मिसळीवर अनेकदा उत्तम चर्चा सुरु असतात. त्यातून खूप चांगली माहिती मिळते. कमेंटमधूनही विषयाचे नवे नवे पैलू उलगडले जातात. म्हणूनच हे संस्थळ मराठी इंटरनेट विश्वात आपले वेगळेपण टिकवून आहे. पण ते हे बलस्थान राखलेही पाहीजे.
नवीन धागा आला की धाग्याच्या अगदी अंगणात काही जण घाण करून ठेवतात. "मी धाग्याच्या दारात पहिली जागा पटकावली आणि घाण केली" असे वर अभिमानाने सांगतात. काही जण तर चर्चा विषय कोणताही असूद्या, " मी पॉपकॉर्न घेऊन बसलो आहे" असे लिहीतात.
मी ग्यारंटीड सांगतो. पुन्हा पुन्हा पॉपकॉर्न घेऊन बसल्याने आरोग्य(मानसिक) बिघडणारच आणि पुन्हा ते धाग्याच्या अंगणात घाण करणारच. त्यामुळे आपल्या आरोग्याची त्यानी स्वतःच काळजी घेतली पाहीजे. नेहमी डॉक्टर येणे शक्य नसते. अशा वेळी मागील अनुभवावरून हे शक्य होवू शकते.
विशेषतः काही सदस्यांच्या धाग्याच्या अंगणात तर ठरवून पॉपकॉर्न खावून घाण करुन ठेवण्याचे प्रकार झाले आहेत.
आपल्या अंगणात कुणी तरी पॉपकॉर्नची घाण करून ठेवतंय म्हणून काही जण दार लावून धागे टाकणे बंद करतात किंवा घर तरी बदलतात. नव्या जागी तिकडेही जावून पॉपकॉर्नवाले आपला गुण दाखवतात का ते मला माहीत नाही.
मिसळीच्या नियंत्रकांनी यासाठी पूर्वी बरेच प्रयत्न केल्याचे आठवते पण बहुधा हस्तक्षेपाच्या ऐवजी स्वयंनियंत्रणाची अपेक्षा इथे बाळगली जाते. ते योग्यही आहे. पण क्वचित फारच तब्येत बिघडलेल्याची मिपा नियंत्रकांनी काळजी घेण्याची गरज असते.
अशा लोकांमुळे सगळ्याच मिसळीची तब्येत नकोय बिघडायला. संस्थळाला शुभेच्छा !
प्रतिक्रिया
1 Dec 2017 - 6:25 pm | आशु जोग
या धाग्याच्या दारात कुणीही पॉपकॉर्न घेऊन बसले नाही आणि आरोग्यदेखील सुधारले ही चांगलीच गोष्ट आहे
4 Dec 2017 - 4:47 pm | कपिलमुनी
कोणी नावे ठेवायला नकोत..... की धाग्यावर काळे कुत्रेदेखील फिरकले नाही . म्हणून फिरायला पाठवत आहे ...
6 Dec 2017 - 12:54 am | आशु जोग
डिपी छान आहे
4 Dec 2017 - 4:50 pm | अभ्या..
चाललांत काय?
30 Jan 2018 - 2:37 pm | आशु जोग
ना ही
10 Apr 2018 - 11:20 am | आशु जोग
कुठे
4 Dec 2017 - 6:30 pm | उपेक्षित
यांच्या एका धाग्यावर पुर्वी विमलाबाई गरवारे मध्ये मिळणाऱ्या अण्णाच्या सामोसा-पाव आन चटणी-पावाची आठवण आली :)
14 Dec 2017 - 11:24 pm | आशु जोग
म्हणजे ?
1 Jul 2018 - 12:29 am | आशु जोग
अधिक माहिती द्या
20 Nov 2018 - 1:23 pm | आशु जोग
?
12 Apr 2018 - 7:46 am | Ram ram
वाघाचे पंजे.....
1 Jul 2018 - 10:02 pm | Ram ram
गुमान झोपा आता गोधडीत.
28 Aug 2018 - 5:15 pm | आशु जोग
हे हे हे