चिअर्स सुंदरीची व्यथा कथा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
11 Jun 2016 - 8:55 am

(या लेखाचा उद्देश्य कुणाची भावना दुखविण्याचा नाही. आधीच क्षमा मागतो).

अत्यंत तोडके कपडे घातलेल्या, ३६-२४-३६ कमनीय देहयष्टीच्या या चिअर्स सुंदरी त्यांच्या टीमच्या फलंदाजाच्या प्रत्येक चौकार आणि षटकारा सोबत मंचकावर येऊन आपल्या देहाचे प्रदर्शन करत नृत्याचे हावभाव करतात. दर्शक त्यांचे नर्तन पाहून शिट्या वाजवितात, टाळ्या पिटतात. जो पर्यंत टीम जिंकत राहते, चिअर्स सुंदरी हि टीम सोबत विमानात प्रवास करतात, उंची हॉटेलात राहतात, बोनस, उपहार आणि अन्य अनेक पुरस्कारांचा वर्षाव या सुंदरींवर होत असतो. पण एकदा टीम हरली कि चिअर्स सुंदरीं हि बेरोजगार होतात. आपल्या टीमचा जोश टिकून राहो, या साठी काही चिअर्स सुंदरी देहासोबत आत्मा हि विकायला सदैव तैयार असतात.

पूर्वी आपल्या देश्यात राजे-महाराजे, आंग्ल भाषेत निपुण असे अभिजात्य जन क्रिकेट खेळायचे. दिपाली अश्याच एका अभिजात्य टीमची चिअर्स सुंदरी होती. टीम सोबत विमानाचा प्रवास, उंची हॉटेलात राहणे, सतत उंची उपहारांचा वर्षाव, याची तिला सवयच होती. तीही आपले सर्वस पणाला लाऊन अभिजात्य टीमचा उत्साह वाढवायची. त्या साठी निर्लजपणे देहाचे प्रदर्शन करायला तिला किंचितहि लज्जा कधी वाटली नाही.

पण म्हणतातना, दैव गति अति न्यारी. गिरच्या जंगलातल्या रहिवासिंच्या अडाणी, अशिक्षित टीम ने अभिजात्य टीमचा पार धुव्वा उडविला. विराट आणि गेल ज्याच्या समोर पाणी भरतील असा जंगली टीमचा कप्तान रक्त पिपासू राक्षस म्हणून कुप्रसिद्ध असा चहावाला एकटाच एवढे चौकार आणि षटकार मारायचा की टीमच्या दुसर्या फलंदाजांना मैदानात उतरण्याची गरजच पडायची नाही. गिर टीमच्या पूर्ण कपडे घातलेल्या अडानी, अशिक्षित आंग्ल भाषेच्या गंध नसलेल्या चिअर्स सुन्दरिंच्या जंगली नृत्यावर दर्शक शिट्या आणि टाळ्या का वाजवितात हेच दीपालीला कळत नव्हते. गेल्या दोन वर्षांपासून अभिजात्य टीम सतत पहिल्याच राउंड मध्ये पराजित होत असल्यामुळे दीपालीचे विमानात प्रवास करणे, उंची हॉटेलात राहणे, परदेसी दौरे सर्वच बंद झाले. इतक्या वर्षांत भरपूर माया जमविल्यामुळे जीवनयापनाची तिला चिंता नव्हती. पण मंचकावर नाचण्याचा आनंद आणि दर्शकांच्या शिट्या यांना हि ती मुकली.

गिरच्या जंगली टीम कितीही चांगली खेळत असली तरी, पाताळेश्वर बळीराजाच्या देशात तिला जायला मज्जाव होता. अर्थातच अभिजात्य टीमने माझ्या सारख्या चिअर्स सुंदरीनींना हाताशी धरून त्या टीमचे नेतृत्व करणार्या चहावाल्याला नरराक्षस म्हणून सर्वत्र कुप्रसिद्ध मिळवून दिली होती.

पण आता तर हद्दच झाली. पाताळेश्वरने स्वत: गिरच्या जंगली टीमला निमंत्रण दिले. तिथे होणार्या मैत्री सामन्यामध्ये चहावाल्याने एवढे षडकार आणि चौकार मारले कि तिथल्या दर्शकांचे हात टाळ्या वाजविता-वाजविता लाली-लाल झाले. एवढ्या टाळ्या तर माझ्या देह दिखाऊ निर्लज्ज नृत्यावर हि कधी दर्शकांनी वाजविल्या नसतील. स्वाभाविकच आहे, माझ्या अंगाची लाही-लाही झाली. रागाने मी म्हंटले, हा कसला फलंदाज हा तर चिअर्स सुंदरी आहे, आम्हापेक्षा जास्त चांगला नाचतो. याला नाचण्यासाठी १00 पैकी ११० गुण दिल्या जाऊ शकतात. केविलवाणा रडका चेहऱ्याने ती म्हणाली, आता तुम्हीच सांगा यात काय चूक म्हंटले मी. या घटकेला सर्व क्रिकेट प्रेमी मला शिव्या देत माझी निंदा करीत आहे. असे म्हणत तिच्या डोळ्यांतून झरझर अश्रू वाहू लागले. मनात आले रुमालाने तिचे अश्रू पुसावे, तिला सांत्वना द्यावी, पण विचार केला, विराट कोहलीपेक्षा सरस महान फलंदाजाला, चिअर्स सुंदरी म्हणणार्या या मूर्ख मुलीचे अश्रू मी का म्हणून पुसावे?

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

कोणी मराठीत हे समजाऊन देईल काय?

विवेकपटाईत's picture

11 Jun 2016 - 5:55 pm | विवेकपटाईत

या लेखाचा IPL वाल्या चिअर्स सुंदरीची काही एक संबंध नाही.

मला वाटले होते मिसळपाव वाले त्या सुंदरीचे नाव आणि गाव हि सांगतील. बहुतेक गेल्या दोन दिवस आधीचे समाचार वाहिनीवर ऐकले असते तर लेख निश्चित कळला असता.

हिंट: प्रधानमंत्री विदेश दौर्यावर पत्रकारांना घेऊन जात नाही. आता तरी नाव गाव शोधून काढणार का?

पियू परी's picture

11 Jun 2016 - 6:03 pm | पियू परी

आता कळाले.
संत्रे सोलून दिल्याबद्दल धन्यवाद.

सिरुसेरि's picture

11 Jun 2016 - 10:33 am | सिरुसेरि

बाउन्सर .

समी's picture

11 Jun 2016 - 10:42 am | समी

शालजोडित छान दिलय.... :)

समी's picture

11 Jun 2016 - 10:42 am | समी

शालजोडित छान दिलय.... :)

यशोधरा's picture

11 Jun 2016 - 10:44 am | यशोधरा

लेख आवडला नाही.

तिमा's picture

11 Jun 2016 - 1:39 pm | तिमा

यशोधरा यांच्याशी सहमत.

रमेश भिडे's picture

11 Jun 2016 - 4:39 pm | रमेश भिडे

+२
यशोधरा आणि तिमा यांच्याशी सहमत.

नाखु's picture

11 Jun 2016 - 5:08 pm | नाखु

रांगतेला

अज्ञ अडाणी नाखु

रमेश भिडे's picture

11 Jun 2016 - 5:21 pm | रमेश भिडे

वेगळी लाइन लावा. आम्हाला समजली आहे पण आवडली नाहीये.
- मा झिचला लेलाल

आनंद's picture

11 Jun 2016 - 11:25 am | आनंद

छान लिहल आहे.
दोन वेळा वाचल्यावर समजल.

साध्यासाध्या घटनात कूट घालून लिहिण्यापेक्षा आपण मस्त साधे सोपे लिहित जावे अशी आप्ल्या एका वाचकाची नम्र इच्छा.

नमकिन's picture

11 Jun 2016 - 3:59 pm | नमकिन

याच १ कारणामुळे IPL पहात नाहीं

विवेकपटाईत's picture

11 Jun 2016 - 5:53 pm | विवेकपटाईत

या लेखाचा IPL वाल्या चिअर्स सुंदरीची काही एक संबंध नाही.

पियू परी's picture

11 Jun 2016 - 4:28 pm | पियू परी

काहीही.. म्हणजे ओ का ठो अगदी काहीही कळले नाही..

विवेकपटाईत's picture

11 Jun 2016 - 5:54 pm | विवेकपटाईत

या लेखाचा IPL वाल्या चिअर्स सुंदरीची काही एक संबंध नाही.

मला वाटले होते मिसळपाव वाले त्या सुंदरीचे नाव आणि गाव हि सांगतील. बहुतेक गेल्या दोन दिवस आधीचे समाचार वाहिनीवर ऐकले असते तर लेख निश्चित कळला असता.

हिंट: प्रधानमंत्री विदेश दौर्यावर पत्रकारांना घेऊन जात नाही. आता तरी नाव गाव शोधून काढणार का?

हा प्रतिसाद तुम्ही जर लेखात तळटीप म्हणून लिहिला असता तर लेख समजायला मदत झाली असती.