कामगार शक्तीचा.....
२०१०... पाहिलंच पोस्टिंग होतं अंदमान ला . या आधी गेलो नव्हतो तिकडे . ४-५ महिने राहायचं जरा वैताग आलेला . आर एपी डी आर पी चा प्रोजेक्ट होता . त्सुनामी नंतर . जावं लागलं बाहेर असताना ,मी परदेशात होतो तेव्हा काही दिवस तरी अचानक जावं लागलं . ते पण आपण फिरतो ते अंदमान नाही रंगत पासून मायाबंदर ते दिगलीपूर पर्यंत . सुरवातीचे ५-६ दिवस मजेत गेले . मायाबंदर ला शासकीय विश्रामगृह होतं राहायला . फिरून वैगरे मजा आली पोर्टब्लेयर ला पण . काम अवघड होतं त्यात मला बाहेरून अचानक इथे पाठवलेलं. मुख्य कंपनी सरकारी पॉवरग्रीड आणि कंत्राट आमच्या कंपनीला मिळालेलं.