श्रीवर्धन तालुक्याच्या कुशीत रममाण छोटे खाणी दिवेआगर.दिवेआगर म्हणजे सृष्टीला पडलेलं स्वप्न... नारळ पोफळीच्या बागांनी नटलेल निसर्गान पुष्कळ दान केलं. जसे श्रीवर्धनला अतिप्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेलं आहे त्याचप्रमाणे दिवेआगर हि अतिप्राचीन गावांपैकी एक ठरत असून देवविद्या पारंगत घैसास, देवल, मावलभट आदी ब्राम्हणाची वस्ती होती. समुद्रमार्गानी येणाऱ्या अरब चाच्यांनी या गावाला वेळोवेळी लुटलं. पण, भट आणि बापट या दोघा भावंडानी सिद्धीच्या परवानगीने याचा कायापालट केला. या गावाचे प्रथम दैवत म्हणजे श्री सिद्धिविनायकाची मूर्ती शेजारी अन्नपूर्णा आणि रुपनारायणची मूर्ती
समुद्रावरुन येणारा खारा वारा घोंगावत होता. समुद्राच्या लाटांची गाज त्याला ऐकू येत होती. पोरवदा होतो बापानं येथे येऊन टाकलं. खाणार तोंड पण वाढली होती घरात पोट भरणारे पण वाढले पाहिजे होते पण, आता हात पण थकत चालेले होते. मोठ्या मालकांनी कधी गडी म्हणून राबवून घेतलं नव्हतं पण त्यांचा मुलगा जेव्हापासून मुंबईवरून शिकून आलाय, तेव्हापासून पैशाची भाषा बोलतो.
गणप्याची मनात विचाराचं वादळ उठलं होत. समुद्राच्या लाटांप्रमाणे एका मागून एका विचार मनात थडकत होते. गणप्याला तीन मुले यशवंत, विश्वजित, मंगल.
यशवंत 'येशू ' स्वभावाने सालस, शांत आणि कामसू त्याने थोड्यावर इयत्ता पहिल्या पण शाळा पुढे शिकणं त्याला काही जमल नाही पण हिशोबाच्या बाबतीत तो चोख होता म्हणून कुलकर्ण्यांनी त्याला वेळीच हेरला. कुलकर्णी दिवेआगरातले सुपारी सम्राट. त्यांनी त्याला हिशोबाच्या कामगिरीवर त्याला नेमला होता. गेल्याच वर्षी येशूचा बार उडवून दिला होत. त्याची बायको लक्ष्मी स्वभावाने बारी होती पण म्हणतात ना ! असलं तर सूत नाहीतर भूत...
गणप्याची बायको गोड तिचा स्वभाव येशू ने उचला होता.
दुसरा विश्वजित 'विश्वा' विश्वा लहानपणा पासून खोडकर, हुशार, हजरजबाबी आणि माणसं ओळखणारा. त्याला माणसातली खोच बरोबर कळे. ७ वी इयत्ते पर्यंत शिकला होता. गणप्याच्या मालकांनी 'बर्वे'नी सुपारीच्या कामासाठी येण्याची गळ घातली होती पण, विश्वा त्यांना धूप लागून देत नव्हता.
मंगला दिसायला अतिशय सुंदर आणि उफाड्या बांध्याची. गणप्याचा तिच्यात प्राण अडकला होता. त्याने तिला लहान असल्यापासून कामाचं करताना पाहिलं होत. ती पहाटेला बंदरावर येणाऱ्या बोटीवरचे मासे घेऊन ती तालुक्याच्या गावी मासे विकायला जायची तेथून घरी आली का घरातली काम. घरात ती लहान होती पण तीच वागणं एखाद्या मोठ्या माणसाला शोभेल असं होत.
क्रमांश:
प्रतिक्रिया
13 Nov 2017 - 11:40 pm | कपिलमुनी
अजून मोठे भाग टाका
13 Nov 2017 - 11:49 pm | पद्मावति
मस्त सुरुवात.
अजून मोठे भाग टाका
सहमत.