समाज

सच बोलू तो

Govind's picture
Govind in जनातलं, मनातलं
25 Aug 2020 - 9:27 am

  गोष्ट आमच्या लहानपणी घडलेली आहे. मी तेव्हा सहावीत असेन.आमचा मित्र फिरोज आणि त्याच्या घरातील हा किस्सा आहे. फिरोजचा अब्बा म्हणजे मोतीलाल हा एक अट्टल बेवडा होता. तो चोवीस तास नशेत असायचा. जेव्हा शुद्धीवर यायचा तेव्हा बायकापोरांना एवढ्या तेवढ्या कारणावरून बदडणे हा त्याचा छंद होता. त्याला कुठलंही कारण पुरायचं. म्हणजे अगदी शेजारच्या घरातील कुत्रा जरी भुंकला तरी तो तेवढ्या कारणावरून बायकोला मारहाण करी. त्यामुळे ती बिचारी सदाची घाबरलेली असे. नवर्‍याला वर डोळा करून बोलायची सोय नव्हती. नाहीतर मग बेदम मार खावून पुन्हा वर तलाक द्यायच्या धमक्या मिळत.

कथाविनोदसमाजविचारआस्वादविरंगुळा

बाप

Govind's picture
Govind in जनातलं, मनातलं
24 Aug 2020 - 10:38 pm

  सकाळची वेळ. सगळीकडे एकप्रकारचं चैतन्य संचारलेलं. सूर्याची कोवळी किरणं सगळीकडे पसरलेली. सार्वजनिक नळावर बायकांची पाणी भरण्यासाठी लगबग चाललेली. घरोघर दारात सडे टाकून त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात गुंतलेल्या मुलीबाळी. कुणी शेतकरी आपली गुरे घेऊन शेताकडे निघालेला. पाणी भरता भरता बायकांचा आवाज वाढायला लागला. वाढत्या उन्हाबरोबर पाणी भरण्याची घाई वाढू लागली आणि त्यासोबतच भांडणांनाही सुरूवात झाली. रस्त्याच्या कडेलाच असणार्‍या झोपडीसमोर फाटक पोतं अंथरूण बसलेलं सुधाकरचं म्हातारं आपले मिचमिचे डोळे उघडायचा प्रयत्न करत होतं पण ऊन्हामुळं डोळ्यांसमोर अंधारी येत होती.

कथासमाजविचारआस्वादविरंगुळा

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
24 Aug 2020 - 9:54 am

(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२)

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

(प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. )

समाजजीवनमानशिक्षणप्रकटनविचारमाध्यमवेधलेखअनुभवमाहितीआरोग्य

वाढदिवस आणि समाज माध्यमे

मृगतृष्णा's picture
मृगतृष्णा in जनातलं, मनातलं
23 Aug 2020 - 10:53 am

त्या दिवशी " लेखा" चा वाढदिवस होता , दिवस नेहमीप्रमाणेच उजाडला, पहाटे ५.३० वाजता लेखा उठली , मुलांचे डबे, नवऱ्याचा डबा , सासु-सासाऱ्यांच्या चहा ची तयारी , दूध तापविणे, नाश्त्याला कोण काय खाणार असे सगळे नेहमीचेच विचार डोक्यात सुरू होते .

समाजविचार

गणेशोत्सव, गणपती बसवायचा मुहूर्त ,किती दिवस बसवावा गणपती?

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
19 Aug 2020 - 4:10 pm

दरवर्षी गणेशोत्सव अंगीभूत असणाऱ्या गणेशप्राणप्रतिष्ठापना यांच्या मुहूर्तांच्या लागू/गैरलागू असण्याबद्दल छोट्याश्या फेसबुक पोष्टी टाकत होतो.. यावेळी जरा विस्तृत मांडणी करता यावी म्हणून विषयबोलक टाकलेला आहे.

संस्कृतीधर्मसमाजविचारमतमाहिती

मृत्यूंचा आकडा वाढला, आता 'राजि'नामे द्या

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
17 Aug 2020 - 10:09 am

सार्स कोविड- २ २०१९ मध्ये मानव प्रजातित उतरुन सहा महिने उलटून गेले. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर पहिल्या १०८ दिवसात १०,००० मृत्यू झाले. त्या नंतर मागच्या ३७ दिवसात १०,००० जीव गेले त्यातील ५००० मागच्या १६ दिवसात गेलेत. संदर्भ

समाजमाध्यमवेधआरोग्य

कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
14 Aug 2020 - 8:43 am

मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा).

प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे :

समाजजीवनमानआरोग्यराहणीऔषधोपचारप्रकटनविचारलेखअनुभवआरोग्य

कोरोना ची किंमत त्याला विचारा...

बलि's picture
बलि in जनातलं, मनातलं
13 Aug 2020 - 3:35 pm

बऱ्याच दिवसांनी लिहितोय, चूकभूल माफ असावी.
कोरोनामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान देखील झालं आहे, त्यांची आवर्जून माफी मागतो.

कोरोना ची किंमत त्याला विचारा...

समाजप्रकटन