समाज
वृक्षासिनी
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.
पत्रकारितेतला दिप्स्तंभ
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई!
यांचे निवडणुक बोलणे तर खास असते. असा एकदम बॅलन्स मानूस आपल्या टिव्हिच्या माध्यमात आहे हे आपले भाग्य आहे. कोणतेही टोपिक असो हा मानूस एकदम मुळाशी जातो. नेहमी पुर्ण दुसरा बाजू दाखवून देतो.
चहाच्या पलीकडे
।। चहाच्या पलीकडे...।।
"व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।" अर्थात महर्षी व्यास यांनी सर्व जग म्हणजे जगातील सर्व विषय उष्टे ( हाताळलेले ) आहेत. थोडं उलटं जाऊन आपण असं म्हणू या की साऱ्या जगाने चहा उष्टावलेला आहे. तो आवडणारे आहेत, नावडणारे आहेत , त्याबद्दल तटस्थ आहेत. पण चहा माहीत नाही असा जगी कोणीही नाही.
उगवता "तेजस्वी" तारा
‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव
0**0**0**0**0
आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक
बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो.
ओळख!
संदर्भः
लहान मुलांकडे असलेल्या निरागसतेमुळे मी नेहमीच प्रभावित अन् अचंबित होत असतो. आणि खरंतर ते अत्यंत आनंददायी असतं!
"अरे खरंच.. आपण असा साधा विचार का नाही करू शकलो?" असं स्वतःला अक्षरशः अनेकदा विचारण्याची वेळ येते !
त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन फार साधा आणि कुतुहलाचा असतो. सरळ स्वभाव असल्यामुळे केमिकल लोचा कमी असतो!
परत, जरी त्यांची स्मृती चांगली असते तरी मनात अढी ठेवून वागण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. उलट ते फार सहजपणे गोड वागतात, माफ करतात आणि विसरूनही जातात. कदाचित याच कारणानं लहान मुलं सगळ्यांना हवीहवीशी वाटतात!
प्रतिमा जपायची आहे
- डॉ. सुधीर रा. देवरे
अरविंद बाळ यांची अंनिसवरील अप्रकाशित प्रतिक्रिया
प्रास्ताविक - आमचे ज्येष्ठ मित्र श्री अरविंद बाळ यांचे दि.27 ऑक्टोबर 2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.आंतरजालावरील उपक्रम या संकेतस्थळाविषयी मी जेव्हा जालाबाहेरील लोकांशी चर्चा करत असतो त्यावेळी त्यांना मराठी संकेतस्थळाविषयी उत्सुकता तर असतेच पण येथील चर्चांविषयी एक आकर्षणही असत. श्री अरविंद बाळ यांचे लेखन हे जालाबाहेरील वर्तुळात असते. गप्पांमधुन ते भरभरुन बोलतात पण लिखाणाबाबत जरा उदासीनच. अरविंद बाळ हे B.E. (Civil) व्यवसायाने सिव्हिल इंजीनिअर . या क्षेत्रातील कंपन्यातून नोकरी व नोकरीनिमित्त भारतभर प्रवास. तीन वर्षे इराकमधे वास्तव्य. निवृत्ती सन 2000 घेतल्यावर पुण्यात कर्वेनगरला स्थायिक.