पाकिस्तानचे हल्ले आणि मोदी पर्रीकर
नुकताच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि आपले काही सैनिक मारले. सगळा देश यामुळे संतप्त आहे. पण याला जरासे वेगळे वळण लागलेले दिसत आहे. काही लोक आज मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना शिकवायला निघाले आहेत. मोदी संघाच्या मूशीतून घडलेले संन्यस्त वृत्तीचे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. मनोहर पर्रीकर हेही संघाच्याच संस्कारात घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि आय आय टी चे विद्यार्थी आहेत. तसेच संरक्षण मंत्री झाल्यावर अनेक दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतले.