वास बापूंचा
लग्नाआधी एक काळ असा आला कि मी आणि भाऊ दोघेही मुंबईबाहेर नोकरी करीत होतो आणि आई काहीशी एकटी झाली होती. त्याच वेळी बिल्डींग मध्ये अनेक बायका अनिरुद्ध बापू भक्त झाल्या होत्या आणि आई हि बरीच नास्तिक असली तरी त्यांच्या बरोबर जाऊ लागली. मग एकदा कधीतरी तिने हे एक खरेखुरे साधुपुरुष आहेत, किती चांगले बोलतात असे सांगितले. थोडे ऐकताच मी तिला सांगितले कि सर्च जण फ्रोड असतात, तू यांच्या नादी लागू नकोस.नंतर तिने भावाला सांगितले ( मी नसताना ) ; तर भाऊ तिला अशा चोरांच्या नादी लागू नकोस म्हणून ओरडला. मग तिची आणि भावाची वादावादी झाली. मग तिने मला सुनवले कि तुम्ही कसे आजीबात धार्मिक नाही .... असो ..