मातृभाषेची सेवा
आपल्या मातृभाषेचा आदर आणि अभिमान बाळगण्यासाठी इतर भाषांचा अपमान आणि द्वेष करावा हे सर्वस्वी चूक आहे. इतर भाषांचा अपमान करून मातृभाषेची सेवा होत नसून मातृभाषेत बोलून, लेखन वाचन करून, लेखकांची पुस्तके विकत घेऊन त्यांना दाद प्रोत्साहन देऊन, इतर भाषेतील उत्कृष्ट साहित्य मातृभाषेत आणून तसेच शब्दकोश सतत वृद्धिंगत करून ती सेवा घडत असते आणि मातृभाषा टिकून राहते. खरा मातृभाषेचा पुरस्कर्ता इतर भाषाही तेवढयाच तन्मयतेने शिकतो, वाचतो, बोलतो, लिहितो.