नेमका प्रॉब्लेम काय असतो काही लोकांचा
मिसळीवर अनेकदा उत्तम चर्चा सुरु असतात. त्यातून खूप चांगली माहिती मिळते. कमेंटमधूनही विषयाचे नवे नवे पैलू उलगडले जातात. म्हणूनच हे संस्थळ मराठी इंटरनेट विश्वात आपले वेगळेपण टिकवून आहे. पण ते हे बलस्थान राखलेही पाहीजे.
नवीन धागा आला की धाग्याच्या अगदी अंगणात काही जण घाण करून ठेवतात. "मी धाग्याच्या दारात पहिली जागा पटकावली आणि घाण केली" असे वर अभिमानाने सांगतात. काही जण तर चर्चा विषय कोणताही असूद्या, " मी पॉपकॉर्न घेऊन बसलो आहे" असे लिहीतात.