm | रातराणी
अमिताभसाठी पाहणारच.
14 Jun 2016 - 8:56 am | तिमा
परीक्षण वाचल्यानंतर चित्रपट पाहिला तरीही आवडला. मला तरी रहस्य शेवट येईपर्यंत कळले नाही. अमिताभच्या अभिनयासाठी तरी जरुर पहावा, असे म्हणेन.
14 Jun 2016 - 9:05 am | सतिश गावडे
TE3N हेच चित्रपटाचे नाव आहे की ही नावाची आद्याक्षरे आहेत?
14 Jun 2016 - 9:15 am | प्रचेतस
त्यांनी नाव इंग्लीश चित्रपट Se7en ची कॉपी मारलीय.
14 Jun 2016 - 9:15 am | प्रचेतस
'त्यांनी नाव देताना' असे वाचावे.
14 Jun 2016 - 10:00 am | सतिश गावडे
हा "ते तीन" नावाचा मराठी चित्रपट आहे का? ;)
14 Jun 2016 - 10:53 am | अभ्या..
अरे आधी TEEN च असतंय, मग एक E अक्षर उलट फिरतंय आणि 3 होतंय.
14 Jun 2016 - 11:31 am | विअर्ड विक्स
One time watch…
जझ्बा + कहानी = तीन ( तीन नाव हे माझी मते कथा तीन व्यक्ती भोवती फिरते , म्हणून असावे ).
अमिताभ ची व्यक्तिरेखा जबरदस्त आहे.कथा विस्कळीत आहे. विद्या नि नवाझुद्दीन ला विशेष scope नाहीये. या दोघांच्या संवादातून त्या दोघांच्यातील नाते स्पष्ट होत नहि. बरेच असे मुद्देद आहेत….
बाकी ransom ( मराठी शब्द ? ) collect करण्याच्या कल्पनेसाठी सलाम …….
शेवटास दोन प्रसंग समांतर आहेत वा भूत- वर्तमान काळ यांची सांगड आहे हे कळले तरच चित्रपट कळला असे मानावे :)
14 Jun 2016 - 12:39 pm | सुबक ठेंगणी
ransom ला खंडणी म्हणतात