समाज

बाई पलंगावर बसून होती

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
26 Apr 2018 - 5:16 pm

बाई पलंगावर बसून होती

गुलाबराव मस्त मळत होते

मळता मळता बघत होते

बाईकडं गिधाडावानी

बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे

कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे

मळता मळता थाप मारली

राळ उडालेली नाकात बसली

शिंकेवरती शिंक आली

शिंकण्यातच सारी रात गेली

आवाजाने गावाला जाग आली

बाई जाम उखडली

वाहून शिव्यांची लाखोली

चरफडत चोरपावलांनी निघून गेली

रात बी गेली अन बाई बी

थापा मारण्यातच वेळ गेली

{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}

अविश्वसनीयआता मला वाटते भितीकाहीच्या काही कवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितासमाजआईस्क्रीमओली चटणी

सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
26 Apr 2018 - 12:36 pm

सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..
प्रसंग पहिला.

एका तरूण मुलीच्या मागे चार ते पाच जण शाळेची बस घेऊन लागतात. ती मुलगी दुचाकी वरून कॉलेज मधून घरी येत असताना, तिचा पाठलाग करतात आणि बस आडवी घालून तिच्या दुचाकीचा अपघात घडवून आणतात. ती मुलगी जखमी होते . अगदी चित्रपटात घडते तसे दृश्य ...पण इथे खरे घडणारे ….त्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही हे तिचे भाग्य. पण झाले असते तर ?

प्रसंग दुसरा.

समाजविचार

आत्मताडनाची कविता.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
21 Apr 2018 - 4:26 pm

आत्मताडनाची कविता लिहू नये...
यात होते असे,
कि आत्मा सोडून
बाकी सगळे दुखावतात
यात काय हशील आहे, सांग!

काय कामाची असली कविता?
माणूस जोडत नाही, ती कविता नाही
ही घे चिकन बिर्याणी,
तुला सांगतो,
कविता म्हणजे बिर्याणी
मसालेदार, स्वादिष्ट!
बोन प्लेट तयार ठेवायची

कविता माझीकाणकोणकालगंगामुक्त कविताकवितामुक्तकसाहित्यिकसमाज

प्रदूषण (२7)- एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
19 Apr 2018 - 7:25 pm

अप्रैल महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात दिल्लीत उन्हाची प्रखरता जाणवू लागते. दिवसाचे तापमान ४० अंशाच्या वर जाते. त्या सोबत दक्षिण पश्चिम दिशेहून येणारे उष्ण वारे हि दिल्लीत येऊन धडकतात. उष्ण वार्यांसोबत राजस्थानची रेत हि दिल्लीत पोहचते. पूर्वी हि धूळ लाल-पिवळी दिसायची. पण आता काळपट दिसते. दिल्लीत लाखो वाहने आणि फैक्ट्र्या रोज आकाशात धूर सोडतात. धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक रासायनिक पदार्थ हवेत मिसळतात. प्रदूषित पदार्थांचे हि बारीक कण हि या धुरासोबत आकाशात पोहचतात. धुळीच्या आंधी सोबत हे सर्व प्रदूषण घरा-घरात पोहचते.

समाजलेख

निनावी कल्लोळ

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
18 Apr 2018 - 6:56 pm

जेटयुगाचे बडवा ढोल,बडवा ढोल !!

निषेधाचाच डब्बा गोल ,डब्बा गोल!!

कर्म अंधारी, वासना विखारी !!

(अ)धर्म तुतारी ,क्लांत शिसारी !!!

टाळाटाळ सरळसोट , टाळाटाळ सरळसोट!!

आपलेच दात आपलेच ओठ !!!

जालपिपाणी टिवटिव गाणी !!

विदेशी विद्वेषी वणवण,तर्कशुध्दि सदैव चणचण !!!

भुक्कड दक्षक भणंग रक्षक !!

दुर्बलांची ऐशीतैशी !! मुजोरांप्रती प्रीतखाशी!!

विफल अरण्यरुदन ,विदीर्ण मूक पीडन !!

गाये हरफनमौला ,गाये हरफनमौला !! तन सुंदर धवल ,पर मन (रहे) सदा मैला!!

आडवाटेला थांबलेला वाचक नाखु

मुक्त कविताकरुणमुक्तकसमाजजीवनमान

वैशाख वणवा

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in जनातलं, मनातलं
18 Apr 2018 - 5:51 pm

निसर्ग नावाचे काहीतरी आहे, याचे भान आम्हाला फक्त फेसबुकवर फोटो पोस्ट करताना, शनिवार रविवारी फिरायला जाताना, फोटो लाईक करतानाच होत असते. इतर वेळेस आपले वागणे असे असते की फक्त माणुस आहे, निसर्ग वगैरे बाकी काही नाही.
वणवा एक भीषण सत्य

समाजजीवनमानप्रकटन

मित्र नव्हे, परिचित !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
18 Apr 2018 - 8:51 am

माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या टप्प्यातील हा प्रसंग आहे. एम.डी. ही पदवी प्राप्त करून मी एका हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून रुजू झालो. ते हॉस्पिटल नव्यानेच सुरू झाले होते. त्यामुळे माझ्यासह इतर सहकारीही पायाभूत उभारणीची कामे मन लावून करीत होते. हळूहळू हॉस्पिटलचा विस्तार होत गेला. मग तेथील डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात आली. अशाच एका नवीन भरतीच्या वेळी माझ्या विभागात डॉ. सतीश हा माझा कनिष्ठ सहकारी म्हणून रुजू झाला. महिनाभरातच मी त्याच्याविषयी एक अंदाज बांधू शकलो. तो जरी फारसा हुशार नसला तरी तो नेमून दिलेली कामे व्यवस्थित करीत असे.

समाजलेख

तुमच्या देशात....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
13 Apr 2018 - 1:33 pm

मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'

धोरणसमाजजीवनमानविचारबातमी

प्रदूषण (२५): महानगर - एक प्रदूषित कारागृह

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
12 Apr 2018 - 7:06 pm

शेरखान जंगलाचा राजा. राजा असला तरी पोट-पाण्यासाठी त्याला शिकार करावीच लागायची. किमान दहा-बारा वेळी प्रयत्न केल्या वर त्याला शिकार गवसायची. कधी सांभर सारखे मोठे जानवर गवसले तर काही दिवस मेजवानी. तर कधी-कधी सस्या सारख्या छोट्या जनावरा वर ही गुजाराण करावी लागे. कधी-कधी कित्येक दिवस उपासमार ही व्हायची. तरी ही शेरखान खुश होता. कुठल्या जनावराचा शिकार करायची हे ठरविण्याचे स्वतंत्रता त्याच्या पाशी होती. आपल्या मर्जीचा तो राजा होता. तो जंगलात कुठेही फिरू शकत होता. पण म्हणतात न, काळ कधीच एकसारखा नसतो. एक दिवस शेरखान शिकारीला निघाला होता. त्याला एका पिंजर्यात लटकलेले जनावराचे मांस दिसले.

समाजआस्वाद