कर्सिव का टचपॅड ?

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
3 Feb 2015 - 6:06 pm
गाभा: 

फिनलंडमधील पुढील शैक्षणिक वर्षापासून, कर्सिव हस्तलिपी (cursive handwriting) हा शैक्षणिक घटक, बाद होणार असून, त्याजागी शाळांना (किबोर्ड/टचपॅड वर ) टेक-टायपिंग चा पर्याय देण्यात येणार आहे. हा बदल अमेरिकेतील काही राज्यांनी त्यांच्या शैक्षणिक 'मध्यवर्ती मूल्यात'(core-values) मधे केलेल्या बदलामागोमाग फिनलंडमध्येसुद्धा येवू घातला आहे. शैक्षणिक मंडळाने सुचवलेला हा बदल, अधिकृतपणे २०१५ च्या शरदऋतूपासून कदाचित अमलात येईल असा अंदाज आहे. 'उत्कृष्ठ टायपिंग हे राष्ट्रीय उत्पादकता कौशल्यांचा ऐक महत्वाचा घटक आहे', असा, काही शैक्षणिक मंडळांच्या सदस्यांचा विश्वास आहे. अमेरिकेमध्ये सप्टेंबर २०१३ मधे असा बदल पहिल्यांदा सुचवण्यात आलेला, आणि मग ४३ राज्यांनी (२०१४ च्या आकडेवारीनुसार) सुरुवात केलेली आहे. काहींनी याला विरोध, तर काहींनी पाठींबा दिला. काहींच्यामते 'हाताने लिहिणे महत्वाचे, त्यासाठी कर्सिवमधेच लिहिले पाहिजे हा अट्टाहास नको'. काही भाषातज्ञाच्या मते, किमान 'कागदाच्या ऐका चिटोर्यावर तुम्ही पेन्सिल/पेनाने खरडलेला मजकूर, वाचणार्याला समजायला हवा' , यामध्ये 'वाचणार्याला समजणे' हे महत्वाचे, तुम्ही ते कर्सीलिपीत लिहिता कि साध्या, हे नाही. लेखन करताना किती सुवाच्य, सुंदर, विशिष्ठ स्टाइलने लिहिता हे महत्वाचे नसून, किती स्वयंचलित सहजतेने (Automaticity) लिहू शकता याला आहे, कारण यामध्ये, लिहिण्याच्या पद्धतीपेक्षा, योग्य मेसेज लिहिण्यासाठी मेंदूची जास्त क्षमता वापरता येईल, (अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील स्पष्टतेवर मेंदूची जास्त क्षमता वापरता येईल), आणि टेक-टायपिंगमुळे हे सहज साध्य करता येवू शकेल. शिवाय टेक-टायपिंग हे कर्सिव हस्तलिपीच्या तुलनेत, खूपच कमी वेळात मुलांना शिकवता येईल, आणि वय ८ वर्षापर्यंतची मुले कर्सिवलिहिण्यापेक्षा टेक-टायपिंग लवकर आत्मसात करतात. सध्याच्या युगातील उदयोन्मुख विचारानुसार शैक्षणिक संस्थांचा भर हा पुस्तकी अभ्यासक्रमाबाहेरील कौशल्यांवर (जस की सहयोग (collaboration ), धैर्य (grit), चिकाटी, संगीत, सृजनशीलता, समस्या-निराकरण) सुद्धा बराच अवलंबून आहे, आणि यामध्ये तंत्रज्ञानाची कास धरायला हवी. 'शालेयजीवनात शिकण्यासारख्या एवढ्या गोष्टी आजूबाजूला असताना, विद्यार्थ्यांच्या जीवनातील बराचसा मूल्यवान कालावधी, पानांच्या थप्प्याच्या थप्या, वह्यांची चळतच्या चळत, गिरगटवण्यात का वाया जावा', हे अनाकलनीय आहे. शेवटी संशोधनाअंती हेच सिद्ध झालंय की, मुलांना एखाद्या गोष्टीत गम्मत वाटत असेल, आवड असेल तरच ती गोष्ठ, ते उत्कृष्ठपणे शिकतात.
आता हे सर्वस्वी तुमच्या निरीक्षणावर अवलंबून आहे की, तुम्हाला मुले टचपॅड हाताळताना जास्ती आनंदी दिसतात, का कर्सिव लिहिताना !

प्रतिक्रिया

अतिशय स्वागतार्ह निर्णय!

हाताने लिहिणे ही काही काळाने कला म्हणून उरेल. त्यावर "टॅबच्या युगात आता हाताने लिहायला विसरलोय" वगैरे वॉट्सॅपी गळेही काढले जातील.

गजानन५९'s picture

3 Feb 2015 - 6:38 pm | गजानन५९

<<<<<हाताने लिहिणे ही काही काळाने कला म्हणून उरेल. त्यावर "टॅबच्या युगात आता हाताने लिहायला विसरलोय" वगैरे वॉट्सॅपी गळेही काढले जातील.>>>>

बरर्र मग ?

काय बोलावं हे कळेनासं झालय. जेंव्हा माझ्या मुलाला कर्सिव्ह लेखन सुरु झालं तेंव्हा लगेच बंद केलं गेलं व शाळेकडून आयप्याडस दिली गेली. पालक आनंदले. आम्ही विरोध करायचा केलेला प्रयत्न हा प्रयत्नच राहिला. तोपर्यंत माझ्या मुलाचे अक्षर व लेखनातला नेटकेपणा हा गुण होता पण त्या मेल्या आयप्याडने हस्ताक्क्षराचा व नेटकेपणाचा विषय निकालात काढला. स्पेलिंग चुका आपोआप दुरुस्त होऊ लागल्या, खाडाखोड दिसेनाशी झाली, क्याल्क्यूलेटरने गणिते पटापट होऊन मुलगा त्याच यंत्रावर कुठले तरी शोज पाहू लागला. नंतर हाताने करण्याच्या प्रोजेक्टला कसेतरी पूर्ण करणे एवढेच उरले. त्याच्या आकृत्यांमधील सुबकपणा निघून गेल्यावरही जेंव्हा शिक्क्षिकाबाईंनी पूर्ण गुण दिले त्यावेळी त्यांना भेटून अस्वछ कामाचे सगळे गुण दिल्याचे लक्षात आणून दिले. त्यावर टेक्निकली तो बरोबर आहे व आम्ही या कामाला स्वच्छ म्हणतो असा मलाच धक्का दिला. मुलगा कार्सिव्ह लिहिताना आनंदी दिसायचा पण आयप्याडमुळे जास्त आनंदी दिसतोय हे पालकांना खटकू शकते ...........मला खटकते. आता दुसर्या शाळेत आयप्याड अजिबात वापरू देत नाहीत आणि याचे हस्ताक्षर किंचितच सुधारले आहे. लहानपणी त्याच्या हस्ताक्षरावर व आकृती काढण्यातील नीटनेटकेपणावर माझ्या वडिलांनी मेहनत घेतली होती. त्याचे पुरेसे फळ मिळाले नसल्याचे मला वाटते. मुले हे असले टायपिंगचे लेखन लवकर आत्मसात न करायला काय झालं? असतं काय त्यात? कमी केलेले कष्ट कोणाला नकोयत? अक्षर हा विषय आता बोलायचाच नाही, त्याने मने दुखावून डोळ्यात महापूर यायचे. फक्त एवढेच झालेय की आम्ही काही बोललो नाही की मुद्दाम अक्षर बरे काढायचे व कागद आम्हाला दिसेलसा ठेवत असे. कौतुक कोणाला नको असते? ;) आणि कमी वेळात भाराभार गोष्टी शिकवण्यापेक्षा चांगल्या गोष्टी जास्तवेळ शिकवा ना! असो, आता काही ए बी सी डीचे वय नाही त्याचे, पण जेंव्हा होते त्यावेळचे आठवले. असले वेगळाले शोध लागणे, पूर्वीचे निकालात निघणे हे चालू राहते. आपले मूल ज्या लाटेत सापडेल तसे होत जाते.
मुलाच्या मित्राच्या शाळेत यावर्षी पारंपारिक गणित हा प्रकार बंद करून सिंगापूर म्याथ पद्धती सुरु केलीये. नेहमीच्या पद्धतीत व सिंगापुरी पद्धतीत काय फरक आहे हे मला माहित नाही पण तो मित्र रशियन म्याथच्या वर्गाला जात असे. आता त्याची आई म्हणते की नुसते उत्तर बरोबर आल्याने गुण मिळत नाहीत तर सिंगापुरी पद्धतीला महत्व आहे. मग त्यांनी त्याला त्या गणिताच्या क्लासला घातले. काही वर्षांनी ते रशियन पद्धत सुरु करणार नाहीत कशावरून?

काळाबरोबर चालायला काहीच हरकत नाही. सुंदर हस्ताक्षर हे कला म्हणून कधीही जोपासता येइल. त्याला वयाची काहीच अट नसावी.

बोरू जसा आपण मागे सोडला, तसाच पेनही मागे सोडायला लागेल....

हस्ताक्षर हे लहानपणी चांगले शिकता येईल असे मला वाटते. माझ्या लहानपणी किबोर्डस नव्हते तरी नंतर ते वापरता आले पण आता हस्ताक्षर चांगले होण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. शिवाय नुसते हस्ताक्षर हा एकच मुद्दा नसतो. त्याबरोबर अनेक गोष्टी साध्य होत असतात. व्यवस्थितपणाची सवय लागणे हेही महत्वाचे. एखादी गोष्ट कशीही करून संपवून टाकताना आपले मन आपल्याला ती व्यवस्थितपणे करण्यास बजावते. बोरु मागे सोडला तरी त्याच्याशी समानता दाखवणारे शाईचे पेन वापरून ज्यांचे अक्षर सुधारले असे अनेक आहेत. वळणदार अक्षर आणि स्पष्ट विचारशक्ती, व्होक्याब्युलरी यांचा परस्पर संबंध दर्शवणारे लेखन एकदा वाचले होते. अर्थात ते एकच मत असावे असे नाही पण चांगल्या गोष्टी काळाच्या ओघात मागे पडल्या तरी दुसर्‍या कोणत्या दर्जाच्या गोष्टी ती जागा भरून काढतात हेही बघणे महत्वाचे ठरावे.

>>व्यवस्थितपणाची सवय लागणे हेही महत्वाचे. एखादी गोष्ट कशीही करून संपवून टाकताना आपले मन आपल्याला ती व्यवस्थितपणे करण्यास बजावते. बोरु मागे सोडला तरी त्याच्याशी समानता दाखवणारे शाईचे पेन वापरून ज्यांचे अक्षर सुधारले असे अनेक आहेत.

+१.

(नुसते शाई पेन नाही, त्याला कट निब असल्याशिवाय आपण अगदी योग्य अशा पद्धतीने मराठी लिपी लिहूच शकणार नाही.)

वरचा लेख वाचा तरी.... जेव्हा हाताने लिहायला पर्याय नव्हता तेव्हा सुंदर हस्ताक्षर ही महत्त्वाची गरज होती. पण आता असा पर्याय उपलब्ध आहे. वर हा पर्याय वापरल्याने, मेंदू अधिक कार्यक्षमतेने मजकूरावर काम करू शकतो हेही दाखवून दिलेले आहे.

कुठलीही कला शिकायला वय हा कधीच अडथळा नसतो- अपवाद बहुधा असे खेळ जिथे लहान वयातच स्पर्धा होणं शक्य आहे.

व्यवस्थितपणा हा संगनकीय लिखानात ही महत्वाचा आहे. डॉक्यूमेंटेशन कला हा अनेक क्षेत्रातील महत्वाचा घटक आहे.

एकदम बरोबर, टेक-टायपिंगमधे मजकूर अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट दिसतो. त्यात, खाडाखोड टाळून, हवा तेव्हा आणि हवा तसा बदल करणे शक्य आहे.

त्यामुळेच हस्त लिखाणापेक्षा मजकूर टाइप करण्याचे प्रमाण वाढतच जाणार आहे.

वेल्लाभट's picture

4 Feb 2015 - 11:42 am | वेल्लाभट

पेन हे नपुसकलिंगी नाम असून 'ते पेन' असतं. तो पेन नव्हे.

असंका's picture

4 Feb 2015 - 11:58 am | असंका

होय....पण मग त्याचं काय? चुकलंय का माझं कुठे लिहिताना ?

वेल्लाभट's picture

4 Feb 2015 - 12:10 pm | वेल्लाभट

बोरू जसा आपण मागे सोडला, तसाच पेनही मागे सोडायला लागेल....

श्रीरंग_जोशी's picture

4 Feb 2015 - 9:04 pm | श्रीरंग_जोशी

ते पेन असे काही ठिकाणच्या बोलीभाषेत म्हंटले जाते.

तो पेन, ती पेन्सिल हे देखील बर्‍याच ठिकाणी बोलले जाते. कुठलेही एक 'चुकीचेच' असा आग्रह करणे बरोबर नाही.

वेल्लाभट's picture

5 Feb 2015 - 12:27 pm | वेल्लाभट

'मला वाटतं' म्हणून हे बरोबर असं नाही म्हटलंय मी ! व्याकरण दृष्ट्या जे बरोबर आहे ते आहे; त्यात आग्रह कसला आला?

निर्जीव गोष्टींना लिंगप्रत्यय लावण्याची मराठी भाषेची जी लकब आहे त्यात नियम असे नाहीत. त्यामुळे तो पेन, ती पेन आणि ते पेन हे सर्वच व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. प्रमाण बोली आणि व्याकरणशुद्ध बोली हे दोन्ही एकच नव्हेत.

नाखु's picture

5 Feb 2015 - 1:50 pm | नाखु

"पेन" फूल चर्चा...

बॅटमॅन's picture

5 Feb 2015 - 7:04 pm | बॅटमॅन

कोटिच्या कोटि उड्डाणे!

जे जे सोपं आणि उपयोगी ते सुंदर असते . रेवती यांचं बरोबर आहे.

माणूस शेपटी वापरायची विसरला, अन येणाऱ्या पिढीतून शेपटी झाडून गेली, आजकाल माणूस लिहिणे विसरू लागलाय. त्याला लिहिण्यापेक्षा मोबाइल अथवा कम्प्युटरवर टायपिंग करणे सोपे आणि सवयीचे होत असल्याचा निष्कर्ष, अनेक लोकांची पाहणी करुन संशोधकांनी काढला आहे. लोक हाताने कमी लिखाण करतात त्यामुळेच कागद पेन्सिल आणि पेनच्या मागणीत लक्षणीय घट होत आहे. कागदावर लिहिण्यापेक्षा टायपिंग करणे लोकांना अंगवळणी पडले आहे. मजकूर अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट दिसतो. त्यात हवा तेव्हा आणि हवा तसा बदल करणे शक्य आहे. त्यामुळेच लिखाणापेक्षा मजकूर टाइप करण्याचे प्रमाण वाढत आहे. एकमेकांना महत्त्वाचे निरोप देण्यासाठी मेसेजिंग, चॅटिंग अथवा मेलिंग करणे खूपच सोयीचे आणि व्यवहार्य होऊ लागल्यामुळे लिखाणापेक्षा, टाइप करुनच संदेशांची देवाणघेवाणचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण भविष्यात आणखी वाढेल, असा दावा संशोधक करत आहेत. संशोधक सांगतात, त्यांच्या पाहणीनुसार, बहुसंख्य व्यक्ती ४१ दिवसांत एकदाच कागदावर लिखाण करतात. दर तीन पैकी एक व्यक्ती सहा महिन्यांत एकदाच कागदावर लिखाण करतात. चॅटिंग, इ-मेल, एसएमएस आणि एमएमएसच्या आजच्या युगात कागदावर पत्र लिहिणे दुर्मिळ झाले आहे.

कर्सिव्ह लिहा की आणि कसं, हस्ताक्षर सुवाच्य असणं महत्त्वाचं!! टाईप करायला केव्हाही शिकता येईल त्यात काय विशेष आहे. आणि हस्ताक्षर वळणदार व्हावं म्हणून वाया जाणार्‍या पानांच्या गठ्ठ्यांची कारणं दिली जात असतील तर हल्ली व्हाईटबोर्ड पाट्या मिळतात. त्यावर सराव करायला काहीच हरकत नसावी.

(ह. घ्या. पीजे केला आहे.)
वळणदार हस्ताक्षराने, काय नंबरप्लेटा रंगवायच्या का आता ?
(रच्याकने त्यासुद्धा स्टीकर वापरून देतात आजकाल)

>>वळणदार हस्ताक्षराने, काय नंबरप्लेटा रंगवायच्या का आता ?

हो.

संदीप डांगे's picture

3 Feb 2015 - 9:40 pm | संदीप डांगे

अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील स्पष्टतेवर मेंदूची जास्त क्षमता वापरता येईल

मानवी मेंदूला संगणकाच्या मर्यादित मेमरीप्रमाणे समजणे व वागवणे हा प्रचंड मूर्खपणाचा कळस आहे.

वाचणाऱ्याला समजले पाहिजे हा मुद्दा महत्वाचा असला तरी लिहिणाऱ्याने काय आणि कसे लिहिले पाहिजे हेसुद्धा महत्वाचे आहे. लेखन सोपे करण्याच्या संगणकीय पद्धती चांगल्याच आहेत, पण मुळात चांगले लिहायचे कसे याची जाण असल्याशिवाय हे सर्व व्यर्थ आहे. हस्ताक्षरात लिहिण्याच्या क्रियेला हमाली किंवा गरज नसलेलं काम समजणे म्हणजे व्यायामशाळेत जाउन वजनं उचलणे हे हमाली आहे असे म्हणण्यासारखे आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी काही शारीरिक क्रियांचा मानसिक परिणाम आपण नाकारू शकत नाही. उद्या मनातले प्रत्यक्ष स्क्रीनवर उमटायला लागेल किंवा त्याच्याही पुढे जाउन याच्या मनातले सरळ त्याच्या मनात उमटायला लागेल तेंव्हाही हाताने लिहिण्याची कला जोपासणे महत्वाचे आहे.

हाताने लिहिण्याने विचारांमध्ये सुसंगता, दिशा आणि स्पष्टता येते. आयपॅड वरील मशिनी लिखाणाची सवय अगदी सुरुवात पासून लागली तर हे फायदे हरवण्याची शक्यता आहे. आमचे जेजे चे आदरणीय सुलेखनकार आणि प्राध्यापक श्री क्षीरसागर सर यांनी एका व्याख्यानात भारतीय लिपी आणि त्यांचा बौद्धिक रित्या होणारा प्रभाव फार सुरेख सांगितला होता. हाताने लिहिण्याच्या क्रियेने लहान वयात मेंदूवर सकारात्मक परिणाम होतात. पण ते काम "काम" म्हणून न करता आनंद म्हणून केले तरच त्याचा फायदा होतो. आपल्या भारतीय लिपीच्या अभ्यासाचा आणि संगणकक्षेत्रात भारतीय मुलांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा त्यांनी सुरेख असा संबंध सांगितला. भारतीय लिपी अभ्यासल्याने लॉजिक मजबूत होते असे त्यांचे मत आहे.

बऱ्याचदा पूर्वसुरींनी काही एक अभ्यास करून एखादे कर्म सांगितले असते, कालौघात त्याच्यामागचा शास्त्रीय विचार मागे पडतो आणि मग त्या कर्माला कालबाह्य म्हटले जाते. असाच काहीसा प्रकार हस्तलेखनाच्या बाबतीत होऊ लागला आहे.

स्वत:च दुरुस्त होणारे शब्द, सुचवल्या जाणारे शब्द व इतर सोयी ह्या निव्वळ व्यावसायिक पातळीवर अतिशय उपयुक्त आहेत पण म्हणून शालेय जीवनापासून त्याचीच सवय करणे भविष्यासाठी घातक ठरू शकते. मी जेजे ला असताना कलाक्षेत्रात नुकताच संगणकीय वापर वाढला होता. प्रथमवर्षात अक्षरश: घाम फोडेल असा अभ्यासक्रम असतो. अगणित असाइनमेंट असायच्या ज्या हातानेच रंगवून काढायच्या असायच्या. त्यातली अक्षरे विविध फोन्ट प्रमाणे स्वतः गिरवावी लागत. आम्ही विद्यार्थी पार वैतागायचो. अरे हे तर संगणकावर आता उपलब्ध आहे ना मग आम्हाला कशाला हमाली करायला लावतात. जुनाट सरकारी पद्धतींना, अभ्यासक्रमाला तेंव्हा फार तळतळाट दिले. पण पुढे त्याचे महत्व कळले. रेखाटन डोक्याने करायचे असते संगणक एक माध्यम आहे. ते काम सोपे करते. पण काम कसे करायचे हे हाताने केल्याशिवाय मेंदूत उतरत नाही. मेंदूमध्ये एक विशिष्ट जडणघडण होते ती पेन्सिल, ब्रश घेऊन काम केल्याने.

मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही.

असंका's picture

3 Feb 2015 - 9:45 pm | असंका

या न्यायाने निरक्षर माणसांच्या मेंदूचा मूलभुत विकास झालेलाच नसतो असा निष्कर्श अगदी सहज काढता येइल....

संदीप डांगे's picture

3 Feb 2015 - 9:56 pm | संदीप डांगे

असा निष्कर्ष काढत असाल तर मग काहीच शिकायची गरज उरत नाही. सगळे उपजतच असते म्हटले कि झाले. डॉक्टरांनी प्रत्यक्ष रुग्ण तपासून औषध देण्याऐवजी फक्त संगणकीय रिपोर्ट बघून उपचार करावेत.

मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही.
हा मुद्दा आहे.

आपल्या लक्षात नाही आलं...ते वरचं माझं मत नाही. जर आपलं म्हणणं योग्य असेल, तर त्याचे कसे अर्थ निघू शकतात हे सांगायचा प्रयत्न होता. ते वाक्य चूक आहे हे मला माहितच होतं.

आपण जे लिहित आहात ते आपले मत आहे. त्याला काहीही आधार नाही. हे दाखवून देण्यासाठी मी निरक्षर माणसाचं उदाहरण दिलं होतं. जर आपण म्हणता ते सत्य असेल, तर निरक्षर माणसाच्या मेंदूचा मुलभूत विकास व्हायलाच नको. पण तसे काही आपल्या आसपास आढळून येत नाही. कसलीही अक्षर ओळख नसलेली पण अत्यंत तल्लख मेंदू असलेली अनेक माणसे या जगात होऊन गेलेली आहेत.

संदीप डांगे's picture

3 Feb 2015 - 11:50 pm | संदीप डांगे

तुम्ही अपवादाला नियम म्हणत आहात. हे तुमच्या लक्षात नाही आलं.

माझं मत तुमच्या मताशी सुसंगत नाही म्हणून तेवढ्यासाठी त्याला काहीही आधार नाही असे तुम्ही म्हणत आहात. तेव्हा एकंदर शिक्षण पद्धतीबद्दल आपले विचार जाणून घ्यायला आवडेल.

शिक्षित समाज आणि अशिक्षित समाज यांच्यामध्ये मुलभूत फरक असतोच. तो शिक्षण घेतल्यामुळेच येतो याबाबत आपले काही वेगळे मत नसावे. शिक्षणामुळे आमुलाग्र बदलेली माणसेही या जगात होऊन गेली आहेत. त्यांची संख्या निरक्षर हुशार माणसांपेक्षा हजारो पटीने जास्त आहे. माझे मत हे काही अभ्यासांती झालेले आहे त्यामुळे माझ्या मताला काहीही आधार नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही.

तुम्हाला मुद्दा समजला नसेल तर परत एकदा सांगतो: एखादी संकल्पना वापरणे यासाठी फारशी बुद्धी लागत नाही. बुद्धी लागते ती संकल्पना निर्माण करण्यात. मुलभूत माहिती नसेल तर नवीन संकल्पना निर्माण करता येणार नाहीत किंवा असलेल्या वापरता येणार नाही. मेंदूचा विकास हा त्या मुलभूत संकल्पना शिकून घेतल्याने होतो. तयार संकल्पना वापरल्याने नव्हे.

उदा: आमच्या क्षेत्रात आजकाल एखादा संगणकाचा जलद अभ्यासक्रम करून स्वत:ला ग्राफिक डिझायनर म्हणवून घेणारे बरेच येत आहेत. जाहिरात किंवा चित्र कलेच्या मुलभूत संकल्पना आत्मसात असल्याशिवाय हे अर्धवट वीर पुढे जाऊच शकत नाहीत. ६ ते ७ वर्षे हस्तचित्र ते संगणकीय चित्र असा प्रवास केलेल्या विद्यार्थ्यांसमोर हे ६ महिने संगणकाचा कोर्स केलेले टिकूच शकत नाहीत. त्यांना भले संगणकाचे परिपूर्ण ज्ञान असेल पण आमच्या लेखी ते निरक्षरच कारण त्यांना कलेचे मुलभूत ज्ञान नसते. याउलट एखादा संगणक निरक्षर पण कलाप्रवीण खूप पुढे जाऊ शकतो. पण त्यासाठी डोक्यातले विचार हाताने रेखाटण्याची कला आली पाहिजे.

ग्राफिक डिझाईन म्हणजे संगणक वापरून काढायचे चित्र अशी ज्यांची समजूत आहे त्यांनाच आयपॅड असल्यावर हस्तलेखनाची काय गरज असे वाटू शकते.

बाकी तुम्ही काही वेगळ्याच अर्थाने काही निष्कर्ष काढत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे.
तुमच्या आयडी वरून असे वाटते कि तुम्ही अकाउण्ट मध्ये असाल. तर तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, आजकाल संगणक वापरून ताळेबंद ठेवता येतो म्हणून माझ्यासारख्या ताळेबंद-निरक्षराला माझी अफाट तल्लख बुद्धी वापरून तो वापरता येईल का? त्यासाठी अकाउण्टच्या काही मुलभूत गोष्टी शिकणे अजिबात आवश्यक नाही का?

साक्षर निरक्षर वाद आलाच कुठून? उदाहरण एवढे ताणायचे नसते.....

अक्षर ओळख ही कल्पना आणि आपल्या मनातले विचार समोरच्यापर्यंत पोचवणे यासाठी आवश्यक असलेले लेखन एवढे मुलभूत ज्ञान पुरेसे आहे. लिखाण हे माध्यम आहे.ते कशा पद्धतीने साध्य केले जाते याने काय फरक पडतो? हाताने लिहा किंवा टाइप करा?

एकदा अक्षर ओळख झाली की फक्त हाताने न लिहिता टाइप केले तर हे मुलभूत ज्ञान मुलभूत न रहाता वरवरचे होते का?

केवळ हाताने पेन वापरून लिहू शकलो तरच आपल्याला मुल्भूत ज्ञान आहे असे म्हणता येइल का? जास्ती कष्ट घेणे म्हणजे मूलभुत ज्ञानाची हमी झाली का?

(आपण आठ वर्षे वयापर्यंतच्या मुलांबद्द्ल बोलत आहोत...उच्चशिक्षणाबद्द्ल नाही. प्रत्येक प्रकारच्या उच्च शिक्षणासाठी लागणार्‍या मुल्भूत गोष्टी वेगवेगळ्या असतात. मला कधीही कुणीही हस्ताक्षराबद्द्ल अवाक्षर विचारले नाही. पण क्लास लावून शिकलेल्या टायपिंगचा मला आजही फायदा होतो.)

नया है वह's picture

20 Apr 2015 - 4:40 pm | नया है वह

+१

पण निरक्षर मानवजातीनेच हस्तलिखाणाचा शोध लावला नं ? म्हणजेच त्यांच्या (हस्तलिखाण आधीच्या)मेंदूचा मुलभूत विकास, झालेला नं ?

श्रीरंग_जोशी's picture

3 Feb 2015 - 9:46 pm | श्रीरंग_जोशी

(हस्त) लेखनकौशल्य हे कमी महत्वाचे समजले जाऊ नये असे वाटते. बाकी काळाच्या महिम्यापुढे आपण फारसे काही करू शकत नसतो.

कातळ, भुर्जपत्रेे,कागद अन आता संगणक. काही काळातच टचपॅड वर स्व-हस्ताक्षरात लिहिने ही नेहमीचे हाईल.

सुबोध खरे's picture

4 Feb 2015 - 10:04 am | सुबोध खरे

@ डांगे साहेब "मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही."
असहमत.
जन्मजात हात नसलेल्या माणसाचा मेंदू अविकसित असतो याला कोणताही शास्त्राधार नाही. फारतर हाताचे स्नायुंची वाढ आणि विकास चांगला होण्यासाठी हाताने लिहिणे आवश्यक असेल. परंतु कोणतीही लिपी लिहू न शकणारा सोनार किंवा घड्याळजी याच्या स्नायूंचा विकासहि तितकाच उत्तम होतो. निरक्षर माणसेसुद्धा उत्तम चित्रकार असतात. किंबहुना एका शतकापूर्वी गावोगावी उत्सवात असे रंगकाम चित्रकला करणारे हे अशिक्षीतच असत.
"हाताने लिहिण्याने विचारांमध्ये सुसंगता, दिशा आणि स्पष्टता येते".असे नसून आपण जो विचार करता आहात त्याच्यात सुसूत्रता येण्यासाठी आपण अगोदर काय लिहिले आहे त्याचा मेंदूला परत आढावा घेता ( visual feedback) आल्यामुळे तसे होते. हि क्रिया संगणकावर लिह्ल्यामुळेसुद्धा होत असतेच. ज्या माणसाची भाषिक मौखीक बुद्धिमत्ता चांगली असते त्याला एकटाकी असे उत्तम लिहिता येते कारण वरील म्हटल्याप्रमाणे visual feedback ची गरज त्याला भासत नाही.
मुळात बुद्धिमत्तेचे ९ प्रकार सांगितले आहेत. आपण फक्त एकच आहे असे गृहीत धरतो. सर्वसामान्यपणे तार्किक आणि गणिती(logical-mathematical) बुद्धिमत्ता असलेल्याला बुद्धिमान समजले जात असे.( म्हणजे गणितात हुशार तोच मुलगा हुशार)परंतु जसे जसे संशोधन होत आहे तसे तसे बुद्धिमत्तेचे प्रकार समजून येत आहेत. आपण जर खालील दुव्यावर नजर टाकलीत तर आपल्याला तसे लक्षात येईल.
http://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences
उलट जगभरातील इतिहास हेच सांगत आला आहे कि इंटर/इंट्रा पर्सनल बुद्धिमत्ता असलेले लोक नेते/राजकारणी होऊन गणिती बुद्धिमत्तेच्या लोकांना आपले नोकर म्हणून वागवत आले आहेत.
आपल्या सरांनी जे सांगितले आहे ते (visual spatial) दृष्टी आणि त्रिमित बुद्धिमत्तेच्या लोकांना आवश्यक असावे(असे मी म्हणतो आहे कारण मला त्यांनी नक्की काय म्हटले आहे ते माहित नाही/ कळले नसावे). हि बुद्धिमत्ता असलेल्या लोकांना ( उदा चित्रकार, शिल्पकार) नजरेत मावत नसलेल्या गोष्टी उत्तम रित्या दृष्टीक्षेपात येऊ शकतात आणि त्याची निर्मिती करता येते. उदा रस्त्यावर १२ क्ष १२ फुटाचे हनुमान किंवा शंकराचे चित्र काढणारा पासून वेरूळ च्या कैलास लेणी एका प्रचंड शिलाखण्डातून खोदून काढणारे शिल्पकार.
मेंदूच्या विकासाला हाताने लिहिण्याची गरज आहे हे मान्य करणे कठीण आहे. अर्थात आपण याबद्दल अधिक काही माहिती दिलीत तर मी माझे मत बदलण्यास तयार आहे.
ता. क. -- बुद्धिमत्तेचे प्रकार हा विषय अतिशय गहन असून मला तो थोडासा सुद्धा समजला आहे असा माझा दावा नाही. परंतु हा विषय अतिशय रसभरीत आहे आणि जितके वाचावे तितके आपल्या आजूबाजूच्या वातावरणा बद्दल आणि माणसांबद्दल समज येण्यास मदत होते.

नया है वह's picture

20 Apr 2015 - 4:44 pm | नया है वह

१००% सहमत

पैसा's picture

3 Feb 2015 - 9:53 pm | पैसा

मी शाळेत असताना आम्हाला कर्सिव्ह रायटिंग शिकवले होते. पण त्याने अक्षर बिघडते, त्यामुळे सरळ साधी लिपी वापरा असे शिक्षक लोक स्पष्ट सांगत. मला रनिंग लिपीमधे लिहिलेले अक्षर कधीच सुंदर वाटले नाही. मराठी मोडी आणि बालबोध अक्षरांमधे सौंदर्यात जो फरक दिसतो, तसाच इंग्रजीच्या साध्या आणि कर्सिव्ह लिप्यांमधे दिसतो. खरे तर रनिंग लिपीमधे जास्त फास्ट लिहिता येते ही गोष्टही कधी पटली नाही.

पुर्वी संगीत नाटके रात्र रात्र चालत असत....आता ३ तास चालली किंवा चालली तरी खुप.....सध्यातरी वेगाने कमी होत जाणारी झाडे पहाता....लिहिण्याऐवजी वेगवेगळी साधनेच वापरली जातील भविष्य़़काळात....कागद बनवण्यासाठी झाडेच उरणार नाहित.

इथे हस्तलेखन आणि टंकनाची तुलना चालू आहे. पण जग "हँडरायटिंग टू टेक्स्ट / हँडरायटिंग रिकग्निशन" च्याही पुढच्या पायरीवर पोचत आहे. सद्या बोलणे अचूकपणे लेखनात परावर्तीत (स्पीच टू टेक्स्ट) करणारी उत्तम अ‍ॅप्स तयार झाली आहेत/होत आहेत. ती जास्त जास्त अचूक होऊ लागली आहेत आणि वापरात येऊ लागली आहेत.

माझा स्वतःचा अनुभव असा आहे की काही सुचू लागले तर हाताने कागदावर लिहिणे (जे मी टंकनापेक्षा जास्त वेगाने करतो) बर्‍याचदा माझ्या मनात तयार होणार्‍या वाक्यांच्या वेगाशी बरोबरी राखू शकत नाही. मग मुद्दे विसरू नये अथवा विचारशृंखला तुटू नये म्हणून मी फक्त मुद्दे क्रमाने कागदावर खरडत जातो आणि लिखाणाचा एखादा तर्कसंगत तुकडा पुरा झाला की परत मागे येऊन वाक्यरचना करतो. माझ्यासारख्या लोकांसाठी "स्पीच टू टेक्स्ट" अ‍ॅप्स वरदान आहेत.

बोलणे साठवून ठेऊन (डिक्टेशन) नंतर ते ऐकून टंकणे हे फक्त कार्यालयीन कामासाठी सेक्रेटरी असते तेव्हा ठीक आहे. कारण खाजगी कामाला टंकनिका परवडत नाही आणि स्वतः टंकावे तर माझ्या मंद टंकनगतीमुळे प्रचंड कंटाळवाणे वाटते ! त्यापेक्षा स्पीच टू टेक्स्ट अ‍ॅप वापरून नंतर त्यामधे जरूर त्या सुधारणा करणे कितीतरी जास्त सोपे आहे *.

तंत्रज्ञान सतत नविन सुविधा निर्माण करतच राहणार आहे. त्यातील ज्या जुन्या सुविधांपेक्षा जास्त सोईच्या/आकर्षक वाटतील त्यांना लोक स्विकारत जातील आणि ज्या तशा वाटणार नाहीत त्या तंत्रदृष्ट्या कितीही पुढारलेल्या असल्या तरी दुर्लक्षीत राहतील.

* : असे मराठी सपोर्ट करणारे अ‍ॅप मिपात अंतर्भूत झाले काय मजा येईल नाही का ?! :)

पिशी अबोली's picture

4 Feb 2015 - 12:14 am | पिशी अबोली

मला शाळेत कर्सिव शिकवलं होतं. मला ते खूप सोयीचं पडतं पटापट काही लिहायला. पण बऱ्याच लोकांना कर्सिव वाचता येत नाही. त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात.

बाकी या प्रश्नसंदर्भात कोणताही संशोधनात्मक अभ्यास मला माहीत नाही, त्यामुळे फारसं बोलता येणार नाही, पण मला व्यक्तिशः हाताने लिहिता येणं आवश्यक असावं असं वाटतं...

वेल्लाभट's picture

4 Feb 2015 - 12:12 pm | वेल्लाभट

पण माझं मुळातच मराठी अक्षर असं यायचं की शिक्षकाला कर्सिवच वाटायचं. ळोळ !

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Feb 2015 - 12:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

अश्या अक्षराचे वर्णन आमचे शिक्षक, "याच्या वहीच्या पानावर कोंबडी चिखलानी भरलेल्या पायांनी नाचली" असे करायचे :) ;)

वेल्लाभट's picture

4 Feb 2015 - 12:19 pm | वेल्लाभट

चेंज इज इनेविटेबल. कशाला तुम्ही चेंज मानून स्वीकारता, यावर सगळं अवलंबून आहे फक्त.

वेल्लाभट's picture

4 Feb 2015 - 12:24 pm | वेल्लाभट

मोबाईल घ्यायला गेलो होतो. कीपॅड वाला हवा म्हटलं; क्वर्टी. आजकल वो सब नही चलता म्हणाला. मी म्हटलं मला तसाच हवाय. मुझे चलता है, और वही अच्छा लगता है. माझ्याबरोबर घ्यायला आलेली मंडळीही 'हं आजकाल टचस्क्रीनचाच जमाना आहे' म्हणून री ओढत होती.

आता टचस्क्रीनच्च्च फोन असणार हा बदल त्यांनी, किंबहुना दुनियेनी स्वीकारला त्यामुळे तो इनेविटेबल झाला. जर तो स्वीकृत झाला नसता, क्वर्टीची मागणी कमी झाली नसती तर कदाचित आज बाजारात क्वर्टी कीपॅड लुप्त झालंय ते झालं नसतं.

टीप - काळंबेरं ने काढलाय म्हणे क्वर्टी अँड्रॉईड फोन. जे दुर्मिळ ते महाग या नियमानुसार आता त्याची किंमत ३०००० इतकी प्रचंड आहे.

पैसा's picture

4 Feb 2015 - 12:35 pm | पैसा

स्वस्तातला चालत असेल तर Karbonn A51Q आणि Karbonn A100 हे बघा. २५०० च्या आसपास मिळतात.

वेल्लाभट's picture

4 Feb 2015 - 4:14 pm | वेल्लाभट

पण हे जे आहेत ते अगदीच म्हणजे.....
फक्त कीपॅडच घेतोय असं वाटायचं. बाकी 'ढ' फोन आहेत ते.

आय स्टिल मिस माय नोकिया ई ७१

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Feb 2015 - 12:44 pm | कैलासवासी सोन्याबापु

हे बरं आहे!!! मायला!! मी नर्सरी पासून कर्सिव शिकलो! पण कर्सिव मधे लिहिल्या मुळे माझा माइक्रोप्रोसेसर चा पेपर बैक ठेवला विद्यापीठान!!! मास्तर म्हणाला आइच्यान तू लेका ब्लॉक मधे लिवत जा! म्हणले बरे! विंटर ला यूनिवर्सिटी टॉप घेतलेला मी एकटा होतो! काय करणार!! आमच्या मास्तर न एक भारी पाठ पढावला!!! परिक्षकाचा ईगो डिस्टर्ब होइल असले कधीच पेपरात लिहू नकोस! तुला फ़क्त पास व्हायचे आहे! ज्ञानाचा बाजार जॉब मार्केट मधे मांड!! काय बोलणार!!!

अनुप ढेरे's picture

4 Feb 2015 - 6:24 pm | अनुप ढेरे

हा हा.. हा धडा बारावीलाच शिकलो. आधी कर्सिव लिहायचो. मास्तराने सांगितलं पेपर तपासणार्‍याला ते वाचता येणार नाही. सुट्ट सुट्ट ल्हि. परिक्षेच्या ३ महिने आधी अनेक वर्षांची सवय मोडावी लागली.

वगिश's picture

4 Feb 2015 - 9:08 pm | वगिश

तुम्ही ELECTRONICS वाले का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Feb 2015 - 11:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

नाही हो मी कंप्यूटर साइंस (बीसीएस) चा (नावापुरता) आम्हाला इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा असे, स्पेसिफिकली एक्स ८६ फॅमिली प्रोसेसर प्रोग्रामिंग वगैरे, शिवाय बारावी ला वोकेशनल इलेक्ट्रॉनिक्स!! इतकेच भांडवल ! इंजिनियर व्हायची लायकी नव्हती!! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Feb 2015 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही. हा मुद्दा आहे.

या मुद्द्याला जीवशास्त्रिय पुरावा नाही.

मानवाने वेद-उपनिषदे, इ लेखन करायला सुरुवात होण्याच्या आधी निर्माण केली आणि काही हजार वर्षे केवळ पाठांतर/मौखीक पद्धती वापरून भूर्जपत्रांवर लिहीण्याची प्रथा येईपर्यंत बर्‍याचश्या प्रमाणात सुव्यवस्थित ठेवली.

शिकताना आपण वारंवार वापरलेल्या गोष्टी/पद्धती सहाजिकपणे नंतर आपल्या अंगवळणी पडतात, सोप्या वाटतात आणि त्यांच्याशी आपली जवळीक निर्माण होते. अश्या रितीने निर्माण झालेल्या पूर्वग्रहावर मात करून, केवळ नविन गोष्टींकडेच नाविन्याने/अलिप्तपणे पाहणे नाही तर परिचयाच्या गोष्टींकडेही तसेच पाहणे, हे आपले शिक्षण/प्रगती पुढे चालू राहण्यासाठी आवश्यक असते... यालाच "आऊट ऑफ बॉक्स" विचार करणे म्हणतात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Feb 2015 - 6:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हातानी लिहिलेलं दिर्घ काळ लक्षात रहातं असा स्वानुभव आहे. मला मराठी आणि इंग्रजीमधे अजुनही हातानी लिहायला जास्त आवडतं.

मला मराठी आणि इंग्रजीमधे अजुनही हातानी लिहायला जास्त आवडतं.

+१

बोका-ए-आझम's picture

5 Feb 2015 - 12:07 am | बोका-ए-आझम

हाताने लिहिताना थोडीफार एकाग्रता लागतेच.कीपॅडवर टाईप करतानासुद्धा लागते पण हाताने लिहिताना आपण काय लिहितोय याकडे बघावं लागतं आणि डोळे आणि हात यांचं coordination होतं. त्यामुळे लक्षात राहात असावं.

आजानुकर्ण's picture

5 Feb 2015 - 12:22 am | आजानुकर्ण

हस्तलिखितामुळे मेंदूची वाढ होते वगैरे बाबीवर माझा विश्वास नाही. पण टॅबलेट व कॉम्प्युटरसारख्या साधनांच्या अतिवापराने डोळे लवकर खराब होण्याची शक्यता निश्चितच आहे. मानवी डोळे हे संगणक-टॅबलेटच्या अतिवापरासाठी सक्षम नाहीत असे मला वाटते. विशेषतः ज्यांना दर्जेदार स्क्रीन घेणे परवडणार नाही त्या लोकांना हानीकारक रिफ्रेश रेट, पिक्सेलेटेड डिस्प्ले वगैरे गोष्टींमुळे डोळ्यांना जास्त ताण पडणार हे उघड आहे. शिवाय महाग डिस्प्ले हे डोळ्यांसाठी चांगले असतीलच असे नक्की सांगता येत नाही.

शिवाय पुस्तके जवळ धरुन वाचताना होणाऱ्या त्रासापेक्षा असे टॅबलेट्स वगैरे जवळ धरुन वाचल्याने होणारा त्रास नक्कीच जास्त असणार आहे.

वेल्लाभट's picture

5 Feb 2015 - 12:30 pm | वेल्लाभट

हस्तलिखितामुळे मेंदूची वाढ होते वगैरे बाबीवर माझा विश्वास नाही.

तुम्ही डॉक्टर आहात?

वाचीव माहिती तरी असंच सांगते की याने मेंदू-हात-डोळे यांच्यातील सुसूत्रता बळावते.

आजानुकर्ण's picture

5 Feb 2015 - 7:01 pm | आजानुकर्ण

तुम्ही डॉक्टर आहात?

मी डॉक्टर आहे असं कुठं म्हटलंय. माझा विश्वास नाही एवढंच म्हटलंय. विश्वास असायला/नसायला डॉक्टर असण्याची आवश्यकता आहे काय?

वाचीव माहिती तरी असंच सांगते की याने मेंदू-हात-डोळे यांच्यातील सुसूत्रता बळावते.

याने म्हणजे कशाने? आणि तुम्ही डॉक्टर आहात काय? :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Feb 2015 - 7:55 am | कैलासवासी सोन्याबापु

वरील सर्व प्रतिसाद वाचले, हस्तलिखित लिपी बाद करून फ़क्त कंप्यूटर टाइपिंग बारक्या पोरांस शिकवणे हे रास्त अन एक स्वगतार्ह पाऊल आहे इथपासून, ते हस्तलिखित लिपी अक्षरे, ती शिकण्याची प्रक्रिया इत्यादी मस्तिष्क विकासासाठी गरजेचे आहे इथपर्यंत वाचले, नवी कल्पना आहे! पण वरती "दौत अन बोरू चा टाक" चं जे एक उदहारण आले आहे ते पण पटले,तरीही मला वाटते लिखित लिपी,कागद पेन चा स्पर्श ह्यांची गरज आहेच! एक व्यवहारीक मुद्दा म्हणून हस्तलिखित मोडीत काढून टाइपिंग प्रचलित करणे ला माझा प्रत्यव्याय नाही! पण मी म्हणतो हस्तलिखित एक "relaxing art and craft" म्हणून एक कला म्हणून जिवंत ठेवल्यास काय हरकत आहें?

उदा. आज आपल्या कोणाच्याच घरी माती ची गाडगी मडकी वापरली जात नाहीत, तरीही एक छन्द म्हणुन एक कलाप्रकार म्हणून तरी आपल्या शहरी मध्यमवर्गा ने "सिरेमिक मॉडलिंग" वगैरे म्हणून जसा एक्सेप्ट केलाय तसा!! शिवाय हे टाइपिंग कंपल्सरी पेक्षा "ऑप्शनल" असावे असे वाटते. टेक्निकल स्किल म्हणून टाइपिंग त्या पोरांस करावे ज्यांचे व्यवसाय समुपदेशन (करियर काउंसलिंग) निकाल तांत्रिक करियर ला अनुकूल असे आलेत, लहानपणा पासून कलात्मक कल असलेल्या पोरांस हे कंपल्सरी करणे इतकेसे नाही रुचले! (अर्थात हे माझे स्वतःचे गट फीलिंग आहे ते खरेच असेल असा आग्रह नाही).

अवांतर :-

ह्या टाइपिंग कंपल्सरी चा फ़ायदा सर्वाधिक जर कोणास झाला तर तो डावखुरी अन डिसलेक्सिया असलेल्या पोरांस होईल असे मना पासून वाटते!टाइपिंग मुळे डाव-या मुलांस लेवल प्लेयिंग ग्राउंड मिळेल! कारण जगातल्या मोजक्या (उर्दू, फारसी, हिब्रू अन आर्माइक) लिपी आहेत ज्या उजवीकडून डावी कड़े लिहिल्या जातात अन डाव-यांच्या नैसर्गिक लेखन प्रवाहात (flow of righting) मधे नीट बसतात उर्वरीत लिपी (रोमन, देवनागरी, पूर्वे कडच्या चित्रलिपी इत्यादी लिहिताना लेखन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पेन/पेंसिल चालवावी लागते, ह्यच्यामुळे एक होते, लिहायला बसताना एकतर वही किंवा तगड पुर्ण वाकडे करून लिहत बसावे लागते किंवा हात पूर्ण उलटा करून उजवे लिहितात त्या लेखन शैली पोस्चर इत्यादी ला अलाइन करून घेऊन लिहावे लागते, परिणाम लेखन गती वर विपरीत होतो, मी स्वतःचा वारासाहक्काने (inheritance) ने डावरा आहे (आई मी एक मामा मावशी मावशी चा मुलगा बाबांचे २ काका ) मी लहानपणी ह्या सर्वाचा स्वानुभव घेतला आहे ! वेडेवाकडे तगड करून लिहित बस्ल्यामुळे इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त वेळ invigilator माझी तपासणी घेत असे, हे अधिक मुळातच कमी असलेला लेखन स्पीड हे मिळुन फ्यूचर चा बैंड वाजवत असत!! अर्थात लहानपणी फ़ळ्यावरचे स्टडी मटेरियल उतरवुन घेताना पण हा मुद्दा येत असे "झाले का रे लिहून" ला कोरस "होsss" म्हणत असे अन मोजकी डावरी पोरे "बाई २ मिनिटे" करत काकुळती ला येऊन! "फ़ास्ट लिहा" हा बाईंचा कायमचा दट्या अन पुसलेले फ़ळे ह्यच्यामुळे खुप नुकसान होते!!!

अर्थात ह्या टाइपिंग कंपल्सरी मुळे ह्या लोकांस एक लेवल प्लेयिंग ग्राउंड मिळेल असा विश्वास वाटतो!

सुबोध खरे's picture

6 Feb 2015 - 10:09 am | सुबोध खरे

सहमत

पगला गजोधर's picture

6 Feb 2015 - 1:06 pm | पगला गजोधर

@सोन्याबापु , सर्व बाबतीत सहमत.
फक्त

'हस्तलिखित एक "relaxing art and craft" म्हणून एक कला म्हणून जिवंत ठेवल्यास काय हरकत आहें? '

ही गोष्ट ऑलरेडी आहे, कॅलीग्राफी म्हणून.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Feb 2015 - 1:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

कैलीग्राफी बद्दल मला पण माहिती आहेच गजोधर भाऊ, मी कैलीग्राफी ला अजुन simplify करण्या विषयी बोललो! क्रिएटिव स्क्रिबलिंग असते तसे! स्ट्रेस बस्टर म्हणून जसे काही लोक फिंगर पेंटिंग क्ले मॉडलिंग वापरतात तसे! नियममुक्त, बेफाम रेघा असतात तशीच अक्षरे!!!

पगला गजोधर's picture

6 Feb 2015 - 1:35 pm | पगला गजोधर

शॉर्टह्यांड ?